Micromax - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 19 Mar 2021 11:26:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 चायनीज ब्रँड्सना टक्कर देण्यास आला माइक्रोमॅक्सचा अजून एक स्वस्त स्मार्टफोन Micromax In 1 https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-1-launched-in-india-price-specifications-features-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-1-launched-in-india-price-specifications-features-sale-offer/#respond Fri, 19 Mar 2021 11:26:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10359 फोटोग्राफीसाठी Micromax In 1 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे.

The post चायनीज ब्रँड्सना टक्कर देण्यास आला माइक्रोमॅक्सचा अजून एक स्वस्त स्मार्टफोन Micromax In 1 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Micromax ने आज भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत अजून एक नवीन स्मार्टफोन Micromax In 1 लॉन्च केला आहे. मोबाईल बाजारात पुन्हा प्रवेश केल्यानंतर हा माइक्रोमॅक्सने लॉन्च केलेला तिसरा स्मार्टफोन आहे. खासकरून, Xiaomi, Realme, OPPO आणि Vivo सारख्या चायनीज ब्रँड्सना टक्कर देण्याचा प्रयत्न करत असलेल्या माइक्रोमॅक्सला भारतीयांचा प्रतिसाद पण मिळत आहे. भारतीयांचा विश्वास कायम ठेवत या देशी कंपनीने आज Micromax In 1 10,499 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला आहे जो 6 जीबी रॅम, 5000एमएएच बॅटरी आणि 48एमपी कॅमेरा अश्या शानदार फीचर्ससह येतो.

लुक व डिजाईन
Micromax In 1 कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला आहे. फ्रंट पॅनलवर डिस्प्लेच्या तीन कडा बेजललेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला पंच-होल देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फोनच्या बॅक पॅनलवर डावीकडे चौकोनी आकाराचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये तीन सेंसर वर्टिकली आहेत तसेच बाजूला फ्लॅश लाईट आणि सेंसर डिटेल आहेत.

माइक्रोमॅक्स इन 1 फोनच्या बॅक पॅनलवर फिजिकल रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच पॅनलवर खाली ‘In’ ब्रँडिंग आहे. या फोनचा रियर पॅनल बर्‍याच अंशी Realme C सीरीजच्या डायमंड कट डिजाईनशी मिळता जुळता दिसतो. Micromax In 1 च्या उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर व पावर बटन देण्यात आला आहे तसेच सिम स्लॉट उजव्या पॅनलवर आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स
Micromax In 1 कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला गेला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.67 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी हा 2.5डी ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.4 टक्के आहे तसेच डिस्प्ले 440निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतात.

माइक्रोमॅक्स इन 1 एंडरॉयड 10 ओएसवर लॉन्च केला गेला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसेरसह मीडियाटेकच्या 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या हीलियो जी80 चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी हा फोन एआरएम जी52 जीपीयूला सपोर्ट करतो. भारतात हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्यात 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी Micromax In 1 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची थर्ड मॅक्रो लेंस देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Micromax In 1 एक डुअल सिम फोन आहे जो डुअल वीओवाईफाई व वीओएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससोबत सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी माइक्रोमॅक्स इन 1 5,000एमएएच बॅटरीसह बाजारात आला आहे जो 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे कि हा फोन एका फुल चार्जमध्ये 18 तासांचा वीडियो प्लेबॅक देऊ शकतो.

प्राइस व सेल
Micromax In 1 चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीने 10,499 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तसेच फोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. या फोनचा पहिला सेल 26 मार्च पासून कंपनीची वेबसाइट व शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर सुरू होईल. पाहिल्या सेल मध्ये माइक्रोमॅक्स इन 1 चे दोन्ही वेरिएंट्स 500 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येतील.

The post चायनीज ब्रँड्सना टक्कर देण्यास आला माइक्रोमॅक्सचा अजून एक स्वस्त स्मार्टफोन Micromax In 1 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-1-launched-in-india-price-specifications-features-sale-offer/feed/ 0
स्वस्त देशी स्मार्टफोन Micromax IN 1 चे स्पेसिफिकेशन लॉन्चपूर्वी आले समोर, Xiaomi-Realme शी होईल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/micromax-1-listed-on-geekbench-revealing-android-10-6gb-ram-5000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/micromax-1-listed-on-geekbench-revealing-android-10-6gb-ram-5000mah-battery/#respond Wed, 17 Mar 2021 15:24:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10349 ई-कॉमर्स वेबसाइटवर In 1 फोन भारतातील नवीन ब्लॉकबस्टर असल्याचे बोलले जात आहे.

The post स्वस्त देशी स्मार्टफोन Micromax IN 1 चे स्पेसिफिकेशन लॉन्चपूर्वी आले समोर, Xiaomi-Realme शी होईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Micromax In 1 स्मार्टफोन 19 मार्चला भारतीय बाजारात लॉन्च होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. फोन लॉन्चसाठी काही दिवस बाकी आहेत, पण यासंदर्भात माहिती समोर येऊ लागली आहे. या फोनची आतुरतेने वाट पाहत असलेल्या लोकांसाठी एक नवीन बातमी समोर आली आहे. फोन गीकबेंचवर स्पॉट केला गेला आहे जिथे फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. तसेच या लिस्टिंगपूर्वी हा फोन ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर लिस्ट झाला आहे जिथे स्मार्टफोनची डिजाइन दिसली होती.

गीकबेंच लिस्टिंग
Geekbench 5 लिस्टिंगनुसार माइक्रोमॅक्स In 1 MT6769V/CT SoC सह सादर केला जाईल जो Helio G80 नावाची एक बजेट गेमिंग एसओसी आहे. इतकेच नव्हे तर फोनमध्ये 6GB रॅम पण दिला जाईल. त्याचबरोबर गीकबेंच लिस्टिंगमध्ये सिंगल-कोर आणि मल्टीर कोर मध्ये स्कोर क्रमश: 361 आणि 1318 मिळाले आहेत. तसेच, फोन Android 10 सह येईल.

