Telecom News - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 05 Jul 2023 07:03:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 अनलिमिटेड डेटासह Vi नं सादर केले दोन स्वस्त प्लॅन, किंमत 24 रुपयांपासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/vi-launched-rs-24-and-rs-49-plan-with-internet-data-benifits/ https://www.91mobiles.com/marathi/vi-launched-rs-24-and-rs-49-plan-with-internet-data-benifits/#respond Wed, 05 Jul 2023 07:03:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21899 विआय ग्राहकांना आकर्षित कर्णाचे पुरेपूर प्रयत्न करत आहे. कंपनीनं ह्या प्रयत्नात दोन स्वस्त प्लॅन्स सादर केले आहेत. हे प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी आणले आहेत. Vi ने एडिशनल बेनिफिट्ससह 24 रुपये आणि 49 रुपयांचा नवीन प्लॅन आणला आहे. ह्या दोन्ही रिचार्जमध्ये अनलिमिटेड नाइट डेटा मिळेल. पुढे आम्ही तुम्हाला ह्या दोन्ही प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सची संपूर्ण माहिती देत आहोत. […]

The post अनलिमिटेड डेटासह Vi नं सादर केले दोन स्वस्त प्लॅन, किंमत 24 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vi नं भारतात 24 आणि 49 रुपयांचे दोन नवीन प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत.
  • दोन्ही प्लॅन युजर्सना डेटा ऑफर केले जात आहेत.
  • 24 रुपयांच्या प्लॅनमध्ये एका तासासाठी अनलिमिटेड डेटा मिळेल.

विआय ग्राहकांना आकर्षित कर्णाचे पुरेपूर प्रयत्न करत आहे. कंपनीनं ह्या प्रयत्नात दोन स्वस्त प्लॅन्स सादर केले आहेत. हे प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी आणले आहेत. Vi ने एडिशनल बेनिफिट्ससह 24 रुपये आणि 49 रुपयांचा नवीन प्लॅन आणला आहे. ह्या दोन्ही रिचार्जमध्ये अनलिमिटेड नाइट डेटा मिळेल. पुढे आम्ही तुम्हाला ह्या दोन्ही प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सची संपूर्ण माहिती देत आहोत.

Vi चा 24 रुपयांचा प्लॅन

Vi च्या 24 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये एक तासासाठी अनलिमिटेड डेटा मिळतो. विआयचा हा रिचार्ज प्लॅन सर्व्हिस व्हॅलिडिटी देत नाही. तसेच प्लॅनसह युजर्सना Vi Movies and Tv अ‍ॅप्सचा सपोर्ट देखील नाही. त्यामुळे ह्या प्लॅनचा लाभ घेण्यासाठी तुमचा नंबर अ‍ॅक्टिव्ह असणं आवश्यक आहे.

Vi चा 49 रुपयांचा प्लॅन

वोडाफोन आयडियाच्या 49 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सना 6GB डेटा ऑफर केला जात आहे. तसेच, यात 24 तासांची व्हॅलिडिटी दिली जात आहे. ह्यातही प्लॅनच्या लाभ घेण्यासाठी विआय युजर्सचा नंबर अ‍ॅक्टिव्ह असणं आवश्यक आहे. म्हणजे युजर्सना सर्व्हिस व्हॅलिडिटी मिळत नाही.

नोट : विआयनं दोन्ही प्लॅन त्या युजर्ससाठी सादर केले आहेत, ज्यांना तात्कळ डेटाची गरज असते.

839 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये बदल

वोडाफोन आयडियाच्या 839 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना 84 ची व्हॅलिडिटी मिळते. तसेच रिचार्ज प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा मिळतो. त्याचबरोबर 84 दिवस तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकता. ह्यात युजर्सना रोज 100 SMS फ्री मिळतील. तसेच रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्ही रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान फ्री स्ट्रीमिंग आणि ब्राउजिंग करू शकाल. वोडाफोन आयडिया युजर्सना 3 महिन्यासाठी Disney Plus Hotstar सब्सक्रिप्शन देखील फ्री मिळत आहे.

The post अनलिमिटेड डेटासह Vi नं सादर केले दोन स्वस्त प्लॅन, किंमत 24 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vi-launched-rs-24-and-rs-49-plan-with-internet-data-benifits/feed/ 0
जियोनं लाँच केले दोन स्वस्त रिचार्ज प्लॅन, वर्षभर डेटा आणि कॉलिंगचा लाभ https://www.91mobiles.com/marathi/jio-launched-rs-123-and-rs-1234-recharge-plan-with-free-data-calling/ https://www.91mobiles.com/marathi/jio-launched-rs-123-and-rs-1234-recharge-plan-with-free-data-calling/#respond Tue, 04 Jul 2023 12:07:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21890 मुकेश अंबानी ह्यांची कंपनी रिलांयस जियोनं अलीकडेच ग्राहकांना धक्का देत आपला जियो भारत वी2 फोन लाँच केला आहे. ह्या 4G फोनसह कंपनीनं दोन नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. हा रिचार्ज प्लॅन 123 रुपये आणि 1234 रुपयांमध्ये सादर करण्यात आले आहेत. तसेच प्लॅनमध्ये डेटा आणि कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. पुढे आम्ही तुम्हाला ह्या प्लॅनची […]

The post जियोनं लाँच केले दोन स्वस्त रिचार्ज प्लॅन, वर्षभर डेटा आणि कॉलिंगचा लाभ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • जियोनं 123 आणि 1234 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे.
  • जियो भारत V2 फोन युजर्ससाठी रिचार्ज प्लॅन आले आहेत.
  • रिचार्ज प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग आणि डेटा मिळत आहे.

