OnePlus Nord CE 3 Lite 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 04 Apr 2023 14:08:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OnePlus Nord CE 3 Lite 5G झाला भारतात लाँच; फोनमध्ये 108MP कॅमेऱ्यासह 16GB रॅम https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-ce-3-lite-5g-smartphone-launched-in-india-features-and-price/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-ce-3-lite-5g-smartphone-launched-in-india-features-and-price/#respond Tue, 04 Apr 2023 13:57:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20022 आज वनप्लसनं भारतात आपल्या नॉर्ड सीरिज नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीनं OnePlus Nord CE 3 Lite 5G देशात सादर केला आहे. जो नॉर्ड सीई 2 लाइटची जागा घेईल. फोनमध्ये 16GB RAM (8GB+8GB), Snapdragon 695 चिपसेट, 108MP Camera, 67W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh Battery देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि […]

The post OnePlus Nord CE 3 Lite 5G झाला भारतात लाँच; फोनमध्ये 108MP कॅमेऱ्यासह 16GB रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा फोन Snapdragon 695 चिपसेटसह भारतात आला आहे.
  • यात 8GB RAM सह 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे.
  • OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन 108MP ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो

आज वनप्लसनं भारतात आपल्या नॉर्ड सीरिज नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीनं OnePlus Nord CE 3 Lite 5G देशात सादर केला आहे. जो नॉर्ड सीई 2 लाइटची जागा घेईल. फोनमध्ये 16GB RAM (8GB+8GB), Snapdragon 695 चिपसेट, 108MP Camera, 67W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh Battery देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.

OnePlus Nord CE 3 Lite 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.72” FHD+ LCD 120Hz Display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • Qualcomm Snapdragon 695
  • 108MP+2MP+2MP Camera
  • 67W 5,000mAh Battery

वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइट 5जी फोन 6.72 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा एक एलसीडी पॅनल आहे जो 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन, 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 240हर्टज टच सॅम्पलिंग रेट, 680निट्स पिक ब्राइटनेस, 20:9 आस्पेक्ट रेशियो आणि 1500:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करतो. कंपनीनं यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा दिली आहे. हे देखील वाचा: 12GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह OPPO A1 5G चीनमध्ये लाँच; जाणून घ्या किंमत

OnePlus Nord CE 3 Lite 5G फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइट 5जी 8GB LPDDR4x RAM आणि 256GB पर्यंत UFS 2.2 storage सह आला आहे. यात वर्च्युअली 8GB अतिरिक्त रॅम मिळून एकूण 16GB रॅम पवार मिळवता येईल. यातील स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सिजन ओएस 13 वर चालतो.

वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइट 5जी फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.75 अपर्चर असलेला 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. जोडीला 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलची लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 7 एप्रिलला भारतात लाँच होईल POCO C51; 8 हजारांच्या आसपास असू शकते किंमत

OnePlus Nord CE 3 Lite 5G ड्युअल सिम फोन आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5जी, 4जी, 3.5एमएम जॅक, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप सीचा ऑप्शन मिळतो. स्मार्टफोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात आलं आहे. तर पावर बॅकअपसाठी हा वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइट 5जी 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

OnePlus Nord CE 3 Lite 5G ची किंमत

OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन 8जीबी रॅमसह दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाॅन्च झाला आहे. बेस मॉडेलमध्ये 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 19,999 रुपये आहे. तर फोनचा 256जीबी स्टोरेज व्हेरिएंट 21,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. या फोनही विक्री 11 एप्रिलपासून सुरु होईल तसेच फोन Pastel Lime आणि Chromatic Gray कलरमध्ये विकत घेता येईल.

The post OnePlus Nord CE 3 Lite 5G झाला भारतात लाँच; फोनमध्ये 108MP कॅमेऱ्यासह 16GB रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-ce-3-lite-5g-smartphone-launched-in-india-features-and-price/feed/ 0
16GB रॅम आणि 108MP कॅमेऱ्यासह लाँच होईल OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-ce-3-lite-5g-smartphone-launch-date-expected-features-and-price/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-ce-3-lite-5g-smartphone-launch-date-expected-features-and-price/#respond Fri, 31 Mar 2023 07:33:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19922 OnePlus लवकरच भारतात OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीनं कंफर्म केलं आहे की हा फोन भारतीय बाजारात 4 एप्रिलला लाँच केला जाईल. वनप्लसचा हा फोन 2023 मध्ये लाँच होणारा सर्वात अफोर्डेबल 5G स्मार्टफोन आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या फोनवर आहेत. लाँचपूर्वीच वनप्लसच्या या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स, डिजाइन आणि किंमतीची माहिती समोर […]

The post 16GB रॅम आणि 108MP कॅमेऱ्यासह लाँच होईल OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन भारतात 4 एप्रिलला लाँच होईल.
  • हा फोन क्वॉलकॉमच्या Snapdragon 695 प्रोसेसरसह मार्केटमध्ये येईल.
  • OnePlus चा हा फोन 8GB रॅमसह 27,999 रुपयांमध्ये सादर केला जाऊ शकतो.

