Samsung Galaxy M30s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 18 Dec 2020 15:06:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung पासून Xiaomi पर्यंतचे हे आहेत 15 हजारांपेक्षा कमी किंमतीतले बेस्ट गेमिंग स्मार्टफोन, बघा संपूर्ण यादी https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-xiaomi-best-gaming-smartphones-under-rs-15000/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-xiaomi-best-gaming-smartphones-under-rs-15000/#respond Fri, 18 Dec 2020 15:06:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9372 आम्ही तुमच्यासाठी 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतले बेस्ट गेमिंग स्मार्टफोन्सची एक यादी घेऊन आलो आहोत. चला बघूया हि यादी..

The post Samsung पासून Xiaomi पर्यंतचे हे आहेत 15 हजारांपेक्षा कमी किंमतीतले बेस्ट गेमिंग स्मार्टफोन, बघा संपूर्ण यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
या धकाधकीच्या जीवनात स्मार्टफोन्सचे महत्व खूप बदलले आहे. फोन फक्त संपर्क साधण्यासाठी राहील नाहीत. सध्या आपण फोनची निवड करण्याआधी काही फीचर्स- गेमिंग, चांगला कॅमेरा, मोठी बॅटरी आणि दमदार परफॉर्मन्स सारख्या अनेक गोष्टींचा विचार करतो. तसेच आपल्या बजेट मध्ये पण अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यातून निवड करणे कठीण होते. 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत सध्या बाजारात अनेक गेमिंग स्मार्टफोन आहेत आणि याच कारणामुळे एक परफेक्ट गेमिंग फोन निवडणे कठीण होते. जर तुम्ही पण 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत बेस्ट गेमिंग फोन शोधत असाल तर तुमची निवडप्रक्रिया आम्ही सोप्पी करणार आहोत. आम्ही तुमच्यासाठी 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतले बेस्ट गेमिंग स्मार्टफोन्सची एक यादी घेऊन आलो आहोत. चला बघूया हि यादी..

Realme Narzo 20 Pro

रियलमी नार्जो 20 प्रो मध्ये मीडियाटेक हीलियो G95 गेमिंग प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्याला AnTuTu मध्ये 30W+ सुपर हाई बेंचमार्क मिळाला आहे. तसेच, हा प्रोसेसर 12nm प्रोसेसचा वापर करून बनवण्यात आला आहे. तसेच हा प्रोसेसर दोन हाई परफॉर्मन्स Cortex-A76 cores at up to 2.05GHz आणि सहा हाई-एफिशिएंसी Cortex-A55 सह येतो. चांगल्या ग्राफिक्ससाठी यात 900MHz Mali-G76GPU देण्यात आला आहे. या प्रोसेसरचा वापर कंपनीने रियलमी 7 मध्ये आधी केला आहे. तसेच, Narzo 20 Pro मध्ये 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची किंमत 14,999 रुपयांपासून सुरु होते. नार्जो 20 प्रो बाबत इथे क्लिक करून जाणून घ्या सर्वकाही.

Motorola Moto G9 Power

मोटोरोलाच्या जी-सीरीजचा लेटेस्ट फोन Moto G9 Power भारतात सर्वप्रथम सादर केला गेला होता. Moto G9 Power भारतातील पहिला फोन होता ज्यात नवीन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला होता. हा हेवी गेमिंग पण चांगल्याप्रकारे सांभाळतो. फोन मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज मिळते. सोबतच यात 512 जीबी पर्यंत माइक्रो एसडी कार्ड सपोर्ट पण मिळेल. फोनची किंमत 11,999 रुपये आहे. फोन बाबत इथे क्लिक करून जाणून घ्या सर्वकाही.

Realme 7

या फोनची किंमत 14,999 रुपयांपासून सुरु होते. रियलमी 7 मध्ये एक दमदार मीडियाटेक हीलियो G95 गेमिंग प्रोसेसर आहे जो मीडिया स्ट्रीमिंग आणि गेमिंगचा दमदार एक्सपीरियंस देतो. फोन मध्ये 6.5 इंचाची फुल एचडी+ स्क्रीन आहे जी 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येते. फोन मध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 30 वॉट डार्ट चार्जिंगला सपोर्ट करते. इथे क्लिक करून जाणून घ्या फोन बाबत सर्वकाही.

Samsung Galaxy M30s

गॅलेक्सी एम30एस ची किंमत 14,999 रुपयांपासून सुरु होते. गेमिंग एक्सपीरियंस चांगला करण्यासाठी Exynos 9611 प्रोसेसर, 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. सोबतच गेम खेळताना फोनची बॅटरी संपू नये म्हणून यासाठी यात 6000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कॅमेरा पाहता यात 48MP + 5MP + 8MP चा ट्रिपल रियर कॅमेरा मिळतो. फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. इथे क्लिक करून जाणून घ्या फोन बाबत सर्वकाही.

Micromax In Note 1

Micromax In Note 1 मध्ये MediaTek’s Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे जो 4GB की रॅम आणि 64GB स्टोरेज सह येतो. या फोन मध्ये पण कोणत्याही अडचणीविना गेमिंग करता येते. सोबतच फोन मध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. फोनची किंमत 10,999 रुपयांपासून सुरु होते. इथे क्लिक करून जाणून घ्या फोन बाबत सर्वकाही.