मुकेश अंबानी ह्यांची कंपनी रिलांयस जियोनं अलीकडेच ग्राहकांना धक्का देत आपला जियो भारत वी2 फोन लाँच केला आहे. ह्या 4G फोनसह कंपनीनं दोन नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. हा रिचार्ज प्लॅन 123 रुपये आणि 1234 रुपयांमध्ये सादर करण्यात आले आहेत. तसेच प्लॅनमध्ये डेटा आणि कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. पुढे आम्ही तुम्हाला ह्या प्लॅनची संपूर्ण माहिती दिली आहे.

जियो 123 रुपयांचा प्लॅन

  • ह्या प्लॅनमध्ये युजर्सना 28 दिवसांची वैधता दिली जात आहे.
  • तसेच रिचार्जमध्ये ग्राहकांना डेली 0.5 जीबी डेटा म्हणजे एकूण 14जीबी डेटा मिळेल.
  • तसेच हा प्लॅन अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगच्या सुविधेसह येतो.
  • इतर टेलीकॉम ऑपरेटर 179 रुपयांमध्ये व्हॉइस कॉलिंगसह 2 जीबी डेटा देत आहेत.

जियो 1234 रुपयांचा प्लॅन

  • ह्या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 0.5 GB डेटा दिला जात आहे.
  • ह्या प्लॅनमध्ये युजर्सना 356 दिवसांची वैधता मिळेल.
  • हिशोब मांडल्यास प्लॅनमध्ये एकूण 128GB डेटा मिळतो.
  • त्याचबरोबर ह्या प्लॅनमध्ये फ्री व्हॉइस कॉलिंगची सुविधा देखील मिळते.
  • हा एक अ‍ॅन्युअल प्लॅन आहे.
  • रिचार्ज बद्दल कंपनीनं दावा केला आहे की दोन्ही प्लॅन इतर प्लॅन्सच्या तुलनेत 30 टक्के स्वस्त आहेत. तसेच ह्या प्लॅनमध्ये 7 पट जास्त डेटा दिला जाता आहे.

Note : हे दोन्ही रिचार्ज प्लॅन जियोच्या अलीकडेच आलेल्या “जियो भारत वी2” फोनसाठी खास सादर करण्यात आले आहेत.

Jio Bharat V2 ची वैशिष्ट्ये

‘जियो भारत V2’ 4जी वर चालतो, ह्यात एचडी व्हॉइस कॉलिंग, एफएम रेडियो, 128 जीबीचा एसडी मेमरी कार्ड सपोर्ट असे फीचर आहेत. तसेच फोनमध्ये 4.5सेमी टीएफटी स्क्रीन, 0.3 मेगापिक्सलचा कॅमेरा, 1000 mAh ची बॅटरी, 3.5 mm हेडफोन जॅक, पावरफुल लाउडस्पिकर आणि टार्च आहे.

तसेच ‘जियो भारत V2’ मोबाइलच्या ग्राहकांना जियोसिनेमाच्या सब्सक्रिप्शनसह जियो-सावनच्या 8 कोटी गाण्यांचा अ‍ॅक्सेस देखील दिला जात आहे. हा मोबाइल 22 भारतीय भाषांमध्ये वापरता येईल.

The post जियोनं लाँच केले दोन स्वस्त रिचार्ज प्लॅन, वर्षभर डेटा आणि कॉलिंगचा लाभ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-launched-rs-123-and-rs-1234-recharge-plan-with-free-data-calling/feed/ 0
BSNL चा 90 दिवस व्हॅलिडिटी असलेला स्वस्त प्लॅन, असे आहेत फायदे https://www.91mobiles.com/marathi/bsnl-90-days-validity-plan-rs-439/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-90-days-validity-plan-rs-439/#respond Tue, 13 Jun 2023 10:25:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21577 BSNL आपल्या किफायतशीर प्लॅन्सच्या जीवावर प्रायव्हेट कंपन्यांना टक्कर देत आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या 90 दिवसांच्या एका प्लॅनबाबत माहिती देणार आहोत. हा प्लॅन त्या ग्राहकांसाठी अतिशय योग्य आहे, ज्यांना डेटाच्या तुलनेत जास्त व्हॉइस कॉलिंग हवी असते. चला जाणून घेऊया ह्या प्लॅनची संपूर्ण माहिती. बीएसएनएल 439 रुपयांचा प्लॅनची माहिती बीएसएनएलच्या ह्या 439 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना […]

The post BSNL चा 90 दिवस व्हॅलिडिटी असलेला स्वस्त प्लॅन, असे आहेत फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • BSNL च्या ह्या प्लॅनची किंमत 439 रुपये आहे.
  • ह्या प्लॅनमध्ये 90 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.
  • रिचार्जमध्ये युजर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग दिली जात आहे.

BSNL आपल्या किफायतशीर प्लॅन्सच्या जीवावर प्रायव्हेट कंपन्यांना टक्कर देत आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या 90 दिवसांच्या एका प्लॅनबाबत माहिती देणार आहोत. हा प्लॅन त्या ग्राहकांसाठी अतिशय योग्य आहे, ज्यांना डेटाच्या तुलनेत जास्त व्हॉइस कॉलिंग हवी असते. चला जाणून घेऊया ह्या प्लॅनची संपूर्ण माहिती.

बीएसएनएल 439 रुपयांचा प्लॅनची माहिती

  • बीएसएनएलच्या ह्या 439 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग सुविधा मिळते.
  • ह्यात 90 दिवस रोज लोकल एसटीडी कॉलिंगचा आनंद घेता येईल.
  • कॉलिंग व्यतिरिक्त ह्या पॅकमध्ये 300 फ्री SMS देखील दिले जात आहेत.
  • कॉलिंग आणि एसएमएसव्यतिरिक्त ह्या प्लॅनमध्ये इतर कोणतेही बेनिफिट्स मिळत नाहीत.

