Reliance - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 04 Oct 2022 13:42:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Jio 5G Launch: दसऱ्याचा मुहूर्त ठरला! उद्या येतंय 1Gbps स्पीडसह JIO 5G; देशातील 4 शहरांना मिळणार पहिला मान https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-launch-speed-1gbps-unlimited-5g-data-5g-sim/ https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-launch-speed-1gbps-unlimited-5g-data-5g-sim/#respond Tue, 04 Oct 2022 13:42:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13705 Jio 5G launch: जियो युजर्सना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती आली आहे, रिलायन्स जियोची 5G Service उद्या म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तला सुरु होत आहे. 5 ऑक्टोबरपासून JIO True 5G Service चं बीटा ट्रायल सुरु होईल. ही सर्व्हिस देशातील चार शहरांमध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि वाराणसीमध्ये सुरु करण्यात येईल. सध्या ही सर्व्हिस ऑन इन्व्हिटेशन आहे, जुन्या जियो […]

The post Jio 5G Launch: दसऱ्याचा मुहूर्त ठरला! उद्या येतंय 1Gbps स्पीडसह JIO 5G; देशातील 4 शहरांना मिळणार पहिला मान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Jio 5G launch: जियो युजर्सना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती आली आहे, रिलायन्स जियोची 5G Service उद्या म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तला सुरु होत आहे. 5 ऑक्टोबरपासून JIO True 5G Service चं बीटा ट्रायल सुरु होईल. ही सर्व्हिस देशातील चार शहरांमध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि वाराणसीमध्ये सुरु करण्यात येईल. सध्या ही सर्व्हिस ऑन इन्व्हिटेशन आहे, जुन्या जियो युजर्स पैकी काही निवडक युजर्सना ही सर्व्हिस वापरण्यासाठी आमंत्रित केलं जाईल.

या ठराविक युजर्सना वेलकम-ऑफर देखील मिळेल, ज्या अंतर्गत युजर्सना 1GBPS पर्यंतच्या स्पीड आणि अनलिमिटेड 5जी डेटा मिळेल. इन्व्हाईटेड युजर्स या जियो ट्रू 5जी सर्व्हिसचा अनुभव घेऊ शकतील आणि त्यांच्या अनुभवाच्या आधारावर कंपनी व्यापक 5जी सर्व्हिस (Jio 5G Service Launch) लाँच करेल. चला जाणून घेऊया JIO TRUE 5G ‘वेलकम-ऑफर’, Jio 5G Speed, Jio 5G Data आणि Jio 5G SIM ची माहिती. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त अँड्रॉइड टॅबलेटमध्ये शानदार 2K डिस्प्ले; 8000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह Redmi Pad ची भारतात एंट्री

Jio 5G Launch Speed 1gbps Unlimited 5g Data 5g Sim

या शहरांमध्ये सुरु होईल जियो 5G सर्व्हिस

वर सांगितल्याप्रमाणे सध्या जियो 5G सर्व्हिसचं बीटा ट्रायल देशातील चार शहरांमध्ये Delhi, Mumbai, Kolkata आणि Varanasi मध्ये सुरु केलं जाईल. सध्या ही सर्व्हिस ऑन इन्व्हिटेशन मिळेल. म्हणजे जुन्या जियो युजर्स पैकी काही निवडक युजर्सना ही सर्व्हिस वापरण्यासाठी इन्व्हाईट पाठवलं जाईल. कंपनीनं या ऑफरला JIO TRUE 5G ‘वेलकम-ऑफर’ असं नाव दिलं आहे.

जियो ट्रू 5जी वेलकम ऑफर

  • Jio True 5G वेलकम ऑफर Jio युजर्ससाठी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये इन्व्हाईट द्वारे लाँच केली जाईल.
  • या ग्राहकांना 1 Gbps+ पर्यंतच्या स्पीडसह अनलिमिटेड 5G डेटा मिळेल
  • जशी जशी शहरं तयार होतील इतर शहरांसाठी बीटा टेस्टिंग सर्व्हिसची घोषणा केली जाईल
  • युजर्स या बीटा टेस्टिंगचा लाभ शहरात संपूर्ण नेटवर्क कव्हरेज मिळेपर्यंत घेऊ शकतील.
  • इन्व्हिटेशन ‘Jio वेलकम ऑफर’ युजर्सना आपलं Jio सिम बदलण्याची गरज नाही. त्यांच्याकडे फक्त 5G मोबाइल असणं आवश्यक आहे, Jio True 5G सेवा ऑटोमॅटिक अपग्रेड होईल.
  • Jio सर्व हँडसेट ब्रँड्ससह काम करत आहे त्यामुळे ग्राहकांकडे 5G डिवाइसचे असंख्य पर्याय आहेत.

jio 5g works on 4g sim

Jio 4G SIM वरच मिळेल 5G सर्व्हिस

जियो ट्रू 5जीच्या बीटा ट्रायलची घोषणा करताना कंपनीनं स्पष्ट केलं आहे की जियो 5G सर्व्हिसचा वापर करण्यासाठी ग्राहकांना नवीन 5G सिमची गरज नाही. कंपनीनं माहिती दिली आहे की इन्व्हिटेशन ‘Jio वेलकम ऑफर’ युजर्सना आपलं Jio सिम बदलण्याची गरज नाही. 5G मोबाइलवर Jio True 5G सेवा ऑटोमॅटिक अपग्रेड होईल. हे देखील वाचा: मनमोहक लूकसह Oppo च्या शानदार स्मार्टफोनची एंट्री; स्वस्तात 50MP Camera आणि 5000mAh Battery

