Tecno Pop 7 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 14:20:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Tecno Spark 10C स्मार्टफोन 4GB RAM सह गुगल प्ले कन्सोल वेबसाइटवर लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/4gb-ram-mobile-phone-tecno-spark-10c-specifications-leaked-google-play-console/ https://www.91mobiles.com/marathi/4gb-ram-mobile-phone-tecno-spark-10c-specifications-leaked-google-play-console/#respond Thu, 23 Feb 2023 03:43:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18073 स्वस्त मोबाइल बनवण्यासाठी लोकप्रिय असलेला टेक ब्रँड टेक्नो आपल्या स्पार्क सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो Tecno Spark 10C नावानं लाँच होईल. कंपनीनं अद्याप आपल्या या नवीन फोनचा उल्लेख अधिकृतपणे केला नाही परंतु हा टेक्नो मोबाइल अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्स व फीचर्ससह Google Play Console वर लिस्ट झाला आहे. पुढे ये स्वस्त लो बजेट फोनची […]

The post Tecno Spark 10C स्मार्टफोन 4GB RAM सह गुगल प्ले कन्सोल वेबसाइटवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Tecno Spark 10C गुगल प्ले कसोंल वर लिस्ट झाला आहे.
  • या फोनमध्ये 4GB RAM आणि Unisoc T606 प्रोसेसर मिळू शकतो.
  • स्पार्क 10सी एक लो बजेट स्वस्त टेक्नो मोबाइल असेल.

स्वस्त मोबाइल बनवण्यासाठी लोकप्रिय असलेला टेक ब्रँड टेक्नो आपल्या स्पार्क सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो Tecno Spark 10C नावानं लाँच होईल. कंपनीनं अद्याप आपल्या या नवीन फोनचा उल्लेख अधिकृतपणे केला नाही परंतु हा टेक्नो मोबाइल अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्स व फीचर्ससह Google Play Console वर लिस्ट झाला आहे. पुढे ये स्वस्त लो बजेट फोनची माहिती देण्यात आली आहे.

Tecno Spark 10C चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 4GB RAM
  • Unisoc T606
  • Android 12 OS

हा टेक्नो फोन गुगल प्ले कंसोल वर Tecno KI5k मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे. लिस्टिंगमध्ये सांगण्यात आलं आहे की हा डिवायस 720 x 1612 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या डिस्प्लेसह लाँच केला जाईल जो एचडी+ रिजोल्यूशनसह येईल तसेच 320पीपीआयला सपोर्ट करेल. लिस्टिंगमधील फोटोजवरून स्पष्ट झालं आहे की या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच स्क्रीन दिली जाईल. हे देखील वाचा: आमच्या हाती लागली Samsung Galaxy A34 आणि Galaxy A54 ची माहिती; पाहा फोटो, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Tecno Spark 10C स्मार्टफोनमध्ये Unisoc T606 प्रोसेसर असल्याचा खुलासा देखील या लिस्टिंगमध्ये झाला आहे. गुगल प्ले कंसोलवर हा टेक्नो फोन 4जीबी रॅमसह समोर आला आहे. परंतु आणखी मेमरी व्हेरिएंट्स देखील बाजारात येतील अशी अपेक्षा आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 12 ओएससह लाँच केला जाईल. फोनचे इतर स्पेसिफिकेशन्ससाठी वाट पाहावी लागेल.

Tecno Pop 7 Pro

  • 6.6″ HD+ Display
  • 3GB RAM + 64GB Storage
  • MediaTek Helio A22
  • 5,000mAh Battery
  • 12MP AI Dual Rear Camera

अलीकडेच टेक्नो पॉप 7 प्रो भारतात लाँच झाला आहे ज्याच्या 2 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6,799 रुपये आणि 3 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची प्राइस 7,299 रुपये आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक हीलियो ए22 प्रोसेसरवर चालतो. पावर बॅकअपसाठी यात 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: Free मध्ये IPL 2023 दाखवून देखील Ambani करणार कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या कसं

Tecno Pop 7 Pro मध्ये 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे जो 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 480निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. हा फोन IPX2 रेटेड आहे. फोटोग्राफीसाठी याच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 12 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा टेक्नो मोबाइल 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

