Realme 8 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:31:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणारे Best Gaming स्मार्टफोन, इथे बघा संपूर्ण यादी https://www.91mobiles.com/marathi/best-gaming-smartphones-under-20000/ https://www.91mobiles.com/marathi/best-gaming-smartphones-under-20000/#respond Thu, 29 Apr 2021 11:51:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10766 तुम्ही एक गेमिंग फोन विकत घेऊ इच्छित असाल तर हे काम सोप्पे करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी बेस्ट गेमिंग स्मार्टफोनची एक यादी घेऊन आलो आहोत. चला जाणून घेऊया 20,000 रुपयांच्या आतल्या बजेटमधील बेस्ट गेमिंग फोनबाबत सर्वकाही.

The post 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणारे Best Gaming स्मार्टफोन, इथे बघा संपूर्ण यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सध्या स्मार्टफोनची भूमिका आपल्या धावपळीच्या जीवनात खूप महत्वाची झाली आहे. फोन फक्त कॉल करण्याचे माध्यम राहिला नसून आता आपण फोनवरून ऑफिसची कामे पण करतो. चांगल्या फोनची निवड करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. शानदार फीचर्स- गेमिंग, चांगला कॅमेरा, मोठी बॅटरी आणि दमदार परफॉर्मन्सनंतर युजर्सचे लक्ष बजेटकडे वळते. जर तुम्ही पण 20,000 रुपयांच्या बजेटमध्ये एक गेमिंग फोनचा शोध घेत असाल तर आम्ही तुमच्यासाठी आम्ही काही अश्या शानदार फोन्सची यादी घेऊन आलो आहोत जे तुमच्यासाठी मोबाईल गेमिंगचा अंदाज बदलतील. बाजारात फोन तर ढीगभर आहेत त्यामुळे निवड करणे कठीण होते. जर तुम्ही एक गेमिंग फोन विकत घेऊ इच्छित असाल तर हे काम सोप्पे करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी बेस्ट गेमिंग स्मार्टफोनची एक यादी घेऊन आलो आहोत. चला जाणून घेऊया 20,000 रुपयांच्या आतल्या बजेटमधील बेस्ट गेमिंग फोनबाबत सर्वकाही. (Best gaming smartphones under 20000)

Poco X3 Pro

POCO X3 Pro अँड्रॉइड 11 ओएसवर सादर केला होता जो मीयुआय 12 सह चालतो. गेमिंगसाठी बनलेल्या या फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी 2.96गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बालेला क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 860 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 640 जीपीयूला सपोर्ट करतो. पोको एक्स3 प्रो LPDDR4X रॅम आणि UFS 3.1 स्टोरेज टेक्नॉलॉजीसह येतो. भारतात हा फोन 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅमवर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची बेस किंमत 18,999 रुपये आहे. तसेच पावर बॅकअपसाठी POCO X3 Pro कंपनीद्वारे 5,160एमएएचच्या मोठ्या बॅटरीने सुसज्ज केला गेला आहे. पोकोचा दावा आहे कि एकदा चार्ज केल्यास या फोनची बॅटरी 11 तासांचा गेमिंग टाईम आणि 18 तास व्हिडीओ प्लेबॅक टाईम देऊ शकते. फोनची मोठी बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी पोको एक्स3 प्रो 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो.

हे देखील वाचा : COVID Vaccine Registration In India: 18 पेक्षा जास्त वय असणारे अश्याप्रकारे करू शकतात नोंदणी

POCO X3 Pro चा फोटो

POCO X3 Pro क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स582 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आहे तर दोन एफ/2.4 अपर्चर असलेले 2 मेगापिक्सल सेंसर देण्यात आले आहेत. ज्यात एक डेफ्थ सेंसर आणि एक मॅक्रो सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी पोको एक्स3 प्रो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 20 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Realme Narzo 30 Pro 5G

