Pixel 6A - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 06:18:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 3000 रुपयांच्या डिस्काउंटसह Google Pixel 6a उपलब्ध; जाणून घ्या माहिती https://www.91mobiles.com/marathi/flipkart-year-end-sale-2022-google-pixel-6a-price-offer-india/ https://www.91mobiles.com/marathi/flipkart-year-end-sale-2022-google-pixel-6a-price-offer-india/#comments Fri, 30 Dec 2022 04:40:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16514 ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर Flipkart Year End Sale सुरु झाला आहे. हा सेल 24 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान सुरु राहील. यात अनेक स्मार्टफोन्स आणि गॅजेट्सवर ऑफर्स आणि बेस्ट डील्स दिल्या जात आहेत. परंतु यातील सर्वात जबरदस्त डील Google Pixel 6a स्मार्टफोनवर मिळत आहे. या डिवाइसवर थेट 3000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे तसेच जोडीला […]

The post 3000 रुपयांच्या डिस्काउंटसह Google Pixel 6a उपलब्ध; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर Flipkart Year End Sale सुरु झाला आहे. हा सेल 24 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान सुरु राहील. यात अनेक स्मार्टफोन्स आणि गॅजेट्सवर ऑफर्स आणि बेस्ट डील्स दिल्या जात आहेत. परंतु यातील सर्वात जबरदस्त डील Google Pixel 6a स्मार्टफोनवर मिळत आहे. या डिवाइसवर थेट 3000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे तसेच जोडीला एक्सचेंज ऑफर, बँक ऑफर, ईएमआय आणि नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन देखील मिळत आहेत.

प्रसिद्ध टेक युटूबर एमकेबीएचडीनं काही दिवसांपूर्वी एक ब्लाइंड स्मार्टफोन कॅमेरा टेस्ट घेतली होती. या टेस्टमध्ये लाखो नेटकाऱ्यानी गुगलच्या या सर्वात स्वस्त Pixel 6A च्या फोटोजना बहुमताने विजयी ठरवलं आहे. आता फ्लिपकार्ट ईयर एन्ड सेलमध्ये Pixel 6a फोनची किंमत डिस्काउंटनंतर 26,999 रुपये होईल. म्हणजे तुम्हाला या फोनवर एकूण 17,000 पर्यंतचा डिस्काउंट मिळेल. हे देखील वाचा: भारतीयांच्या भेटीला येतोय मोटोरोला स्वस्त. सुंदर आणि टिकाऊ फोन; Moto E13 चा इंडिया लाँचसाठी सज्ज

Google Pixel 6a Offer

Google Pixel 6a हा फोन 43,999 रुपयांमध्ये लाँच झाला होता, त्यावर आता फ्लिपकार्ट इयर एन्ड सेल अंतर्गत सेल दरम्यान डिस्काउंट दिला जाईल, त्यामुळे हा फोन तुम्हाला 29,999 रुपयांमध्ये मिळेल. तसेच हा फोन फेडरल बँकेच्या कार्डनं खरेदी केल्यास ग्राहकांना 3,000 रुपयांचा थेट डिस्काउंट देण्यात येईल. त्यामुळे Google Pixel 6a ची किंमत फक्त 26,999 रुपये होईल.

Google Pixel 6a चे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स

Google Pixel 6a स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. हा डिस्प्ले Corning Gorilla Glass 3 च्या प्रोटेक्शनसह येतो. गुगलच्या या फोनमध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, स्टीरियो स्पिकर, ड्युअल मायक्रोफोन आणि नॉइज इंप्रीसनसह सादर करण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G VoLTE, Wi-Fi 6E, Bluetooth 5.2 LE, GPS, NFC आणि USB Type C पोर्ट देण्यात आला आहे. यात Titan M2 सिक्योरिटी चिप देखील देण्यात आली आहे.