फ्लिपकार्ट लिस्टिंग
ई-कॉमर्स वेबसाइटवर In 1 फोन भारतातील नवीन ब्लॉकबस्टर असल्याचे बोलले जात आहे. इतकेच नव्हे तर लिस्टिंगमध्ये याच्या वैशिष्ट्यांना बॉलीवुड चित्रपटांची नावे देण्यात आली आहेत, जसे की गेमिंगचे गली बॉय, डिस्प्लेचे डॉन, कॅमेऱ्याचे खिलाडी, डेटाला दबंग आणि स्टाइलला सुपरस्टार. फ्लिपकार्ट लिस्टिंग व्यतिरिक्त, XDA डेवलपरने पण या फोनच्या स्पेसिफिकेशनची माहिती ऑनलाइन लीक केली होती.

डिजाइन
डिवाइसच्या मागच्या पनल मध्ये X पॅटर्न असेल. तसेच मागे आयताकृती कॅमेरा मॉड्युलसह एक फिंगरप्रिंट सेंसर असेल. तसेच फ्रंटला फोनमध्ये मध्यभागी पंच-होल कॅमेरा असेल, त्यामुळे फोनच्या तिन्ही कडा बेजललेस असतिल. तसेच फोनच्या खाली रुंद चिन पार्ट दिसत आहे. त्याचबरोबर स्पष्ट झाले आहे की फोन ब्लू आणि सिल्वर कलर ऑप्शनमध्ये लॉन्च होईल.

स्पेसिफिकेशन्स
XDA डेवलपर तुषार मेहताने दिलेल्या माहितीनुसार फोनमध्ये 6.67 इंचाचा IPS LCD पॅनल दिला जाऊ शकतो, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1080×2460 पिक्सल असेल. तसेच, फोन 6जीबी पर्यंतच्या रॅम आणि 128जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. प्रोसेसरबद्दल बोलायचे तर हा फोन मीडियाटेक हीलियो G80 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो.

फोटोग्राफीसाठी फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्याचा प्राइमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असेल आणि दोन 2 मेगापिक्सलचे कॅमेरा सेंसर मिळतील. फोनमध्ये सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. तसेच फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जिंगसह येऊ शकते.

The post स्वस्त देशी स्मार्टफोन Micromax IN 1 चे स्पेसिफिकेशन लॉन्चपूर्वी आले समोर, Xiaomi-Realme शी होईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/micromax-1-listed-on-geekbench-revealing-android-10-6gb-ram-5000mah-battery/feed/ 0
स्वदेशी 5G फोन घेऊन येत आहे Micromax, असेल पूर्णपणे Made In India, किंमत पण असेल खूप कमी https://www.91mobiles.com/marathi/made-in-india-micromax-5g-phone-to-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/made-in-india-micromax-5g-phone-to-launch-soon/#respond Thu, 11 Feb 2021 12:12:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9999 कंपनी को-फाउंडरने सांगितले आहे कि माइक्रोमॅक्सने आपल्या 5जी इनेबल्ड मोबाईल फोनवर काम सुरु केले आहे आणि बंगलोर मधील कंपनीच्या आर अँड डी सेंटर मध्ये हा बनवला जात आहे.

The post स्वदेशी 5G फोन घेऊन येत आहे Micromax, असेल पूर्णपणे Made In India, किंमत पण असेल खूप कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन टेक ब्रँड Micromax ने मोठ्या अंतरानंतर गेल्यावर्षी पुनरागमन केले आहे. कंपनीने एकसाथ दोन स्मार्टफोन Micromax In Note 1 आणि In 1b लाॅन्च केले होते जे लो बजेट मध्ये आले आहेत. बाजारात हिट झाल्यानंतर माइक्रोमॅक्स आता काही नवीन आणि मोठे करण्याचे प्रयत्न करत आहे. माइक्रोमॅक्स भारतातील पहिली मोबाईल कंपनी बानू शकते जी Made In India 5G स्मार्टफोन घेऊन येईल.

Micromax 5G phone ची माहिती कोणत्याही लीक किंवा मीडिया रिपोर्टने नाही तर स्वतः कंपनीचे को-फाउंडर राहुल शर्मा यांनी दिली आहे. माइक्रोमॅक्सने ‘लेट्स टाॅक इंडिया के लिए’ नावाने यूट्यूबवर एक टाॅक सेशन आयोजित केला होता ज्यात मोबाईल युजर्स आणि माइक्रोमॅक्स फॅन्सने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली होती. दरम्यान एक युजरच्या प्रश्नाला उत्तर देत राहुल यांनी मान्य केले आहे की माइक्रोमॅक्स 5जी फोनची निर्मिती करत आहे.

कंपनी को-फाउंडरने सांगितले आहे कि माइक्रोमॅक्सने आपल्या 5जी इनेबल्ड मोबाईल फोनवर काम सुरु केले आहे आणि बंगलोर मधील कंपनीच्या आर अँड डी सेंटर मध्ये हा बनवला जात आहे. राहुल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार माइक्रोमॅक्स लवकरच आपला 5जी स्मार्टफोन बाजारात घेऊन येईल आणि हा मोबाईल फोन मेड इन इंडिया असेल. 5जी फोन व्यतिरिक्त माइक्रोमॅक्स वायरलेस इयरफोन आणि स्पीकर्स सोबतच इतर स्मार्ट ऍक्सेसरीज पण मार्केट मध्ये लाॅन्च करणार आहे.