16,999 रुपयांची बेस किंमत असलेला Narzo 30 Pro 5G गेमर्सचा लक्षात ठेऊन सादर केला गेला होता. कंपनीने आपली नारजो सीरीज गेमिंगच्या चाहत्यांसाठी सादर केली होती. या स्मार्टफोनचा सर्वात खास फीचर 5जी कनेक्टिविटी आहे. कंपनीने यात मीडियाटेक डाइमेंसिटी 800यू 5जी चिपसेट दिला आहे. मीडियाटेक च‍ि‍पसेट मीडियाटेक 5जी अल्‍ट्रासेव टेक्‍नोलॉजीसह येतो. या चिपसेटमध्ये 2.3जीबीपीएस पर्यंत डाउनलोड स्‍पीड मिळवण्याची क्षमता आहे. इतकेच नव्हे तर हा 7एनएम प्रोसेसचा वापर करून बनवण्यात आला आहे. यात डुअल क्‍लस्‍टरसह एक ओक्‍टाकोर सीपीयू आहे, ज्यात 2.4गीगाहर्ट्ज क्‍लॉक स्‍पीडसह दोन आर्म कॉर्टेक्‍स-ए76 प्रोसेसर आहेत.

realme narzo 30 pro चा फोटो

Realme चा हा फोन देशातील सर्वात किफायतशीर 5G फोन्स पैकी एक आहे. या फोनमध्ये 8 जीबी पर्यंत रॅम व 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले पॅनल आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आहे. Narzo 30 Pro 5G मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला सिंगल पंच-होल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मागील कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे तर यात f/1.8 अपर्चरसह 48 मेगापिक्सलची मेन 6P लेंस देण्यात आली आहे. तसेच f/2.3 अपर्चरसह 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेंस आणि f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये f/2.1 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

हे देखील वाचा : 8GB रॅमसह Samsung घेऊन येत आहे एक नवीन 5G फोन Samsung Galaxy F52, लॉन्चच्या आधी वेबसाइटवर झाला लिस्ट

Redmi Note 10 Pro Max

चांगल्या गेमिंगसाठी या फोनमध्ये शानदार बॅटरी, दमदार प्रोसेसर आणि रॅम व स्टोरेज पावर देण्यात आली आहे. प्रोसेसिंग पाहता Redmi Note 10 Pro Max मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा 8एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेला स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी स्मार्टफोन एड्रेनो 618 जीपीयूला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोनमध्ये 5,020एमएएचची मोठी बॅटरी आहे. स्मार्टफोन 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. तसेच Redmi Note 10 Pro मॅक्सची बेस किंमत 19,990 रुपये आहे.

Redmi NOte 10 Pro Max चा फोटो

गेमिंग सोबतच Redmi च्या या फोनमध्ये शानदार फोटोग्राफीसाठी दमदार कॅमेरा आहे. रेडमी नोट 10 प्रो मॅक्समध्ये 108MP चा प्राथमिक कॅमेरा सेंसर आहे. तसेच फोनच्या मागे 8MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस, 5MP मॅक्रो लेंस आणि 2MP डेप्थ सेंसर आहे. रेडमी नोट 10 प्रो मॅक्समध्ये फ्रंटला 16 एमपी कॅमेरा मिळतो.

हे देखील वाचा : Apple iPhone 11 वर मिळत आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट, तरीही आहे हा तोट्याचा सौदा

Samsung Galaxy F41

जर तुम्ही सॅमसंगचा गेमिंग फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर सॅमसंग गॅलेक्सी एफ41 एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा फोन 6 जीबी रॅमवर लॉन्च झाला आहे जो 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते. या फोनची बेस किंमत 14,499 रुपये आहे. तर, Samsung Galaxy F41 मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी आहे जी 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. तसेच Samsung Galaxy F41 स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियोवर लॉन्च झाला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले डिस्प्लेला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy F41 चा फोटो

Samsung Galaxy F41 ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 123डिग्री फिल्ड आफ व्यू की क्षमता असलेला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Vivo V21 5G स्मार्टफोन शानदार डिजाइन, 44MP सेल्फी कॅमेरा आणि 4000mAh बॅटरीसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Realme 8 5G

कंपनीने हा 14,999 रुपयांमध्ये काही दिवसांपूर्वी सादर केला होता. हि किंमत डिवाइसच्या 4GB+128GB वेरिएंटची आहे. 8GB+128GB वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. Realme 8 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.5 इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080p+ आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. परफॉर्मन्स पाहता रियलमीचा हा 5G स्मार्टफोन Dimensity 700 चिपसेटसह सादर केला गेला होता.