The post Samsung पासून Xiaomi पर्यंतचे हे आहेत 15 हजारांपेक्षा कमी किंमतीतले बेस्ट गेमिंग स्मार्टफोन, बघा संपूर्ण यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-xiaomi-best-gaming-smartphones-under-rs-15000/feed/ 0
6000 mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M30s चा नवीन वेरिएंट झाला लॉन्च, किंमत 12,999 रुपये https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-4gb-ram-128gb-rom-variant-price-12999-specification-sale-amazon-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-4gb-ram-128gb-rom-variant-price-12999-specification-sale-amazon-india/#respond Thu, 12 Mar 2020 14:06:47 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6778 स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत Galaxy M30s 4/128 GB आणि 6/128 GB वेरिएंट मध्ये जास्त फरक नाही.

The post 6000 mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M30s चा नवीन वेरिएंट झाला लॉन्च, किंमत 12,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy M30s कंपनीचा खूप लोकप्रिय बजेट स्मार्टफोन आहे. हे पाहता गॅलेक्सी एम30एस चा एक नवीन वेरिएंट सादर केला गेला आहे. कंपनीने Galaxy M30s च्या नवीन वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज दिली आहे. चला जाणून घेऊया फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

किंमत

कंपनीने गॅलेक्सी एम30एस चा 4जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. डिवाइस डुअल टोन कलर ऑप्शन-Opal Black, Sapphire Blue आणि Quartz Green मध्ये येतो. ग्राहक Galaxy M30s 4/128 GB वेरिएंट अमेझॉन इंडिया, सॅमसंग ऑनलाइन स्टोर सोबतच ऑफलाइन स्टोर वर 14 मार्च पासून विकत घेऊ शकतील. तसेच डिवाइसचा 6/128 GB वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत Galaxy M30s 4/128 GB आणि 6/128 GB वेरिएंट मध्ये जास्त फरक नाही. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता फोन इनफिनिटी यू-डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. या फोन मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रोसेसिंग साठी Galaxy M30s मध्ये ऑक्टा कोर 2.3 गीहार्ट्ज + 1.7 गीगाहर्ट्ज सह कंपनीचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे. फोन दोन रॅम व स्टोरेज वेरिएंट 4+64 जीबी आणि 6+128 जीबी मध्ये सादर झाला आहे.

Samsung Galaxy M30s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमारी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर वाल्या 5-मेगापिक्सलच्या सेकेंडरी आणि एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8-मेगापिक्सलच्या तिसऱ्या सेंसर सह येतो. सेल्फी साठी Galaxy M30s मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 6,000एमएएच ची दमदार बॅटरी मिळेल जी 15वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट दिला जाईल जो बॅटरी वेगाने चार्ज करण्यास मदत करेल. तसेच फोन एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे.

The post 6000 mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M30s चा नवीन वेरिएंट झाला लॉन्च, किंमत 12,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-4gb-ram-128gb-rom-variant-price-12999-specification-sale-amazon-india/feed/ 0
16 मार्चला लॉन्च होईल 6,000एमएएच बॅटरी आणि 48एमपी ट्रिपल कॅमेरा असलेला Samsung Galaxy M21 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m21-to-launch-on-16-march-in-india-with-6000mah-battery-48mp-triple-rear-camera-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m21-to-launch-on-16-march-in-india-with-6000mah-battery-48mp-triple-rear-camera-specs-price-sale/#respond Mon, 09 Mar 2020 12:31:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6745 Samsung Galaxy M21 च्या लॉन्चची माहिती न्यूज एजेंसी आईएएनएस च्या माध्यमातून समोर आली आहे.

The post 16 मार्चला लॉन्च होईल 6,000एमएएच बॅटरी आणि 48एमपी ट्रिपल कॅमेरा असलेला Samsung Galaxy M21 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung गेल्या वर्षी पासून टेक मार्केट मध्ये खूप आक्रमक आहे. कंपनी प्रत्येक बजेट मध्ये स्मार्टफोन्स लॉन्च करत आहे. ‘गॅलेक्सी ए’ आणि ‘गॅलेक्सी एम’ सीरीजचे फोन सतत येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून Samsung Galaxy M21 स्मार्टफोनच्या बातम्या इंटरनेट वर शेयर होत आहेत. हा डिवाईस वेगवेगळ्या सर्टिफिकेशन्स साइट वर पण लिस्ट झाला आहे जिथे फोनच्या डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स संबंधित बरीच माहिती समोर आली आहे. तसेच आता बातमी मिळाली आहे कि सॅमसंग आपला हा आगामी स्मार्टफोन गॅलेक्सी एम21 येत्या 16 मार्चला इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करणार आहे.

Samsung Galaxy M21 च्या लॉन्चची माहिती न्यूज एजेंसी आईएएनएस च्या माध्यमातून समोर आली आहे. आईएएनएस ने सांगितले आहे कि सॅमसंग येत्या 16 मार्चला इंडियन मार्केट मध्ये आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल. हा स्मार्टफोन गॅलेक्सी एम सीरीजचा असेल जो Samsung Galaxy M21 नावाने मार्केट मध्ये येईल. पण एजेंसी ने स्पष्ट केले नाही कि 16 मार्चला सॅमसंग लॉन्च ईवेंटचे आयोजन करेल कि आनलाईन लाईव स्ट्रीमिंगच्या माध्यमातून गॅलेक्सी एम21 चा सॉफ्ट लॉन्च करेल. कोरोना वायरसमुळे आशा आहे कि सॅमसंग लाईव स्ट्रीमिंगच्या माध्यमातून Samsung Galaxy M21 भारतीय बाजारात आणेल.