The post Jio 5G Launch: दसऱ्याचा मुहूर्त ठरला! उद्या येतंय 1Gbps स्पीडसह JIO 5G; देशातील 4 शहरांना मिळणार पहिला मान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-launch-speed-1gbps-unlimited-5g-data-5g-sim/feed/ 0
भारतात पुन्हा होणार TikTok ची एंट्री! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण https://www.91mobiles.com/marathi/bytedance-in-talks-with-reliance-for-investment-in-tiktok-india/ https://www.91mobiles.com/marathi/bytedance-in-talks-with-reliance-for-investment-in-tiktok-india/#respond Fri, 14 Aug 2020 10:03:37 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7787 रॉयटर्सच्या एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि रिलायंस इंडस्ट्रीज टिकटॉकचा भारतातील व्यवसाय खरेदी करू शकते.

The post भारतात पुन्हा होणार TikTok ची एंट्री! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
यावर्षी जुलै मध्ये भारत सरकारने टिकटॉक समवेत 59 चायनीज ऍप बॅन केले होते. सरकारने प्राइवेसीचे कारण देत टिकटॉक समवेत इतर चायनीज ऍप बॅन केले होते. या 59 चायनीज ऍप्स मधील सर्वात प्रसिद्ध TikTok बाबत बातमी समोर येत आहे कि हा वीडियो मेकिंग ऍप भारतात पुन्हा एंट्री करू शकतो.

रॉयटर्सच्या एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि रिलायंस इंडस्ट्रीज टिकटॉकचा भारतातील व्यवसाय खरेदी करू शकते. सूत्रांच्यानुसार आता डील बाबत बोलणी सुरु झाली आहे. तसेच आता पर्यंत रिलायंस आणि टिकटॉक कडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

मार्केट इंटेलिजेंस फर्म सेंसर टॉवरच्या डेटानुसार भारत 61 मिलियन पेक्षा जास्त डाउनलोड सह शॉर्ट वीडियो ऍपचा सर्वात मोठा बाजार आहे. पण जेव्हा मॉनिटाइजेशनचा प्रश्न येतो तेव्हा चीन, यूएस आणि यूकेला टिकटॉकचा एकूण 90% हिस्सा मिळतो.

जून मध्ये भारत सरकारने आईटी ऍक्ट 2000 च्या सेक्शन 69 अंतर्गत हा ऍप देशात बॅन केला आहे. टिकटॉक सोबतच सरकारने एकूण 59 ऍप्सच्या वापरावर भारतात बंदी घातली होती. या आदेशानंतर गूगल प्ले स्टोर आणि ऍप्पल ऍप स्टोरने टिकटॉक व्यतिरिक्त Helo, Mi Video Call – Xiaomi, DU Browser, DU Privacy, Cache Cleaner – DU App Studio, Clean Master – Cheetah Mobile आणि Wonder Camera पण आपल्या प्लॅटफॉर्म वरून काढून टाकले होते.

अमेरिकेत पण टिकटॉक बॅन

गेल्या आठवड्यात अमेरिकेने पण चीनी ऍप टिकटॉक वरील बॅनला मंजुरी दिली होती. पण अमेरिकेने बाइटडांसला टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय एखाद्या अमेरिकन कंपनीला विकण्यासाठी 15 सप्टेंबर पर्यंतची वेळ दिली आहे. टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय माइक्रोसॉफ्ट आणि ट्वीटर विकत घेऊ शकतात. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Google आणि Apple ने आपल्या ऍप स्टोर वरून काढून टाकला फोर्टनाइट

खूप लोकप्रिय बॅटल रॉयल गेम Fortnite ऍप्पलने गुरुवारी आपल्या ऍप स्टोर वरून काढून टाकला आहे. डेवलपरने फोर्टनाइटसाठी एक अपडेट जाहीर केल्यानंतर लगेचच हे पाऊल उचलण्यात आले आहे. ऍप्पल व्यतिरिक्त Google ने पण प्ले स्टोर वरून हा ऍप काढून टाकला आहे. गूगल प्ले स्टोर आणि ऍपल ऍप स्टोर दोन्ही ठिकाणी हा ऍप उपलब्ध नाही.

The post भारतात पुन्हा होणार TikTok ची एंट्री! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bytedance-in-talks-with-reliance-for-investment-in-tiktok-india/feed/ 0
Jio ची अजून एक भेट, JioPhone यूजर्सना मोफत मिळतील 100 मिनिट्स https://www.91mobiles.com/marathi/good-news-for-reliacne-jiophone-users-get-free-100-minute-and-sms/ https://www.91mobiles.com/marathi/good-news-for-reliacne-jiophone-users-get-free-100-minute-and-sms/#respond Tue, 31 Mar 2020 11:57:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6946 रिलायंस जियोने ATM द्वारे रिचार्ज करण्याच्या सुविधेची पण घोषणा केली होती. यूजर्सना हि स्पेशल सर्विस देण्यासाठी जियोने 9 बँकांसोबत भागेदारी केली आहे.

The post Jio ची अजून एक भेट, JioPhone यूजर्सना मोफत मिळतील 100 मिनिट्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशात चालू असलेला 21 दिवसांचा लॉकडाउन पाहून बीएसएनएल आणि एयरटेल नंतर रिलांयसने आपल्या जियोफोन ग्राहकांसाठी शानदार भेट आणली आहे. कंपनीने JioPhone ग्राहकांसाठी एक खास ऑफर सादर केली आहे. या ऑफर मध्ये JioPhone यूजर्सची वैधता संपल्यावर पण त्यांची इनकमिंग चालू राहील.

