Vivo T2 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 11 Apr 2023 07:13:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 64MP Camera सह Vivo T2 5G भारतात दाखल; पाहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-phone-vivo-t2-launch-know-features-specifications-and-price-details/ https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-phone-vivo-t2-launch-know-features-specifications-and-price-details/#respond Tue, 11 Apr 2023 06:49:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20189 विवो टी2 सीरीजसंबंधित बातम्या गेल्या कित्येक दिवस येत होत्या. कंपनी देखील हे फोन्स टीज करत होती आता विवोनं आपला नवीन मोबाइल फोन Vivo T2 5G ऑफिशियल केला आहे. जोडीला कंपनीनं Vivo T2x देखील सादर केला आहे. हा विवो फोन शानदार कॅमेऱ्यासह आला आहे तसेच फीचर्स व अन्य स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. विवो टी2 […]

The post 64MP Camera सह Vivo T2 5G भारतात दाखल; पाहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo T2 5G भारतात लाँच झाला आहे.
  • या फोनमध्ये 64MP Camera देण्यात आला आहे.
  • विवो टी2 5जी स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरला सपोर्ट करतो.

विवो टी2 सीरीजसंबंधित बातम्या गेल्या कित्येक दिवस येत होत्या. कंपनी देखील हे फोन्स टीज करत होती आता विवोनं आपला नवीन मोबाइल फोन Vivo T2 5G ऑफिशियल केला आहे. जोडीला कंपनीनं Vivo T2x देखील सादर केला आहे. हा विवो फोन शानदार कॅमेऱ्यासह आला आहे तसेच फीचर्स व अन्य स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

विवो टी2 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.38” AMOLED Display
  • Snapdragon 695
  • 64MP Dual Rear Camera
  • Android 13
  • 4500mAh Battery, 44W Fast Charging

Vivo T2 5G स्मार्टफोन वॉटरड्रॉप स्टाईल स्क्रीनसह लाँच झाला आहे. या फोनमध्ये 6.38 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी फुल एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करते. विवो टी2 5जी स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरवर चालतो. या फोनमध्ये अँड्रॉइड 13 सह फनटच ओएस देण्यात आला आहे. फोनमध्ये 8जीबी पर्यंत रॅम आणि 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

Vivo T2 5G फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, जो एफ 1.79 अपर्चरला सपोर्ट करतो. तर जोडीला एफ 2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी एफ 2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा सेन्सर आहे.

विवो टी2 5जी मध्ये पावर बॅकअपसाठी 4,500एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टव्हिटीसाठी यात 2जी, 3जी, 4जी, 5जीसह Wi-Fi, Bluetooth, USB, GPS आणि OTG सपोर्ट देखील मिळतो. या एक ड्युअल सिम फोन आहे, जो मायक्रोएसडी कार्डला देखील सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी हा फोन इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो.

विवो टी2 5जी ची किंमत

Vivo T2 5G चे भारतात दोन व्हेरिएंट्स आले आहेत. एकामध्ये 6GB रॅम आहे तर दुसऱ्यामध्ये 8GB रॅम परंतु दोन्ही मॉडेल्समध्ये 128GB स्टोरेज मिळते. बेस मॉडेलची किंमत 18,999 रुपये तर मोठ्या मॉडेलची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनची विक्री 18 एप्रिलपासून फ्लिपकार्टसह विवोची वेबसाइट आणि ऑफलाइन स्टोर्सच्या माध्यमातून केली जाईल. विवो टी2 5जी Velocity Wave आणि Nitro Blaze कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.

The post 64MP Camera सह Vivo T2 5G भारतात दाखल; पाहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-phone-vivo-t2-launch-know-features-specifications-and-price-details/feed/ 0
विवो घेऊन येत आहे दोन नवीन 5जी फोन; Vivo T2 आणि T2x 5G होतील 11 एप्रिलला भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/11-april-vivo-t2-5g-t2x-5g-phone-launch-date-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/11-april-vivo-t2-5g-t2x-5g-phone-launch-date-in-india/#respond Thu, 06 Apr 2023 04:09:20 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20059 विवो भारतीय बाजारात दोन नवीन 5जी फोन घेऊन येत आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की येत्या 11 एप्रिलला भारतात Vivo T2 Series लाँच होईल आणि टी2 5जी तथा टी2एक्स 5जी फोन बाजारात येतील. या सीरीजचं प्रोडक्ट पेज ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर लाइव्ह करण्यात आलं आहे जिथे इंडिया लाँचपूर्वीच Vivo T2 आणि T2x 5G फोनचे महत्वाचे स्पेसिफिकेशन्स […]

The post विवो घेऊन येत आहे दोन नवीन 5जी फोन; Vivo T2 आणि T2x 5G होतील 11 एप्रिलला भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo T2 Series 11 एप्रिलला भारतात लाँच होईल.
  • सीरीजमध्ये T2 5G आणि T2x 5G फोनचा समावेश करण्यात येईल.
  • विवो टी2 सीरीजची विक्री फ्लिपकार्टवरून केली जाईल.