सॅमसंग गॅलेक्सी एम21 च्या लॉन्च डेटची माहिती देण्यासोबतच आईएएनएसने फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण दिली आहे. एजेंसी ने सांगितले आहे कि हा स्मार्टफोन 6.4 इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. Galaxy M21 स्मार्टफोन मध्ये 6,000एमएएच ची पावरफुल बॅटरी असल्याचे पण समोर आले आहे. तसेच रिपोर्टनुसार Samsung Galaxy M21 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल आणि फोनचा प्राइमरी कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल.

Samsung Galaxy M21

गॅलेक्सी एम21 बद्दल बोलले जात आहे कि या फोनचे स्पेसिफिकेशन्स सॅमसंगच्या गॅलेक्सी एम30एस स्मार्टफोन सारखे असतील. गॅलेक्सी एम30एस बद्दल बोलायचे तर यात 6.4-इंचाचा सुपर एमोलेड फुल एचडी+ डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच सह फोन मध्ये सॅमसंग Exynos 9611 चिपसेट आहे. तसेच फोन मध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोेरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येईल. तसेच फोन एंडरॉयड 9.0 पाई सह कस्टम वन UI 2.0 स्किन वर चालेल.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M30s मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असेल, ज्यात 48MP चा प्राइमरी सेंसर, 8MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस आणि 5MP डेप्थ सेंसर आहे. तसेच फोन मध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा वीडियो कॉलिंगसाठी पण आहे. कनेक्टिविटी फीचर्स पाहता फोन मध्ये डुअल 4G VoLTE, डुअल-बॅंड वाई-फाई, ब्लूटूथ 5.0, GPS + GLONASS, आणि यूएसबी टाइप-सी सह 6,000mAh ची बॅटरी आहे.

The post 16 मार्चला लॉन्च होईल 6,000एमएएच बॅटरी आणि 48एमपी ट्रिपल कॅमेरा असलेला Samsung Galaxy M21 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m21-to-launch-on-16-march-in-india-with-6000mah-battery-48mp-triple-rear-camera-specs-price-sale/feed/ 0
Samsung Galaxy M31 ची टीजर ईमेज आली समोर, 64एमपी कॅमेरा आणि पावरफुल बॅटरी सह लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-teaser-image-leaked-64mp-camera-mega-monster-coming-soon-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-teaser-image-leaked-64mp-camera-mega-monster-coming-soon-in-india/#respond Tue, 04 Feb 2020 14:48:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6505 विशेष म्हणजे Samsung Galaxy M31 क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह येईल जो ‘L-शेप’ असेल.

The post Samsung Galaxy M31 ची टीजर ईमेज आली समोर, 64एमपी कॅमेरा आणि पावरफुल बॅटरी सह लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung बद्दल 91मोबाईल्सने वर्षाच्या सुरवातीला एक्सक्लूसिवली माहिती दिली होती कि सॅमसंग गॅलेक्सी एम31 ची निर्मिती भारतात सुरु झाली आहे तसेच या फोनच्या कॅमेरा मॉड्यूलचा फोटो शेयर केला होता जो फॅक्ट्री मध्ये असेंबल केला जात होता. मागे Samsung Galaxy M31 गीकबेंच आणि वाईफाई अलायंस वर पण दिसला होता जिथे फोनचे अनेक महत्वाचे फीचर्स समोर आले होते. आज सॅमसंग गॅलेक्सी ए31 चा टीजर पोस्टर पण इंटरनेट वर लीक झाला आहे ज्यावरून फक्त फोनच्या लॉन्चची माहिती मिळाली नाही तर असे पण समजले आहे कि Samsung Galaxy M31 स्मार्टफोन 64 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसर सह लॉन्च होईल.

Samsung Galaxy M31 चा एक पोस्टर इंटरनेट वर शेयर झाला आहे ज्यात फोन टीज केला गेला आहे. या टीजर ईमेज मध्ये Galaxy M31 लिहिण्यात आले आहे तसेच फोटो मध्ये मोठा 64 अंक छापण्यात आला आहे. या 64 मध्ये कॅमेरा सेंसर सारखा आकार बनवण्यात आला आहे. हा फोटो बघून अंदाज लावला जात आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एम31 स्मार्टफोन 64 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसर सह लॉन्च होईल. विशेष म्हणजे Samsung Galaxy M31 क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह येईल जो ‘L-शेप’ असेल.

सॅमसंग गॅलेक्सी एम31 च्या या टीजर ईमेज बद्दल बोलायचे तर यावर #MegaMonster लिहण्यात आले आहे. हा हॅशटॅग बघून आशा व्यक्त केली जात आहे कि सॅमसंग हा स्मार्टफोन पण कंपनी द्वारे गेल्यावर्षी लॉन्च केल्या गेलेल्या Samsung Galaxy M30s प्रमाणे मोठ्या बॅटरी सह सादर करेल. विशेष म्हणजे गॅलेक्सी एम30एस सॅमसंगने 6,000एमएएच बॅटरी सह बाजारात आणला होता. तसेच Samsung Galaxy M31 च्या या पोस्टर वर Coming Soon पण लिहिण्यात आले आहे जो फोन लवकरच लॉन्च होण्याकडे ईशारा करत आहे.