The post Tecno Spark 10C स्मार्टफोन 4GB RAM सह गुगल प्ले कन्सोल वेबसाइटवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/4gb-ram-mobile-phone-tecno-spark-10c-specifications-leaked-google-play-console/feed/ 0
5000mAh Battery आणि 6GB RAM सह Tecno Pop 7 Pro ची भारतात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/phone-under-7000-tecno-pop-7-pro-launched-in-india-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/phone-under-7000-tecno-pop-7-pro-launched-in-india-know-price-and-specifications/#respond Thu, 16 Feb 2023 10:16:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17882 टेक्नो ब्रँड आपल्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्ससाठी भारतात प्रसिद्ध आहे. त्यातल्या त्या कंपनीची ‘पॉप’ सीरीज एंट्री लेव्हल स्मार्टफोनसाठी ओळखली जाते. कंपनीनं या सीरिजचा विस्तार करत नवीन Tecno Pop 7 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. हा एंट्री लेव्हल डिवायस आहे जो फक्त 6,799 रुपयांमध्ये भारतात सेलसाठी उपलब्ध होईल. पॉप 7 प्रो मध्ये 3GB RAM सह MediaTek Helio […]

The post 5000mAh Battery आणि 6GB RAM सह Tecno Pop 7 Pro ची भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Tecno Pop 7 Pro स्मार्टफोन 3GB RAM आणि 2GB RAM सह लाँच झाला आहे.
  • Extended RAM टेक्नॉलॉजीसह फोनला 6GB RAM ची पावर मिळते.
  • फुल चार्ज नंतर हा मोबाइल 29 दिवसांचा स्टॅन्ड बाय टाइम देऊ शकतो.

टेक्नो ब्रँड आपल्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्ससाठी भारतात प्रसिद्ध आहे. त्यातल्या त्या कंपनीची ‘पॉप’ सीरीज एंट्री लेव्हल स्मार्टफोनसाठी ओळखली जाते. कंपनीनं या सीरिजचा विस्तार करत नवीन Tecno Pop 7 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. हा एंट्री लेव्हल डिवायस आहे जो फक्त 6,799 रुपयांमध्ये भारतात सेलसाठी उपलब्ध होईल. पॉप 7 प्रो मध्ये 3GB RAM सह MediaTek Helio A22 चिपसेट देण्यात आला आहे.

Tecno Pop 7 Pro Price

टेक्नो पॉप 7 प्रो भारतीय बाजारात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये आला आहे. स्मार्टफोनच्या बेस मॉडेलमध्ये 2 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तसेच मोठा व्हेरिएंट 3 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या दोन्ही व्हेरिएंट्सची किंमत अनुक्रमे 6,799 रुपये आणि 7,299 रुपये आहे. Tecno Pop 7 Pro स्मार्टफोन 22 फेब्रुवारीपासून अ‍ॅमेझॉन इंडियावर Endless Black आणि Uyuni Blue कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: लॅपटॉपपेक्षा जास्त रॅम आणि 120W फास्ट चार्जिंग; गेमर्ससाठी iQOO Neo 7 झाला भारतात लाँच

Tecno Pop 7 Pro Specifications

  • 6.6″ HD+ Display
  • 3GB+3GB = 6GB RAM
  • MediaTek Helio A22
  • 5,000mAh Battery
  • 12MP AI Dual Rear Camera

टेक्नो पॉप 7 प्रो स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह लाँच झाला आहे जो 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन आयपीएस पॅनलवर बनली आहे तसेच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. फोन डिस्प्लेवर 480निट्स ब्राइटनेस सारखे फीचर्स देखील मिळतात. या फोनचे डायमेंशन 163.86 X 75.51 X 8.9एमएम आहे.

Tecno Pop 7 Pro स्मार्टफोन 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर मीडियाटेक हीलियो ए22 प्रोसेसरवर काम करतो. हा फोन मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीसह येतो 2जीबी रॅम व्हेरिएंट एक्स्ट्रा 2जीबी रॅम तसेच 3जीबी रॅम व्हेरिएंट अतिरिक्त 3जीबी रॅमची ताकद देतो. म्हणजे हा टेक्नो मोबाइल गरज पडल्यास 6जीबी रॅमची परफॉर्मन्स देऊ शकतो.

फोटोग्राफीसाठी टेक्नो पॉप 7 प्रो मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.85 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एआय लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा टेक्नो मोबाइल एफ/2.0 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 149 रुपयांमध्ये 15 पेक्षा जास्त OTT आणि मोफत डेटा; Airtel नं आणला नवा स्वस्त प्लॅन

Tecno Pop 7 Pro अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो हायओएस 11.0 सह चालतो. या फोनमध्ये ड्युअल सिमचा सपोर्ट आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हा फोन IPX2 रेटेड आहे ज्यामुळे पाण्याच्या शिंतोड्यांपासून सुरक्षित राहू शकतो.