नोट : जर तुमच्या घरी वाय-फाय कनेक्टिव्हिटी असेल आणि तुम्हाला फक्त नंबर चालू ठेवणे आणि कॉलिंगसाठी स्वस्त प्लॅन हवा असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

जियो-एयरटेल कडे देखील आहेत 90 दिवसाचे प्लॅन

Jio चा 899 रुपयांचा प्लॅन : रिचार्जमध्ये 90 दिवसांच्या वैधतेसह डेली 2.5जीबी डेटा म्हणजे एकूण 225जीबी डेटा मिळेल. तसेच , रिचार्जमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 SMS फ्री मिळतील. त्याचबरोबर जियो अ‍ॅप्सचं सब्सस्क्रिप्शन देखील ग्राहकांना मोफत दिलं जाईल.

एयरटेलचा 779 रुपयांचा रिचार्ज प्लॅन : ह्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल, 1.5GB डेली डेटा, 100 SMS/ day, विंक म्यूजिक सब्सक्रिप्शन, फ्री हॅलो ट्यून्स, FASTag वर 100 रुपये कॅशबॅक आणि Apollo 24/7 Circle सब्सक्रिप्शन मिळतं. तसेच, रिचार्जची वैधता 90 दिवस आहे.

The post BSNL चा 90 दिवस व्हॅलिडिटी असलेला स्वस्त प्लॅन, असे आहेत फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-90-days-validity-plan-rs-439/feed/ 0
90 दिवस वैधता आणि डेली 2GB डेटा असलेला Vi रिचार्ज लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व फायदे https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-launch-new-rs-902-recharge-plan-with-90-days-validity-2gb-daily-data-and-more/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-launch-new-rs-902-recharge-plan-with-90-days-validity-2gb-daily-data-and-more/#respond Fri, 09 Jun 2023 05:36:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21497 Vodafone Idea (Vi) गेल्या काही दिवसांपासून अनेक नवीन रिचार्ज प्लॅन्स लाँच करत आहे. आताही कंपनीनं आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलियोमध्ये एक प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन खासकरून त्या ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे, जे दीर्घ वैधतेसह इंटरनेट डेटा वापरू इच्छित आहेत. हा प्लॅन 902 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया ह्या प्लॅन्सची संपूर्ण […]

The post 90 दिवस वैधता आणि डेली 2GB डेटा असलेला Vi रिचार्ज लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vi च्या ह्या नवीन प्लॅनची किंमत 902 रुपये आहे.
  • प्लॅन कंपनीच्या साइटवर “Unlimited” टॅबमध्ये लिस्ट केला आहे.
  • प्लॅनमधील फायदे युजर्सना 3 महिन्यांसाठी मिळतील.

Vodafone Idea (Vi) गेल्या काही दिवसांपासून अनेक नवीन रिचार्ज प्लॅन्स लाँच करत आहे. आताही कंपनीनं आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलियोमध्ये एक प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन खासकरून त्या ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे, जे दीर्घ वैधतेसह इंटरनेट डेटा वापरू इच्छित आहेत. हा प्लॅन 902 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया ह्या प्लॅन्सची संपूर्ण माहिती.

Vi 902 रुपये प्लॅनची संपूर्ण माहिती

  • नवीन Vi अनलिमिटेड रिचार्ज प्लॅनची किंमत 902 रुपये आहे आणि हा 90 दिवसांच्या वैधतेसह येतो.
  • हा कंपनीच्या साइटवर “Unlimited” टॅबमध्ये लिस्ट करण्यात आला आहे.
  • ह्यात 90 दिवस अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा लाभ मिळतो.
  • प्लॅनमध्ये डेली 2GB डेटा म्हणजे एकूण 180GB डेटा यूजसाठी मिळेल. डेली डेटा कोटा संपल्यावर इंटरनेट स्पीड कमी होऊन 64Kbps होतो.
  • रिचार्जमध्ये युजर्सना रोज 100 एसएमएस देखील मिळतात, ज्यांचा वापर तुम्ही तेव्हा करू शकता जेव्हा तुमचं आवडीचं इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्यवस्थित चालत नाही किंवा इंटरनेट कनेक्शन चालत नाही.

ओटीटी सब्सक्रिप्शन फ्री

फ्री कॉलिंग, डेटा आणि एसएमएस व्यतिरिक्त युजर्सना SunNXT चं फ्री सब्सक्रिप्शन देखील दिलं जात आहे. ह्या सब्सक्रिप्शनची व्हॅलिडिटी 90 दिवस आहे. SunNXT एक Sun TV Network ची स्ट्रीमिंग सर्व्हिस आहे. Sun TV Network च्या सब्सक्रिप्शनची किंमत 480 रुपयांपासून सुरु होते. ही किंमत बेसिक सब्सक्रिप्शन प्लॅनची आहे तर प्रीमियम सब्सक्रिप्शन प्लॅन 799 रुपयांमध्ये मिळतो.

Weekend Data Rollover आणि Night data बेनिफिट्स

ह्या रिचार्ज प्लॅनमध्ये Weekend Data Rollover आणि Night data बेनेफिट्स देखील मिळतात. वीकेंड डेटा रोलओव्हरमध्ये सोमवार ते शुक्रवार दरम्यान डेली डेटामधून उरलेल्या इंटरनेटचा वापर ग्राहक शनिवार व रविवारी करू शकतात.

नाइट डेटा बेनेफिट पाहता, हा प्लॅन रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान अनलिमिटिड इंटरनेट अ‍ॅक्सेस देतो. ह्या कालावधीत वापरलेला डेटा तुमच्या डेली डेटा कोटा मधून कट होत नाही.