Realme 8 5G चा फोटो

मीडियाटेकच्या Dimensity 700 चिपसेटबाबत बोलले जात आहे कि हा कामगिरीच्याबाबतीत थोडा कमजोर आहे. पण, या चिपसेटबद्दल सर्वात चांगली बाब आहे कि हा 7nm चिपसेट आहे. Realme 8 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.5 इंचाचा LCD डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080p+ आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. एकंदरीत, तुम्हाला कम किंमतीत 5G सह एक गेमिंग फोन घ्यावयाचा असेल तर हा शानदार डिवाइस आहे. Realme 8 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे ज्याचा अपर्चर f/1.8 आहे. यासोबत 2 मेगापिक्सलची f/2.4 अपर्चर मोनोक्रोम लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस. हा Super Nightscape मोडसह येतो त्यामुळे खूप कमी प्रकाशात पण फोटोग्राफी करता येईल. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा पण Super Nightscape mode ला सपोर्ट करतो. फ्रंट आणि रियर दोन्ही बाजूंना कॅमेऱ्यात 30fps रेटने 1080p व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येईल.

हे देखील वाचा : Xiaomi ने Redmi Note 10 ची वाढवली किंमत, जाणून घ्या नवीन किंमत

Infinix Zero 8i

हा फोन 20.5:9 आस्पेक्ट रेशियोवर लॉन्च झाला होता जो 6.85 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डुअल पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित एक्सओएस 7 वर सादर केला गेला आहे जो 12एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेल्या मीडियाटेक हीलियो जी90टी चिपसेटवर चालतो. फोनमध्ये गेमिंग स्मूद करण्यासाठी आणि हीटिंग प्रॉबल्म्सपासून वाचण्यासाठी इनफिनिक्स झिरो 8आई मल्टी-डायमनशनल लिक्विड कूल टेक्नोलॉजीसह येतो. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन एआरएम माली-जी76 जीपीयूला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी Infinix Zero 8i च्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा फोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,500एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Infinix Zero 8i चा फोटो

या फोनची किंमत 14,999 रुपये आहे. तसेच Infinix Zero 8i ची मुख्य यूएसपी फोनचा कॅमेरा सेटअप आहे. हा फोन 6 कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो ज्यात चार सेंसर बॅक पॅनलवर आणि दोन सेंसर फ्रंट पॅनलवर देण्यात आले आहेत. फ्रंट पॅनल पाहता इनफिनिक्स झिरो 8आई मधील डुअल सेल्फी कॅमेरा सेटअपमध्ये 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंससह चालतो. इनफिनिक्स झिरो 8आई चा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनलवर डायमंड शेपमध्ये आहे. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेंसर आणि एका एआय लेंसला सपोर्ट करतो.

The post 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणारे Best Gaming स्मार्टफोन, इथे बघा संपूर्ण यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-gaming-smartphones-under-20000/feed/ 0
20,000 रुपयांच्या बजेटमध्ये बेस्ट 5G फोन, इथे बघा संपूर्ण यादी https://www.91mobiles.com/marathi/best-5g-phone-under-rs-20000/ https://www.91mobiles.com/marathi/best-5g-phone-under-rs-20000/#respond Thu, 22 Apr 2021 13:47:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10683 तुम्ही पण एक नवीन 5G फोन घेण्याचा विचार करत असाल तर 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हे फोन्स विकत घेता येतील.

The post 20,000 रुपयांच्या बजेटमध्ये बेस्ट 5G फोन, इथे बघा संपूर्ण यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तसे पाहता भारतात अजून 5G नेटवर्कची सुरुवात झाली नाही, पण मोबाईल निर्माता कंपन्यांनी आतापासून कंबर बांधली आहे. 5G नेटवर्कच्या सुरुवातीविना मोबाईल कंपन्या गेल्यावर्षीपासून भारतात 5G स्मार्टफोन सादर करत आहेत. आता एक पाऊल पुढे टाकत कंपन्या 5G फोन ग्राहकांच्या खिशाच्या विचार करून सादर करत आहेत. आज रियलमीने पण आपला नवीन फोन Realme 8 5G सादर केला आहे, ज्याची किंमत ग्राहकांच्या खिशाचा विचार करून खूप कमी ठेवण्यात आली आहे. ते पाहता आज आम्ही भारतीय बाजारातील 5 सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोन बाबत जाणून घेऊया, जे शानदार लुकसह पावरफुल स्पेसिफिकेशनसोबत येतात. जर तुम्ही पण एक नवीन 5G फोन घेण्याचा विचार करत असाल तर 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हे फोन्स विकत घेता येतील. (Best 5G phone under RS 20000)

Realme 8G 5G

सर्वप्रथम बोलूया 20,000 रुपयांमध्ये आज सादर करण्यात आलेल्या Realme 8G 5G बाबत. 5G फोनची वाढती मागणी पाहून रियलमीने आपला नवीन आणि स्वस्त 5जी फोन भारतीय बाजारात आणला आहे. हा फोन भारतातील सर्वात कमी किंमत असलेला 5G फोन आहे. कंपनीने हा फोन 14,999 रुपयांमध्ये सादर केला आहे. हि किंमत डिवाइसच्या 4GB+128GB वेरिएंटची आहे. तर, 8GB+128GB वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. Realme 8 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.5 इंचाचा LCD डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080p+ आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. परफॉर्मन्स पाहता रियलमीचा हा 5G स्मार्टफोन Dimensity 700 चिपसेटसह सादर केला गेला आहे.