इतकेच नव्हे तर यूजर्सना 17 एप्रिल 2020 पर्यंत कॉलिंगसाठी 100 मिनिट्स आणि 100 SMS फ्री मिळतील. त्याचबरोबर सर्व JioPhone यूजर्सना इनकमिंग कॉल वैधतेनंतर पण मिळतील. जियोच्या ऑफर नंतर त्या यूजर्सना सर्वात जास्त फायदा मिळेल, ज्यांचा प्लान लवकरच संपणार होता.

अलीकडेच रिलायंस जियोने ATM द्वारे रिचार्ज करण्याच्या सुविधेची पण घोषणा केली होती. यूजर्सना हि स्पेशल सर्विस देण्यासाठी जियोने 9 बँकांसोबत भागेदारी केली आहे. कंपनीने हा निर्णय कोरोना वायरसमुळे देशात सुरु असेलेल्या लॉकडाउन मध्ये घेतला आहे. यूजर्सना मोबाईल रिचार्ज करताना अडचण येत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर जियो यूजर्स UPI, एसएमएस आणि कॉलच्या माध्यमातून पण रिचार्ज करू शकतात.

असाच निर्णय BSNL आणि Airtel पण घेतला आहे. विशेष म्हणजे मुकेश अंबानी यांच्या रिलायंस इंडस्ट्रीजने पीएम केयर्स फंड मध्ये 500 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. कंपनीने घोषणा केली होती कि ते 5 लाख लोकांना पुढील 10 दिवस जेवण देईल. कोरोनामुळे चालू असलेल्या लॉकडाउन मध्ये कंपनी 50 लाख लोकांच्या जेवणाची सोया करेल.

रिलायंसने काही दिवसांपूर्वी आपल्या काही यूजर्सना भेट देत JIO DATA PACK पॅक सादर केला होता. हा पॅक 1 एप्रिल पर्यंत वैध आहे. रिलायंस जियोचा हा प्लान लॉकडाउनमुळे घरातून काम करत असलेल्या यूजर्सना खूप उपयोगी पडेल. एकदा पुन्हा सांगू इच्छितो कि जियोने सादर केलेल्या या डेटा पॅकसाठी यूजर्सना कोणताही रिचार्ज करण्याची गरज नाही. चीनच्या वुहान मध्ये नोव्हेंबर 2019 पासून कोरोना संक्रमणाची सुरवात झाली होती. आज या वायरसच्या विळख्यात चीन समवेत संपूर्ण जग आले आहे. हा खतरनाक वायरस पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारतात 21 दिवसांच्या बंदाची घोषणा केली आहे. म्हणजे 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लॉकडाउन असेल.

The post Jio ची अजून एक भेट, JioPhone यूजर्सना मोफत मिळतील 100 मिनिट्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/good-news-for-reliacne-jiophone-users-get-free-100-minute-and-sms/feed/ 0
Jio ने सादर केला Coronovirus चेक करण्याचे टूल, अशाप्रकारे करा चेक https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-launches-covid-19-symptoms-checker-tool-in-my-jio-app/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-launches-covid-19-symptoms-checker-tool-in-my-jio-app/#respond Wed, 25 Mar 2020 13:24:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6893 या महामारी विळखा पाहता टेलिकॉम ऑपरेटर Jio ने MyJio App मध्ये एक नवीन फीचर जोडले आहे.

The post Jio ने सादर केला Coronovirus चेक करण्याचे टूल, अशाप्रकारे करा चेक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीन मधील वुहान मध्ये नोव्हेंबर 2019 पासून कोरोना संक्रमणाची सुरवात झाली होती. आज या वायरसच्या विळख्यात चीन समवेत संपूर्ण जग आहे. या खतरनाक वायरसमुळे मंगळवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारतात 21 दिवसांच्या बंदची घोषणा केली आहे. या महामारी विळखा पाहता टेलिकॉम ऑपरेटर Jio ने MyJio App मध्ये एक नवीन फीचर जोडले आहे.

या नवीन फीचरच्या मदतीने यूजर्स कोरोना संबंधित सर्व माहिती मिळवू शकतात. जियो ऍप मध्ये मिळणाऱ्या या फीचरला कंपनीने ‘कोरोना वायरस इन्फो अँड टूल’ असे नाव दिले आहे. फोन मधील माए जियो ऍपच्या हॅम्बर्गर मेन्यू वर टॅप करून हा वापरता येईल. या ऑप्शन वर क्लिक केल्यावर एक मेसेज यूजर्सना दिसेल.

यात लिहिण्यात आले आहे की, ‘कोरोना वायरस (COVID-19) एक संक्रामक आजार आहे, जो अश्या नवीन वायरसमुळे होत आहे जो याआधी कधीच माणसांमध्ये सापडला नाही. कृपया खाली दिलेल्या ऑप्शंसच्या मदतीने याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आणि अपडेटेड रहा.’

यूजर्सना या ऍप वर कोणती लक्षणे असल्यावर कोरोना संक्रमण होऊ शकते आणि कोणती लक्षणे सामान्य तापाची आहेत याची माहिती मिळते. पुढील फोटोजच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता कि कोणत्या प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्ही जाणून घेऊ शकता कि तुम्हाला कोरोना वायरस झाला आहे कि नाही.