The post 90 दिवस वैधता आणि डेली 2GB डेटा असलेला Vi रिचार्ज लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-launch-new-rs-902-recharge-plan-with-90-days-validity-2gb-daily-data-and-more/feed/ 0
Vodafone Idea नं आणले चार नवीन प्लॅन, डेटा आणि कॉलिंगसह मिळेल 1 महिन्याची वैधता https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-launch-rs-198-rs-204-rs-224-and-rs-232-prepaid-recharge-plans-check-benefits/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-launch-rs-198-rs-204-rs-224-and-rs-232-prepaid-recharge-plans-check-benefits/#respond Fri, 02 Jun 2023 09:02:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21347 टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये वोडाफोन आयडिया 5G लाँच बाबत जियो आणि एयरटेलच्या मागे आहे. परंतु दुसरीकडे कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत नवनवीन प्लॅन्स सादर करत आहे. अलीकडेच तीन नवीन रिचार्ज सादर केल्यानंतर विआयनं 4 नवीन रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. कंपनी ह्या चारही रिचार्ज प्लॅन्समध्ये ग्राहकांना जबरदस्त ऑफर्स देत आहे. फक्त मुंबई सर्कलमध्ये उपलब्ध रिचार्ज कंपनीच्या चार […]

The post Vodafone Idea नं आणले चार नवीन प्लॅन, डेटा आणि कॉलिंगसह मिळेल 1 महिन्याची वैधता first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vi नं आणले 198 रुपये, 204 रुपये, 224 रुपये आणि 232 रुपयांचे नवीन रिचार्ज.
  • रिचार्जमध्ये 1 महीने पर्यंतच्या वैधतेसह कॉलिंग आणि डेटा चा लाभ मिळेल.
  • चारही रिचार्ज सध्या फक्त मुंबई सर्कलमध्ये उपलब्ध आहेत.

टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये वोडाफोन आयडिया 5G लाँच बाबत जियो आणि एयरटेलच्या मागे आहे. परंतु दुसरीकडे कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत नवनवीन प्लॅन्स सादर करत आहे. अलीकडेच तीन नवीन रिचार्ज सादर केल्यानंतर विआयनं 4 नवीन रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. कंपनी ह्या चारही रिचार्ज प्लॅन्समध्ये ग्राहकांना जबरदस्त ऑफर्स देत आहे.

फक्त मुंबई सर्कलमध्ये उपलब्ध रिचार्ज

कंपनीच्या चार नवीन रिचार्ज प्लॅन्समध्ये Rs 198 plan, Rs 204 plan, Rs 224 आणि Rs 232 plans चा समावेश आहे. विशेष म्हणजे चारही प्लॅन सध्या फक्त मुंबई सर्कलमध्ये उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊया ह्या प्लॅन्समध्ये मिळणार्‍या ऑफर्स बाबत सर्वकाही.

  1. Vi चा 198 रुपयांचा रिचार्ज: 198 रुपयांच्या रिचार्जमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह 500MB डेटा मिळतो. इतकेच नव्हे तर ह्यात 198 रुपयांचा टॉकटाइम देखील दिला जात आहे.
  2. Vi चा 204 रुपयांच्या रिचार्ज: 204 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 204 रुपयांचा लिमिटेड टॉकटाइम आणि एक महिन्याच्या वैधतेसह 500MB डेटा मिळत आहे. तर प्लॅनसह कॉलसाठी 2.5 पैसे/सेकंद दराने शुल्क आकारले जाईल.
  3. Vi चा 224 रुपयांचा रिचार्ज: या रिचार्जमध्ये युजर्सना 30 दिवसांची वैधता मिळते. तसेच ह्यात अनलिमिटेड फ्री कॉलिंगसह एकूण 4GB डेटा दिला जात आहे. परंतु ह्या प्लॅनमध्ये कोणतेही एसएमएस बेनिफिट मिळत नाहीत.
  4. Vi चा 232 रुपयांचा रिचार्ज: 224 रुपयांच्या प्लॅन प्रमाणेच ह्यात देखील फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि 4जीबी डेटा मिळत आहे. परंतु, प्लॅनची वैधता एक महिना आहे.

विआय 5G ची तयारी सुरू

काही महिन्यांपूर्वी विआय कंपनीच्या कस्टमर सपोर्ट टीमनं ट्विटरवर सांगितलं होतं की, “Vi अनेक शहरांमध्ये 5G सादर करण्यासाठी आपल्या पार्टनर्ससह काम करत आहे” आणि कंपनी लवकरच आपल्या प्लॅनिंगचा खुलासा करेल.

The post Vodafone Idea नं आणले चार नवीन प्लॅन, डेटा आणि कॉलिंगसह मिळेल 1 महिन्याची वैधता first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-launch-rs-198-rs-204-rs-224-and-rs-232-prepaid-recharge-plans-check-benefits/feed/ 0
Vi नं लाँच केले 3 नवीन रिचार्ज, मिळेल 1.5GB पर्यंत डेली डेटा https://www.91mobiles.com/marathi/vi-rs-17-rs-57-and-rs-1999-recharge-plans-launched-know-all-benefits/ https://www.91mobiles.com/marathi/vi-rs-17-rs-57-and-rs-1999-recharge-plans-launched-know-all-benefits/#respond Wed, 31 May 2023 11:52:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21286 Vodafone idea (Vi) नं आपल्या ग्राहकांना खुश करत तीन नवीन रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. कंपनीनं 17 रुपये, 57 रुपये आणि 1,999 रुपयांचे प्लॅन्स सादर केले आहेत जे अनलिमिटेड नाइट डेटा, कॉलिंग आणि मोठ्या वैधतेसह आले आहेत. त्याचबरोबर कंपनीनं हे आपल्या वेबसाइटवर लिस्ट केला केले आहेत. चला जाणून घेऊया ह्या प्लॅन्सची संपूर्ण माहिती. Vi चे […]

The post Vi नं लाँच केले 3 नवीन रिचार्ज, मिळेल 1.5GB पर्यंत डेली डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vi Rs 17 आणि Rs 57 रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा मिळतो.
  • 1,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 250 दिवसांची वैधता मिळते.
  • प्लॅन्स कंपनीच्या वेबसाइटवर लिस्टस करण्यात आले आहेत.