Samsung Galaxy M31

सॅमसंग गॅलेक्सी एम31 बद्दल बोलायचे तर हा फोन Galaxy M30 आणि Galaxy M30s चा अपग्रेडेड वर्जन असेल. आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार हा स्मार्टफोन एंडरॉयड 10 सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालेल. तसेच हा फोन बाजारात 6 जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी या फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे. त्याचबरोबर Galaxy M31 मध्ये 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर मिळू शकतो.

Samsung Galaxy M31 गीकबेंच वर SM-M315F मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे जिथे फोन मध्ये 1.74गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर असल्याचे समोर आले होते. Samsung Galaxy M31 वाई-फाई अलायंस वर लिस्ट केला गेला आहे. हि लिस्टिंग 22 जानेवारीची आहे तसेच वेबसाइट वर फोन SM-31S5/DS मॉडेल नंबर सह समोर आला आहे. सर्टिफिकेशन्स मध्ये फोनचे जास्त स्पेसिफिकेशन्स तर समोर आले नाहीत पण असे समजले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एम31 एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च होईल. तसेच लिस्टिंग मध्ये फोन 2.4GHz आणि 5GHz वाई-फाई फ्रिक्वेंसी बॅंड सह दाखवण्यात आला आहे. Samsung Galaxy M31 कधी बाजारात येईल यासाठी कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post Samsung Galaxy M31 ची टीजर ईमेज आली समोर, 64एमपी कॅमेरा आणि पावरफुल बॅटरी सह लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-teaser-image-leaked-64mp-camera-mega-monster-coming-soon-in-india/feed/ 0
6000mAh बॅटरी आणि 6GB रॅम असलेला Samsung Galaxy M30s झाला स्वस्त, फक्त 14999 रुपयांमध्ये मिळेल हा दमदार फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-price-slashed-in-india-upto-2000-sale-offer-availability/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-price-slashed-in-india-upto-2000-sale-offer-availability/#respond Wed, 29 Jan 2020 14:49:49 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6432 Samsung Galaxy M30s नवीन किंमतीत ब्लू, ब्लॅक आणि व्हाईट कलर मध्ये अमेझॉन आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर सेलसाठी उपलब्ध आहे.

The post 6000mAh बॅटरी आणि 6GB रॅम असलेला Samsung Galaxy M30s झाला स्वस्त, फक्त 14999 रुपयांमध्ये मिळेल हा दमदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने गेल्यावर्षी आपल्या गॅलेक्सी एम सीरीज अंतर्गत Galaxy M30s स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन 6,000एमएएच च्या ताकदवान बॅटरीला सपोर्ट करतो ज्यमुळे हा प्रसिद्ध झाला होता. काही दिवसांपूर्वी शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर आयोजित सेलसाठी हा स्मार्टफोन कमी किंमतीत विकला गेला होता. तर आता आपल्या फॅन्सना भेट देत सॅमसंगने Samsung Galaxy M30s ची किंमत कमी केली आहे. कंपनीने फोनची किंमत 2,000 रुपयांनी कमी केली आहे ज्यामुळे हा डिवाईस अमेझॉन सोबतच सॅमसंगच्या वेबसाइट वरून पण कमी किंमतीत विकत घेता येईल.

Samsung Galaxy M30s भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला होता. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर मोठ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. सॅमसंगने गॅलेक्सी एम30एस चा 4 जीबी रॅम वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता तसेच फोनचा 6 जीबी रॅम वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये आणला होता.

सॅमसंगने आता Samsung Galaxy M30s च्या 6 जीबी रॅम वेरिएंटची किंमत थेट 2,000 रुपयांनी कमी केली आहे ज्यामुळे हा डिवाईस 14,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच फोनच्या 4 जीबी रॅम वेरिएंटची किंमत 1,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे ज्यानंतर हा फोन वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Samsung Galaxy M30s नवीन किंमतीत ब्लू, ब्लॅक आणि व्हाईट कलर मध्ये अमेझॉन आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर सेलसाठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy M30s

Samsung Galaxy M30s चे स्पेसिफिकेशन्स पाहता फोन इनफिनिटी यू-डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. या फोन मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रोसेसिंग साठी Galaxy M30s मध्ये ऑक्टा कोर 2.3 गीहार्ट्ज + 1.7 गीगाहर्ट्ज सह कंपनीचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे. फोन दोन रॅम व स्टोरेज वेरिएंट 4+64 जीबी आणि 6+128 जीबी मध्ये सादर झाला आहे.

Samsung Galaxy M30s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमारी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर वाल्या 5-मेगापिक्सलच्या सेकेंडरी आणि एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8-मेगापिक्सलच्या तिसऱ्या सेंसर सह येतो. सेल्फी साठी Galaxy M30s मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 6,000एमएएच ची दमदार बॅटरी मिळेल जी 15वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट दिला जाईल जो बॅटरी वेगाने चार्ज करण्यास मदत करेल. तसेच फोन एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे.