हे देखील वाचा : Oppo F17 Pro स्मार्टफोन झाला अजून स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत आणि वैशिष्ट्ये

Realme 8 5G

मीडियाटेकच्या Dimensity 700 चिपसेटबाबत बोलले जात आहे कि हा परफॉर्मन्सच्या बाबतीत थोडा कमजोर आहे. पण, पण या चिपसेटबद्दल सर्वात चांगली बाब अशी आहे कि हा 7nm चिपसेट आहे. Realme 8 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.5 इंचाचा LCD डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080p+ आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. तसेच Realme 8 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे ज्याचा अपर्चर f/1.8 आहे. तसेच या फोनमध्ये 2 मेगापिक्सलची f/2.4 अपर्चर मोनोक्रोम लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. हा फोन Super Nightscape मोडसह येतो त्यामुळे कमी प्रकाशात पण फोटोग्राफी करता येते. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा पण Super Nightscape mode कोला सपोर्ट करतो. फ्रंट आणि रियर दोन्ही साइड कॅमेऱ्यात 30fps च्या रेटने 1080p व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येईल.

OPPO A74 5G

हा फोन OPPO का आता पर्यंतचा सर्वात स्वस्त 5G फोन आहे. कंपनीने अलीकडेच भारतीय मोबाईल फॅन्सना भेट देत OPPO A74 5G सादर केला होता. शानदार फीचर्स आणि आकर्षक लुक असलेला हा 5जी फोन ओपोने फक्त 17,990 रुपयांमध्ये सादर केला होता. OPPO A74 5G मध्ये 6.5 इंचाच्या फुल एचडी+ पंच-होल डिस्प्ले सोबतच फोनच्या बॅक पॅनलवर तीन रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत.

OPPO A74 5G

फोटोग्राफीसाठी फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एफ/1.7 लेंससह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसरचा समावेश आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 18वाॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 5G ड्यूल सिम डुअल स्टॅन्डबाय, ब्लूटूथ 5.1, GPS/AGPS/GLONASS/BEIDOU/GALILEO सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा : फक्त 14,999 रुपयांत लॉन्च झाला Realme 8 5G, Xiaomi आणि Samsung च्या अडचणी वाढल्या

Realme Narzo 30 Pro 5G

स्वस्त 5G फोनच्या या लिस्टमध्ये अजून एक फोन Realme चा आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात Realme Narzo 30 Pro 5G सादर केला होता. या फोनची किंमत पाहता, फक्त 16,999 रुपयांमध्ये याचा 6 जीबी रॅम आणि 64 जीबी वेरिएंट विकत घेता येईल. तर, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी वेरिएंट 19,999 रुपयांमध्ये विकला जात आहे फोनची खासियत पाहता, या फोनमध्ये 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 5000 एमएएचची बॅटरी, हाई रेंज ऑडियो, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डाइमेंसिटी 800यू 5जी चिपसेट आहे.

realme narzo 30 pro

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एआय आधारित ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे. हा f/1.8 अपर्चर, 6P लेंस आणि PDAF सारख्या फीचर्ससह येतो. तर, दुसरी 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड-अँगल लेंस आहे. हा f/2.3 अपर्चर, FOV 119 डिग्री आणि PDAF सारख्या फीचर्ससह येतो. तिसरी 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस अपर्चर f/2.4 सह आहे. तसेच, फोनमध्ये सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा इन-डिस्प्ले सेल्फी सेंसर देण्यात आला आहे. तसेच अपर्चर f/2.1 आहे. फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 5G+5G ड्यूल सिम डुअल स्टॅन्डबाय, ब्लूटूथ 5.1, GPS/AGPS/GLONASS/BEIDOU/GALILEO सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Moto G 5G