OnePlus लवकरच भारतात OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीनं कंफर्म केलं आहे की हा फोन भारतीय बाजारात 4 एप्रिलला लाँच केला जाईल. वनप्लसचा हा फोन 2023 मध्ये लाँच होणारा सर्वात अफोर्डेबल 5G स्मार्टफोन आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या फोनवर आहेत. लाँचपूर्वीच वनप्लसच्या या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स, डिजाइन आणि किंमतीची माहिती समोर आली आहे. त्यानुसार हा फोन 16GB रॅम (8GB+8GB) आणि आणि 108MP कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. चला जाणून घेऊया वनप्लसच्या या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमतीची आतापर्यंत आलेली माहिती.

OnePlus Nord CE 3 Lite 5G लाँच डेट

कंपनीनं कंफर्म केलं आहे की हा फोन भारतात 4 एप्रिलला एका इव्हेंटमध्ये लाँच केला जाईल. वनप्लसनं या इव्हेंटला ‘लार्जर दॅन लाइफ – अ वनप्लस नॉर्ड लाँच इव्हेंट’ असं नाव दिलं आहे. वनप्लसचा हा इव्हेंट भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. कंपनी यादिवशी OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोनसह वायरलेस इयरबड्स OnePlus Nord Buds 2 देखील लाँच करेल. हा इव्हेंट वनप्लसच्या ऑफिशियल सोशल मीडिया साइट आणि युट्युब चॅनेलवर लाइव्ह बघता येईल.

OnePlus Nord CE 3 Lite 5G स्पेसिफिकेशन्स

  • 6.7 इंचाचा FHD+ डिस्प्ले
  • 108 MP + 2 MP + 2 MP रियर कॅमेरा सेटअप
  • 16 MP सेल्फी कॅमेरा
  • Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर
  • 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज
  • 5000mAh बॅटरी, 67W फास्ट चार्जिंग

डिस्प्ले

OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोनचे महत्वाचे स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीच लीक झाले आहेत तर काही कंपनीनं वेबसाइट लिस्टिंगमधून कन्फर्म केले आहेत. कंपनीच्या मायक्रोसाइटनुसार या फोनमध्ये 6.72-इंचाचा FHD+ डिस्प्ले दिला जाईल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. त्याचबरोबर वनप्लसच्या या फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट दिली जाईल.

कॅमेरा

OnePlus च्या आगामी Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन बाबत बोललं जात आहे की यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यात दोन कॅमेरा रिंग आहेत. पहिल्या रिंगमध्ये फोनचा 108MP चा प्रायमरी कॅमेरा आहे, जो 3X झूमला सपोर्ट करतो. दुसऱ्या रिंगमध्ये दोन कॅमेरा सेन्सर असतील, ज्यात 2MP चा डेप्थ आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा असू शकतो. रियर पॅनलमध्ये कॅमेरारिंग सह LED फ्लॅश देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

प्रोसेसर

वनप्लसनं कंफर्म केलं आहे की हा आगामी फोन Qualcomm च्या Snapdragon 695 प्रोससरसह मार्केटमध्ये एंट्री करेल. तसेच कंपनीनं सांगितलं आहे की फोनमध्ये 8GB LPDDR4x RAM असेल. जोडीला 8GB व्हर्च्युअल रॅम मिळून फोनमध्ये एकूण 16GB रॅमची पावर मिळेल. लीक रिपोर्ट्सनुसार हा फोन फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच होईल आणि फोनमध्ये 128GB स्टोरेज मिळू शकते.

बॅटरी

OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाईल, असं कंपनीनं सांगितलं आहे. तसेच हा फोन 67W फास्ट चार्जला सपोर्टसह सादर केला जाईल. कंपनीचा दावा आहे की हा फोन फक्त 30 मिनिटांच्या चार्जमध्ये फुल डे बॅटरी बॅकअप देतो.

कनेक्टिव्हिटी आणि अन्य फीचर्स

OnePlus चा आगामी अफोर्डेबल 5G स्मार्टफोन Android 13 आधारित OxygenOS 13 कस्टम स्किनवर चालू शकतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, Wi-Fi 802.11ac, Bluetooth 5.1, आणि USB Type-C पोर्टचा सपोर्ट दिला जाऊ शकतो. तसेच फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो. या फोनचा बॅक पॅनल पॉलीकार्बोनेट मॅटेरियलपासून बनवण्यात येऊ शकतो.

