Realme GT Neo 5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 04 Apr 2023 04:18:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme GT Neo 5 SE लाँच! यात आहे 100W चार्जिंग, 5000mAh Battery आणि 1.5K डिस्प्ले https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-se-price-and-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-se-price-and-specifications-in-marathi/#respond Tue, 04 Apr 2023 04:18:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19989 Realme GT Neo 5 SE आज चीनमध्ये लाँच झाला आहे. हा मोबाइल 240W Charging असेलल्या Realme GT Neo 5 स्मार्टफोनचा छोटा व्हर्जन आहे जो 100W Fast Charging टेक्नॉलॉजीसह मार्केटमध्ये आला आहे. रियलमी जीटी नियो 5 एसई फोनमध्ये 1.5K Display, 64MP Camera, 16GB RAM, Qualcomm Snapdragon 7+ Gen 2 प्रोसेसर 5,500mAh Battery असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले […]

The post Realme GT Neo 5 SE लाँच! यात आहे 100W चार्जिंग, 5000mAh Battery आणि 1.5K डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme GT Neo 5 चीनमध्ये लाँच झाला आहे.
  • हा Snapdragon 7 Plus Gen 2 वर चालतो.
  • रियलमी मोबाइलमध्ये 100W Charging देण्यात आली आहे.

Realme GT Neo 5 SE आज चीनमध्ये लाँच झाला आहे. हा मोबाइल 240W Charging असेलल्या Realme GT Neo 5 स्मार्टफोनचा छोटा व्हर्जन आहे जो 100W Fast Charging टेक्नॉलॉजीसह मार्केटमध्ये आला आहे. रियलमी जीटी नियो 5 एसई फोनमध्ये 1.5K Display, 64MP Camera, 16GB RAM, Qualcomm Snapdragon 7+ Gen 2 प्रोसेसर 5,500mAh Battery असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत ज्याची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

रियलमी जीटी नियो 5 एसईची किंमत

Realme GT Neo 5 SE चार मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनचा बेस व्हेरिएंट 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत CNY 1999 म्हणजे जवळपास 24,000 रुपये आहे. तर फोनचा 12जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज व्हेरिएंट CNY 2199 (जवळपास 26,300 रुपये) आणि 12जीबी रॅम + 512जीबी स्टोरेज व्हेरिएंट CNY 2299 (जवळपास 27,500 रुपये) मध्ये लाँच करण्यात आला आहे.

रियलमी जीटी नियो 5 एसई 5जी फोनचा सर्वात मोठा व्हेरिएंट 16जीबी रॅमसह 1टीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच याची किंमत CNY 2599 आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार 31,100 रुपयांच्या आसपास आहे. चीनमध्ये हा रियलमी मोबाइल Final Fantasy आणि Shadow Black कलरमध्ये आला आहे. हे देखील वाचा: अधिकृतपणे समोर आले Redmi Note 12 Pro 4G चे स्पेसिफिकेशन्स; मिळेल 108MP चा कॅमेरा

रियलमी जीटी नियो 5 एसईचे स्पेसिफिकेशन्स

Realme GT Neo 5 SE स्मार्टफोन 2772 x 1240 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.74 इंचाच्या 1.5के डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 144हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. फोन डिस्प्लेमध्ये 1500हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 2160पीडब्ल्यूएम डिमिंग आणि 1400निट्स ब्राइटनेस सारखे फीचर्स मिळतात. कंपनीनं आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह बाजारात आणला आहे.