बाजारातील स्मार्टफोन्सची किंमत

Micromax IN 1b कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 2 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम व 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. फोनच्या 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,999 रुपये आहे तर फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे.

Micromax In Note 1 ने पण दोन वेरिएंट्स मध्ये मार्केट मध्ये एंट्री घेतली आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम तसेच 64 जीबी स्टोरेजवर लॉन्च केला गेला आहे तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. फोनच्या 4 जीबी रॅम वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे तसेच मोठा 6 जीबी रॅम वेरिएंट माइक्रोमॅक्सद्वारे 12,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. दोन्ही फोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या ऑफिशियल साइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

माइक्रोमॅक्स इन नोट 1 व्हिडीओ

The post स्वदेशी 5G फोन घेऊन येत आहे Micromax, असेल पूर्णपणे Made In India, किंमत पण असेल खूप कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/made-in-india-micromax-5g-phone-to-launch-soon/feed/ 0
Micromax चा अजून एक नवीन फोन होणार आहे भारतात लॉन्च, करेल लो बजेट मध्ये एंट्री https://www.91mobiles.com/marathi/micromax-e7748-bis-certification-leak-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/micromax-e7748-bis-certification-leak-india-launch-soon/#respond Mon, 14 Dec 2020 07:43:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9287 कंपनीचा हा मोबाईल ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड म्हणजे BIS वर पर स्पॉट झाला आहे. बीआयएस वर हा फोन Micromax E7748 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे.

The post Micromax चा अजून एक नवीन फोन होणार आहे भारतात लॉन्च, करेल लो बजेट मध्ये एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Micromax ने भारतीय मोबाईल युजर्सच्या मनात एक नवीन आशा निर्मण करत काही दिवसांपूर्वी आपले दोन स्वस्त स्मार्टफोन Micromax In Note 1 आणि Micromax In 1b बाजारात आणले होते. या स्मार्टफोन्सच्या माध्यमातून माइक्रोमॅक्सने थेट शब्दांमध्ये चीनी कंपन्यांना लक्ष केले होते आणि ‘Made In India’ स्मार्टफोन म्हणून सादर केले होते. हे दोन्ही मोबाईल फोन्स नंतर आता कंपनी लवकरच अजून एक नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे आणि हा तिसरा फोन पण ‘IN’ सीरीज मध्ये एंट्री करेल.

Micromax लवकरच भारतात आपला अजून एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. कंपनीने आतापर्यंत या आगामी फोन बद्दल अधिकृतपणे सांगितले नाही पण कंपनीचा हा मोबाईल ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड म्हणजे BIS वर पर स्पॉट झाला आहे. बीआयएस वर हा फोन Micromax E7748 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. वेबसाइट वर फोनच्या नावाची माहिती तर मिळाली नाही पण स्पष्ट झाले आहे कि माइक्रोमॅक्स भारतात लवकरच एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

जुन्या स्मार्टफोन्सची किंमत

Micromax IN 1b कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम व 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. फोनच्या 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,999 रुपये आहे तसेच फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे.

Micromax In Note 1 पण दोन वेरिएंट्स मध्ये मार्केट मध्ये आला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम तसेच 64 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. फोनच्या 4 जीबी रॅम वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे तर मोठ्या 6 जीबी रॅम वेरिएंट माइक्रोमॅक्स द्वारे 12,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. दोन्ही फोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या ऑफिशियल साइट वर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

माइक्रोमॅक्स इन नोट 1 व्हिडीओ

The post Micromax चा अजून एक नवीन फोन होणार आहे भारतात लॉन्च, करेल लो बजेट मध्ये एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/micromax-e7748-bis-certification-leak-india-launch-soon/feed/ 0
6GB रॅम आणि ऍडव्हान्स फीचर्स सह Micromax घेऊन येत नवीन फोन, Xiaomi मिळेल का आव्हान? https://www.91mobiles.com/marathi/micromax-launch-soon-new-phone-with-6gb-ram-liquid-cooling-features/ https://www.91mobiles.com/marathi/micromax-launch-soon-new-phone-with-6gb-ram-liquid-cooling-features/#respond Wed, 02 Dec 2020 13:17:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9142 राहुल शर्मा यांनी प्रोडक्ट हेड सुनील जून सोबत केलेल्या या वर्चुल सेशन मध्ये माहिती दिली आहे कि माइक्रोमॅक्स आपले इन-सीरीज फोन देशात ऑफलाइन विकायला सुरवात करेल. नवीन 6जीबी रॅम वर बाबत त्यांनी स्पष्ट केले कि हा Micromax In Note 1 चा नवीन वेरिएंट नसेल.

The post 6GB रॅम आणि ऍडव्हान्स फीचर्स सह Micromax घेऊन येत नवीन फोन, Xiaomi मिळेल का आव्हान? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी Micromax ने काही दिवसांपूर्वी दोन नवीन फोन Micromax In Note 1 आणि Micromax In 1b बाजारात आणले होते. आता कंपनीकडून माहिती समोर आली आहे कि येत्या काळात माइक्रोमॅक्स भारतीय बाजारात 6जीबी रॅम असलेला नवीन स्मार्टफोन सादर करण्याची योजना बनवत आहे. माइक्रोमॅक्सचे सह-संस्थापक राहुल शर्मा यांनी सोमवारी यूट्यूब वर एक वर्चुअल सेशन मध्ये सांगितले कि कंपनी एक नवीन 6जीबी रॅम असलेला स्मार्टफोन बनवत आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी In-सीरीजच्या आगामी स्मार्टफोन मध्ये हाय रिफ्रेश रेट आणि लिक्विड कूलिंग असल्याचे पण म्हटले आहे.