The post 5000mAh Battery आणि 6GB RAM सह Tecno Pop 7 Pro ची भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/phone-under-7000-tecno-pop-7-pro-launched-in-india-know-price-and-specifications/feed/ 0
Tecno Pop 7 Pro 16 फेब्रुवारीला होईल भारतात लाँच; कंपनीनं केलं ट्विट https://www.91mobiles.com/marathi/16-february-tecno-pop-7-pro-launch-date-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/16-february-tecno-pop-7-pro-launch-date-in-india/#respond Wed, 15 Feb 2023 04:11:40 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17810 टेक्नोनं काही दिवसांपूर्वी एक जबरदस्त बजेट फ्रेंडली स्मार्टफोन Tecno POP 6 Pro लाँच केला होता. आता या स्मार्टफोनचा अ‍ॅडव्हान्स व्हर्जन भारतात येत आहे. कंपनीनं गेल्या आठवड्यात घोषणा केली होती की भारतीय बाजारात नवीन Tecno Pop 7 Pro स्मार्टफोन येईल. आता कंपनीनं फोनची लाँच डेट देखील सांगितली आहे. टेक्नो पॉप 7 प्रो 16 फेब्रुवारीला भारतात लाँच […]

The post Tecno Pop 7 Pro 16 फेब्रुवारीला होईल भारतात लाँच; कंपनीनं केलं ट्विट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Tecno Pop 7 Pro याच आठवड्यात भारतात लाँच होईल.
  • हा फोन 3GB Extended RAM टेक्नॉलॉजीसह बाजारात येईल.
  • या टेक्नो मोबाइलची किंमत 12 ते 15 हजार दरम्यान असू शकते.

टेक्नोनं काही दिवसांपूर्वी एक जबरदस्त बजेट फ्रेंडली स्मार्टफोन Tecno POP 6 Pro लाँच केला होता. आता या स्मार्टफोनचा अ‍ॅडव्हान्स व्हर्जन भारतात येत आहे. कंपनीनं गेल्या आठवड्यात घोषणा केली होती की भारतीय बाजारात नवीन Tecno Pop 7 Pro स्मार्टफोन येईल. आता कंपनीनं फोनची लाँच डेट देखील सांगितली आहे. टेक्नो पॉप 7 प्रो 16 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल. हे देखील एक लो बजेट मोबाइल फोन असेल ज्याची किंमत 12 ते 15 हजार रुपयांच्या दरम्यान असेल. पुढे आम्ही या टेक्नो फोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Tecno Pop 7 Pro

  • 6.6″ HD+ Display
  • 5,000mAh Battery
  • 3GB Extended RAM
  • MediaTek Helio A22
  • 13MP AI Dual Rear Camera

टेक्नो पॉप 7 प्रो स्मार्टफोन नायजेरिया मध्ये सादर करण्यात आला, त्यामुळे फोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती आधीपासूनच उपलब्ध आहे. हा मोबाइल फोन क्वॉडकोर प्रोसेसर असलेल्या मीडियाटेक हीलियो ए22 चिपसेटवर चालतो. टेक्नोनं आपला हा फोन 3जीबी एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीसह बाजारात आणला आहे. हे देखील वाचा: या स्मार्टफोनच्या बजेटवर जाऊ नका; जबरदस्त गेमिंग प्रोसेसरसह Poco X5 GT येणार

Tecno Pop 7 Pro स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे जो 720 x 1612 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही वॉटरड्रॉप नॉच स्टाईल स्क्रीन आहे जी 480निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते. या फोनची उंची 163.86एमएम आणि रुंदी 75.51एमएम आहे. वहीं टेक्नो पॉप 7 प्रो फक्त 8.9एमएम जाड आहे.

फोटोग्राफीसाठी या टेक्नो मोबाइलमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये 13 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह सेकंडरी एआय लेन्स देण्यात आली आहे जी ड्युअल फ्लॅशसह येते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: दिवस सुरु होताच डेटा संपतो? Jio चे हे प्लॅन्स देत आहेत 3GB डेली डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

Tecno Pop 7 Pro ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यात 3.5एमएम जॅक देखील मिळतो. सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. आशा आहे की 16 फेब्रुवारीला भारतात लाँच होणारा टेक्नो पॉप 7 प्रो देखील याच स्पेसिफिकेशन्ससह येईल.