रियलमी जीटी नियो 5 एसई लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे जो रियलमी युआय 4.0 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगन 7+ जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.91गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 725 जीपीयू आहे. हा रियलमी मोबाइल 16जीबी पर्यंतच्या रॅम आणि 1टीबी पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: मोबाइल फोन आणि कंप्यूटरमध्ये मराठीत कसं लिहायचं? जाणून घ्या सोपी पद्धत

फोटोग्राफीसाठी Realme GT Neo 5 SE च्या बॅक पॅनलवर एफ/1.79 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/3.3 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.45 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

The post Realme GT Neo 5 SE लाँच! यात आहे 100W चार्जिंग, 5000mAh Battery आणि 1.5K डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-se-price-and-specifications-in-marathi/feed/ 0
अबब! तब्बल 240W फास्ट चार्जिंग! Realme GT Neo 5 च्या लाँचची कंपनीनं केली घोषणा https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-launch-date-fast-charging-specs-confirmed/ https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-launch-date-fast-charging-specs-confirmed/#respond Wed, 01 Feb 2023 06:14:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17386 या महिन्याच्या सुरुवातीला Realme नं आपल्या 240W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीची घोषणा केली होती आणि सांगितले होते की कंपनीच्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये ही टेक्नॉलॉजी देण्यात येईल. लिक्समधून असं सांगण्यात आलं होतं की आगामी Realme GT Neo 5 मध्ये या टेक्नॉलॉजीचा समावेश करण्यात येईल. आता खुद्द रियलमीनं आपल्या नव्या स्मार्टफोन GT Neo 5 च्या लाँच डेटची घोषणा […]

The post अबब! तब्बल 240W फास्ट चार्जिंग! Realme GT Neo 5 च्या लाँचची कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • रियलमीनं आगामी Realme GT Neo 5 च्या लाँच डेटची घोषणा केली आहे.
  • Realme GT Neo 5 येत्या 9 फेब्रुवारीला सर्वप्रथम चीनमध्ये लाँच केला जाईल.
  • अधिकृत टीजरमधून 240W फास्ट चार्जिंगची पुष्टी

या महिन्याच्या सुरुवातीला Realme नं आपल्या 240W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीची घोषणा केली होती आणि सांगितले होते की कंपनीच्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये ही टेक्नॉलॉजी देण्यात येईल. लिक्समधून असं सांगण्यात आलं होतं की आगामी Realme GT Neo 5 मध्ये या टेक्नॉलॉजीचा समावेश करण्यात येईल. आता खुद्द रियलमीनं आपल्या नव्या स्मार्टफोन GT Neo 5 च्या लाँच डेटची घोषणा केली आहे आणि यातील 240W फास्ट चार्जिंग देखील कंपनीनं टीज केली आहे.

टेक वेबसाइट प्राइसबाबाच्या एका रिपोर्टमधून समजलं आहे की हा फोन कंपनी मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2023 मध्ये सादर करेल जो 27 फेब्रुवारी आणि 2 मार्च दरम्यान बार्सिलोनामध्ये आयोजित केला जाईल. परंतु कंपनी नव्या जीटी नियो 5 साठी वेगळी योजना आखात आहे. हा फोन पुढील आठवड्यात ग्राहकांच्या भेटीला येत आहे. हे देखील वाचा: पेट्रोलविना चालणारी दणकट बाइक आली बाजारात; इतकी आहे PURE EV ecoDryft ची किंमत

Realme GT Neo 5 ची लाँच डेट ठरली

रियलमीनं चायनीज मायक्रो ब्लॉगिंग साईट विबोवर अधिकृत टीजर शेयर केला आहे. त्यानुसार Realme GT Neo 5 स्मार्टफोन येत्या 9 फेब्रुवारीला चीनमध्ये लाँच केला जाईल. टीजरमधून स्मार्टफोनच्या 240वॅट फास्ट चार्जिंगचा खुलासा झाला आहे. याआधी आलेल्या माहितीनुसार हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच होईल ज्यातील एकात 240W फास्ट चार्जिंग मिळेल तर एक 150W चार्जिंग स्पीड देईल.

Realme GT Neo 5 चे संभाव्य स्पेक्स

लिक्सनुसार, Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळेल, जो 2,772×1,240 पिक्सेल रिजोल्यूशनला सपोर्ट करणारा 1.5K ओएलईडी डिस्प्ले असेल आणि 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. प्रोसेसिंगसाठी Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात येईल. जोडीला 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB पर्यंत UFS4.0 स्टोरेज दिली जाऊ शकते.