तसेच राहुल शर्मा यांनी प्रोडक्ट हेड सुनील जून सोबत केलेल्या या वर्चुल सेशन मध्ये माहिती दिली आहे कि माइक्रोमॅक्स आपले इन-सीरीज फोन देशात ऑफलाइन विकायला सुरवात करेल. नवीन 6जीबी रॅम वर बाबत त्यांनी स्पष्ट केले कि हा Micromax In Note 1 चा नवीन वेरिएंट नसेल. इन नोट 1 हा फोन 4 जीबी रॅम सह 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज ऑप्शन सह येतो.

काही दिवसांपूर्वी Micromax In 1b स्मार्टफोन संबंधीत एक मोठी माहिती समोर आली होती. गॅजेट360 वेबसाइटच्या एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि माइक्रोमॅक्स इन 1बी स्मार्टफोनचे दोन्ही मॉडेल वेगवेगळ्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम वर चालतील. फोनचा 4 जीबी रॅम वेरिएंट अँड्रॉइड 10 च्या रेग्युलर एडिशन वर चालेल पण Micromax In 1b चा 2 जीबी रॅम वेरिएंट कंपनी अँड्रॉइड 10 च्या ‘गो’ एडिशन सह बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करेल. विशेष म्हणजे माइक्रोमॅक्स स्मार्टफोनचे हे दोन्ही मॉडेल्स समान चिपसेटला सपोर्ट करतील.

तसेच अलीकडेच एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यात राहुल शर्मा यांनी एका व्हिडीओ मध्ये मान्य केले आहे कि Micromax In Note 1 स्मार्टफोन पूर्णपणे मेड इन इंडिया फोन नाही आणि याच्या निर्मितीत चीनची पण मदत आहे. राहुल यांनी सांगितले आहे कि माइक्रोमॅक्स इन नोट स्मार्टफोन मध्ये वापरण्यात आलेली बॅटरी चीन वरून इंपोर्ट केली गेली आहे. पण दुसरा फोन Micromax In 1b कंपनीच्या सीईओने शंभर टक्के ‘Made In India’ स्मार्टफोन असल्याचे सांगितले आहे ज्याचे सर्व पार्ट्स भारतातच बनले आहेत.

माइक्रोमॅक्स इन 1बी 64जीबी व्हिडीओ

The post 6GB रॅम आणि ऍडव्हान्स फीचर्स सह Micromax घेऊन येत नवीन फोन, Xiaomi मिळेल का आव्हान? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/micromax-launch-soon-new-phone-with-6gb-ram-liquid-cooling-features/feed/ 0
Micromax ने मान्य केले In Note 1 स्मार्टफोन नाही आहे पूर्णपणे ‘Made In India’, फोनच्या निर्मितीत चीनचा पण आहे हात https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-note-1-smartphone-is-not-fully-made-in-india-battery-is-chinese/ https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-note-1-smartphone-is-not-fully-made-in-india-battery-is-chinese/#respond Wed, 02 Dec 2020 12:27:49 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9133 आता माहिती समोर येत आहे कि माइक्रोमॅक्सचा फोन पूर्णपणे ‘Made In India’ नाही आणि याच्या निर्मितीत चीनी कंपनीची मदत घेण्यात आली आहे.

The post Micromax ने मान्य केले In Note 1 स्मार्टफोन नाही आहे पूर्णपणे ‘Made In India’, फोनच्या निर्मितीत चीनचा पण आहे हात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन मोबाईल कंपनी Micromax ने स्मार्टफोन बाजारात नवीन सुरवात करत दोन नवीन स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी लॉन्च केले आहेत. हे मोबाईल फोन्स Micromax In Note 1 आणि Micromax In 1b नावाने बाजारात आले आहेत जे कमी किंमतीत चांगले स्पेसिफिकेशन्स देतात. हे मोबाईल फोन्स घेऊन येण्याच्या आधी कंपनीने थेट चीनी कंपन्यांवर हल्ला चढवला होता आणि ‘आओ चीनी कम करें’ सारख्या टॅग लाईनचा वापर करत आपले स्मार्टफोन्सना ‘इंडियन’ असल्याचे सांगितले होते. पण आता माहिती समोर येत आहे कि माइक्रोमॅक्सचा फोन पूर्णपणे ‘Made In India’ नाही आणि याच्या निर्मितीत चीनी कंपनीची मदत घेण्यात आली आहे.

Micromax चे सीईओ राहुल शर्मा यांनी एका व्हिडीओ मध्ये हि गोष्ट कबूल केली आहे कि Micromax In Note 1 स्मार्टफोन पूर्णपणे मेड इन इंडिया फोन नाही आणि याच्या निर्मितीत चायनाची पण मदत आहे. राहुल यांनी सांगितले आहे कि माइक्रोमॅक्स इन नोट स्मार्टफोन मध्ये वापरण्यात आलेली बॅटरी चीन वरून मागवण्यात आली आहे. पण दुसरा फोन Micromax In 1b कंपनी सीईओने शंभर टक्के ‘Made In India’ स्मार्टफोन असल्याचे सांगितले आहे ज्याचे सर्व पार्ट्स भारतातच बनले आहेत.

Micromax In Note 1 च्या बॅटरी बद्दल कंपनी अधिकाऱ्यांनी सफाई पण दिली आहे कि या फोन मध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरीच्या कंपनीला सर्टिफिकेशन्स मिळाले नव्हते. त्यामुळे फोन बाजारात आणण्यासाठी चीनी कंपनीची मदत घ्यावी लागली आणि स्मार्टफोन मध्ये वापरण्यात आलेली बॅटरी चायनावरून आयात करावी लागली. तसेच माइक्रोमॅक्सच्या सीईओने असे पण सांगितले आहे कि फोनची बॅटरी सोडून इतर सर्व पार्ट्स तसेच दुसरा स्मार्टफोन माइक्रोमॅक्स इन 1बी ची निर्मिती भारतात बनवण्यात आलेल्या पार्ट्स आणि भारतीय कारागिरांद्वारे करण्यात आली आहे.