The post 6000mAh बॅटरी आणि 6GB रॅम असलेला Samsung Galaxy M30s झाला स्वस्त, फक्त 14999 रुपयांमध्ये मिळेल हा दमदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-price-slashed-in-india-upto-2000-sale-offer-availability/feed/ 0
एंडरॉयड 10 सह समोर आला Samsung Galaxy M31, लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-listed-on-wifi-certification-with-android-10-sm-31s5-ds/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-listed-on-wifi-certification-with-android-10-sm-31s5-ds/#respond Wed, 22 Jan 2020 13:11:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6352 सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीजचा लो बजेट स्मार्टफोन गॅलेक्सी एम11 पण वाई-फाई अलायंस वर लिस्ट झाला आहे.

The post एंडरॉयड 10 सह समोर आला Samsung Galaxy M31, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने वर्षाच्या सुरवातीला आपल्या एक्सक्लूसिव बातमीत Samsung Galaxy M31 ची माहिती दिली होती. आम्ही सॅमसंग गॅलेक्सी एम31 के कॅमेरा मॉड्यूलचा फोटो शेयर केला होता जो फॅक्टरी मध्ये असेंबल केला जात होता. हा फोटो समोर आल्यामुळे खुलासा झाला होता कि Galaxy M31 स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेरा सेटअप वर लॉन्च केला जाईल जो ‘L-शेप’ सह येईल. तर आज या स्मार्टफोन संबंधित अजून एक आणि मोठी बातमी समोर आली आहे कि गॅलेक्सी एम31 वाई-फाई सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट केला गेला आहे. या लिस्टिंगने स्पष्ट केले आहे कि Samsung Galaxy M31 आता लवकरच टेक बाजारात एंट्री घेणार आहे.

Samsung Galaxy M31 वाई-फाई अलायंस वर लिस्ट केला गेला आहे. हि लिस्टिंग 22 जानेवारीची आहे तसेच वेबसाइट वर फोन SM-31S5/DS मॉडेल नंबर सह समोर आला आहे. सर्टिफिकेशन्स मध्ये फोनचे जास्त स्पेसिफिकेशन्स तर समोर आले नाहीत पण असे समजले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एम31 एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च होईल. तसेच लिस्टिंग मध्ये फोन 2.4GHz आणि 5GHz वाई-फाई फ्रिक्वेंसी बॅंड सह दाखवण्यात आला आहे. वाई-फाई सर्टिफाइड झाल्यानंतर आशा आहे कि येत्या काही दिवसात सॅमसंग Galaxy M31 टेक मंचावर सादर करू शकते.

Samsung Galaxy M31

सॅमसंग गॅलेक्सी एम31 बद्दल बोलायचे तर हा फोन Galaxy M30 आणि Galaxy M30s चा अपग्रेडेड वर्जन असेल. आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार हा स्मार्टफोन एंडरॉयड 10 सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालेल. तसेच हा फोन बाजारात 6 जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी या फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे. त्याचबरोबर Galaxy M31 मध्ये 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर मिळू शकतो. Samsung Galaxy M31 गीकबेंच वर SM-M315F मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे जिथे फोन मध्ये 1.74गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर असल्याचे समोर आले होते.

Samsung Galaxy M11

विशेष म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीजचा लो बजेट स्मार्टफोन गॅलेक्सी एम11 पण वाई-फाई अलायंस वर लिस्ट झाला आहे. या वेबसाइट वर फोन SM-M115F मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. लिस्टिंग मध्ये समजले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एम11 कंपनीच्या यूजर इंटरफेस यूआई 2.0 आधारित एंडरॉयड 10 वर सादर केला जाईल. तसेच फोन मध्ये 2.4GHz फ्रिक्वेंसी असलेला वाई-फाई बॅंड दिला जाईल. बोलले जात आहे कि हा स्मार्टफोन 128 जीबी इंटरनल स्टोरेज सह लॉन्च होईल.

The post एंडरॉयड 10 सह समोर आला Samsung Galaxy M31, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-listed-on-wifi-certification-with-android-10-sm-31s5-ds/feed/ 0
Samsung Galaxy A70s कंपनीच्या इंडियन वेबसाइट वर लिस्ट, 64 MP कॅमेरा सह पुढल्या महिन्यात होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a70s-sm-a707f-lisited-india-support-page-64mp-camera/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a70s-sm-a707f-lisited-india-support-page-64mp-camera/#respond Fri, 20 Sep 2019 13:48:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5375 Samsung Galaxy A70s बद्दल गेल्या काही दिवसांत अनेक लीक्स समोर आले आहेत. हा स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच आणि सर्टिफिकेशन्स साइट वाई-फाई अलायंस वर लिस्ट झाला होता त्यानंतर जवळपास निश्चित झाले कि Samsung लवकरच Galaxy A70s टेक मंचावर आणेल. आता Galaxy A70s Samsung च्या अधिकृत इंडियन वेबसाइट वर पण लिस्ट करण्यात आला आहे ज्यावरून स्पष्ट […]

The post Samsung Galaxy A70s कंपनीच्या इंडियन वेबसाइट वर लिस्ट, 64 MP कॅमेरा सह पुढल्या महिन्यात होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A70s बद्दल गेल्या काही दिवसांत अनेक लीक्स समोर आले आहेत. हा स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच आणि सर्टिफिकेशन्स साइट वाई-फाई अलायंस वर लिस्ट झाला होता त्यानंतर जवळपास निश्चित झाले कि Samsung लवकरच Galaxy A70s टेक मंचावर आणेल. आता Galaxy A70s Samsung च्या अधिकृत इंडियन वेबसाइट वर पण लिस्ट करण्यात आला आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी ए70एस लावरच भारतीय बाजारात पण लॉन्च केला जाईल.