कोरोना वायरस टेस्ट मध्ये तुम्हाला काही साधे प्रश्न विचारले जातील, जसे कि तुमचे वय किती आहे, तुम्ही परदेश यात्रा केली आहे कि नाही, तुम्हाला सर्दी किंवा खोकला आहे का. शेवटी तुम्हाला उत्तर मिळेल कि तुम्हाला Covid-19 ची जोखीम किती आहे.

टेस्ट सेंटर वर टॅप केल्यावर जियो यूजर्सना देशातील सर्व टेस्ट सेंटर्सची राज्यवार लिस्ट संपूर्ण पत्त्यासह देण्यात आली आहे. या फीचर मध्ये कोरोना वायरस चेक करण्याव्यतिरिक्त टेस्ट सेंटर्स ची लिस्ट, आकडे , हेल्पलाइन आणि FAQ सारख्या ऑप्शनचा समावेश आहे.

नोट: जर तुमच्याकडे माए जियो ऍप नसेल तर तुम्ही लिंक वर क्लिक करून कोरोना वायरसची लक्षणे चेक करू शकता.

The post Jio ने सादर केला Coronovirus चेक करण्याचे टूल, अशाप्रकारे करा चेक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-launches-covid-19-symptoms-checker-tool-in-my-jio-app/feed/ 0
स्वस्त कॉलिंगचे दिवस संपले, 6 डिसेंबर पासून इतके महागणार Jio चे प्लान्स https://www.91mobiles.com/marathi/jio-hike-tariff-plans-price-from-6-december-know-about-it/ https://www.91mobiles.com/marathi/jio-hike-tariff-plans-price-from-6-december-know-about-it/#respond Mon, 02 Dec 2019 11:07:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5928 मोबाईल सर्विस रेट्स ऑल इन वन प्लान्स अंतर्गत वाढवले जातील, ज्यात ग्राहकांना 300 टक्क्यांपर्यंत फायदा पण दिला जाईल.

The post स्वस्त कॉलिंगचे दिवस संपले, 6 डिसेंबर पासून इतके महागणार Jio चे प्लान्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात काही वर्षांपासून सुरु असलेला स्वस्त कॉलिंगचा काळ आता संपुष्टात येताना दिसत आहे. या काळात ज्यांनी फायदा घेतला त्या ग्राहकांच्या खिश्यावरील ओझे वाढणार आहे. देशातील मोठ्या टेलीकॉम कंपनी एयरटेल आणि वोडाफोन-आइडिया सोबतच रिलायंस जियोने पण आपल्या मोबाईल प्लानच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

कंपनीने एक प्रेस नोट पाठवून सांगितले आहे कि 6 डिसेंबर पासून मोबाईल टॅरिफ 40 टक्क्यांपर्यंत वाढवले जातील. तसेच कंपनीने विधान केले आहे कि मोबाईल सर्विस रेट्स ऑल इन वन प्लान्स अंतर्गत वाढवले जातील, ज्यात ग्राहकांना 300 टक्क्यांपर्यंत फायदा पण दिला जाईल.

याव्यतिरिक्त कंपनी म्हणते कि जियो यूजर्स साठी लवकरच नवीन ऑल इन वन प्लान सादर केले जातील, ज्यात ग्राहकांना अनलिमिटेड वॉयस आणि डेटा मिळेल. पण नवीन प्लान्स 40 टक्क्यांपर्यंत महाग असतील. पण ‘कस्टमर्स फर्स्ट’ च्या वचनानंतर्गत ग्राहकांना 300 टक्के ज्यादा फायदा दिला जाईल.

कंपनीने पुढे म्हटले आहे कि जियो टेलीकॉम टॅरिफ रिवाइज करण्याच्या प्रक्रियेबद्दल सरकारशी बोलणी करेल. विशेष म्हणजे भारती एयरटेल आणि वोडाफोन-आइडियाने टॅरिफ रेट्स वाढवण्याची घोषणा केली होती. या कंपन्यांनी म्हटले कि 3 डिसेंबर पासून प्रीपेड कॉल आणि डेटा 40 टक्क्यांपर्यंत वाढतील. तर एयरटेलने आपल्या नवीन प्रीपेड प्लानच्या किंमती पण घोषित केल्या आहेत.

The post स्वस्त कॉलिंगचे दिवस संपले, 6 डिसेंबर पासून इतके महागणार Jio चे प्लान्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-hike-tariff-plans-price-from-6-december-know-about-it/feed/ 0
Jio Fiber चा झटका, वाई-फाई कनेक्ट केल्यावर स्पीड कमी होऊन होत आहे निम्मा https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-offer-50mbps-speed-on-wifi-100mbps-plan-benefits/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-offer-50mbps-speed-on-wifi-100mbps-plan-benefits/#respond Wed, 25 Sep 2019 14:49:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5418 तांत्रिक विशेषज्ञानी सांगितले कि कंपनीकडून मिळणारा Wi-Fi router सिंगल-बँड आहे आणि 2.4गीगाहर्ट्ज फ्रिक्वेंसी वर चालतो. आणि याच कारणामुळे Jio Fiber शी वाई-फाई कनेक्ट केल्यावर 50Mbps चा स्पीड मिळत आहे.

