फक्त अडीच वर्षात 30 कोटी यूजर मिळवून Jio ने केली कमाल

भारतीय टेलीकॉम मार्केट मध्ये आल्यांनतर ​रिलायंस जियो ने देशातील टेलीकॉम बाजाराचा चेहराच बदलून टाकला आहे. इंटरनेट डेटा साठी भरभक्कम पैसे देणाऱ्या यूजर्सना फ्री मध्ये इंटरनेट देण्यासोबतच हि कंपनी एकापाठोपाठ एक नवीन रेकॉर्ड करत आहे. हेच रेकॉर्ड पुढे नेत कंपनी Relinace Jio ने 3 वर्षांपेक्षा कमी वेळात 300 मिलियन यानी 30 कोटी कस्टमर्स मिळवण्याचा पराक्रम केला आहे.

कंपनी ने हा आकडा 2 मार्चला मिळवला होता. IPL 2019 मध्ये टीवी कमर्शियल्स मध्ये जियो ‘सेलिब्रेटिंग 300 मिलियन यूजर्स’ टॅगलाइन सह जाहिरात देत आहे. पण आम्ही जियो कडे याविषयी विचारले तेव्हा त्यांनी ऑफिशियल याची कोणतीही माहिती दिली नाही.

Jio जगातील सर्वात वेगवान 100 मिलियन कस्टमर मिळवणारी कंपनी पण बनली आहे. विशेष म्हणजे Jio ने 170 दिवसांत 100 मिलियन कस्टमर जोडले होते. भारती एयरटेल बद्दल बोलायचे तर डिसेंबर 2018 च्या क्वार्टर मध्ये कंपनी ने 284 मिलियनचा कस्टमर बेस दाखवला होता. पण रेग्युलेटरी फाइलिंग्स नुसार डिसेंबर मध्ये एयरटेल कडे 340.2 मिलियन कस्टमर्स आणी जानेवारीच्या शेवटी 340.3 मिलियन कस्टमर्स होते.

विशेष म्हणजे एयरटेल ने 300 मिलियन कस्टमर्स मिळवण्यासाठी 19 वर्ष घेतले होते. तर वोडाफोन आणी आइडिया मर्ज झाल्यानंतर वोडाफोन आइडिया लिमिटेड भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर बनली आहे. वोडाफोन आइडिया लिमिटेड कडे 400 मिलियनचा कस्टमर बेस आहे. पण जियोची प्रगती पाहता असे वाटत आहे कि कंपनी लवकरच वोडाफोन आइडिया मागे टाकत सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर बनू शकते.

अलीकडेच ​रिलायंस जियो ने आपल्या युजर्ससाठी Cricket Data Pack खासकरून क्रिकेटच्या चाहत्त्यांसाठी सादर केला होता. सध्या टी-20 क्रिकेट ची टूर्नामेंट आईपीएल चालू आहे. आईपीएल चे वेड जगजाहीर आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांचे क्रिकेट प्रेमी हि टूर्नामेंट आवडीने बघतात. आशाच क्रिकेट फॅन्स साठी रिलायंस जियो ने क्रिकेट डेटा पॅक लॉन्च केला आहे.

रिलायंस जियोच्या या खास क्रिकेट डेटा पॅक मध्ये मिळणारे फायदे पाहता हा प्लान प्रीपेड ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे. जियो क्रिकेट डेटा पॅकची किंमत 251 रुपये आहे. हा पॅक 51 दिवसांच्या वॅलि​डिटी सह येतो. कंपनी या प्लान मध्ये रोज आपल्या यूजर्सना 2जीबी इंटरनेट डेटा देत आहे जो 4जी स्पीड वर चालेल. 2जीबी प्रतिदिन या हिशोबाने जियो ग्राहकांना प्लान अंतर्गत एकूण 102जीबी 4जी डेटा मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here