Samsung इंडिया च्या अधिकृत वेबसाइट वर Galaxy A70s चा सपोर्ट पेज लाईव झाला आहे. या पेज वर गॅलेक्सी ए70एस SM-A707F मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. सॅमसंग वेबसाइट वर या फोनच्या स्पेसिफिकेशन्स किंवा लॉन्च संबंधित माहिती देण्यात आलेली नाही पण इंडियन वेबसाइट वरील सपोर्ट पेज वरून स्पष्ट झाले आहे कि Samsung Galaxy A70s भारतीय बाजारात पण येईल आणि हा पुढल्या महिन्यात देशात लॉन्च केला जाऊ शकतो.

91मोबाईल्स ने नुकतेच आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये सांगितले होते कि Samsung Galaxy A70s मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी मिळेल आणि भारतात हा स्मार्टफोन 32,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल. तसेच Samsung Galaxy A70s बद्दल असे पण अनेक मीडिया रिपोर्ट्स मध्ये समोर आले आहे कि हा सॅमसंगचा पहिला स्मार्टफोन असेल जो 64 MP च्या रियर कॅमेरा सेंसर सह लॉन्च केला जाईल. या फोन मध्ये Samsung ISOCELL Bright GW1 मिळेल.

Samsung Galaxy A70s

Samsung Galaxy A70 मध्ये तुम्हाला 1080 X 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असेलली 6.7-इंचाची मोठी फुलएचडी+ सुपर एमोलेड स्क्रीन मिळेल. त्याचबरोबर कंपनीने हा इनफिनिटी यू डिस्प्ले सह सादर केला आहे. फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट आधारित या फोन मध्ये 2.0 गीगाहट्र्जचा ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 32 मेगापिक्सलचा प्राइमरी, 8 मेगापिक्सल सेकेंडरी आणि 5 मेगापिक्सल तिसरा कॅमेरा आहे. तसेच सेल्फी साठी सॅमसंग Galaxy A70 मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बेंचमार्किंग लिस्टिंग

Samsung Galaxy A70s गीकबेंच वर 8 ऑगस्टला लिस्ट केला गेला आहे ज्यात फोनचा मॉडेल नंबर SM-A707F आहे. गीकबेंच वर Galaxy A70s एंडरॉयड 9.0 पाई आधारित दाखवण्यात आला आहे तसेच प्रोसेसिंग साठी फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन SM6150 म्हणजे स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट असल्याचे सांगण्यात आले आहे. गीकबेंच वर Galaxy A70s मध्ये 6जीबी रॅम दाखवण्यात आला आहे. स्कोर पाहता Samsung Galaxy A70s ला सिंगल-कोर मध्ये 2365 स्कोर आणि मल्टी-कोर मध्ये 6372 स्कोर मिळाला आहे.

वाई-फाई सर्टिफिकेशन्स

वाई-फाई अलायंस वर Samsung Galaxy A70s SM-A707F/DSM मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. हि लिस्टिंग 27 ऑगस्टची आहे. वाई-फाई अलायंस वर Galaxy A70s एंडरॉयड 9 पाई आधारित दाखवण्यात आला आहे जो सॅमसंगच्या कस्टम वन यूआई स्कीन वर चालले. हा फोन डुअल सिमला सपोर्ट करेल. तसेच लिस्टिंग वरून फोन मध्ये डुअल-बॅंड (2.4गीगाहर्ट्ज आणि 5गीगाहर्ट्ज) वाई-फाई सपोर्ट असल्याचे समजले आहे.

Samsung Galaxy A70s भारतात कधी लॉन्च केला जाईल यासाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघावी लागेल.

The post Samsung Galaxy A70s कंपनीच्या इंडियन वेबसाइट वर लिस्ट, 64 MP कॅमेरा सह पुढल्या महिन्यात होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a70s-sm-a707f-lisited-india-support-page-64mp-camera/feed/ 0
6,000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा आणि सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च झाला Samsung Galaxy M30s, किंमत फक्त 13,999 रुपये https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-launched-in-india-know-price-and-specification/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-launched-in-india-know-price-and-specification/#respond Wed, 18 Sep 2019 12:57:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5345 फोन Opal Black, Sapphire Blue आणि Pearl White मध्ये उपलब्ध होईल.

The post 6,000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा आणि सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च झाला Samsung Galaxy M30s, किंमत फक्त 13,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने आज आपल्या M सीरीज मध्ये Galaxy M30s लॉन्च केला आहे. विशेष म्हणजे हा फोन Galaxy M30 चा अपग्रेडेड वर्जन आहे. तसेच कंपनीने Galaxy M30 चा 3 जीबी रॅम व 32 जीबी स्टोरेज वेरिएंट पण सादर केला आहे. चाल बघूया Samsung ब्रँड मध्ये सादर केल्या गेलेल्या या नवीन स्मार्टफोन्सची माहिती.