Realme GT Neo 5 मध्ये Android 13 आधारित रियलमी युआय 4.0 ची स्किन मिळू शकते. या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये 50MP Sony IMX890 सेन्सर प्रायमरी कॅमेऱ्याचे काम करेल, जोडीला 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 2MP चा माक्रो कॅमेरा मिळेल. फोनमधील फ्रंट कॅमेऱ्याची माहिती मात्र अद्याप मिळाली नाही. हे देखील वाचा: पुन्हा एकदा बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी वनप्लसची तयारी; किफायतशीर OnePlus Nord 3 चे स्पेसिफिकेशन लीक

Realme GT Neo 5 स्मार्टफोन दोन वेगवेगळ्या बॅटरी आणि फास्ट चार्जिंग व्हेरिएंटसह लाँच होईल. यातील एका मॉडेलमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात येईल जो 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तर दुसऱ्या मॉडेलमध्ये 4,600mAh ची छोटी बॅटरी मिळेल परंतु हा व्हेरिएंट 240W च्या दणकट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल, त्यामुळे काही मिनिटांतच हा हँडसेट फुलचार्ज होईल. हा डिवाइस इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करेल आणि यात एक प्लास्टिक फ्रेम देण्यात येईल. टिपस्टरनुसार, Realme GT Neo 5 मध्ये RBG लाइट्सचं फिचर असेल, जे पहिल्यांदाच कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये मिळेल.

The post अबब! तब्बल 240W फास्ट चार्जिंग! Realme GT Neo 5 च्या लाँचची कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-launch-date-fast-charging-specs-confirmed/feed/ 0
चुटकीसरशी फुल चार्ज होणार फोन! 240W fast charging टेक्नॉलॉजी येतेय बाजारात; शाओमीला टाकले मागे https://www.91mobiles.com/marathi/240w-fast-charging-technology-launch-with-realme-gt-neo-5/ https://www.91mobiles.com/marathi/240w-fast-charging-technology-launch-with-realme-gt-neo-5/#respond Fri, 06 Jan 2023 05:40:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16607 रियलमीनं अधिकृत घोषणा करून सांगितलं आहे की कंपनीनं 240वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी तयार केली आहे तसेच लवकरच ही टेक्नॉलॉजी असलेला स्मार्टफोन बाजारात येईल. रियलमी जगातील पहिला मोबाइल ब्रँड असेल जो ही चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेला फोन लाँच करेल. आतापर्यंत मार्केटमध्ये 200W फास्ट चार्जिंग असलेले फोन आले आहेत परंतु 240W fast charging technology वर कोणताही डिवायस बनला […]

The post चुटकीसरशी फुल चार्ज होणार फोन! 240W fast charging टेक्नॉलॉजी येतेय बाजारात; शाओमीला टाकले मागे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमीनं अधिकृत घोषणा करून सांगितलं आहे की कंपनीनं 240वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी तयार केली आहे तसेच लवकरच ही टेक्नॉलॉजी असलेला स्मार्टफोन बाजारात येईल. रियलमी जगातील पहिला मोबाइल ब्रँड असेल जो ही चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेला फोन लाँच करेल. आतापर्यंत मार्केटमध्ये 200W फास्ट चार्जिंग असलेले फोन आले आहेत परंतु 240W fast charging technology वर कोणताही डिवायस बनला नाही.

कोणत्या फोनमध्ये मिळेल 240वॉट फास्ट चार्जिंग?

जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणता मोबाइल फोन एवढ्या दमदार फास्ट चार्जिंगसह येणार आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे Realme GT Neo 5. रियलमी कंपनीनं सांगितलं आहे की जीटी नियो5 फोन 240वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारा पहिला मोबाइल असेल. हा डिवायस पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारी 2023 मध्ये मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. पुढे आम्ही या स्मार्टफोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

कसा असेल Realme GT Neo 5?