या लिस्टमध्ये Motorola चा हा एकमेव फोन आहे जो ज्याची किंमत 20,000 मध्ये नाही. पण, या लिस्टमध्ये आम्ही हा फोन यासाठी समाविष्ट केला आहे कारण याची किंमत इतकी जास्त नाही. Moto G 5G एक कमी किंमत असलेला शानदार 5G फोन आहे जो 20,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यात 5,000mAh ची बॅटरी मिळेल, जी 20W फास्ट चार्जरच्या मदतीने चार्ज करता येईल. फोनच्या मागच्या पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन Qualcomm Snapdragon 750G चिपसेटसह येईल. इतकेच नव्हे तर तुम्ही इतर फोन्स काही पैसे जास्त देऊन हा फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह विकत घेता येईल.

MotoG 5G

तसेच फोनमध्ये फोटोग्राफीसाठी मोटो जी 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. मागे अपर्चर एफ/1.7 सह 48 मेगापिक्सल प्राइमरी, अपर्चर एफ/2.2 सह 8 मेगापिक्सल वाइड-अँगल आणि अपर्चर एफ/2.4 सह मॅक्रो सेंसर आहे. फोनमध्ये पुढे अपर्चर एफ/2.2 सह 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा पण आहे. तसेच कनेक्टिविटीसाठी मोटो या फोनमध्ये 5जी, एनएफसी, ब्लूटूथ 5.1, वाय-फाय 802.11 एसी, यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस आणि इतर फीचर्स आहेत.

Realme X7 5G

20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत भारतीय बाजारात सध्या रियलमीकडे एक दोन नव्हे तर तीन फोन आहेत. या लिस्टमध्ये रियलमीचा तिसरा फोन Realme X7 5G आहे. रियलमी एक्स7 5जी च्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी वेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. तर, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी वेरिएंट 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. जर फोनची खासियत पाहता यात स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डाइमेंसिटी 800यू 5जी प्रोसेसर आणि फोनमध्ये जीव ओतण्यासाठी 4310 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 50 वॉट सुपरडार्ट चार्ज आहे.

हे देखील वाचा : 5,000एमएएच बॅटरी आणि 6.8 इंचाचा मोठ्या डिस्प्लेसह लाॅन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन

Realme X7

तसेच फोनमध्ये मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबत एफ/2.3 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी एक्स7 स्मार्टफोन एफ/2.5 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या सोनी आईएमएक्स471 सेंसरला सपोर्ट करतो.

The post 20,000 रुपयांच्या बजेटमध्ये बेस्ट 5G फोन, इथे बघा संपूर्ण यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-5g-phone-under-rs-20000/feed/ 0
फक्त 14,999 रुपयांत लॉन्च झाला Realme 8 5G, Xiaomi आणि Samsung च्या अडचणी वाढल्या https://www.91mobiles.com/marathi/realme-8-5g-launched-price-specifications-and-features-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/realme-8-5g-launched-price-specifications-and-features-in-india/#respond Thu, 22 Apr 2021 11:57:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10677 Realme 8 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 5000mAh ची बॅटरी आहे. या स्मार्टफोनसह कंपनीने 18W चा चार्जर दिला आहे.

The post फक्त 14,999 रुपयांत लॉन्च झाला Realme 8 5G, Xiaomi आणि Samsung च्या अडचणी वाढल्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने भारतात सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Realme 8 5G लॉन्च केला आहे. नावावरून समजत आहे कि रियलमीचा हा स्मार्टफोन कंपनीच्या Realme 8 सीरीजमधील लेटेस्ट मेंबर आहे. यापूर्वी कंपनीने या सीरीजचे दोन स्मार्टफोन Realme 8 आणि Realme 8 Pro स्मार्टफोन भारतात सादर केले आहेत. आता कंपनी या सीरीजचा 5G मॉडेल घेऊन आली आहे. Realme 8 5G स्मार्टफोन कंपनीने मीडियाटेकच्या Dimensity 700 चिपसेट, 90 Hz LCD आणि 5,000mAh बॅटरीसह सादर केला आहे. एकंदरीत हा स्मार्टफोन Realme 8 च्या 4G वेरिएंटपेक्षा खूप वेगळा आहे. हा स्मार्टफोन 5G मॉडेल कंपनीने Dimensity 700 चिपसेटसह सादर केला आहे तसेच या फोनचा 4G मॉडेल कंपनीने मीडियाटेकच्या Helio G95 चिपसेटसह सादर केला होता. (Realme 8 5G launched price specifications and features in India)