किंमत

किंमतीबद्दल बोलायचे तर कंपनीने Galaxy M30s चा 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज वेरीएंट 13,999 रुपये आणि 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये ठेवली आहे. तसेच हँडसेट ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडिया सोबतच कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट वर 29 सप्टेंबर पासून सेल केला जाईल. फोन Opal Black, Sapphire Blue आणि Pearl White मध्ये उपलब्ध होईल.

हे देखील वाचा: Realme 5 ला टक्कर देण्यासाठी आला Samsung Galaxy M10s, किंमत करेल हैराण

Samsung Galaxy M30s चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M30s चे स्पेसिफिकेशन्स पाहता फोन इनफिनिटी यू-डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. या फोन मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रोसेसिंग साठी Galaxy M30s मध्ये ऑक्टा कोर 2.3 गीहार्ट्ज + 1.7 गीगाहर्ट्ज सह कंपनीचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे. फोन दोन रॅम व स्टोरेज वेरिएंट 4+64 जीबी आणि 6+128 जीबी मध्ये सादर झाला आहे.

Samsung Galaxy M30s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमारी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर वाल्या 5-मेगापिक्सलच्या सेकेंडरी आणि एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8-मेगापिक्सलच्या तिसऱ्या सेंसर सह येतो. सेल्फी साठी Galaxy M30s मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

हे देखील वाचा: 13 मेगापिक्सल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Honor Play 3e, जाणून घ्या किंमत

पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 6,000एमएएच ची दमदार बॅटरी मिळेल जी 15वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट दिला जाईल जो बॅटरी वेगाने चार्ज करण्यास मदत करेल. तसेच फोन एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे.

The post 6,000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा आणि सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च झाला Samsung Galaxy M30s, किंमत फक्त 13,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-launched-in-india-know-price-and-specification/feed/ 0
6000एमएएच बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M30s मध्ये असेल 24-एमपी सेल्फी आणि 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा, 18 सप्टेंबरला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-will-support-24mp-selfie-48mp-triple-rear-camera-6000mah-battery-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-will-support-24mp-selfie-48mp-triple-rear-camera-6000mah-battery-india/#respond Mon, 09 Sep 2019 11:37:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5255 Samsung Galaxy M30s 15 हजार रुपये ते 20 हजार रुपयांच्या बजेट मध्ये सादर केला जाईल

The post 6000एमएएच बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M30s मध्ये असेल 24-एमपी सेल्फी आणि 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा, 18 सप्टेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने घोषणा केली आहे कि कंपनी भारतात आपली गॅलेक्सी एम सीरीज वाढवणार आहे आणि येत्या 18 सप्टेंबरला या सीरीजचा नवीन फोन Galaxy M30s भारतात लॉन्च केला जाईल. Samsung Galaxy M30s ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडिया वर लिस्ट पण करण्यात आला आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि गॅलेक्सी एम सीरीजच्या इतर स्मार्टफोन्स प्रमाणे Galaxy M30s पण अमेझॉन वर सेल साठी उपलब्ध होईल. लॉन्चच्या आधीच Samsung Galaxy M30s चे अनेक स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. तर आता या फोनच्या कॅमेरा डिटेल्सचा पण खुलासा झाला आहे.

कॅमेऱ्याची माहिती

Samsung Galaxy M30s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. इंडियन टिप्स्टरने या फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक करत दावा केला आहे कि Galaxy M30s च्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमारी सेंसर दिला जाईल. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर वाल्या 5-मेगापिक्सलच्या सेकेंडरी आणि एफ/2.2 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या तिसऱ्या सेंसरला सपोर्ट करेल. तसेच सेल्फी साठी Galaxy M30s मध्ये 24-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

6,000एमएएच बॅटरी

Samsung कंपनी Galaxy M30s स्मार्टफोन सह #GoMonster हॅशटॅग वापरत आहे. हा टॅग फोनची बॅटरी दर्शवतो जी गॅलेक्सी एम30एस ची सर्वात मोठी यूएसपी आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 6,000एमएएच ची दमदार बॅटरी मिळेल जी 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट दिला जाईल जो बॅटरी जलद गतीने चार्ज करण्यास मदत करेल. विशेष म्हणजे हा पहिला सॅमसंग एंडरॉयड स्मार्टफोन असेल जो इतक्या पावरच्या बॅटरीला सपोर्ट करेल.

हे देखील वाचा: आता स्वस्त मोबाईल मध्ये पण असेल 5G, बदलेल स्मार्टफोन्सची दुनिया

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M30s चे स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या रिपोर्ट नुसार हा डिवाईस पण वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला जाईल. या फोन मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.4-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळू शकते. बोलले जात आहे कि सॅमसंग हा फोन एंडरॉयड 9 पाई वर सादर करेल ज्या सोबत प्रोसेसिंग साठी Galaxy M30s मध्ये कंपनीचा एक्सनॉस 9610 चिपसेट दिला जाईल.