The post Jio Fiber चा झटका, वाई-फाई कनेक्ट केल्यावर स्पीड कमी होऊन होत आहे निम्मा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio ने गेल्याच महिन्यात देशात आपल्या ब्रॉडबँड सर्विसची सुरवात करत Jio Fiber लॉन्च केला होता. Jio Fiber भारतात लॉन्च झालेली पहिली ब्रॉडबँड सर्विस आहे जी 1Gbps चा इंटरनेट स्पीड देण्यास सक्षम आहे. Jio Fiber चा सर्वात छोटा प्लान 699 रुपयांचा आहे ज्यात कंपनीकडून यूजर्सना 100Mbps स्पीडने इंटरनेट देण्याचा दावा केला गेला होता. आता जेव्हा Jio Fiber बाजारात रोलआउट झाली आहे आणि देशात Jio Fiber चे कनेक्शन जोडण्यास सुरवात झाली आहे, तेव्हा समोर आले आहे कि Jio Fiber शी वाई-फाई कनेक्ट केल्यावर यूजर्सना फक्त 50Mbps चा स्पीड मिळत आहे.

91मोबाईल्सने आपल्या रिपोर्ट मध्ये Jio Fiber संबंधित हि महत्वाची माहिती दिली आहे. 91मोबाईल्सने राजधानी दिल्ली मध्ये Jio Fiber चे कनेक्शन देणाऱ्या डीलरशी संपर्क करून माहिती घेतील आहे. प्राप्त माहिती नुसार Jio Fiber आपल्या सर्वात छोट्या प्लान्स मध्ये एक महिन्यासाठी 100GB डेटा देत आहे जो 100 Mbps स्पीडने चालतो. एखाद्या कंम्प्यूटर किंवा लॅपटॉप मध्ये Jio Fiber कनेक्ट केल्यास हा स्पीड अगदी योग्य म्हणजे 100 Mbps च्य आसपास असतो पण जेव्हा Jio Fiber शी वाई-फाई कनेक्ट करण्यात आला तेव्हा हा स्पीड अर्धा म्हणजे 50 Mbps झाला.

वाई-फाई कनेक्शन वर फक्त 50Mbps स्पीड

Jio Fiber शी वाई-फाई कनेक्ट केल्यावर इंटरनेट स्पीड 100Mbps वरून थेट 50Mbps वर आला. याबाबतीत जेव्हा Jio शी संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितले कि 100Mbps स्पीड असलेला प्लान विकत घेतल्यास LAN/Ethernet कनेक्शन सह Jio संपूर्ण 100Mbps चा स्पीड देईल. पण Jio Fiber जेव्हा Jio Wi-Fi Home gateway द्वारे एखाद्या स्मार्टफोन किंवा इतर डिवाईसशी कनेक्ट केली जाईल तेव्हा हा स्पीड 50Mbps पर्यंत येईल.

हे आहे कारण

91मोबाईल्सशी बोलताना Reliance Jio च्या तांत्रिक विशेषज्ञानी सांगितले कि कंपनीकडून मिळणारा Wi-Fi router सिंगल-बँड आहे आणि 2.4गीगाहर्ट्ज फ्रिक्वेंसी वर चालतो. आणि याच कारणामुळे Jio Fiber शी वाई-फाई कनेक्ट केल्यावर 50Mbps चा स्पीड मिळत आहे.

उपाय पण आहे

फक्त 50Mbps चा स्पीड मिळण्याच्या कारणासोबतच 91मोबाईल्सने हा स्पीड वाढवण्याचा उपाय पण शोधला आहे. Reliance Jio कडून जो Jio Fiber सह सिंगल-बँड Wi-Fi router दिला जात आहे तोच बदलून यूजर डुअल-बँड Wi-Fi router पण वापरू शकतात. Jio Fiber सह वाई-फाई वर पण 100Mbps पर्यंतचा स्पीड मिळवण्यासाठी 5गीगाहर्ट्ज पर्यंत फ्रिक्वेंसी असेलला राउटर वापरावा लागेल. पण त्यासाठी यूजर्सना वेगळे पैसे द्यावे लागतील.

फ्री टीवी ऑफर

Reliance Jio HD/4K LED TV आणि 4K Setup Box कंपनीच्या Jio Fiber ब्राडबँड सोबत फ्री देत आहे. म्हणजे Jio Fiber विकत घेतल्यास यूजर्सना टेलीविजन आणि सेटअप बॉक्स मोआफ्ट मिळवण्याची संधी मिळेल. कंपनीच्या स्कीम अंतर्गत जियो फाइबरचा वार्षिक प्लान घेतल्यास यूजर्सना हि मोफत सुविधा मिळेल. कंपनीने आपल्या या प्लानचे नाव ‘Jio Forever Annual Plan’ ठेवले आहे.

कंपनीने Jio Fiber च्या प्लानची बेस किंमत 700 रुपये प्रतिमाह ठेवली आहे. तसेच Jio Fiber चा सर्वात मोठा प्लान 10,000 रुपये प्रतिमाहचा आहे. Jio Fiber चा कोणताही प्लान एक वर्षासाठी घेतल्यास कंपनी कडून यूजर्सना HD/4K LED TV आणि 4K Setup Box मोफत मिळेल. टीवी आणि सेटअप बॉक्स साठी ग्राहकांना अतिरिक्त पैसे दयावे लागणार नाहीत.

उदाहरणार्थ जर तुम्ही Jio Fiber चा 700 रुपयांचा प्लान Jio Forever Annual Plan सह घेतला तर तुम्हाला संपूर्ण वर्षात एकूण 8,400 रुपये द्यावे लागतील. या 8,400 रुपयांमध्ये तुम्हाला Jio Fiber + HD/4K LED TV + 4K Setup Box मिळेल. म्हणजे एका सर्विसच्या किंमतीत अजून दोन सर्विस मोफत.