OnePlus Nord CE 3 Lite 5G किंमत (लीक)

लीक रिपोर्ट्सनुसार, OnePlus Nord CE 3 Lite 5G भारतात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 21,999 रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. फोनची सेलिंग प्राइस थोडी कमी असू शकते. वनप्लसचा हा फोन दोन कलर व्हेरिएंट – पॅस्टेल लाइम आणि क्रोमॅटिक ग्रे ऑप्शनमध्ये लाँच केला जाईल.

SourceOnePlus

The post 16GB रॅम आणि 108MP कॅमेऱ्यासह लाँच होईल OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-ce-3-lite-5g-smartphone-launch-date-expected-features-and-price/feed/ 0
OnePlus Nord CE 3 Lite 5G ची किंमत आणि फीचर्स लीक; 4 एप्रिलला होईल भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-ce-3-lite-5g-price-and-specifications-leaked-before-launch/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-ce-3-lite-5g-price-and-specifications-leaked-before-launch/#respond Mon, 27 Mar 2023 05:33:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19767 वनप्लसनं घोषणा केली आहे की कंपनी येत्या 4 एप्रिलला भारतात आपल्या ‘नॉर्ड’ सीरीजकॅच नवीन स्मार्टफोन OnePlus Nord CE 3 Lite 5G लाँच करेल. कंपनीनं आतापर्यंत या फोनचे स्पेसिफिकेशन्स सांगितले नाहीत परंतुआ एका नवीन लीकमध्ये नॉर्ड सीई 3 लाइटच्या किंमतीसह अनेक महत्वाचे डिटेल्स समोर आले आहेत. या 5जी फोनमध्ये 108MP Camera आणि 67W SuperVOOC सारखे फीचर्स […]

The post OnePlus Nord CE 3 Lite 5G ची किंमत आणि फीचर्स लीक; 4 एप्रिलला होईल भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन 4 एप्रिलला भारतात लाँच होईल.
  • या फोनची किंमत 329 euro (जवळपास 29,000 रुपये) असू शकते.
  • वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइट 5जी मध्ये 108MP Camera दिला जाऊ शकतो.

वनप्लसनं घोषणा केली आहे की कंपनी येत्या 4 एप्रिलला भारतात आपल्या ‘नॉर्ड’ सीरीजकॅच नवीन स्मार्टफोन OnePlus Nord CE 3 Lite 5G लाँच करेल. कंपनीनं आतापर्यंत या फोनचे स्पेसिफिकेशन्स सांगितले नाहीत परंतुआ एका नवीन लीकमध्ये नॉर्ड सीई 3 लाइटच्या किंमतीसह अनेक महत्वाचे डिटेल्स समोर आले आहेत. या 5जी फोनमध्ये 108MP Camera आणि 67W SuperVOOC सारखे फीचर्स मिळू शकतात आणि याची किंमत 329 युरो असू शकते.

वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइट 5जीची लीक किंमत

OnePlus Nord CE 3 Lite 5G प्राइस बद्दल सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल फोन इंटरनॅशनल मार्केटमध्ये 329 euro मध्ये लाँच केला जाऊ शकतो. ही किंमत भारतीय करंसीनुसार 29,000 रुपयांच्या आसपास आहे. ही फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत असू शकते आणि यह नॉर्ड सीई 3 लाइट 5जीची प्रारंभिक किंमत असू शकते. लीकनुसार हा वनप्लस फोन Pastel Lime आणि Chromatic Gray कलरमध्ये लाँच केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: वाय-फाय कॉलिंग म्हणजे काय? कशाप्रकारे नेटवर्क नसताना VoWiFi च्या मदतीनं कॉल्स करायचे जाणून घ्या

वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइट 5जी चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.72″ FHD+ 120Hz Display
  • Qualcomm Snapdragon 695
  • 108MP Triple Rear Camera
  • 5,000mAh battery
  • 67W SuperVOOC charging

OnePlus Nord CE 3 Lite 5G शी संबंधित लीकमध्ये दावा करण्यात आला आहे की हा मोबाइल फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 8जीबी रॅम असल्याचं सांगण्यात आलं आहे, जोडीला 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. तसेच भारतीय बाजारात नॉर्ड सीई 3 लाइट एकापेक्षा जास्त मेमरी व्हेरिएंटमध्ये येऊ शकतो.

वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइट 5जी च्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर असू शकतो, असं सांगण्यात आलं आहे. फोनच्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरचा समावेश असू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

लीकनुसार, OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.72 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. ही फोन स्क्रीन एलसीडी पॅनल आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येऊ शकते. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी असल्याचं सांगण्यात आलं आहे, जी 67वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते. हे देखील वाचा: शाओमीनं लाँच केले दोन बजेट स्मार्टफोन Redmi A2 आणि Redmi A2+, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

वनप्लस इंडिया लाँच

4 एप्रिलला OnePlus Nord CE 3 Lite 5G आणि OnePlus Nord Buds 2 भारतात लाँच केले जातील. हा ऑनलाईन लाँच इव्हेंट संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल जो कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, युट्युब चॅनेल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह बघता येईल. शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉन इंडियावर नॉर्ड सीई 3 लाइट 5जीचं प्रोडक्ट पेज देखील लाइव्ह करण्यात आलं आहे तसेच याच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर फोनची विक्री होईल.