अशी आहे दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत

Micromax IN 1b कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम व 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. फोनच्या 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,999 रुपये आहे तसेच फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे.

Micromax In Note 1 ने पण दोन वेरिएंट्स मध्ये मार्केट मध्ये एंट्री केली आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम तसेच 64 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. फोनच्या 4 जीबी रॅम वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे तसेच मोठा 6 जीबी रॅम वेरिएंट माइक्रोमॅक्सद्वारे 12,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. दोन्ही फोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या ऑफिशियल साइट वर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

The post Micromax ने मान्य केले In Note 1 स्मार्टफोन नाही आहे पूर्णपणे ‘Made In India’, फोनच्या निर्मितीत चीनचा पण आहे हात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-note-1-smartphone-is-not-fully-made-in-india-battery-is-chinese/feed/ 0
6,999 रुपयांच्या Micromax In 1b मध्ये मिळेल 5,000एमएएच बॅटरी आणि अँड्रॉइड 10 गो एडिशन https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-1b-2gb-ram-variant-will-run-on-android-10-go-edition-price-at-rs-6999/ https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-1b-2gb-ram-variant-will-run-on-android-10-go-edition-price-at-rs-6999/#respond Fri, 27 Nov 2020 12:49:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9096 Micromax In 1b स्मार्टफोन संबंधित हि मोठी माहिती गॅजेट360 वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे.

The post 6,999 रुपयांच्या Micromax In 1b मध्ये मिळेल 5,000एमएएच बॅटरी आणि अँड्रॉइड 10 गो एडिशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशी मोबाईल कंपनी Micromax ने अलीकडेच भारतीय बाजारात आपली नवीन सुरवात करत Micromax In 1b स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता ज्यात 2 जीबी रॅम आणि 4 जीबी रॅमचा समावेश आहे. माइक्रोमॅक्स इन 1बी सध्या देशात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकला नाही पण फोनची विक्री सुरु होण्याआधी माहिती समोर येत आहे कि Micromax In 1b चा 4 जीबी रॅम मॉडेल अँड्रॉइड 10 ओएस वर रन करेल तसेच फोनचा 2 जीबी रॅम मॉडेल Android 10 (Go edition) सह उपलब्ध होईल.

Micromax In 1b स्मार्टफोन संबंधित हि मोठी माहिती गॅजेट360 वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. वेबसाइट रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि माइक्रोमॅक्स इन 1बी स्मार्टफोनचे दोन्ही मॉडेल वेगवेगळ्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम वर चालतील. फोनचा 4 जीबी रॅम वेरिएंट तर अँड्रॉइड 10 च्या रेग्युलर एडिशन वर चालेल पण Micromax In 1b चा 2 जीबी रॅम वेरिएंट कंपनी अँड्रॉइड 10 च्या ‘गो’ एडिशन सह बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करेल. माइक्रोमॅक्स स्मार्टफोनचे हे दोन्ही मॉडेल्स एकाच चिपसेटला सपोर्ट करतील.

माइक्रोमॅक्स इन 1बी का 2 जीबी रॅम वेरिएंट 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच फोनच्या 4 जीबी रॅम वेरिएंट मध्ये 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. किंमत पाहता 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,999 रुपये आहे तसेच फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. हा फोन येत्या काही दिवसांत विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Micromax In 1b

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.52-इंचाची मोठी स्क्रीन देण्यात आली आहे ज्यात HD+ एलसीडी डिस्प्ले पॅनलचा वापर केला आहे. फोनचा स्क्रीन आस्पेक्ट रेशिया 20:9 आहे आणि हा वॉटरड्रॉप नॉच सह येतो. फोनचे स्क्रीन रेज्यूल्यूशन 720 x 1600 pixels आहे आणि पिक्सल डेंसिटी 269 ppi.

हे देखील वाचा : Micromax In 1b Vs Redmi 9A: जाणून घ्या कोण जिंकेल लो बजेटची लढाई

फोटोग्राफीसाठी हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबतच 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. कॅमेरा 3x डिजिटल झूम सपोर्ट सह सादर केला गेला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Micromax In 1b मीडियाटेकच्या हीलियो जी35 चिपसेट वर लॉन्च केला गेला आहे. फोन मध्ये 2.3 GHz Octa core प्रोसेसर दिला आहे जो 64 bit Cortex A53 आर्किटेक्चर वर चालतो. ग्राफिक्ससाठी PowerVR GE8320 जीपीयू देण्यात आला आहे. मीडसेग्मेंट मध्ये हा प्रोसेसर चांगल्या गेमिंग परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

माइक्रोमॅक्स इन 1बी व्हिडीओ

The post 6,999 रुपयांच्या Micromax In 1b मध्ये मिळेल 5,000एमएएच बॅटरी आणि अँड्रॉइड 10 गो एडिशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-1b-2gb-ram-variant-will-run-on-android-10-go-edition-price-at-rs-6999/feed/ 0
हे आहेत भारतात लॉन्च झालेले 5 सर्वात नवीन आणि स्वस्त नॉन-चायनीज स्मार्टफोन, किंमत फक्त 6,999 रुपयांपासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/5-cheapest-latest-low-budget-non-chinese-smartphone-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/5-cheapest-latest-low-budget-non-chinese-smartphone-in-india/#respond Wed, 11 Nov 2020 13:25:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8899 तुम्ही पण एखाद्या नवीन आणि स्वस्त नॉन-चायनीज स्मार्टफोनच्या शोधात असाल तर पुढे सांगितलेले 5 लेटेस्ट स्मार्टफोन तुम्हाला आवडू शकतात.