Realme 8 5G डिजाइन आणि लुक

Realme 8 5G स्मार्टफोनची डिजाइन पाहता हा फोन काहीसा 4G वेरिएंट सारखाच आहे. रियलमीचा हा फोन बॅक पॅनल ग्लॉसी फिनिशसह पॉलीकार्बोनेटने बनला आहे. तसेच फोनच्या मागे रियलमीची ब्रँडिंग आणि आयताकृती कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे, ज्यात तीन कॅमेरा सेंसर आणि LED फ्लॅश मिळतो. रियलमी 8 च्या 5G आणि 4G वेरिएंटच्या डिजाइनमध्ये मोठा फरक एका बाजूला असलेला फिंगरप्रिंट सेंसर इतकाच आहे . कंपनीने 5G वेरिएंटमध्ये साइड माउंटेड कॅमेरा सेंसर दिला आहे तर 4G वेरिएंटमध्ये इन-डिस्प्ले कॅमेरा सेंसर मिळतो.

Realme 8 5G स्पेसिफिकेशन्स आणि फीचर

Realme 8 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.5 इंचाचा LCD डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080p+ आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. परफॉर्मन्स पाहता रियलमीचा हा 5G स्मार्टफोन Dimensity 700 चिपसेटसह सादर केला गेला आहे. मीडियाटेकच्या Dimensity 700 चिपसेटबाबत बोलले जात आहे कि या 4G स्मार्टफोनमध्ये हीलियो जी95 च्या तुलनेत परफॉर्मन्सच्या बाबतीत थोडा कमजोर आहे. पण या चिपसेटबद्दल सर्वात चांगली बाब अशी आहे कि हा 7nm चिपसेट आहे. तर Helio G95 चिपसेट 12nm वर बनला होता.

हे देखील वाचा : सुपर परफॉर्मन्स असलेला फोन Oppo K9 पुढल्या महिन्यात Enco Air आणि Oppo Band सह होईल लॉन्च

Realme 8 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 5000mAh ची बॅटरी आहे. या स्मार्टफोनसह कंपनीने 18W चा चार्जर दिला आहे. तर कंपनीने या फोनच्या 4G वेरिएंटमध्ये 30W चा चार्जर दिला होता. रियलमीचा हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर चालतो. Realme 8 5G दोन वेरिएंट 4GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम + 128 GB स्टोरेजसह सादर केला गेला आहे. माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून फोनची स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा : 5,000एमएएच बॅटरी आणि 6.8 इंचाचा मोठ्या डिस्प्लेसह लाॅन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन

Realme 8 5G कॅमेरा

लेटेस्ट Realme 8 5G चा कॅमेरा सेंसर पाहता या स्मार्टफोनच्या बॅकपॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि LED फ्लॅश आहे. या फोनचा प्राइमेरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे, सोबत ब्लॅक अँड वाइड कॅमेरा लेंस आणि मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी रियलमीच्या या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा प्राइमेरी कॅमेरा सेंसर आहे.

Realme 8 5G किंमत

Realme 8 5G स्मार्टफोन भारतात दोन वेरिएंट्समध्ये सादर केला गेला आहे. या स्मार्टफोनचा बेस वेरिएंट 4GB रॅम + 128GB स्टोरेजसह 14,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. तसेच फोनचा हायर वेरिएंट 8GB रॅम + 128GB स्टोरेजसह 16,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. रियलमीचा हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart आणि रियलमीच्या ऑफिशियल वेबसाइटवर 28 एप्रिलला विक्रीसाठी येईल.

The post फक्त 14,999 रुपयांत लॉन्च झाला Realme 8 5G, Xiaomi आणि Samsung च्या अडचणी वाढल्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-8-5g-launched-price-specifications-and-features-in-india/feed/ 0
Realme 8 5G फोन 22 एप्रिलला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/realme-8-5g-india-launch-on-22-april-with-dimensity-700-processor/ https://www.91mobiles.com/marathi/realme-8-5g-india-launch-on-22-april-with-dimensity-700-processor/#respond Fri, 16 Apr 2021 12:40:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10607 रियलमी 8 5जीच्या लॉन्च डेटची माहिती देण्यासोबत कंपनीने मीडिया इन्वायटमध्ये या फोनचा फोटो पण शेयर केला आहे.