The post Jio Fiber चा झटका, वाई-फाई कनेक्ट केल्यावर स्पीड कमी होऊन होत आहे निम्मा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-offer-50mbps-speed-on-wifi-100mbps-plan-benefits/feed/ 0
जियोने सादर केला 102 रुपयांचा प्लान, मिळेल अनलिमिटिड फ्री डेटा आणि कॉलिंगचा फायदा https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-launch-102-rs-new-plan-for-prepaid-users-amarnath-yatra/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-launch-102-rs-new-plan-for-prepaid-users-amarnath-yatra/#respond Fri, 05 Jul 2019 13:10:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4735 प्रवासी कनेक्शन तर घेतात पण याचा वापर फक्त यात्रेतच करतात त्यामुळे हा सौदा महागात पडतो.

The post जियोने सादर केला 102 रुपयांचा प्लान, मिळेल अनलिमिटिड फ्री डेटा आणि कॉलिंगचा फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंस जियोने अमरनाथ यात्रेकरूंसाठी 102 रुपयांचा एक नवीन प्रीपेड प्लान सादर केला आहे. यात्रा लक्षात घेऊन प्लानची वैधता 7 दिवस ठेवण्यात आली आहे. या प्लान मध्ये यूजर्सना कॉलिंग, इंटरनेट आणि एसएमएसचा लाभ मिळेल. चला तर मग जाणून घेऊया या प्लान बद्दल सर्वकाही.

रिलायंस जियोचा हा प्लान प्रीपेड यूजर्स साठी आहे. हा प्लान कंपनीने जम्मू कश्मीर सर्कल साठी सादर केला आहे. ग्राहकांना या प्लानने रिचार्ज केल्यानंतर 0.5जीबी अनलिमिटेड डेटा रोज मिळेल. तसेच डेटा संपल्यावर 64केबीपीएस स्पीडने इंटरनेट वापरता येईल.

सोबतच यूजर्सना अनलिमिटिड नॅशनल आणि लोकल कॉलिंगची सुविधा पण मिळेल. तसेच ग्राहकांना प्रतिदिन 100 एसएमएस पण फ्री मिळतील. हा प्लान फक्त नॉन-प्राइम मेंबर्स साठी आहे.

जम्मू कश्मीर मध्ये सुरक्षेच्या कारणांमुळे देशभरातून आलेल्या यात्रेकरूंचे फक्त पोस्ट-पेड कनेक्शनच चालतात. दुसऱ्या राज्यातून आलेल्या प्रवाशांचे प्रीपेड कनेक्शन राज्यात बंद पडतात. त्यामुळे कोणत्याही टेलीकॉम कंपनीच्या प्री पेड ग्राहकांना आपल्या कुटुंबाच्या संपर्कात राहण्यासाठीजम्मू कश्मीर मधून नवीन कनेक्शन घ्यावे लागते. प्रवासी कनेक्शन तर घेतात पण याचा वापर फक्त यात्रेतच करतात त्यामुळे हा सौदा महागात पडतो.

रिलायंस जियोचा 7 दिवसांचा हा प्रीपेड प्लान अमरनाथ यात्रेकरूंसाठी योग्य आहे. ज्यात फक्त 102 रुपयांमध्ये यात्री फक्त यात्राकाळात आपल्या कुटुंबाशी संपर्क करू शकतीलआणि 7 दिवसांची व्हॅलिडिटी संपताच हा आपोआप संपेल.

The post जियोने सादर केला 102 रुपयांचा प्लान, मिळेल अनलिमिटिड फ्री डेटा आणि कॉलिंगचा फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-launch-102-rs-new-plan-for-prepaid-users-amarnath-yatra/feed/ 0
फक्त अडीच वर्षात 30 कोटी यूजर मिळवून Jio ने केली कमाल https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-crosses-300-million-customers-mark/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-crosses-300-million-customers-mark/#respond Mon, 15 Apr 2019 09:53:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4098 IPL 2019 मध्ये टीवी कमर्शियल्स मध्ये जियो ‘सेलिब्रेटिंग 300 मिलियन यूजर्स’ टॅगलाइन सह जाहिरात देत आहे.

The post फक्त अडीच वर्षात 30 कोटी यूजर मिळवून Jio ने केली कमाल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय टेलीकॉम मार्केट मध्ये आल्यांनतर ​रिलायंस जियो ने देशातील टेलीकॉम बाजाराचा चेहराच बदलून टाकला आहे. इंटरनेट डेटा साठी भरभक्कम पैसे देणाऱ्या यूजर्सना फ्री मध्ये इंटरनेट देण्यासोबतच हि कंपनी एकापाठोपाठ एक नवीन रेकॉर्ड करत आहे. हेच रेकॉर्ड पुढे नेत कंपनी Relinace Jio ने 3 वर्षांपेक्षा कमी वेळात 300 मिलियन यानी 30 कोटी कस्टमर्स मिळवण्याचा पराक्रम केला आहे.

कंपनी ने हा आकडा 2 मार्चला मिळवला होता. IPL 2019 मध्ये टीवी कमर्शियल्स मध्ये जियो ‘सेलिब्रेटिंग 300 मिलियन यूजर्स’ टॅगलाइन सह जाहिरात देत आहे. पण आम्ही जियो कडे याविषयी विचारले तेव्हा त्यांनी ऑफिशियल याची कोणतीही माहिती दिली नाही.