Google Pixel 6a स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12.2MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 12MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. हा कॅमेरा सेटअप OIS आणि EIS ला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4K 60FPS व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येते. हे देखील वाचा: यंदाचे फोन आवडले नाहीत? 2023 मध्ये भारतात येतायत हे दणकट स्मार्टफोन्स; पाहून आत्ताच ठेवाल पैसे बाजूला

हा फोन Android 12 OS सह सादर करण्यात आला आहे. गुगलचा हा फोन कंपनीच्या Tensor प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी Mali-G78 GPU देण्यात आला आहे. यात 6GB LPDDR5 RAM, आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. यातील 4306mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

The post 3000 रुपयांच्या डिस्काउंटसह Google Pixel 6a उपलब्ध; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/flipkart-year-end-sale-2022-google-pixel-6a-price-offer-india/feed/ 1
16,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर Google Pixel 6a परवडणाऱ्या किंमतीत; Big Billion Days Sale ची जबरदस्त ऑफर https://www.91mobiles.com/marathi/flipkart-big-billion-days-sale-google-pixel-6a-price-offer-india/ https://www.91mobiles.com/marathi/flipkart-big-billion-days-sale-google-pixel-6a-price-offer-india/#respond Tue, 13 Sep 2022 11:08:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13068 ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर लवकरच Flipkart Big Billion Days Sale सुरु होणार आहे. कंपनीनं सेलची अचूक तारीख सांगितली नाही परंतु यात मिळणार ऑफर्स आणि बेस्ट डील्सची माहिती वेबसाइटवर दिली जात आहे. परंतु यातील सर्वात जबरदस्त डील Google Pixel 6a स्मार्टफोनवर मिळत आहे. या डिवाइसवर थेट मोठा डिस्काउंट तर दिला जात आहे जोडीला एक्सचेंज ऑफर, बँक […]

The post 16,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर Google Pixel 6a परवडणाऱ्या किंमतीत; Big Billion Days Sale ची जबरदस्त ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर लवकरच Flipkart Big Billion Days Sale सुरु होणार आहे. कंपनीनं सेलची अचूक तारीख सांगितली नाही परंतु यात मिळणार ऑफर्स आणि बेस्ट डील्सची माहिती वेबसाइटवर दिली जात आहे. परंतु यातील सर्वात जबरदस्त डील Google Pixel 6a स्मार्टफोनवर मिळत आहे. या डिवाइसवर थेट मोठा डिस्काउंट तर दिला जात आहे जोडीला एक्सचेंज ऑफर, बँक ऑफर, ईएमआय आणि नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन देखील मिळत आहेत.

गुगलनं जुलैमध्ये हा स्मार्टफोन 43,999 रुपयांमध्ये लाँच केला होता. तेव्हा गुगल प्रेमींकडून देखील या किंमतीची तक्रार करण्यात आली होती. आता फ्लिपकार्ट बिग बिलियन सेलमध्ये Pixel 6a फोनची किंमत डिस्काउंटनंतर 27,699 रुपये होईल. म्हणजे तुम्हाला या फोनवर पूर्ण 16,000 पर्यंतचा डिस्काउंट मिळेल. नेटकऱ्यांनी देखील या ऑफरला उचलून धरलं आहे. हे देखील वाचा: 200MP Camera असलेला भारतातील पहिला फोन; पाहा बसतोय का तुमच्या बजेटमध्ये हा 5G Phone

Google Pixel 6a Offer

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart नं ऑफरची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. हा फोन 43,999 रुपयांमध्ये लाँच झाला होता, त्यावर सर्वप्रथम बिग बिलियन डे सेल दरम्यान डिस्काउंट दिला जाईल, त्यामुळे हा फोन तुम्हाला 34,199 रुपयांमध्ये मिळेल. प्रीपेड ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांना 3,500 रुपयांची सूट मिळेल. तसेच आयसीआयसीआय आणि अ‍ॅक्सिस बँक कार्ड होल्डर्सना 3,000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येईल. त्यामुळे Google Pixel 6a ची किंमत फक्त 27,699 रुपये होईल.

