चीनी मोबाईल ब्रँड्स भारतात हिट होण्याचे एक मोठे कारण यांची किंमत कमी असणे हे होते. Xiaomi आणि Realme सारख्या कंपन्यांनी लो बजेट मध्ये अनेक स्मार्टफोन्स लॉन्च केले जे भारतीय युजर्सनी हातोहात विकत घेतले. पण आता बाजाराची गरज वळून निवडक चीनीच नाही तर जवळपास प्रत्येक मोठ्या ब्रँडने लो बजेट सेग्मेंट मध्ये आपली हजेरी लावली आहे. भारतात चायनीज कंपन्यांना आव्हान देत गेल्या आठवड्यात 5 नवीन स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत जे नॉन चीनी ब्रँड्स द्वारे लॉन्च केले गेले आहेत. हे पाचही स्मार्टफोन लो बजेट मध्ये आले आहेत, ज्यांची किंमत फक्त 6,999 रुपयांपासून सुरु होते. जर तुम्ही पण एखाद्या नवीन आणि स्वस्त नॉन-चायनीज स्मार्टफोनच्या शोधात असाल तर पुढे सांगितलेले 5 लेटेस्ट स्मार्टफोन तुम्हाला आवडू शकतात.
1. Micromax In 1b
या लिस्ट मध्ये इंडियन कंपनी माइक्रोमॅक्स पण आहे, जिने बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा स्मार्टफोन मार्केट मध्ये एंट्री घेतली आहे. कंपनीने Micromax In 1b नावाने आपला स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केला आहे जो दोन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 6,999 रुपये आहे. तसेच माइक्रोमॅक्स इन 1बी च्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी मेमरी देण्यात आली आहे आणि याची किंमत फक्त 7,999 रुपये आहे. हा फोन 24 नोव्हेंबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Micromax IN 1b स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.52-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 रेडी आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफीसाठी हा फोन एफ/1.8 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी आणि 2 मेगापिक्सलच्या सेकेंडरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबतच पावर बॅकअपसाठी हा फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह येतो.
2. LG W11
साउथ कोरियन कंपनी एलजीने भारतीय बाजारात आपल्या लो बजेट ‘डब्ल्यू सीरीज’ चा विस्तार करत LG W11 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन 3 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेज व 512 जीबीच्या एक्सपांडेबल स्टोरेजला सपोर्ट करतो. 4जी वोएलटीई आणि डुअल सिमला सपोर्ट करणारा एलजी डब्ल्यू11 कंपनीने फक्त 9,490 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.
LG W11 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ फुलविजन डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर चालतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर पीडीएएफ फीचर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि पावर बॅकअपसाठी 4,000एमएएचची बॅटरी फोन मध्ये देण्यात आली आहे.
हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी आणि 48MP क्वाड कॅमेऱ्यासह आला Honor 10X Lite, देईल का Samsung ला आव्हान?
3. LG W31
एलजीने आपल्या डब्ल्यू सीरीज मध्ये LG W31 स्मार्टफोन पण जोडला आहे. हा पण एक लो बजेट डिवायस आहे जो 10,990 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. एलजीचा हा फोन 4 जीबी रॅमला सपोर्ट करतो सोबतच 64 जीबीची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते. LG W31 मीडनाईट ब्लू कलर मधेच विकत घेता येईल. फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवायस पण 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ फुलविजन डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे.
LG W31 मध्ये चिपसेटची माहिती समोर आली नाही पण हा अँड्रॉइड 10 ओएस सह 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर चालतो. फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सल प्राइमरी सेंसरसह, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 5 मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेंस आहे. सेल्फीसाठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर सह गुगल असिस्टंट बटन आणि 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
4. Micromax In Note 1
माइक्रोमॅक्सने ‘Made In India’ चा दावा करत स्टाईलिश आणि स्वस्त इन नोट 1 स्मार्टफोन पण लॉन्च केला आहे. पंच-होल डिस्प्ले डिजाईन वर बनलेला हा फोन पण दोन वेरिएंट्स मध्ये बाजारात आला आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम देण्यात आला आहे ज्याची किंमत 10,999 रुपये आहे. तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम देण्यात आला आहे आणि याची किंमत 12,999 रुपये आहे. हे दोन्ही वेरिएंट 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात जे 24 ऑक्टोबर पासून फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होतील.
Micromax In Note 1 स्मार्टफोन 21:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.67 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 11 रेडी आहे ज्यात हायपरइंजन गेमिंग टेक्नोलॉजी असलेला मीडियाटेकचा हीलियो जी85 चिपसेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 48 एमपी प्राइमरी सेंसर + 5 एमपी वाइड अँगल लेंस + 2 एमपी + 2 एमपी सेंसर आहे. तसेच सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि पावर बॅकअपसाठी 18वॉट फास्ट चार्जिंग असेलली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
हे देखील वाचा : Exclusive: क्वाड कॅमेरा आणि ड्यूल टोन-डिजाइन सह येईल Samsung Galaxy M12, रियर पॅनल आला समोर
5. LG W31+
एलजी डब्ल्यू31 प्लस स्मार्टफोन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत LG W31 सारखा आहे. हा फोन 4 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते. डुअल सिम व 4जी वोएलअीईला सपोर्ट असलेला LG W31+ कंपनीने 11,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो मीडनाईट ब्लू कलर मधेच विक्रीसाठी उपलब्ध होईल.
हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ फुलविजन डिस्प्लेला सपोर्ट करतो. अँड्रॉइड 10 ओएस सह फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सल प्राइमरी सेंसर सह , 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 5 मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेंस आहे. सेल्फीसाठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोन मध्ये पण रियर फिंगरप्रिंट सेंसर सह गुगल असिस्टंट बटन आणि 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.