Vodafone idea (Vi) नं आपल्या ग्राहकांना खुश करत तीन नवीन रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. कंपनीनं 17 रुपये, 57 रुपये आणि 1,999 रुपयांचे प्लॅन्स सादर केले आहेत जे अनलिमिटेड नाइट डेटा, कॉलिंग आणि मोठ्या वैधतेसह आले आहेत. त्याचबरोबर कंपनीनं हे आपल्या वेबसाइटवर लिस्ट केला केले आहेत. चला जाणून घेऊया ह्या प्लॅन्सची संपूर्ण माहिती.

Vi चे 17 रुपये आणि 57 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन्स

Vi Rs 17 प्लॅन :

  • ह्या नवीन 17 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 24 तासांची वैधता मिळते, ज्यात अनलिमिटेड नाइट डेटा (12 AM आणि 6 AM दरम्यान) मिळतो.
  • परंतु ह्या प्लॅनमध्ये कोणतेही आउटगोइंग एसएमएस आणि सर्व्हिस वैधता मिळत नाहीत.

Vi Rs 57 प्लॅन :

  • Rs 57 प्रीपेड प्लॅनची वैधता 7 दिवस आहे.
  • ह्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड नाइट डेटा मिळतो. परंतु ह्यात सर्व्हिस वैधता आणि आउटगोइंग एसएमएसचा फायदा मिळत नाही.

Vi का 1,999 रुपयांचा प्लॅन

  • ह्या नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये 250 दिवसांची वैधता मिळते.
  • रिचार्जमध्ये अनलिमिटेड कॉल्स, 100 एसएमएस प्रति दिन आणि 1.5जीबी डेली डेटा मिळतो.
  • हाय-स्पीड डेटा संपल्यावर ग्राहकांना 64Kbps स्पीडवर इंटरनेट वापरता येते.
  • तसेच 100 एसएमएस संपल्यावर युजर्सना लोकल मेसेजसाठी 1 रुपये आणि एसटीडी मेसेजसाठी 1.50 पैसे चार्ज केले जातील.

तसेच कंपनीनं अलीकडेच लाँच केलेल्या 549 रुपयांचा प्लॅन आपल्या साइटवरून हटवला आहे. ह्या प्लॅनमध्ये 180 दिवसांची वैधता आणि 1GB डेटाचा लाभ मिळतो. इतकेच नव्हे तर रिचार्जमध्ये 549 रुपयांचा टॉकटाइम देखील मिळत होता. ह्या टॉकटाइमच्या मदतीनं ग्राहक 2.5 पैसे प्रति सेकंदच्या हिशोबाने वर कॉल करू शकतात.

The post Vi नं लाँच केले 3 नवीन रिचार्ज, मिळेल 1.5GB पर्यंत डेली डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vi-rs-17-rs-57-and-rs-1999-recharge-plans-launched-know-all-benefits/feed/ 0
BSNL युजर्ससाठी खुशखबर! दोन आठवड्यात लाँच होऊ शकते 4G सर्व्हिस, असा आहे सरकारचा प्लॅन https://www.91mobiles.com/marathi/bsnl-4g-go-live-in-next-2-weeks-5g-upgrade-set-for-december-says-it-minister-ashwini-vaishnaw/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-4g-go-live-in-next-2-weeks-5g-upgrade-set-for-december-says-it-minister-ashwini-vaishnaw/#respond Fri, 26 May 2023 08:47:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21217 बीएसएनएल 4जी ची वाट बघत असलेल्या युजर्ससाठी मोठी खुशखबर आहे. केंद्रीय आयटी आणि संचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे की दोन आठवड्यात बीएसएनएल 4G लाँच होईल. त्यांनी म्हटलं आहे की बीएसएनएल लवकरच 200 साइट्ससह 4जी नेटवर्क सुरु करेल. तसेच, तीन महिन्याच्या टेस्टिंग दरम्यान कंपनीनं रोज सरासरी 200 साइट्स लाँच करेल. इतकेच नव्हे तर केंद्रीय […]

The post BSNL युजर्ससाठी खुशखबर! दोन आठवड्यात लाँच होऊ शकते 4G सर्व्हिस, असा आहे सरकारचा प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं 4जी-5जी टेलीकॉम स्टॅक आम्ही भारतात विकसित केला आहे.
  • चंदिगढ आणि देहरादून दरम्यान 200 साइट्स स्थापना करण्यात आल्या आहेत.
  • टीसीएसला मिळालं कंत्राट.

बीएसएनएल 4जी ची वाट बघत असलेल्या युजर्ससाठी मोठी खुशखबर आहे. केंद्रीय आयटी आणि संचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे की दोन आठवड्यात बीएसएनएल 4G लाँच होईल. त्यांनी म्हटलं आहे की बीएसएनएल लवकरच 200 साइट्ससह 4जी नेटवर्क सुरु करेल. तसेच, तीन महिन्याच्या टेस्टिंग दरम्यान कंपनीनं रोज सरासरी 200 साइट्स लाँच करेल. इतकेच नव्हे तर केंद्रीय मंत्र्यांनी सांगतील आहे की नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत बीएसएनएलचं 4जी नेटवर्क 5जी वर अपग्रेड केलं जाईल.