लिक्सनुसार, Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळेल, जो 2,772×1,240 पिक्सेल रिजोल्यूशनला सपोर्ट करणारा 1.5K ओएलईडी डिस्प्ले असेल आणि 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. प्रोसेसिंगसाठी Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात येईल. जोडीला 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB पर्यंत UFS4.0 स्टोरेज दिली जाऊ शकते.

Realme GT Neo 5 मध्ये Android 13 आधारित रियलमी युआय 4.0 ची स्किन मिळू शकते. या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये 50MP Sony IMX890 सेन्सर प्रायमरी कॅमेऱ्याचे काम करेल, जोडीला 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 2MP चा माक्रो कॅमेरा मिळेल. फोनमधील फ्रंट कॅमेऱ्याची माहिती मात्र अद्याप मिळाली नाही.

Realme GT Neo 5 स्मार्टफोन दोन वेगवेगळ्या बॅटरी आणि फास्ट चार्जिंग व्हेरिएंटसह लाँच होईल. यातील एका मॉडेलमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात येईल जो 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तर दुसऱ्या मॉडेलमध्ये 4,600mAh ची छोटी बॅटरी मिळेल परंतु हा व्हेरिएंट 240W च्या दणकट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल, त्यामुळे काही मिनिटांतच हा हँडसेट फुलचार्ज होईल. हा डिवाइस इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करेल आणि यात एक प्लास्टिक फ्रेम देण्यात येईल. टिपस्टरनुसार, Realme GT Neo 5 मध्ये RBG लाइट्सचं फिचर असेल, जे पहिल्यांदाच कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये मिळेल.

The post चुटकीसरशी फुल चार्ज होणार फोन! 240W fast charging टेक्नॉलॉजी येतेय बाजारात; शाओमीला टाकले मागे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/240w-fast-charging-technology-launch-with-realme-gt-neo-5/feed/ 0
240W च्या सुपरफास्ट चार्जिंगसह होऊ शकते Realme GT Neo 5 ची एंट्री; लाँच पूर्वीच माहिती लीक https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-design-key-specifications-leaked-ahead-of-its-launch/ https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-design-key-specifications-leaked-ahead-of-its-launch/#respond Thu, 29 Dec 2022 05:11:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16471 Realme नं कन्फर्म केलं आहे की कंपनी येत्या 5 जानेवारी 2023 ला चीनमध्ये एका इव्हेंटचे आयोजन करणार आहे. कंपनीनं आपल्या नेक्स्ट जेनरेशन चार्जिंग टेक्नॉलॉजीची हिंट देण्यास सुरुवात केली आहे, जी बहुचर्चित 240W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असू शकते. याआधी आलेल्या रिपोर्ट्सनुसार आगामी Realme GT Neo 5 स्मार्टफोन कंपनीचा आणि कदाचित जगातील सर्वात पहिला स्मार्टफोन असू शकतो […]

The post 240W च्या सुपरफास्ट चार्जिंगसह होऊ शकते Realme GT Neo 5 ची एंट्री; लाँच पूर्वीच माहिती लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme नं कन्फर्म केलं आहे की कंपनी येत्या 5 जानेवारी 2023 ला चीनमध्ये एका इव्हेंटचे आयोजन करणार आहे. कंपनीनं आपल्या नेक्स्ट जेनरेशन चार्जिंग टेक्नॉलॉजीची हिंट देण्यास सुरुवात केली आहे, जी बहुचर्चित 240W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असू शकते. याआधी आलेल्या रिपोर्ट्सनुसार आगामी Realme GT Neo 5 स्मार्टफोन कंपनीचा आणि कदाचित जगातील सर्वात पहिला स्मार्टफोन असू शकतो ज्यात 240W चा अवाढव्य fast charging स्पीड मिळू शकतो. कंपनीनं मात्र Realme GT Neo 5 ची कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही परंतु नव्या लिक्समधून या स्मार्टफोनच्या डिजाईन आणि महत्वाच्या स्पेक्सची माहिती समोर आली आहे.