Google Pixel 6a चे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स

Google Pixel 6a स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. हा डिस्प्ले Corning Gorilla Glass 3 च्या प्रोटेक्शनसह येतो. गुगलच्या या फोनमध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, स्टीरियो स्पिकर, ड्युअल मायक्रोफोन आणि नॉइज इंप्रीसनसह सादर करण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G VoLTE, Wi-Fi 6E, Bluetooth 5.2 LE, GPS, NFC आणि USB Type C पोर्ट देण्यात आला आहे. यात Titan M2 सिक्योरिटी चिप देखील देण्यात आली आहे.

big billion days sale google pixel 6a price offer india

Google Pixel 6a स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12.2MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 12MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. हा कॅमेरा सेटअप OIS आणि EIS ला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4K 60FPS व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येते. हे देखील वाचा: 200MP Camera असलेला भारतातील पहिला फोन; पाहा बसतोय का तुमच्या बजेटमध्ये हा 5G Phone

हा फोन Android 12 OS सह सादर करण्यात आला आहे. गुगलचा हा फोन कंपनीच्या Tensor प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी Mali-G78 GPU देण्यात आला आहे. यात 6GB LPDDR5 RAM, आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. यातील 4306mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

The post 16,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर Google Pixel 6a परवडणाऱ्या किंमतीत; Big Billion Days Sale ची जबरदस्त ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/flipkart-big-billion-days-sale-google-pixel-6a-price-offer-india/feed/ 0
Google Pixel 6a मध्ये मोठा घोटाळा समोर; फिंगरप्रिंट रजिस्टर न करताच फोन होतोय अनलॉक https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-6a-unlocked-unregister-fingerprint/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-6a-unlocked-unregister-fingerprint/#respond Mon, 25 Jul 2022 13:24:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11703 Google Pixel 6a स्मार्टफोनमधील इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची गडबड समोर आली आहे.

The post Google Pixel 6a मध्ये मोठा घोटाळा समोर; फिंगरप्रिंट रजिस्टर न करताच फोन होतोय अनलॉक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Google Pixel 6a स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात लाँच करण्यात आला आहे. तब्बल दोन वर्षानंतर गुगलचा पिक्सल स्मार्टफोन भारतात आल्यामुळे चाहत्यांनी या हँडसेटला डोक्यावर घेतलं आहे. परंतु आता चाहत्यांच्या आनंदावर विरजण घालणारी बातमी आली आहे. गुगलच्या लेटेस्ट Pixel 6a स्मार्टफोनमध्ये मोठी गडबड समोर आली आहे. यामुळे युजर्सची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. हा फोन रजिस्टर न करताच कोणाच्याही फिंगरप्रिंटनं अनलॉक होत आहे. पिक्सल फोनमधील या त्रुटीची सर्वप्रथम इंडियन युट्युबर Geekyranjit आणि Beebom यांनी दिली आहे. त्यांनी याचे व्हिडीओ देखील शेयर केले आहेत. 91मोबाईल्सच्या रिव्यू यूनिटमध्ये देखील अशाप्रकारची गडबड दिसली आहे. गुगल पिक्सल 6a स्मार्टफोनची विक्री 28 जुलैपासून फ्लिपकार्टवर केली जाणार आहे. विशेष म्हणजे गुगलनं या फोन मध्ये सिक्योरिटीसाठी खास Titan M2 चिपसेटचा वापर केला आहे.

91mobiles ला मिळालेल्या रिव्यू यूनिट देखील रजिस्टर न केलेल्या फिंगरप्रिंटनं देखील गुगल पिक्सल 6ए स्मार्टफोन अनलॉक होत आहे. पुढे दिलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही हे पाहू शकता.