200 साइट्स उभारणार

तसेच केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सांगितलं आहे की 4जी-5जी टेलीकॉम स्टॅक आम्ही भारतात विकसित केला आहे. ह्या स्टॅकची उपयोजन बीएसएनएलसह सुरु झालं आहे. चंदिगढ आणि देहरादून दरम्यान 200 साइट्स स्थापना करण्यात आल्या आहेत आणि जास्तीत जास्त दोन आठवड्यात ह्या लाइव्ह होतील.

7-10 दिवसांत 4G सिम आणि सर्व्हिस

मीडिया रिपोर्ट्स नुसार, 4G सर्व्हिस पंजाबच्या दोन शहरांमध्ये ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत लाइव्ह केली जाईल. एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर अमृतसर आणि फिरोजपुरमध्ये सर्व्हिस लाइव्ह केली जाईल. तसेच, येत्या 7-10 दिवसांत सर्व्हिस आणि 4जी सिम शुरु होईल.

संचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच सांगितलं होतं की बीएसएनएलच्या 4जी नेटवर्कसाठी स्वदेशी टेलीकॉम स्टॅक सेटअपचं गेल्यावर्षी टेस्टिंग करण्यात आली होती आणि एकत्र 10 मिलियन कॉल्सचा भार सांभाळू शकतं.

TCS ला मिळालं कंत्राट

विशेष म्हणजे बीएसएनएलनं 1.23 लाखांपेक्षा साइट्स 4जी नेटवर्कच्या उपयोजनेसाठी टाटा कंसल्टंसी सर्व्हिसेज आणि आयटीआय लिमिटेडला कंत्राट देण्यात आलं आहे. BSNL च्या 4जी नेटवर्कसाठी टीसीएस देशातील सुमारे एक लाख साइट्सवर इंस्टॉलेशन आणि देखभालीचं काम करेल.

बीएसएनएलनं टीसीएस-सी-डॉट च्या नेतृत्वातील कंसोर्टियमसह 100,000 4जी साइट्ससाठी आयटीआयला 15,000 कोटी रुयांच्या 4जी उपकरणांसाठी अ‍ॅडव्हान्स खरेदीचे आदेश दिले होते, जे पुढील 18 महिन्यात 4जी रोलआउट मध्ये मदत करेल.

The post BSNL युजर्ससाठी खुशखबर! दोन आठवड्यात लाँच होऊ शकते 4G सर्व्हिस, असा आहे सरकारचा प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-4g-go-live-in-next-2-weeks-5g-upgrade-set-for-december-says-it-minister-ashwini-vaishnaw/feed/ 0
Jio चा नवीन धमाका! फक्त 61 रुपयांमध्ये देत आहे 10GB Data! जाणून घ्या माहिती https://www.91mobiles.com/marathi/10-gb-data-at-rs-61-jio-data-booster-recharge-plan-details-and-benefits-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/10-gb-data-at-rs-61-jio-data-booster-recharge-plan-details-and-benefits-in-marathi/#respond Tue, 23 May 2023 04:14:22 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21093 Reliance Jio वेळोवेळी असे रिचार्ज प्लॅन आणि ऑफर सादर करत असते जे कंपनी युजर्ससाठी फायदेशीर असतात तसेच इतर टेलीकॉम ऑपरेटर्सच्या तुलनेत स्वस्त आणि बेस्ट देखील ठरतात. आपल्या ग्राहकांसाठी कंपनीनं आता 61 रुपयांचा Data Booster Recharge Plan सादर केला आहे ज्यात एकूण 10GB Data मिळतो. जियो 61 रुपयांचा प्लॅन कंपनीनं हा ‘डाटा बूस्टर’ रिचार्ज प्लॅन्सच्या श्रेणीत […]

The post Jio चा नवीन धमाका! फक्त 61 रुपयांमध्ये देत आहे 10GB Data! जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा Data Booster रिचार्ज आहे.
  • ह्यात कॉल किंवा SMS बेनिफिट नाहीत.
  • प्रीपेड युजर हा रिचार्ज वापरू शकतात.

Reliance Jio वेळोवेळी असे रिचार्ज प्लॅन आणि ऑफर सादर करत असते जे कंपनी युजर्ससाठी फायदेशीर असतात तसेच इतर टेलीकॉम ऑपरेटर्सच्या तुलनेत स्वस्त आणि बेस्ट देखील ठरतात. आपल्या ग्राहकांसाठी कंपनीनं आता 61 रुपयांचा Data Booster Recharge Plan सादर केला आहे ज्यात एकूण 10GB Data मिळतो.

जियो 61 रुपयांचा प्लॅन

  • कंपनीनं हा ‘डाटा बूस्टर’ रिचार्ज प्लॅन्सच्या श्रेणीत ठेवला आहे.
  • ह्याची किंमत फक्त 61 रुपये आहे.
  • हा प्लॅन कोणत्याही वैधतेविना येतो.
  • ह्या प्लॅनमध्ये जियो ग्राहकांना 10जीबी डेटा मिळतो.
  • ह्या रिचार्जसह कॉलिंग किंवा एसएमएस बेनिफिट मिळत नाहीत.
  • ह्याचा लाभ आधीपासून सक्रिय असलेल्या प्लॅनच्या वैधतेत घेता येतो.
  • 10जीबी डेटा संपल्यावर 64Kbps स्पीडनं इंटरनेट वापरता येईल.