Realme GT Neo 5 ची लीक डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स

  • 240W फास्ट चार्जिंग
  • 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज
  • Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर
  • Sony IMX890 कॅमेरा आणि OIS

वर दिलेल्या लीक पोस्टरनुसार आगामी Realme GT Neo 5 दिसेल. ही डिजाईन आधी लीक झालेल्या रेंडर्ससारखी आहे. या रेंडर्समधून या हँडसेटच्या बॅक पॅनलची डिजाईन दिसली आहे. त्यानुसार हा फोन ड्युअल टोन डिजाईनसह सादर केला जाऊ शकतो. बॅक पॅनलवर वरच्या बाजूला एका चौकोनी कॅमेरा मोड्यूलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो, जोडीला एलईडी फ्लॅश मिळू शकतो. हा फोन कर्व एजसह लाँच होऊ शकतो हे रेंडरवरून स्पष्ट झालं आहे. तसेच फोनच्या उजवीकडे पवार बटन दिसत आहे, त्यामुळे व्हॉल्युम रॉकर डावीकडे मिळू शकतात. हे देखील वाचा: 5000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंट! आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत Xiaomi 11i 5G उपलब्ध

पोस्टरवर उल्लेख केल्यानुसार Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये 240W ची फास्ट चार्जिंग मिळू शकते. तसेच या फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी Snapdragon 8+ Gen 1 ची पावर दिली जाऊ शकते. तसेच जोडीला 16GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यांतची स्टोरेज दिली जाऊ शकते. Realme GT Neo 5 मध्ये Sony IMX890 कॅमेरा सेन्सर OIS ला सपोर्टसह मिळू शकतो, अशी माहिती देखील समोर आली आहे.

Realme GT Neo 5 चे संभाव्य स्पेक्स

लिक्सनुसार, Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळू शकतो, जो 2,772×1,240 पिक्सेल रिजोल्यूशनला सपोर्ट करणारा 1.5K ओएलईडी डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटसह येऊ शकतो. प्रोसेसिंगसाठी Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. जोडीला 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB पर्यंत UFS4.0 स्टोरेज दिली जाऊ शकते.

Realme GT Neo 5 मध्ये Android 13 आधारित रियलमी युआय 4.0 ची स्किन मिळू शकते. या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये 50MP Sony IMX890 सेन्सर प्रायमरी कॅमेऱ्याचे काम करू शकतो, जोडीला 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 2MP चा माक्रो कॅमेरा मिळू शकतो. फोनमधील फ्रंट कॅमेऱ्याची माहिती मात्र अद्याप मिळाली नाही. हे देखील वाचा: 8 हजारांपेक्षा कमी बजेटमध्ये येईल Samsung Galaxy F04; पुढील आठवड्यात होणार देशात एंट्री

Realme GT Neo 5 स्मार्टफोन दोन वेगवेगळ्या बॅटरी आणि फास्ट चार्जिंग व्हेरिएंटसह लाँच होऊ शकतो. यातील एका मॉडेलमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी 150W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येऊ शकते. तर दुसऱ्या मॉडेलमध्ये 4,600mAh ची छोटी बॅटरी 240W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. हा डिवाइस इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करू शकतो आणि यात एक प्लास्टिक फ्रेम मिळू शकते. टिपस्टरनुसार, Realme GT Neo 5 मध्ये RBG लाइट्सचं फिचर असू शकतं.

The post 240W च्या सुपरफास्ट चार्जिंगसह होऊ शकते Realme GT Neo 5 ची एंट्री; लाँच पूर्वीच माहिती लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-design-key-specifications-leaked-ahead-of-its-launch/feed/ 0
Realme GT Neo 5 चे स्पेसिफिकेशन्स लीक; जाणून घ्या माहिती https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-specifications-leak-ahead-of-launch/ https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-specifications-leak-ahead-of-launch/#respond Tue, 20 Dec 2022 05:36:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16156 Realme आपल्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT Neo 5 चीनमध्ये लाँच करण्याची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी Realme GT Neo 5 स्मार्टफोनचे रेंडर ऑनलाइन लीक झाले होते. त्यामुळे हा फोन कसा दिसेल याची माहिती नेटकऱ्यांना मिळाली आहे. तसेच आता कंपनी आपल्या आगामी जीटी नियो स्मार्टफोनचा लाँच टीज करत आहे. आज Realme GT Neo 5 चे […]