The post हे आहेत भारतात लॉन्च झालेले 5 सर्वात नवीन आणि स्वस्त नॉन-चायनीज स्मार्टफोन, किंमत फक्त 6,999 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी मोबाईल ब्रँड्स भारतात हिट होण्याचे एक मोठे कारण यांची किंमत कमी असणे हे होते. Xiaomi आणि Realme सारख्या कंपन्यांनी लो बजेट मध्ये अनेक स्मार्टफोन्स लॉन्च केले जे भारतीय युजर्सनी हातोहात विकत घेतले. पण आता बाजाराची गरज वळून निवडक चीनीच नाही तर जवळपास प्रत्येक मोठ्या ब्रँडने लो बजेट सेग्मेंट मध्ये आपली हजेरी लावली आहे. भारतात चायनीज कंपन्यांना आव्हान देत गेल्या आठवड्यात 5 नवीन स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत जे नॉन चीनी ब्रँड्स द्वारे लॉन्च केले गेले आहेत. हे पाचही स्मार्टफोन लो बजेट मध्ये आले आहेत, ज्यांची किंमत फक्त 6,999 रुपयांपासून सुरु होते. जर तुम्ही पण एखाद्या नवीन आणि स्वस्त नॉन-चायनीज स्मार्टफोनच्या शोधात असाल तर पुढे सांगितलेले 5 लेटेस्ट स्मार्टफोन तुम्हाला आवडू शकतात.

1. Micromax In 1b

या लिस्ट मध्ये इंडियन कंपनी माइक्रोमॅक्स पण आहे, जिने बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा स्मार्टफोन मार्केट मध्ये एंट्री घेतली आहे. कंपनीने Micromax In 1b नावाने आपला स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केला आहे जो दोन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 6,999 रुपये आहे. तसेच माइक्रोमॅक्स इन 1बी च्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी मेमरी देण्यात आली आहे आणि याची किंमत फक्त 7,999 रुपये आहे. हा फोन 24 नोव्हेंबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Micromax IN 1b स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.52-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 रेडी आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफीसाठी हा फोन एफ/1.8 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी आणि 2 मेगापिक्सलच्या सेकेंडरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबतच पावर बॅकअपसाठी हा फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह येतो.

2. LG W11

साउथ कोरियन कंपनी एलजीने भारतीय बाजारात आपल्या लो बजेट ‘डब्ल्यू सीरीज’ चा विस्तार करत LG W11 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन 3 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेज व 512 जीबीच्या एक्सपांडेबल स्टोरेजला सपोर्ट करतो. 4जी वोएलटीई आणि डुअल सिमला सपोर्ट करणारा एलजी डब्ल्यू11 कंपनीने फक्त 9,490 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

LG W11 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ फुलविजन डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर चालतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर पीडीएएफ फीचर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि पावर बॅकअपसाठी 4,000एमएएचची बॅटरी फोन मध्ये देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी आणि 48MP क्वाड कॅमेऱ्यासह आला Honor 10X Lite, देईल का Samsung ला आव्हान?

3. LG W31

एलजीने आपल्या डब्ल्यू सीरीज मध्ये LG W31 स्मार्टफोन पण जोडला आहे. हा पण एक लो बजेट डिवायस आहे जो 10,990 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. एलजीचा हा फोन 4 जीबी रॅमला सपोर्ट करतो सोबतच 64 जीबीची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते. LG W31 मीडनाईट ब्लू कलर मधेच विकत घेता येईल. फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवायस पण 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ फुलविजन डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे.

LG W31 मध्ये चिपसेटची माहिती समोर आली नाही पण हा अँड्रॉइड 10 ओएस सह 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर चालतो. फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सल प्राइमरी सेंसरसह, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 5 मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेंस आहे. सेल्फीसाठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर सह गुगल असिस्टंट बटन आणि 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

4. Micromax In Note 1

माइक्रोमॅक्सने ‘Made In India’ चा दावा करत स्टाईलिश आणि स्वस्त इन नोट 1 स्मार्टफोन पण लॉन्च केला आहे. पंच-होल डिस्प्ले डिजाईन वर बनलेला हा फोन पण दोन वेरिएंट्स मध्ये बाजारात आला आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम देण्यात आला आहे ज्याची किंमत 10,999 रुपये आहे. तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम देण्यात आला आहे आणि याची किंमत 12,999 रुपये आहे. हे दोन्ही वेरिएंट 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात जे 24 ऑक्टोबर पासून फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होतील.

Micromax In Note 1 स्मार्टफोन 21:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.67 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 11 रेडी आहे ज्यात हायपरइंजन गेमिंग टेक्नोलॉजी असलेला मीडियाटेकचा हीलियो जी85 चिपसेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 48 एमपी प्राइमरी सेंसर + 5 एमपी वाइड अँगल लेंस + 2 एमपी + 2 एमपी सेंसर आहे. तसेच सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि पावर बॅकअपसाठी 18वॉट फास्ट चार्जिंग असेलली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Exclusive: क्वाड कॅमेरा आणि ड्यूल टोन-डिजाइन सह येईल Samsung Galaxy M12, रियर पॅनल आला समोर

5. LG W31+

एलजी डब्ल्यू31 प्लस स्मार्टफोन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत LG W31 सारखा आहे. हा फोन 4 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते. डुअल सिम व 4जी वोएलअीईला सपोर्ट असलेला LG W31+ कंपनीने 11,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो मीडनाईट ब्लू कलर मधेच विक्रीसाठी उपलब्ध होईल.

हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ फुलविजन डिस्प्लेला सपोर्ट करतो. अँड्रॉइड 10 ओएस सह फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सल प्राइमरी सेंसर सह , 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 5 मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेंस आहे. सेल्फीसाठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोन मध्ये पण रियर फिंगरप्रिंट सेंसर सह गुगल असिस्टंट बटन आणि 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post हे आहेत भारतात लॉन्च झालेले 5 सर्वात नवीन आणि स्वस्त नॉन-चायनीज स्मार्टफोन, किंमत फक्त 6,999 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5-cheapest-latest-low-budget-non-chinese-smartphone-in-india/feed/ 0
Micromax चा चीनी कंपन्यांवर वार, लॉन्च केले 5000mAh बॅटरी आणि 48MP रियर कॅमेरा असलेले दोन फोन https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-note-1-in-1b-launched-today-with-5000mah-battery-48mp-camera-know-price-sale-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-note-1-in-1b-launched-today-with-5000mah-battery-48mp-camera-know-price-sale-flipkart/#respond Tue, 03 Nov 2020 12:51:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8774 Micromax In Note 1 आणि In 1b च्या डिजाइन बद्दल बोलायचे झाले तर दोन्ही फोन खूप वेगळे आहेत. In-सीरीजच्या दोन्ही डिवाइसेज मध्ये मीडियाटेकचा प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्याची माहिती कंपनीने आधीच दिली होती.

The post Micromax चा चीनी कंपन्यांवर वार, लॉन्च केले 5000mAh बॅटरी आणि 48MP रियर कॅमेरा असलेले दोन फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय स्मार्टफोन मेकर Micromax ने भारतीय बाजारात पुन्हा एकदा वापसी केली आहे. जवळपास दोन वर्षांनंतर आज कंपनीने In सीरीज अंतगर्त दोन नवीन स्मार्टफोन्स जगासमोर ठेवले आहेत. ‘आओ करें चीनी कम’ टॅगलाइन सह सादर करण्यात आलेल्या या फोन्सच्या जीवावर कंपनी भारतीयांच्या मनात पुन्हा एकदा जागा बनवण्याचा प्रयत्न करत आहे. मेड इन इंडिया फोन आणि भारतीय कंपनी असल्याचा फायदा घेत कंपनी सरळ चीनी स्मार्टफोन वर ब्रँड वर हल्ला करत आहे. चला जाणून घेऊया Micromax In सीरीज मध्ये सादर केल्या गेलेल्या Micromax In Note 1 आणि In 1b बाबत सर्वकाही.

सुंदर डिजाइन

Micromax In Note 1 आणि In 1b च्या डिजाइन बद्दल बोलायचे झाले तर दोन्ही फोन खूप वेगळे आहेत. सर्वप्रथम Micromax In Note 1 बद्दल बोलूया, कंपनीने हा पंच-होल डिस्प्ले सह सादर केला आहे. फोनच्या फ्रंटला मधोमध एक कटआउट देण्यात आली आला आहे, ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. पंच-होल असल्यामुळे फोनच्या तिन्ही कडा वर बेजल लेस आहेत. पण खाली थोडा चिन पार्ट मिळेल. तसेच मागे टॉप लेफ्ट मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे जो आयताकृती आहे. तसेच मागे फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

दुसरीकडे Micromax In 1b कंपनीने वॉटर ड्रॉप-नॉच डिस्प्ले सह सादर केला आहे. तसेच या फोन मध्ये पण डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत आणि खालच्या बाजूला थोडी जाड बेजल मिळेल. तसेच मागे आयताकृती ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. Micromax In Note 1 प्रमाणेच In 1b मध्ये पण बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

शानदार डिस्प्ले

Micromax In Note 1 मध्ये 6.67-इंच FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे जो 21:9 आसपेक्ट रेशियो आणि पंच-होल कटआउट सह येतो. तर दुसरीकडे लो बजेट Micromax In 1b मध्ये 6.52-इंचाच्या HD+ एलसीडी डिस्प्ले सह 20:9 आसपेक्ट रेश्यो आहे.

दमदार कॅमेरा

कॅमेरा बद्दल बोलायचे तर Micromax In Note 1 मध्ये कंपनीने मागे क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. या सेटअप मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 5 मेगापिक्सलचा वाइड-अँगल लेंस आणि दोन 2-मेगापिक्सल कॅमेरा आहेत. तसेच व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फ्रंटला 16 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा आहे जो 78-degree FoV सह येतो.

Micromax In 1b मध्ये डुअल-कॅमेरा मागे देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलची सेकेंडरी लेंस आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी आणि रिवर्स चार्जिंग

Micromax In Note 1 आणि In 1b दोन्ही मध्ये कंपनीने रिवर्स चार्जिंगचा ऑप्शन दिला आहे, ज्याचा अर्थ असा आहे कि या फोन द्वारे कोणताही वायरलेस चार्ज असलेला फोन चार्ज केला जाऊ शकतो. दोन्ही फोन अँड्रॉइड 10 ओएस वर चालतात. कंपनी या दोन्ही फोन मध्ये अँड्रॉइड 11 आणि अँड्रॉइड 12 अपडेट देणार आहे. सुरक्षेसाठी फोन्स मध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

पावर बॅकअप पाहता दोन्ही फोन मध्ये 5000एमएएच बॅटरी सह येतात. Micromax In Note 1 मध्ये 18W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे आणि In 1B मध्ये 10W चार्जिंग सपोर्ट आहे. कनेक्टिविटी ऑप्शनसाठी दोन्ही फोन मध्ये 4जी एलटीई, वाय-फाई, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, आणि यूएसबी टाइप सी पोर्ट आहे.

हार्डवेयर

In-सीरीजच्या दोन्ही डिवाइसेज मध्ये मीडियाटेकचा प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्याची माहिती कंपनीने आधीच दिली होती. Micromax In Note 1 मध्ये HyperEngine गेमिंग असलेला MediaTek Helio G85 SoC सह 4GB रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज आहे. तर In 1b मध्ये MediaTek Helio G35 SoC सह Mali-G52 GPU देण्यात आला आहे. सोबतच या फोन मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे.