https://www.facebook.com/watch/?v=1074923253401278

Google Pixel 6a युजर्सची सुरक्षा धोक्यात

Google Pixel 6a मध्ये येणारी ही समस्या खराब हार्डवेयरमुळे आहे की सॉफ्टवेयरमुळे याची माहिती कंपनीनं दिलेली नाही. कंपनीकडून या प्रकरणाबाबत कोणतीही माहिती आली नाही. कोणत्याही फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या स्मार्टफोनमध्ये आधी फिंगरप्रिंट रजिस्टर करावं लागतं मगच त्या फिंगरप्रिंटनं फोन अनलॉक होतो. हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्मार्टफोनचा पासवर्ड आवश्यक असतो. परंतु गुगलचा हा फोन रजिस्टर न केलेल्या फिंगरप्रिंटनं देखील ओपन होत आहे. त्यामुळे कोणीही हा स्मार्टफोन अ‍ॅक्सेस करू शकतो. टेक युट्युबर गीकीरंजीत आणि बीबॉम यांनी एक व्हिडीओ शेयर करून हा दोष सर्वप्रथम रिपोर्ट केला आहे. या त्रुटीमुळे गुगलचा हा फोन युजर्सची सुरक्षा धोक्यात टाकत आहे.

Google Pixel 6a चे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स

Google Pixel 6a स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. हा डिस्प्ले Corning Gorilla Glass 3 च्या प्रोटेक्शनसह येतो. Google Pixel 6a स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12.2MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 12MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. हा कॅमेरा सेटअप OIS आणि EIS ला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4K 60FPS व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येते.

हा फोन Android 12 OS सह सादर करण्यात आला आहे. गुगलचा हा फोन कंपनीच्या Tensor प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी Mali-G78 GPU देण्यात आला आहे. यात 6GB LPDDR5 RAM, आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. यातील 4306mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

गुगलच्या या फोनमध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, स्टीरियो स्पिकर, ड्युअल मायक्रोफोन आणि नॉइज इंप्रीसनसह सादर करण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G VoLTE, Wi-Fi 6E, Bluetooth 5.2 LE, GPS, NFC आणि USB Type C पोर्ट देण्यात आला आहे. यात Titan M2 सिक्योरिटी चिप देखील देण्यात आली आहे.

28 तारखेला विक्री सुरु

Google Pixel 6a स्मार्टफोन भारतात 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. या फोनची भारतात किंमत 43,999 रुपये आहे, जो चारकोल (ब्लॅक) आणि चाक (व्हाईट) कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. या फोनचा सेज (ग्रीन) कलर ऑप्शन भारतात लाँच करण्यात आला नाही. फोनची भारतात विक्री 28 जुलैपासून केली जाईल. सध्या प्री-बुकिंग फ्लिपकार्टवर सुरु आहे.

The post Google Pixel 6a मध्ये मोठा घोटाळा समोर; फिंगरप्रिंट रजिस्टर न करताच फोन होतोय अनलॉक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-6a-unlocked-unregister-fingerprint/feed/ 0
शाओमी-सॅमसंगची झोप उडवण्यासाठी अँड्रॉइडचा बादशहा भारतात; शानदार कॅमेऱ्यासह Google Pixel 6a लाँच https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-6a-launched-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-6a-launched-in-india/#respond Thu, 21 Jul 2022 07:20:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11594 Pixel 6a स्मार्टफोनमध्ये गुगलचा Tensor प्रोसेसर देण्यात आला आहे जो Pixel 6 आणि 6 Pro मध्ये देखील मिळतो.

The post शाओमी-सॅमसंगची झोप उडवण्यासाठी अँड्रॉइडचा बादशहा भारतात; शानदार कॅमेऱ्यासह Google Pixel 6a लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Google ची Pixel स्मार्टफोन सीरिज म्हणजे सच्चा अँड्रॉइड फोन. कोणत्याही अनावश्यक अ‍ॅप्सविना येणार क्लीन युआय अनेकांना आवडतो. तसेच पिक्सल स्मार्टफोनच्या कॅमेरा परफॉर्मन्सला तोड नाही, असं देखील पिक्सल युजर्स म्हणतात. असे ट्रू अँड्रॉइड एक्स्पीरियंस देणारे हे फोन भारतात मात्र जास्त येत नाहीत. परंतु आता Google Pixel 6a स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. दोन वर्षानंतर गुगलला भारतीयांची आठवण झाली आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी जागतिक बाजारात आलेला हा हँडसेट आता भारतात लाँच करण्यात आला आहे.