The post Realme GT Neo 5 चे स्पेसिफिकेशन्स लीक; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme आपल्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT Neo 5 चीनमध्ये लाँच करण्याची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी Realme GT Neo 5 स्मार्टफोनचे रेंडर ऑनलाइन लीक झाले होते. त्यामुळे हा फोन कसा दिसेल याची माहिती नेटकऱ्यांना मिळाली आहे. तसेच आता कंपनी आपल्या आगामी जीटी नियो स्मार्टफोनचा लाँच टीज करत आहे. आज Realme GT Neo 5 चे काही महत्वाचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. ही माहिती विश्वासू सोर्सकडून मिळाली आहे, ज्यात डिस्प्ले, कॅमेरा, चिपसेट आणि बॅटरीच्या डिटेल्सचा समावेश आहे.

Realme GT Neo 5 चे लीक स्पेसिफिकेशन्स

Realme GT Neo 5 स्मार्टफोनचे रेंडर्स काही दिवसांपूर्वी लीक झाले होते. या रेंडर्समधून या हँडसेटच्या बॅक पॅनलची डिजाईन दिसली आहे. त्यानुसार हा फोन ड्युअल टोन डिजाईनसह सादर केला जाऊ शकतो. बॅक पॅनलवर वरच्या बाजूला एका चौकोनी कॅमेरा मोड्यूलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो, जोडीला एलईडी फ्लॅश मिळेल. हा फोन कर्व एजसह लाँच होऊ शकतो हे रेंडरवरून स्पष्ट झालं आहे. तसेच फोनच्या उजवीकडे पवार बटन दिसत आहे, त्यामुळे व्हॉल्युम रॉकर डावीकडे मिळू शकतो. हे देखील वाचा: नव्या फोनची चाहूल लागताच OnePlus 10 Pro वर मोठा डिस्काउंट; स्टॉक संपण्याआधी करा बुक

प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं रियलमीच्या आगामी स्मार्टफोनची माहिती दिली आहे. त्यानुसार, Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळू शकतो, जो 2,772×1,240 पिक्सेल रिजोल्यूशनला सपोर्ट करणारा 1.5K ओएलईडी डिस्प्ले असू शकतो आणि 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. प्रोसेसिंगसाठी Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. जोडीला 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB पर्यंत UFS4.0 स्टोरेज दिली जाऊ शकते.

Realme GT Neo 5 मध्ये Android 13 आधारित रियलमी युआय 4.0 ची स्किन मिळू शकते. या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतोRealme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये 50MP Sony IMX890 सेन्सर प्रायमरी कॅमेऱ्याचे काम करेल, जोडीला 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 2MP चा माक्रो कॅमेरा मिळू शकतो. फोनमधील फ्रंट कॅमेऱ्याची माहिती मात्र अद्याप मिळाली नाही. हे देखील वाचा: 999 रुपयांमध्ये कुटुंबातील 4 माणसांचा रिचार्ज; अनलिमिटेड कॉलिंग व डेटा असलेला Airtel चा भन्नाट प्लॅन

Realme GT Neo 5 स्मार्टफोन दोन वेगवेगळ्या बॅटरी आणि फास्ट चार्जिंग व्हेरिएंटसह लाँच होऊ शकतो. यातील एका मॉडेलमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात येईल जो 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. तर दुसऱ्या मॉडेलमध्ये 4,600mAh ची छोटी बॅटरी मिळेल परंतु हा व्हेरिएंट 240W च्या दणकट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल, त्यामुळे काही मिनिटांतच हा हँडसेट फुलचार्ज होऊ शकते. हा डिवाइस इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करेल आणि यात एक प्लास्टिक फ्रेम दिली जाऊ शकते.

The post Realme GT Neo 5 चे स्पेसिफिकेशन्स लीक; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-specifications-leak-ahead-of-launch/feed/ 0