किंमत

Micromax IN 1b कंपनीने 6,999 रुपयांच्या बेस किंमतीत सादर केला आहे. हि किंमत फोनच्या 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंटची आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वर्जनची किंमत 7,999 रुपये आहे. तसेच या सीरीजच्या मोठ्या फोन Micromax IN Note 1 च्या 4GB RAM आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,999 रुपये व 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 12,999 रुपये आहे. दोन्ही फोन 24 नोव्हेंबर पासून ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या ऑफिशियल साइट वर विक्रीसाठी येतील.

The post Micromax चा चीनी कंपन्यांवर वार, लॉन्च केले 5000mAh बॅटरी आणि 48MP रियर कॅमेरा असलेले दोन फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-note-1-in-1b-launched-today-with-5000mah-battery-48mp-camera-know-price-sale-flipkart/feed/ 0
Micromax In सीरीज लॉन्चच्या आधीच आली महत्वाची माहिती समोर, 3 नोव्हेंबरला एंट्री करतील स्वस्त ‘Made In India’ फोन https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-series-mediatek-g35-g85-india-launch-on-3-november-specs/ https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-series-mediatek-g35-g85-india-launch-on-3-november-specs/#respond Wed, 28 Oct 2020 14:20:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8710 Micromax In सीरीजच्या या स्मार्टफोनची किंमत 7,000 रुपयांच्या आसपास असल्याचे बोलले जात लेकिन 3 नोव्हेंबरला फोन लॉन्च होईस्तोवर हे स्पेसिफिकेशन्स निश्चित म्हणता येणार नाहीत.

The post Micromax In सीरीज लॉन्चच्या आधीच आली महत्वाची माहिती समोर, 3 नोव्हेंबरला एंट्री करतील स्वस्त ‘Made In India’ फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Micromax ने सांगितले आहे कि कंपनी स्मार्टफोन मार्केट मध्ये पुन्हा एकदा वापसी करणार आहे आणि येत्या 3 नोव्हेंबरला माइक्रोमॅक्सचे नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले जातील. हि नवीन सुरवात कंपनीने ‘आत्मनिर्भर भारत’ ला समर्पित करत असल्याचे सांगितले आहे कि तसेच माइक्रोमॅक्सचे आगामी स्मार्टफोन्स ‘Micromax In’ सीरीज अंतगर्त लॉन्च केले जातील. हि सीरीज बाजारात येण्याआधीच माइक्रोमॅक्सने आपल्या आगामी स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स संबंधित महत्वाची माहिती सार्वजनिक केली आहे.

माइक्रोमॅक्सने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वर ट्वीट करून कंपनीच्या आगामी मोबाईल फोन्स मधील चिपसेटचा खुलासा केला आहे. Micromax ने सांगितले आहे कि कंपनी द्वारे लॉन्च केल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्स पैकी एक डिवायस मीडियाटेकच्या हीलियो जी35 चिपसेट सह बाजारात येईल, तसेच दुसऱ्या फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो जी85 चिपसेट मिळेल. चर्चा अशी आहे कि माइक्रोमॅक्सचे आगामी स्मार्टफोन Micromax In 1 आणि Micromax In 1a नावाने मार्केट मध्ये येतील.

स्पेसिफिकेशन्स

कंपनीने आतापर्यंत इतर स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही पण मीडिया रिपोट्स आणि लीक्समसूर मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेटला सपोर्ट करणाऱ्या फोन मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिली जाईल. हा फोन अँड्रॉइड 10 ओएस वर काम करेल तसेच दोन वेरिएंट्स सह मार्केट मध्ये लॉन्च होईल त्यातील एकात 2 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज आणि दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल मेमरी मिळू शकते.

हे देखील वाचा : मोबाईल डेटा स्पीड मध्ये अशी आहे India ची रँकिंग, भारताची पुन्हा घसरण

बोलले जात आहे कि उपरोक्त फोनच्या 2 जीबी रॅम वेरिएंट मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल तसेच 3 जीबी रॅम वेरिएंट मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. 2 जीबी रॅम वेरिएंटची बद्दल बोलायचे तर यात 13 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल असलेला रियर कॅमेरा सेटअप तसेच 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

तसेच फोन मध्ये 3 जीबी रॅम वेरिएंटच्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 5 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर आणि 2 मेगापिक्सलची थर्ड लेंस दिली जाऊ शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोन मध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. तसेच लीकनुसार Micromax चा हा फोन पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करेल.

हे देखील वाचा : LG Velvet भारतात लॉन्च, ताकदवान स्पेसिफिकेशन्स सह इतकी दमदार डिजाईन कि पडल्यावर पण तुटणार नाही स्क्रीन

Micromax In सीरीजच्या या स्मार्टफोनची किंमत 7,000 रुपयांच्या आसपास असल्याचे बोलले जात लेकिन 3 नोव्हेंबरला फोन लॉन्च होईस्तोवर हे स्पेसिफिकेशन्स निश्चित म्हणता येणार नाहीत. माइक्रोमॅक्स आपल्या आगामी फोन्स सह ‘आओ चीनी कम करें’ टॅग लाईनचा वापर करत आहे, ज्यावरून स्पष्ट होते कि इंडियन कंपनी Micromax चे थेट टारगेट Xiaomi, Realme, OPPO आणि Vivo सारख्या चायनीज कंपन्या आहेत.

The post Micromax In सीरीज लॉन्चच्या आधीच आली महत्वाची माहिती समोर, 3 नोव्हेंबरला एंट्री करतील स्वस्त ‘Made In India’ फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-series-mediatek-g35-g85-india-launch-on-3-november-specs/feed/ 0