डाटा बूस्टर रिचार्ज प्लॅनचा फायदा

  • हा पॅक अ‍ॅक्टिव्ह झाल्यावर ‘डेली डेटा’ चं टेंशन राहत नाही.
  • गरजेच्या वेळी उपलब्ध डेटा संपल्यावर हा डेटा बूस्टर कामी येतो.
  • IPL पाहताना जर डेटा संपला तर ह्या डेटावर मॅच कंटिन्यू पाहता येईल.
  • जर एखादी मोठी फाईल इंटरनेटवरून डाउनलोड किंवा अपलोड करताना हा डेटा वापरता येईल.
  • आधी 61 रुपयांमध्ये 6जीबी डेटा मिळत होता परंतु आता 10जीबी मिळत आहे. म्हणजे 4जीबी एक्स्ट्रा डेटाचा फायदा.

जियो डेटा बूस्टर रिचार्ज प्लॅन्स

  • 15 रुपये
  • 25 रुपये
  • 121 रुपये
  • 222 रुपये

जियोचा 15 रुपयांचा डेटा बूस्टर प्लॅन 1 जीबी डेटासह येतो. ह्यात कोणतेही कॉल किंवा मेसेज मिळत नाहीत आणि ह्याची वैधता देखील सक्रिय प्लॅन इतकी आहे.

25 रुपयांच्या जियो डेटा बूस्टर प्लॅन 2जीबी डेटासह येतो. हा रिचार्ज देखील सक्रिय प्लॅनच्या व्हॅलिडिटी सोबतच चालतो.

61 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना 10जीबी डेटा दिला जात आहे. तर 121 रुपयांच्या डेटा बूस्टर प्लॅनमध्ये जियो आपल्या ग्राहकांना 12जीबी डेटा देत आहे.

Data Booster Recharge Plans मध्ये सर्वात मोठा पॅक 222 रुपयांचा आहे. हा Jio रिचार्ज पॅक 50जीबी डेटा देतो ज्याचा लाभ सक्रिय प्लॅनसह घेता येतो.

The post Jio चा नवीन धमाका! फक्त 61 रुपयांमध्ये देत आहे 10GB Data! जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/10-gb-data-at-rs-61-jio-data-booster-recharge-plan-details-and-benefits-in-marathi/feed/ 0
365 दिवस चालणारा Airtel चा सर्वात स्वस्त प्लॅन, किंमत 1799 रुपये https://www.91mobiles.com/marathi/airtel-12-month-cheapest-recharge-plan-price-rs-1799-free-calling-internet-data-2/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-12-month-cheapest-recharge-plan-price-rs-1799-free-calling-internet-data-2/#respond Thu, 18 May 2023 07:32:40 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20985 जर तुम्ही Airtel कंपनीचे ग्राहक असाल आणि दरमहा रिचार्ज करण्याचे झंझट नको असेल तर तुमच्यासाठी ह्या आर्टिकलमध्ये चांगला उपाय आहे. आज आम्ही या लेखात एयरटेलच्या एका अशा प्रीपेड रिचार्ज प्लॅनची माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुमचं सिम एक वर्षभर सक्रिय राहील आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला रिचार्ज करण्याची गरज नाही. विशेष म्हणजे हा कंपनीचा सर्वात स्वस्त वार्षिक […]

The post 365 दिवस चालणारा Airtel चा सर्वात स्वस्त प्लॅन, किंमत 1799 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • प्लॅनमध्ये FASTag वर 150 रुपयांचा कॅशबॅक मिळतो.
  • ह्या रिचार्जमध्ये 365 दिवस वैधता, फ्री कॉलिंग आणि एसएमएस मिळतात.
  • हा रिचार्ज तुमचं सिम एक वर्षभर सक्रिय ठेवेल.

जर तुम्ही Airtel कंपनीचे ग्राहक असाल आणि दरमहा रिचार्ज करण्याचे झंझट नको असेल तर तुमच्यासाठी ह्या आर्टिकलमध्ये चांगला उपाय आहे. आज आम्ही या लेखात एयरटेलच्या एका अशा प्रीपेड रिचार्ज प्लॅनची माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुमचं सिम एक वर्षभर सक्रिय राहील आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला रिचार्ज करण्याची गरज नाही. विशेष म्हणजे हा कंपनीचा सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन आहे.

रोजचा खर्च फक्त 4.9 रुपये

एयरटेलच्या ज्या रिचार्ज प्लॅन बद्दल आम्ही बोलत आहोत त्याच्या खर्च विभागल्यास दिवसाला फक्त 4.9 रुपये मोजावे लागतील. भारतातील दुसऱ्या मोठ्या टेलिकॉम कंपनीकडे 1799 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. हा प्लॅन कमी खर्चात 365 दिवसांची वैधता देतो. त्यामुळे ज्या युजर्सकडे एयरटेल सेकंडरी सिम म्हणून आहे आणि आपलं सिम वर्षभर सक्रिय ठेवायचं आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन योग्य आहे.

एयरटेल प्लॅनमध्ये मिळणारे बेनिफिट्स

  • ह्या प्लॅनमध्ये तुम्हाला फ्री अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ दिला जात आहे.
  • इंटरनेट वापरासाठी युजर्सना एकूण 24 GB डेटा मिळतो.
  • इतकेच नव्हे तर ह्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला डेली डेटा लिमिट मिळत नाही.
  • प्लॅनमध्ये मिळणारा 24 GB इंटरनेट डेटा 365 दिवसांत कधीही वापरता येतो.
  • प्लॅन रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला एकूण 3600 SMS ची सुविधा पण मिळेल.
  • ह्यात अपोलो 24/7 सर्कल, विंक म्यूजिक आणि फ्री हॅलोट्यूनची सुविधा दिली जात आहे.