The post OnePlus Nord CE 3 Lite 5G ची किंमत आणि फीचर्स लीक; 4 एप्रिलला होईल भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-ce-3-lite-5g-price-and-specifications-leaked-before-launch/feed/ 0
OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन 4 एप्रिलला येणार भारतात, जोडीला येतायत OnePlus Nord Buds 2 https://www.91mobiles.com/marathi/4-april-oneplus-nord-ce-3-lite-5g-launch-date-in-india-with-nord-buds-2/ https://www.91mobiles.com/marathi/4-april-oneplus-nord-ce-3-lite-5g-launch-date-in-india-with-nord-buds-2/#respond Thu, 23 Mar 2023 12:55:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19701 OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन 4 एप्रिलला भारतात लाँच होईल. आज कंपनीनं अधिकृतपणे या फोनच्या लाँचवरून पडदा हटवला आहे. त्याचबरोबर खुलासा करण्यात आला आहे की या दिवशी OnePlus चे नवीन टीडब्लूएस Nord Buds 2 देखील सादर केले जातील. फोन स्पेसिफिकेशन्सबाबत कंपनीनं आतापर्यंत कोणतीही माहिती दिली नाही परंतु लीक्सच्या माध्यमातून बरीच माहिती समोर आली […]

The post OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन 4 एप्रिलला येणार भारतात, जोडीला येतायत OnePlus Nord Buds 2 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • 4 एप्रिलला भारतात वनप्लसचा ‘लार्जर दॅन लाइफ’ इव्हेंट होईल.
  • या इव्हेंटमध्ये OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन लाँच केला जाईल.
  • वनप्लस फोन सोबतच OnePlus Nord Buds 2 देखील होतील.

OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन 4 एप्रिलला भारतात लाँच होईल. आज कंपनीनं अधिकृतपणे या फोनच्या लाँचवरून पडदा हटवला आहे. त्याचबरोबर खुलासा करण्यात आला आहे की या दिवशी OnePlus चे नवीन टीडब्लूएस Nord Buds 2 देखील सादर केले जातील. फोन स्पेसिफिकेशन्सबाबत कंपनीनं आतापर्यंत कोणतीही माहिती दिली नाही परंतु लीक्सच्या माध्यमातून बरीच माहिती समोर आली आहे.

वनप्लस लाँच इव्हेंट

वनप्लस इंडियानं सांगितलं आहे की कंपनी येत्या 4 एप्रिलला भारतात नवीन इव्हेंटचं आयोजन करत आहे ज्याचे नाव ‘Larger than life – A OnePlus Nord Launch Event’ असं ठेवण्यात आलं आहे. हा इव्हेंट संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल ज्याच्या मंचावरून OnePlus Nord CE 3 Lite 5G आणि OnePlus Nord Buds 2 भारतात लाँच केले जातील. हा लाँच कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, युट्युब चॅनेल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह बघता येईल. हे देखील वाचा: Jio युजर्ससाठी वाईट बातमी! कंपनीनं 100 रुपयांनी वाढवली सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनची किंमत

वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइट 5जीचे लीक स्पेसिफिकेशन्स

OnePlus Nord CE 3 Lite 5G संबंधीत लीक्स पाहता या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिली जाऊ शकते. ही स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली असू शकते ज्यात 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असण्याची शक्यता आहे. ही स्क्रीन पंच-होल स्टाईल असू शकते.

वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइट 5जी फोन अँड्रॉइड 13 वर सादर केला जाऊ शकतो, जोडीला आक्सिजनओएस 13 असण्याची शक्यता आहे. तसेच प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट मिळू शकतो. लीक्सनुसार हा फोन 8जीबी रॅम आणि 12जीबी रॅमसह मार्केटमध्ये एंट्री करू शकतो, जोडीला 128जीबी आणि 256जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: 32MP सेल्फी कॅमेरा असलेला फोन फक्त 12,499 रुपयांमध्ये! Tecno Spark 10 Pro ची भारतात एंट्री

फोटोग्राफीसाठी OnePlus Nord CE 3 Lite 5G मध्ये 108 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो जो मॅक्रो लेन्स आणि डेप्थ सेन्सरसह येऊ शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी या वनप्लस फोनमध्ये 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

The post OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन 4 एप्रिलला येणार भारतात, जोडीला येतायत OnePlus Nord Buds 2 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/4-april-oneplus-nord-ce-3-lite-5g-launch-date-in-india-with-nord-buds-2/feed/ 0