The post Realme 8 5G फोन 22 एप्रिलला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme इंडिया सीईओ माधव सेठ यांनी जेव्हापासून सांगितले आहे कि कंपनी ‘रियलमी 8’ सीरीजमध्ये 5G फोन पण जोडेल, तेव्हापासून रियलमी फॅन्स या फोनच्या इंडिया लॉन्चची वाट बघत आहेत. तसेच आज कंपनीने अधिकृतपणे घोषणा करून सांगितले आहे कि कंपनीचा आगामी 5जी फोन येत्या 22 एप्रिलला भारतात लॉन्च केला जाईल जो Realme 8 5G नावाने मार्केटमध्ये येईल. लॉन्च डेट सोबतच कंपनीने सांगितले आहे कि हा फोन मीडियाटेक डायमनसिटी 700 चिपसेटवर रन करेल. (Realme 8 5G India Launch on 22 April with Dimensity 700 processor)

Realme 8 5G च्या लॉन्चची माहिती कंपनीने मीडिया इन्वायटच्या माध्यमातून शेयर केली आहे. रियलमी इंडियाने सांगितले आहे कि कंपनी येत्या 22 एप्रिलला एका ऑनलाईन ईवेंटचे आयोजन करेल ज्याच्या मंचावरून रियलमी 8 5जी मॉडेल भारतीय बाजारात येईल. हा लॉन्च ईवेंट 22 एप्रिलच्या दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ज्याचे थेट प्रक्षेपण कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि यूट्यूब चॅनेलवर पण केले जाईल.

ऑफिशियल फोटो आला समोर

रियलमी 8 5जीच्या लॉन्च डेटची माहिती देण्यासोबत कंपनीने मीडिया इन्वायटमध्ये या फोनचा फोटो पण शेयर केला आहे. फोटो बघून समजले आहे कि हा मोबाईल फोन पंच होल डिस्प्लेवर लॉन्च केला जाईल ज्यात सेल्फी कॅमेरा असलेला होल स्क्रीनच्या वरच्या बाजूला डावीकडे असेल. फोनची स्क्रीन बेजल लेस आहे तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. Realme 8 5G च्या उजव्या पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटण पण दिसत आहे.

हे देखील वाचा : OPPO A74 5G ची किंमत असेल 20,000 रुपयांपेक्षा कमी, Xiaomi-Realme आणि Vivo च्या नाकात होईल दम

असे असतील स्पेसिफिकेशन्स

समोर आलेल्या रिपोर्ट्स व लीकनुसार Realme 8 5G मध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. या स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो. म्हणजे रियलमीचा हा स्मार्टफोन LCD पॅनलसह सादर केला जाऊ शकतो. त्यामुळे रियलमीच्या या स्मार्टफोनमध्ये 4G वेरिएंट प्रमाणे AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकत नाही.

रियलमीच्या या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यांच्यासोबत 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर दिला जाऊ शकतो. रियलमीच्या या स्मार्टफोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्ज सपोर्ट दिला जाऊ शकतो. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी 22 एप्रिलची वाट बघावी लागणार आहे.

The post Realme 8 5G फोन 22 एप्रिलला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-8-5g-india-launch-on-22-april-with-dimensity-700-processor/feed/ 0
Realme 8 5G स्मार्टफोनचा भारतातील लॉन्च निश्चित, समोर आले नवीन स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/realme-8-5g-india-launch-tease-on-flipkart-google-play-console-listing-revealed-some-specifications-check-details/ https://www.91mobiles.com/marathi/realme-8-5g-india-launch-tease-on-flipkart-google-play-console-listing-revealed-some-specifications-check-details/#respond Wed, 14 Apr 2021 14:46:22 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10590 Realme 8 5G स्मार्टफोनच्या Google Play Console लिस्टिंगनुसार हा अपकमिंग स्मार्टफोन MediaTek MT6882 चिपसेट म्हणजे MediaTek Dimensity 800 SoC सह लॉन्च केला जाऊ शकतो.

The post Realme 8 5G स्मार्टफोनचा भारतातील लॉन्च निश्चित, समोर आले नवीन स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme 8 5G स्मार्टफोनच्या लॉन्चसाठी आता कमी वेळ उरला आहे. रियलमीचा हा स्मार्टफोन थायलंडमध्ये 21 एप्रिलला लॉन्च होईल. रियलमी लवकरच भारतात हा स्मार्टफोन लॉन्च करेल. रियलमी इंडियाने ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Flipkart वर लिस्ट करून या फोनचा भारतातील लॉन्चची पुष्टी केली आहे. सध्या रियलमी 8 5G स्मार्टफोनच्या इंडिया लॉन्चच्या डेट बद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. Realme 8 5G स्मार्टफोनच्या लॉन्चपूर्वी हा स्मार्टफोन Google Play Console वर स्पॉट केला गेला आहे. गुगल प्ले कंसोलवर या स्मार्टफोनची लिस्टिंग सर्वप्रथम MySmartPrice ने रिपोर्ट केला आहे. या लिस्टिंगच्या माध्यमातून काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. (Realme 8 5G India launch tease on Flipkart Google play console listing revealed some specifications check details)