Jio जगातील सर्वात वेगवान 100 मिलियन कस्टमर मिळवणारी कंपनी पण बनली आहे. विशेष म्हणजे Jio ने 170 दिवसांत 100 मिलियन कस्टमर जोडले होते. भारती एयरटेल बद्दल बोलायचे तर डिसेंबर 2018 च्या क्वार्टर मध्ये कंपनी ने 284 मिलियनचा कस्टमर बेस दाखवला होता. पण रेग्युलेटरी फाइलिंग्स नुसार डिसेंबर मध्ये एयरटेल कडे 340.2 मिलियन कस्टमर्स आणी जानेवारीच्या शेवटी 340.3 मिलियन कस्टमर्स होते.

विशेष म्हणजे एयरटेल ने 300 मिलियन कस्टमर्स मिळवण्यासाठी 19 वर्ष घेतले होते. तर वोडाफोन आणी आइडिया मर्ज झाल्यानंतर वोडाफोन आइडिया लिमिटेड भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर बनली आहे. वोडाफोन आइडिया लिमिटेड कडे 400 मिलियनचा कस्टमर बेस आहे. पण जियोची प्रगती पाहता असे वाटत आहे कि कंपनी लवकरच वोडाफोन आइडिया मागे टाकत सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर बनू शकते.

अलीकडेच ​रिलायंस जियो ने आपल्या युजर्ससाठी Cricket Data Pack खासकरून क्रिकेटच्या चाहत्त्यांसाठी सादर केला होता. सध्या टी-20 क्रिकेट ची टूर्नामेंट आईपीएल चालू आहे. आईपीएल चे वेड जगजाहीर आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांचे क्रिकेट प्रेमी हि टूर्नामेंट आवडीने बघतात. आशाच क्रिकेट फॅन्स साठी रिलायंस जियो ने क्रिकेट डेटा पॅक लॉन्च केला आहे.

रिलायंस जियोच्या या खास क्रिकेट डेटा पॅक मध्ये मिळणारे फायदे पाहता हा प्लान प्रीपेड ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे. जियो क्रिकेट डेटा पॅकची किंमत 251 रुपये आहे. हा पॅक 51 दिवसांच्या वॅलि​डिटी सह येतो. कंपनी या प्लान मध्ये रोज आपल्या यूजर्सना 2जीबी इंटरनेट डेटा देत आहे जो 4जी स्पीड वर चालेल. 2जीबी प्रतिदिन या हिशोबाने जियो ग्राहकांना प्लान अंतर्गत एकूण 102जीबी 4जी डेटा मिळेल.

The post फक्त अडीच वर्षात 30 कोटी यूजर मिळवून Jio ने केली कमाल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-crosses-300-million-customers-mark/feed/ 0
दिवाळीच्या निमित्ताने जियो ने लॉन्च केले जियोफोन फेस्टिवल गिफ्ट कार्ड, बघा याचे फायदे https://www.91mobiles.com/marathi/reliance-jiophone-gift-card-launched-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jiophone-gift-card-launched-in-marathi/#respond Tue, 30 Oct 2018 07:57:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2679 रिलायंस जियोफोन फेस्टिवल गिफ्ट कार्ड आॅनलाइन स्टोर अमेझॉन इंडिया, रिलायंस डिजिटल स्टोर आणि रिलायंस फ्रेश सहित इतर कंपनी स्टोर वर उपलब्ध आहे याची किंमत ​1,095 रुपये आहे.

The post दिवाळीच्या निमित्ताने जियो ने लॉन्च केले जियोफोन फेस्टिवल गिफ्ट कार्ड, बघा याचे फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
निमित्त कोणतेही असो रिलायंस जियो ते सोडत नाही. प्रत्येक संधीचा फायदा घेऊन आपल्या यूजर्सना कंपनी काही ना काही आॅफर्स देत असते. आता दिवाळीची लगबग सुरु झाली आहे आणि यावेळी पण कंपनी आपल्या यूजर्स साठी खास भेट घेऊन आली आहे. कंपनीने जियोफोन फेस्टिवल गिफ्ट कार्ड लॉन्च केला आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही खूप कमी किंमतीती जियो फोन रिचार्ज सोबतच विकत घेऊ शकता किंवा कोणलाही गिफ्ट करू शकता.

रिलायंस जियोफोन फेस्टिवल गिफ्ट कार्ड आॅनलाइन स्टोर अमेझॉन इंडिया, रिलायंस डिजिटल स्टोर आणि रिलायंस फ्रेश सहित इतर कंपनी स्टोर वर उपलब्ध आहे याची किंमत ​1,095 रुपये आहे. हा तुम्ही अमेझॉन व्यतिरिक्त रिलायंस डिजिटल स्टोर वरून पण वापरू शकता. या कार्डच्या माध्यमातून तुम्ही कोणताही जुना फोन देऊन 1,500 रुपयांचा नवीन जियोफोन घेऊ शकता ज्याची किंमत फक्त 501 रुपये असेल. इतकेच नव्हे तर गिफ्ट कार्ड सोबत जियो फोन वर 594 रुपयांचा स्पेशल प्रीपेड प्लान वाला कूपन पण मिळेल ज्यात भरपूर डेटा आणि कॉलिंग बेनिफिट्स आहेत.

रिलायंस जियो च्या 6 महिन्यांच्या या प्लानची वैधता 6 महीने अर्थात 180 दिवस आहे आणि यात तुम्हाला रोज 500 एमबी 4जी डेटा मिळेल. कंपनी 180 दिवसांत 90जीबी 4जी डेटा देत आहे. तसेच जियो च्या इतर प्लान प्रमाणे या प्लान मध्ये पण अनलिमिटेड कॉलिंग सेवा मोफत आहे. सोबतच नॅशनल रोमिंग पण फ्री आहे. तसेच कंपनी जुना फोन एक्सचेंज केल्यास 6जीबी ​अतिरिक्त 4जी डेटा देता आहे.