गुगलच्या या फोनची प्री-बुकिंग आता भारतात देखील सुरु झाली आहे. Google Pixel 6a कंपनीनं गेल्यावर्षी लाँच केलेल्या Pixel 5a चा हा उत्तराधिकारी आहे जो भारतात लाँच करण्यात आला नव्हता. याआधी कंपनीनं भारतात साल 2020 मध्ये Pixel 4a सादर केला होता. नवया Google Pixel 6A स्मार्टफोनमध्ये कंपनीचा Tensor प्रोसेसर देण्यात आला आहे, जो गुगलच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये देखील मिळतो. गुगलच्या या फोनला भारतात OnePlus 10R, Nothing Phone (1), आणि Realme GT सीरीज कडून थेट टक्कर मिळणार आहे.

Google Pixel 6a ची किंमत

Google Pixel 6a स्मार्टफोन भारतात 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. या फोनची भारतात किंमत 43,999 रुपये आहे, जो चारकोल (ब्लॅक) आणि चाक (व्हाईट) कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. या फोनचा सेज (ग्रीन) कलर ऑप्शन भारतात लाँच करण्यात आला नाही. फोनची भारतात विक्री 28 जुलैपासून केली जाईल परंतु प्री-बुकिंग फ्लिपकार्टवर सुरु झाली आहे.

लाँच ऑफर्स अंतर्गत Axis बँकेच्या कार्ड आणि EMI ट्रँजॅक्शनवर 4000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळेल. जुन्या पिक्सल फोनवर 6000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल. तसेच जुन्या स्मार्टफोनच्या एक्सचेंजवर 2000 रुपयांची सूट मिळवता येईल. Pixel 6a विकत घेतल्यास Google Nest Hub Gen2/Pixel Buds A Series/ Fitbit Inspire 2 फक्त 4,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. YouTube Premium आणि Google One चे तीन महिन्यांचे सब्सक्रिप्शन मोफत मिळेल. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर 5 टक्क्यांचा कॅशबॅक दिला जाईल. तसेच निवडक कार्डवर नो कॉस्ट EMI ऑफर देखील देण्यात आली आहे.

Google Pixel 6a चे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स

Google Pixel 6a स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. हा डिस्प्ले Corning Gorilla Glass 3 च्या प्रोटेक्शनसह येतो. Google Pixel 6a स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12.2MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 12MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. हा कॅमेरा सेटअप OIS आणि EIS ला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4K 60FPS व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येते.

हा फोन Android 12 OS सह सादर करण्यात आला आहे. गुगलचा हा फोन कंपनीच्या Tensor प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी Mali-G78 GPU देण्यात आला आहे. यात 6GB LPDDR5 RAM, आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. यातील 4306mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

गुगलच्या या फोनमध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, स्टीरियो स्पिकर, ड्युअल मायक्रोफोन आणि नॉइज इंप्रीसनसह सादर करण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G VoLTE, Wi-Fi 6E, Bluetooth 5.2 LE, GPS, NFC आणि USB Type C पोर्ट देण्यात आला आहे. यात Titan M2 सिक्योरिटी चिप देखील देण्यात आली आहे.

The post शाओमी-सॅमसंगची झोप उडवण्यासाठी अँड्रॉइडचा बादशहा भारतात; शानदार कॅमेऱ्यासह Google Pixel 6a लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-6a-launched-in-india/feed/ 0
नथिंग फोनला टिकू देणार नाही Google; भारतात येतोय स्वस्त Pixel स्मार्टफोन, किंमत लीक https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-6a-india-price-leaked-before-launch/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-6a-india-price-leaked-before-launch/#respond Tue, 19 Jul 2022 07:20:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11521 Google नं आपल्या अ‍ॅन्युअल टेक इव्हेंट Google I/O 2022 दरम्यान Pixel 6a स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची घोषणा केली होती. गुगलचे खूप कमी स्मार्टफोन देशात येतात त्यामुळे या ही घोषणा भारतीय चाहत्यांसाठी खुशखबरच होती. अजूनतरी कंपनीनं Pixel 6a च्या भारतीय लाँच डेटचा खुलासा केला नाही. परंतु, लीक्सनुसार हा फोन काही महिन्यांमध्ये भारतीयांच्या भेटीला येईल आणि Google Pixel […]