Realme 8 5G चा भारतातील लॉन्च निश्चित

ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर Realme 8 5G स्मार्टफोन टीज केला गेला आहे. म्हणजे रियलमी लवकरच हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याचे प्लानिंग करत आहे. फ्लिपकार्टवरील टीजरनुसार हा फोन 16 एप्रिलला समोर येईल. तसेच रियलमी इंडियाने ट्वीट करून MediaTek Dimensity 700 SoC सह आगामी स्मार्टफोन टीज केला आहे.

Realme 8 5G : Google Play Console लिस्टिंग

Realme 8 5G स्मार्टफोनच्या Google Play Console लिस्टिंगनुसार हा अपकमिंग स्मार्टफोन MediaTek MT6882 चिपसेट म्हणजे MediaTek Dimensity 800 SoC सह लॉन्च केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये ग्राफिक्ससाठी Mali-G57 MC2 GPU देण्यात आला आहे. तसेच रियलमीचा हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित कंपनीच्या कस्टम युआयवर चालेल.

हे देखील वाचा : Samsung Galaxy A32 स्मार्टफोनवर मिळत आहे 3000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, सविस्तर जाणून घ्या ऑफर

Realme 8 5G

रियलमीचा अपकमिंग 5G स्मार्टफोन 8GB RAM सह सादर केला जाऊ शकतो. रियलमी 8 5G स्मार्टफोन यापूर्वी Geekbench च्या लिस्टिंगमध्ये MediaTek Dimensity 700 SoC सह स्पॉट केला गेला होता. Realme 8 5G स्मार्टफोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता या फोनमध्ये FHD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचे रिजोल्यूशन 1080 x 2400 पिक्सल असू शकते. अंदाज लावला जात आहे कि Realme 8 5G स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च झालेल्या Realme V13 5G चा रिब्रँड असू शकतो.

हे देखील वाचा : Samsung Galaxy M21 स्मार्टफोन झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

Realme 8 5G च्या टीजरमध्ये दिसली झलक

Realme 8 5G स्मार्टफोनच्या टीजरमध्ये या स्मार्टफोनच्या डिजाइनची झलक दिसली आहे. त्याचबरोबर रियलमीच्या या स्मार्टफोनचे कलर वेरिएंट्स पण समोर आले आहेत. रियलमीचा हा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शन सुपरसोनिक ब्लू आणि सुपरसोनिक ब्लॅकमध्ये सादर केला जाऊ शकतो. रियलमीचा अपकमिंग 5G स्मार्टफोन 8.5mm जाड आणि 185 ग्राम वजनाचा असू शकतो. डिजाइन पाहता Realme 8 5G स्मार्टफोनच्या मागे चौकोनी कॅमेरा मॉड्यूल दिला जाऊ शकतो. या फोनचा प्राइमेरी कॅमेरा 48MP चा असू शकतो.

Realme V13 5G स्पेसिफिकेशन्स

Realme V13 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन FHD+, रिफ्रेश रेट 90Hz, टच सॅंपिंग रेट 180Hz आणि मॅक्सिमम ब्राइटनेस 600 निट्स आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी डिस्प्लेमध्ये पंच होल कटआउट देण्यात आला आहे. रियलमीचा हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 700 SoC सह 8GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेजसह सादर केला गेला आहे. तसेच रियलमीचा हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर चालतो.

Realme V13 मध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये प्राइमेरी कॅमेरा 48MP मेगापिक्सलचा आहे, तसेच 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरी पाहता या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्ज देण्यात आला आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये डुअल-SIM, डुअल-5G, डुअल-बॅंड Wi-Fi ac, Bluetooth v5.1, GPS, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅकसह सादर केला गेला आहे. तसेच या फोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

The post Realme 8 5G स्मार्टफोनचा भारतातील लॉन्च निश्चित, समोर आले नवीन स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-8-5g-india-launch-tease-on-flipkart-google-play-console-listing-revealed-some-specifications-check-details/feed/ 0