नोट : जर तुम्ही मोठी वैधता असलेला एयरटेलचा स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधात असाल तर तुम्ही एयरटेलच्या ह्या प्लॅनची निवड करू शकता. डेटा संपल्यावर अ‍ॅड डेटा पॅकचा वापर करता येईल. तसेच सतत वायफायशी कनेक्टेड राहणाऱ्या युजर्ससाठी देखील हा एक चांगला प्लॅन आहे.

The post 365 दिवस चालणारा Airtel चा सर्वात स्वस्त प्लॅन, किंमत 1799 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-12-month-cheapest-recharge-plan-price-rs-1799-free-calling-internet-data-2/feed/ 0
BSNL नं लाँच केले नवीन Cinemaplus OTT Entertainment Packs, किंमत सुरु होते 49 रुपयांपासून https://www.91mobiles.com/marathi/bsnl-launch-cinemaplus-ott-entertainment-packs-starting-price-rs-49/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-launch-cinemaplus-ott-entertainment-packs-starting-price-rs-49/#respond Wed, 17 May 2023 09:30:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20951 ओटीटी वापरणाऱ्या युजर्सची वाढती संख्या पाहून BSNL नं तीन नवीन प्लॅन्स सादर केले आहेत. हे प्लॅन्स कंपनीनं Cinemaplus OTT Entertainment Packs नावानं सादर केले आहेत. ह्यासाठी सरकारी टेलीकॉम कंपनीनं Lionsgate, ShemarooMe, Hungama आणि EpicOn सारख्या ओटीटी साइट्सशी भागेदारी केली आहे. चला जाणून घेऊया ह्या प्लॅन्सबाबत संपूर्ण माहिती. बीएसएनएल न्यू ओटीटी पॅक्सची किंमत BSNL Cinemaplus 49 […]

The post BSNL नं लाँच केले नवीन Cinemaplus OTT Entertainment Packs, किंमत सुरु होते 49 रुपयांपासून first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • बीएसएनएलनं तीन नवीन पॅक्स सादर केले आहेत.
  • बीएसएनएल प्लॅन्समध्ये अनेक ओटीटी अ‍ॅप्सचा फायदा मिळेल.
  • या प्लॅनची किंमत तुमच्या बिलमध्ये जोडली जाईल.

ओटीटी वापरणाऱ्या युजर्सची वाढती संख्या पाहून BSNL नं तीन नवीन प्लॅन्स सादर केले आहेत. हे प्लॅन्स कंपनीनं Cinemaplus OTT Entertainment Packs नावानं सादर केले आहेत. ह्यासाठी सरकारी टेलीकॉम कंपनीनं Lionsgate, ShemarooMe, Hungama आणि EpicOn सारख्या ओटीटी साइट्सशी भागेदारी केली आहे. चला जाणून घेऊया ह्या प्लॅन्सबाबत संपूर्ण माहिती.

बीएसएनएल न्यू ओटीटी पॅक्सची किंमत

  • BSNL Cinemaplus 49 रुपयांचा प्लॅन
  • BSNL Cinemaplus 199 रुपयांचा प्लॅन
  • BSNL Cinemaplus 249 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएल सिनेमाप्लस स्टार्टर पॅक: स्टार्टर पॅक सध्या 49 रुपयांमध्ये (मूळ किंमत 99 रुपये) डिस्काउंटसह उपलब्ध आहे. यात शेमारू, हंगामा, लायन्सगेट आणि एपिक ऑनच्या ओटीटी सेवेचा समावेश करण्यात आला आहे.

बीएसएनएल सिनेमाप्लस फुल पॅक: 199 रुपयांची किंमत असलेला हा फुल पॅक ZEE5 प्रीमियम, SonyLIV प्रीमियम, YuppTV आणि Hotstar सह येतो.

बीएसएनएल सिनेमाप्लस प्रीमियम पॅक: 249 रुपयांमध्ये हा प्रीमियम पॅक उपलब्ध आहे, ज्यात ZEE5 प्रीमियम, SonyLIV प्रीमियम, YuppTV, Shemaroo, Hungama, Lionsgate आणि Hotstar चा कंटेंट मिळतो.

वर सांगितल्याप्रमाणे बीएसएनएल तुम्हाला वेगवेगळ्या ओटीटी कंटेंट प्रोव्हायडर कॉम्बिनेशनसह तीन पॅक ऑफर करत आहे. निवडलेल्या पॅकच्या आधारावर सर्व ओटीटीसाठी सब्सस्क्रिप्शन तुमच्या फायबर कनेक्शनच्या रजिस्टर मोबाइल नंबरवर अ‍ॅक्टिव्ह होईल. प्लॅनची किंमत तुमच्या बिल मध्ये जोडली जाईल.

एकंदरीत पाहता बीएसएनएल सिनेमाप्लस तुमच्या सर्व मनोरंजनाच्या गरजांसाठी वन स्टॉप डेस्टिनेशन आहे. जर तुम्ही ओटीटीसाठी वेगळं सब्सक्रिप्शन घेत असला तर हे पॅक्स तुमच्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतात.

बीएसएनएलचा 799 रुपयांच्या प्लॅन

या प्लॅनमध्ये 24 तास कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येते. बीएसएनएलच्या ह्या प्लॅनमध्ये 100Mbps स्पीडनं अनलिमिटेड इंटरनेट मिळतं. तसेच ह्यात 1000GB डेटा मिळतो. डेटा संपल्यावर स्पीड 5Mbps होतो. ह्या प्लॅनमध्ये Hotstar Super, Lions Gate, Shemaroo, Hungama, SonyLIV, Zee5, Voot आणि YuppTV चं फ्री सब्सक्रिप्शन मिळतं.

The post BSNL नं लाँच केले नवीन Cinemaplus OTT Entertainment Packs, किंमत सुरु होते 49 रुपयांपासून first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-launch-cinemaplus-ott-entertainment-packs-starting-price-rs-49/feed/ 0