The post नथिंग फोनला टिकू देणार नाही Google; भारतात येतोय स्वस्त Pixel स्मार्टफोन, किंमत लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Google नं आपल्या अ‍ॅन्युअल टेक इव्हेंट Google I/O 2022 दरम्यान Pixel 6a स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची घोषणा केली होती. गुगलचे खूप कमी स्मार्टफोन देशात येतात त्यामुळे या ही घोषणा भारतीय चाहत्यांसाठी खुशखबरच होती. अजूनतरी कंपनीनं Pixel 6a च्या भारतीय लाँच डेटचा खुलासा केला नाही. परंतु, लीक्सनुसार हा फोन काही महिन्यांमध्ये भारतीयांच्या भेटीला येईल आणि Google Pixel 6A स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल. आता ऑफिशियल होण्याआधी या स्मार्टफोनच्या इंडियन व्हर्जनच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. चला जाणून घेऊया किती असेल याची किंमत.

Google Pixel 6A Price In India

टिप्सटर अभिषेक यादवनं एका ट्वीटच्या माध्यमातून Google Pixel 6A स्मार्टफोनच्या किंमतीचा खुलासा केला आहे. त्यानुसार आगामी गुगल पिक्सल स्मार्टफोन भारतात 37 हजार रुपयांच्या रेंजमध्ये सादर केला जाऊ शकतो. परंतु याआधी एका टिपस्टरनं 40 हजार रुपयांच्या किंमतीचा दावा केला होता. तसेच, यूएसमध्ये फोनचा 6GB रॅम + 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट फक्त 449 डॉलर्स (जवळपास 35,100 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे.

Nothing Phone (1), OnePlus 10R शी करावी लागणार स्पर्धा

जर Google Pixel 6A स्मार्टफोन 35000 रुपयांच्या आसपासच्या किंमतीत सादर करण्यात आला तर भारतातील Nothing Phone (1) आणि OnePlus 10R कडून या पिक्सल फोनला चांगली टक्कर मिळेल, अशी चर्चा आहे. हे दोन्ही फोन 35000 रुपयांच्या आसपासच्या बजेटमध्ये सादर करण्यात आले आहेत. तसेच वनप्लस आपल्या फास्ट चार्जिंगमुळे तर नथिंग आपल्या हटके डिजाईनमुळे लोकप्रिय होत आहे. आता या फोन्ससमोर कॅमेरा परफॉर्मन्ससाठी ओळखला जाणारा पिक्सल 6A किती टिकतो ते पाहावं लागेल.

Google Pixel 6a चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.1-इंच FHD+ डिस्प्ले, 60Hz रिफ्रेश रेट
  • Tensor प्रोसेसर
  • 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज
  • Android 12 ऑपरेटिंग सिस्टम
  • 12.2MP + 12MP ड्युअल कॅमेरा
  • 8MP सेल्फी कॅमेरा
  • 4306mAh बॅटरी, 18W फास्ट चार्जिंग

Google Pixel 6a स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. हा डिस्प्ले Corning Gorilla Glass 3 च्या प्रोटेक्शनसह येतो. Google Pixel 6a स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12.2MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 12MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. या फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

हा फोन Android 12 OS सह सादर करण्यात आला आहे. गुगलचा हा फोन कंपनीच्या Tensor प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी Mali-G78 GPU देण्यात आला आहे. यात 6GB LPDDR5 RAM, आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. यातील 4306mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

गुगलच्या या फोनमध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, स्टीरियो स्पिकर, ड्युअल मायक्रोफोन आणि नॉइज इंप्रीसनसह सादर करण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G VoLTE, Wi-Fi 6E, Bluetooth 5.2 LE, GPS, आणि USB Type C पोर्ट देण्यात आला आहे. यात Titan M2 सिक्योरिटी चिप देखील देण्यात आली आहे.

The post नथिंग फोनला टिकू देणार नाही Google; भारतात येतोय स्वस्त Pixel स्मार्टफोन, किंमत लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-6a-india-price-leaked-before-launch/feed/ 0