The post Tecno Pop 7 Pro 16 फेब्रुवारीला होईल भारतात लाँच; कंपनीनं केलं ट्विट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/16-february-tecno-pop-7-pro-launch-date-in-india/feed/ 0
रेडमी-रियलमी नव्हे टेक्नो घालणार बजेटमध्ये धमाकूळ; येतोय स्वस्त आणि सुंदर Tecno Pop 7 Pro https://www.91mobiles.com/marathi/entry-level-mobile-phone-tecno-pop-7-pro-launching-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/entry-level-mobile-phone-tecno-pop-7-pro-launching-in-india/#respond Thu, 09 Feb 2023 09:30:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17667 टेक्नोनं गेल्याच महिन्यात 6,999 रुपयांचा Tecno Spark Go 2023 स्मार्टफोन भारतात लाँच केला होता. आता बातमी येत आहे की कंपनी आणखी एक स्वस्त मोबाइल फोन भारतात आणण्याची तयारी करत आहे. या फोनचे नाव Tecno Pop 7 Pro असल्याचं सांगण्यात आलं आहे जो या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच होईल. आगामी लो बजेट स्मार्टफोन टेक्नो पॉप […]

The post रेडमी-रियलमी नव्हे टेक्नो घालणार बजेटमध्ये धमाकूळ; येतोय स्वस्त आणि सुंदर Tecno Pop 7 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Tecno Pop 7 Pro या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच होईल.
  • हा गेल्यावर्षी आलेल्या Tecno POP 6 Pro चा अ‍ॅडव्हान्स व्हर्जन असेल.
  • टेक्नो पॉप 7 प्रोची किंमत 6 हजारांच्या बजेटमध्ये असू शकते.

टेक्नोनं गेल्याच महिन्यात 6,999 रुपयांचा Tecno Spark Go 2023 स्मार्टफोन भारतात लाँच केला होता. आता बातमी येत आहे की कंपनी आणखी एक स्वस्त मोबाइल फोन भारतात आणण्याची तयारी करत आहे. या फोनचे नाव Tecno Pop 7 Pro असल्याचं सांगण्यात आलं आहे जो या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच होईल. आगामी लो बजेट स्मार्टफोन टेक्नो पॉप 7 प्रोची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Tecno Pop 7 Pro येतोय भारतात

टेक्नो पॉप 7 प्रो संबंधित बातमी समोर आली आहे, त्यानुसार हा मोबाइल फोन याच महिन्यात फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच होईल. फोनची कोणतीही ठोस लाँच डेट समोर आली नाही परंतुलेकिन हा स्मार्टफोन फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सादर केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन black आणि purple कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

Tecno POP 6 Pro

टेक्नो पॉप 7 प्रो सप्टेंबर 2022 मध्ये भारतात लाँच झालेल्या पॉप 6 प्रोचा अ‍ॅडव्हान्स व्हर्जन असेल. Tecno POP 6 Pro 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजसह 6,099 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे जो Peaceful Blue आणि Polar Black कलरमध्ये विकत घेता येईल.

टेक्नो पॉप 6 प्रो 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह भारतात आला आहे, जो 120 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 270 पीपीआयला सपोर्ट करतो. डॉट नॉच स्टाइल असलेल्या या फोनची स्क्रीन 2.5डी ग्लासनं प्रोटेक्ट करण्यात आली आहे. या फोनची जाडी फक्त 8.75 एमएम आहे. हे देखील वाचा: शानदार कॅमेऱ्यासह येतायत Vivo V27 आणि V27 Pro; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Tecno POP 6 Pro अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे. हा 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो ए22 चिपसेटवर चालतो. हा मोबाइल फोन 2GB LPDDR4x RAM आणि 32GB eMMC5.1 ROM ला सपोर्ट करतो ज्यात 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड वापरता येईल.

फोटोग्राफीसाठी नवीन टेक्नो मोबाइलमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. पॉप 6 प्रो च्या बॅक पॅनलवर एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि तेवढ्याच अपर्चरची सेकंडरी एआय लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन फ्रंट फ्लॅश से लैस 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: इतक्या स्वस्तात 16GB RAM! भारतात गुपचूप सुरु झाली Vivo Y100 विक्री; कॅमेरा आहे जबरदस्त

Tecno POP 6 Pro ड्युअल सिम फोन आहे ज्यात 3.5एमएम जॅक व ओटीजी सोबतच अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये फेस अनलॉक फीचर मिळतं. तसेच पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे की हा फोन 42 दिवस स्टँडबाय टाइम देऊ शकतो.

The post रेडमी-रियलमी नव्हे टेक्नो घालणार बजेटमध्ये धमाकूळ; येतोय स्वस्त आणि सुंदर Tecno Pop 7 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/entry-level-mobile-phone-tecno-pop-7-pro-launching-in-india/feed/ 0