भारतात Samsung Galaxy M30s दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. रिपोर्ट नुसार फोनचा एक वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम मेमरी सह 128जीबी ची इंटरनल मेमरी दिली जाईल. Galaxy M30s च्या बॅक पॅनल वर सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: Reliance Jio चे 3 वर्ष पूर्ण, जाणून घ्या 3 वर्षांतील 30 मोठे कारनामे

91मोबाईल्सला Samsung इंडियाच्या असीम वारसी यांनी सांगितले होते कि “दिवाळीपर्यंत Samsung Galaxy M सीरीज मध्ये 3 फोन लॉन्च केले जातील. कंपनी सर्वातआधी Galaxy M30s सादर करणार आहे. त्यानंतर M10s मॉडेल येईल. पुढे Galaxy M30 चा एक नवीन वेरियंट पण सादर केला जाईल.” त्यांनी सांगितले होते कि “तिन्ही फोन तीन प्राइस सेग्मेंट मध्ये असतील. Samsung Galaxy M30s 15 हजार रुपये ते 20 हजार रुपयांच्या बजेट मध्ये सादर केला जाईल. तर Galaxy M10s ची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी असेल. तर M30 चा नवीन वेरियंट 10 हजार ते 15 हजार रुपयांच्या बजेट मध्ये उपलब्ध होईल.”

The post 6000एमएएच बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M30s मध्ये असेल 24-एमपी सेल्फी आणि 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा, 18 सप्टेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-will-support-24mp-selfie-48mp-triple-rear-camera-6000mah-battery-india/feed/ 0
18 सेप्टेंबरला भारतात लॉन्च होईल 6000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Samsung Galaxy M30s https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-launching-in-india-18-september-6000mah-battery-triple-rear-camera/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-launching-in-india-18-september-6000mah-battery-triple-rear-camera/#respond Tue, 03 Sep 2019 11:58:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5211 सीरीजच्या इतर स्मार्टफोन्स प्रमाणे Galaxy M30s पण अमेझॉन वरच सेल साठी उपलब्ध होईल.

The post 18 सेप्टेंबरला भारतात लॉन्च होईल 6000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Samsung Galaxy M30s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy M30s बद्दल कालच आम्ही एक बातमी दिली होती ज्यात सांगितले होते कि सॅमसंगचा आगामी स्मार्टफोन Google च्या अधिकृत वेबसाइट एंडरॉयड इंटरप्राईज वर लिस्ट केला गेला आहे, जिथे फोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. आतापर्यंत Galaxy M30s बद्दल लीक्स समोर येत होते पण आता सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीजच्या या नवीन फोनची लॉन्च डेट पण समोर आली आहे. Samsung Galaxy M30s येत्या 18 सेप्टेंबरला भारतात लॉन्च केला जाईल.

Samsung Galaxy M30s च्या लॉन्च डेटचा खुलासा ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडिया ने केला आहे. अमेझॉन वर Galaxy M30s चे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे जिथे फोनच्या लॉन्च डेट सोबतच याच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. या प्रोडक्ट पेज वरून समजले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीजचा हा आगामी स्मार्टफोन 18 सेप्टेंबरला भारतीय बाजारात येईल त्याचबरोबर सीरीजच्या इतर स्मार्टफोन्स प्रमाणे Galaxy M30s पण अमेझॉन वरच सेल साठी उपलब्ध होईल.

स्पेसिफिकेशन्सचा खुलासा

Galaxy M30s च्या प्रोडक्ट पेज वर असे स्पष्ट करण्यात आले आहे कि Samsung आपला हा डिवाईस 6,000एमएएच च्या पावरफुल बॅटरी सह लॉन्च करेल. विशेष म्हणजे हा पहिला सॅमसंग एंडरॉयड स्मार्टफोन असेल जो इतक्या पावरच्या बॅटरीला सपोर्ट करेल. Galaxy M30s सह कंपनीने #GoMonster हॅशटॅग वापरला आहे. अमेझॉन वर सांगण्यात आला आहे कि हा फोन सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy M30s ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह दाखवण्यात आला आहे. अमेझॉन इंडिया ने म्हणून ‘_8 MP Triple camera’ लिहिले आहे. हि हिंट पाहून बोलले जात आहे कि गॅलेक्सी एम30एस मध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो. अमेझॉन वर Galaxy M30s इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे तसेच फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M30s

Samsung Galaxy M30s चे स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या रिपोर्ट नुसार हा डिवाईस पण वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला जाईल. या फोन मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.4-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळू शकते. बोलले जात आहे कि सॅमसंग हा फोन एंडरॉयड 9 पाई वर सादर करेल ज्या सोबत प्रोसेसिंग साठी Galaxy M30s मध्ये कंपनीचा एक्सनॉस 9610 चिपसेट दिला जाईल.

भारतात Samsung Galaxy M30s दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. रिपोर्ट नुसार फोनचा एक वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम मेमरी सह 128जीबी ची इंटरनल मेमरी दिली जाईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Galaxy M30s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. रिपोर्ट नुसार फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर मिळेल जो एफ/2.0 अपर्चरला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy M30s च्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर मिळेल. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. Galaxy M30s चा रियर कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅश सह येईल.

Galaxy M30s च्या बॅक पॅनल वर सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 6,000एमएएच ची बॅटरी मिळेल जी 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. अजूनतरी फोनची किंमत किती असेल आणि हा भारतात कधी सेल साठी येईल यासाठी 18 सेप्टेंबरला फोन लॉन्चची वाट बघावी लागेल.

The post 18 सेप्टेंबरला भारतात लॉन्च होईल 6000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Samsung Galaxy M30s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-launching-in-india-18-september-6000mah-battery-triple-rear-camera/feed/ 0