स्वस्त कॉलिंगचे दिवस संपले, 6 डिसेंबर पासून इतके महागणार Jio चे प्लान्स

भारतात काही वर्षांपासून सुरु असलेला स्वस्त कॉलिंगचा काळ आता संपुष्टात येताना दिसत आहे. या काळात ज्यांनी फायदा घेतला त्या ग्राहकांच्या खिश्यावरील ओझे वाढणार आहे. देशातील मोठ्या टेलीकॉम कंपनी एयरटेल आणि वोडाफोन-आइडिया सोबतच रिलायंस जियोने पण आपल्या मोबाईल प्लानच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

कंपनीने एक प्रेस नोट पाठवून सांगितले आहे कि 6 डिसेंबर पासून मोबाईल टॅरिफ 40 टक्क्यांपर्यंत वाढवले जातील. तसेच कंपनीने विधान केले आहे कि मोबाईल सर्विस रेट्स ऑल इन वन प्लान्स अंतर्गत वाढवले जातील, ज्यात ग्राहकांना 300 टक्क्यांपर्यंत फायदा पण दिला जाईल.

याव्यतिरिक्त कंपनी म्हणते कि जियो यूजर्स साठी लवकरच नवीन ऑल इन वन प्लान सादर केले जातील, ज्यात ग्राहकांना अनलिमिटेड वॉयस आणि डेटा मिळेल. पण नवीन प्लान्स 40 टक्क्यांपर्यंत महाग असतील. पण ‘कस्टमर्स फर्स्ट’ च्या वचनानंतर्गत ग्राहकांना 300 टक्के ज्यादा फायदा दिला जाईल.

कंपनीने पुढे म्हटले आहे कि जियो टेलीकॉम टॅरिफ रिवाइज करण्याच्या प्रक्रियेबद्दल सरकारशी बोलणी करेल. विशेष म्हणजे भारती एयरटेल आणि वोडाफोन-आइडियाने टॅरिफ रेट्स वाढवण्याची घोषणा केली होती. या कंपन्यांनी म्हटले कि 3 डिसेंबर पासून प्रीपेड कॉल आणि डेटा 40 टक्क्यांपर्यंत वाढतील. तर एयरटेलने आपल्या नवीन प्रीपेड प्लानच्या किंमती पण घोषित केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here