स्वदेशी 5G फोन घेऊन येत आहे Micromax, असेल पूर्णपणे Made In India, किंमत पण असेल खूप कमी

इंडियन टेक ब्रँड Micromax ने मोठ्या अंतरानंतर गेल्यावर्षी पुनरागमन केले आहे. कंपनीने एकसाथ दोन स्मार्टफोन Micromax In Note 1 आणि In 1b लाॅन्च केले होते जे लो बजेट मध्ये आले आहेत. बाजारात हिट झाल्यानंतर माइक्रोमॅक्स आता काही नवीन आणि मोठे करण्याचे प्रयत्न करत आहे. माइक्रोमॅक्स भारतातील पहिली मोबाईल कंपनी बानू शकते जी Made In India 5G स्मार्टफोन घेऊन येईल.

Micromax 5G phone ची माहिती कोणत्याही लीक किंवा मीडिया रिपोर्टने नाही तर स्वतः कंपनीचे को-फाउंडर राहुल शर्मा यांनी दिली आहे. माइक्रोमॅक्सने ‘लेट्स टाॅक इंडिया के लिए’ नावाने यूट्यूबवर एक टाॅक सेशन आयोजित केला होता ज्यात मोबाईल युजर्स आणि माइक्रोमॅक्स फॅन्सने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली होती. दरम्यान एक युजरच्या प्रश्नाला उत्तर देत राहुल यांनी मान्य केले आहे की माइक्रोमॅक्स 5जी फोनची निर्मिती करत आहे.

कंपनी को-फाउंडरने सांगितले आहे कि माइक्रोमॅक्सने आपल्या 5जी इनेबल्ड मोबाईल फोनवर काम सुरु केले आहे आणि बंगलोर मधील कंपनीच्या आर अँड डी सेंटर मध्ये हा बनवला जात आहे. राहुल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार माइक्रोमॅक्स लवकरच आपला 5जी स्मार्टफोन बाजारात घेऊन येईल आणि हा मोबाईल फोन मेड इन इंडिया असेल. 5जी फोन व्यतिरिक्त माइक्रोमॅक्स वायरलेस इयरफोन आणि स्पीकर्स सोबतच इतर स्मार्ट ऍक्सेसरीज पण मार्केट मध्ये लाॅन्च करणार आहे.

बाजारातील स्मार्टफोन्सची किंमत

Micromax IN 1b कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 2 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम व 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. फोनच्या 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,999 रुपये आहे तर फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे.

Micromax In Note 1 ने पण दोन वेरिएंट्स मध्ये मार्केट मध्ये एंट्री घेतली आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम तसेच 64 जीबी स्टोरेजवर लॉन्च केला गेला आहे तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. फोनच्या 4 जीबी रॅम वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे तसेच मोठा 6 जीबी रॅम वेरिएंट माइक्रोमॅक्सद्वारे 12,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. दोन्ही फोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या ऑफिशियल साइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

माइक्रोमॅक्स इन नोट 1 व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here