विशेष म्हणजे साल 2017 मध्ये रिलायंस ने 1,500 रुपयांचा 4जी फीचर फोन सादर केला होता. या फोन साठी कंपनीने 49 रुपयांचा मासिक, 153 रुपयांचा मासिक आणि 594 रुपयांचा सहामाही प्लान सादर केला आहे. तसेच यावर्षी कंपनी ने जियोफोन 2 सादर केला आहे जो क्वर्टी कीपॅड सह उपलब्ध आहे ज्याची किंमत 2,999 रुपये आहार. या फोन मध्ये डुअल सिमचा वापर करता येतो तर जियोफोन मध्ये एकच सिमचा वापर करता येतो. जियोफोन 2 साठी हे गिफ्टकार्ड वैध नाही.

The post दिवाळीच्या निमित्ताने जियो ने लॉन्च केले जियोफोन फेस्टिवल गिफ्ट कार्ड, बघा याचे फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jiophone-gift-card-launched-in-marathi/feed/ 0
जियोची ‘रिचार्ज करा या दिवाळीला आणि फायदा मिळवा वर्षभर’, एक वर्ष फ्री कॉल आणि 547जीबी 4जी डेटा https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-diwali-offer-100-percent-cashback-rs-1699-plan-with-547-gb-4g-data-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-diwali-offer-100-percent-cashback-rs-1699-plan-with-547-gb-4g-data-in-marathi/#respond Mon, 22 Oct 2018 14:18:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2590 जियो ग्राहक लोकल व एसटीडी आॅननेटवर्क तसेच आॅफनेटवर्क नंबर्स वर अनलिमिटेड वॉयस कॉल करू शकतील. हे वॉयस कॉल रोमिंग मध्ये पण फ्री असतील.

The post जियोची ‘रिचार्ज करा या दिवाळीला आणि फायदा मिळवा वर्षभर’, एक वर्ष फ्री कॉल आणि 547जीबी 4जी डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंस जियो ने नुकताच आपला रिपोर्ट शेयर केला होता ज्यात कंपनी ने सांगितले होते की जियो ने फक्त 25 महिन्यात 25,00,00,000 यूजर जोडले आहेत. एवढ्या वेगाने हा प्रगती करत जियो इंडियन टेलीकॉम बाजारात नवीन रेकॉर्ड केला आहे. हा पराक्रमाचे श्रेय जियो ने आपल्या यूजर्सना दिले आहे. तर आता दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना भेट देत जियो ने ‘रिचार्ज करा या दिवाळीला आणि फायदा मिळवा वर्षभर’ नावाची अनोखी आॅफर सादर केली आहे. या आॅफर मध्ये वर्षभरासाठी डेटा बेनिफिट आणि अनलिमिटेड कॉलिंग सोबतच रिचार्ज वर 100 टक्के कॅशबॅक देण्यात येत आहे.

रिलायंस जियोचा स्पेशल प्लान पाहता कंपनी ने दिवाळीच्या निमित्ताने 1699 रुपयांचा नवीन प्लान सादर केला आहे. हा प्लान 365 दिन म्हणजे एका वर्षाच्या वैधतेसह येतो. या प्लान मध्ये एक वर्ष मोफत कॉलिंग करता येईल. जियो ग्राहक लोकल व एसटीडी आॅननेटवर्क तसेच आॅफनेटवर्क नंबर्स वर अनलिमिटेड वॉयस कॉल करू शकतील. हे वॉयस कॉल रोमिंग मध्ये पण फ्री असतील.

जियोच्या या दिवाळी धमाका मध्ये मिळणारा इंटरनेट डेटा पाहता 1699 रुपयांच्या प्लान मध्ये कंपनी आपल्या यूजर्सना रोज 1.5जीबी 4जी इंटरनेट डेटा देईल. या हिशोबाने यूजर्सना वर्षभरात एकूण 547जीबी 4जी डेटा मिळेल. सोबतच जियो ग्राहकांना रोज 100एसएमएस पण मिळतील आणि कंपनी कडून माय जियो अॅप चे मोफत सब्सक्रिप्शन मिळेल.

या सर्व बेनिफिट सोबतच कंपनी 100 टक्के कॅशबॅक पण या प्लान वर देत आहे. हा कॅशबॅक वाउचर स्वरुपात ग्राहकांना मिळेल. 1699 रुपयांच्या प्लान ने रिचार्ज केल्यास 500 रुपयांचे 2 वाउचर तर एक 200 रुपयांचा वाउचर मिळेल. या वाउचर्सचा वापर माय जियो अॅप सोबतच रिलायंस डिजीटल स्टोर्स वर पण करता येईल. ज्यातून फोन रिचार्ज सोबतच आॅनलाईन खरेदी पण करता येईल. ​

रिलायंस जियो कडून मिळणारे हे वाउचर 31 डिसेंबर पर्यंत वापरावे लागतील. पण जियोच्या या शानदार दिवाळी आॅफरचा लाभ घेण्यासाठी 30 नोव्हेंबरच्या आधी रिचार्ज करावा लागेल.

The post जियोची ‘रिचार्ज करा या दिवाळीला आणि फायदा मिळवा वर्षभर’, एक वर्ष फ्री कॉल आणि 547जीबी 4जी डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-diwali-offer-100-percent-cashback-rs-1699-plan-with-547-gb-4g-data-in-marathi/feed/ 0