चायनीज ब्रँड्सना टक्कर देण्यास आला माइक्रोमॅक्सचा अजून एक स्वस्त स्मार्टफोन Micromax In 1

Micromax ने आज भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत अजून एक नवीन स्मार्टफोन Micromax In 1 लॉन्च केला आहे. मोबाईल बाजारात पुन्हा प्रवेश केल्यानंतर हा माइक्रोमॅक्सने लॉन्च केलेला तिसरा स्मार्टफोन आहे. खासकरून, Xiaomi, Realme, OPPO आणि Vivo सारख्या चायनीज ब्रँड्सना टक्कर देण्याचा प्रयत्न करत असलेल्या माइक्रोमॅक्सला भारतीयांचा प्रतिसाद पण मिळत आहे. भारतीयांचा विश्वास कायम ठेवत या देशी कंपनीने आज Micromax In 1 10,499 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला आहे जो 6 जीबी रॅम, 5000एमएएच बॅटरी आणि 48एमपी कॅमेरा अश्या शानदार फीचर्ससह येतो.

लुक व डिजाईन
Micromax In 1 कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला आहे. फ्रंट पॅनलवर डिस्प्लेच्या तीन कडा बेजललेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला पंच-होल देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फोनच्या बॅक पॅनलवर डावीकडे चौकोनी आकाराचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये तीन सेंसर वर्टिकली आहेत तसेच बाजूला फ्लॅश लाईट आणि सेंसर डिटेल आहेत.

माइक्रोमॅक्स इन 1 फोनच्या बॅक पॅनलवर फिजिकल रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच पॅनलवर खाली ‘In’ ब्रँडिंग आहे. या फोनचा रियर पॅनल बर्‍याच अंशी Realme C सीरीजच्या डायमंड कट डिजाईनशी मिळता जुळता दिसतो. Micromax In 1 च्या उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर व पावर बटन देण्यात आला आहे तसेच सिम स्लॉट उजव्या पॅनलवर आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स
Micromax In 1 कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला गेला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.67 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी हा 2.5डी ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.4 टक्के आहे तसेच डिस्प्ले 440निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतात.

माइक्रोमॅक्स इन 1 एंडरॉयड 10 ओएसवर लॉन्च केला गेला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसेरसह मीडियाटेकच्या 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या हीलियो जी80 चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी हा फोन एआरएम जी52 जीपीयूला सपोर्ट करतो. भारतात हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्यात 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी Micromax In 1 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची थर्ड मॅक्रो लेंस देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Micromax In 1 एक डुअल सिम फोन आहे जो डुअल वीओवाईफाई व वीओएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससोबत सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी माइक्रोमॅक्स इन 1 5,000एमएएच बॅटरीसह बाजारात आला आहे जो 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे कि हा फोन एका फुल चार्जमध्ये 18 तासांचा वीडियो प्लेबॅक देऊ शकतो.

प्राइस व सेल
Micromax In 1 चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीने 10,499 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तसेच फोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. या फोनचा पहिला सेल 26 मार्च पासून कंपनीची वेबसाइट व शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर सुरू होईल. पाहिल्या सेल मध्ये माइक्रोमॅक्स इन 1 चे दोन्ही वेरिएंट्स 500 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here