विवो भारतीय बाजारात दोन नवीन 5जी फोन घेऊन येत आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की येत्या 11 एप्रिलला भारतात Vivo T2 Series लाँच होईल आणि टी2 5जी तथा टी2एक्स 5जी फोन बाजारात येतील. या सीरीजचं प्रोडक्ट पेज ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर लाइव्ह करण्यात आलं आहे जिथे इंडिया लाँचपूर्वीच Vivo T2 आणि T2x 5G फोनचे महत्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर ठेवण्यात आले आहेत.

विवो टी2 सीरीज इंडिया लाँचची माहिती

कंपनीनं अधिकृत घोषणा करून सांगितलं आहे की येत्या 11 एप्रिलला Vivo T2 5G आणि Vivo T2x 5G भारतात लाँच होतील. कंपनी व्हर्च्युअल इव्हेंटच्या माध्यमातून आपले नवीन फोन्स भारतीय बाजारात आणेल जो 11 एप्रिलला दुपारी 12 वाजता सुरु होईल. हा लाँच इव्हेंट कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व विवो इंडिया सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह स्ट्रीम होईल. फ्लिपकार्टवर Vivo T2 Series प्रोडक्ट पेज लाइव्ह झालं आहे तसेच दोन्ही 5जी फोन्सची विक्री याच शॉपिंग साइटवर होईल. हे देखील वाचा: iQOO Neo 6 च्या किंमतीत 5,000 रुपयांची मोठी कपात; जाणून घ्या नवी प्राइस

विवो टी2 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स

लाँच डेटची माहिती देण्यासोबतच कंपनीनं सांगितलं आहे की या सीरीजमध्ये अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळेल. फोन स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच स्टाईलसह येईल जी फुलएचडी+ रिजोल्यूशनवर चालेल. तसेच विवो टी2 सीरीज स्मार्टफोनवर 1300निट्स ब्राइटनेस, 6000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट सारखे फीचर्स देखील दिले जातील.

फोटोग्राफीसाठी Vivo T2 Series मध्ये ड्युअल रियर कॅमेरा दिला जाईल. यात 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरचा समावेश असू शकतो. लीकमध्ये समोर आलेली माहिती पाहता या सीरीजच्या मोबाइल फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट मिळू शकतो. तसेच फोन्समध्ये 8जीबी पर्यंतचा रॅम आणि 128जीबी पर्यंतची स्टोरेज दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: शाओमीचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन लाँचच्या उंबरठ्यावर; Xiaomi 13 Ultra ला मिळालं IMDA सर्टिफिकेट

बाजारातील Vivo T Series चे फोन्स

विवो टी2 5जी आणि टी2एक्स 5जी फोनच्या फुल स्पेसिफिकेशन्स आणि किंमतची माहिती 11 एप्रिलला समोर येईल. या सीरीज अंतगर्त कंपनीनं भारतात चार मोबाइल फोन लाँच केले आहेत ज्यात Vivo T1 Pro 5G, Vivo T1x, Vivo T1 5G आणि Vivo T1 4G चा समावेश आहे. यांची किंमत 11,999 रुपयांपासून सुरु होऊन 23,999 रुपयांपर्यंत जाते.

The post विवो घेऊन येत आहे दोन नवीन 5जी फोन; Vivo T2 आणि T2x 5G होतील 11 एप्रिलला भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/11-april-vivo-t2-5g-t2x-5g-phone-launch-date-in-india/feed/ 0
Vivo T2 5G सीरीज येतेय भारतात; फ्लिपकार्टवर लिस्ट झाला फोन https://www.91mobiles.com/marathi/vivo-t2-5g-india-launch-confirmed-in-india-sale-on-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-t2-5g-india-launch-confirmed-in-india-sale-on-flipkart/#respond Tue, 04 Apr 2023 07:34:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20002 विवोच्या टी2 सीरीज बद्दल गेले कित्येक दिवस लीक व माहिती समोर येत आहे. आता फ्लिपकार्टवर Vivo T2 सीरीजची मायक्रो-साइट लाइव्ह करण्यात आली आहे. लिस्टिंगवरून निश्चित झालं आहे की हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात लाँच केला जाईल. परंतु अजूनही अधिकृत लाँच डेट समोर आली नाही. लिस्टिंगवरून स्पष्ट झालं आहे की येत्या काही दिवसांत डिवाइसच्या फीचर्सचा खुलासा […]

The post Vivo T2 5G सीरीज येतेय भारतात; फ्लिपकार्टवर लिस्ट झाला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo T2 5G सीरीजमध्ये Vivo T2 आणि Vivo T2x सादर केला जाऊ शकतो.
  • आशा आहे की फोन मिड-एप्रिलमध्ये लाँच केला जाऊ शकतो.
  • हा iQOO Z7 सीरीज स्मार्टफोनचा रिब्रँडेड व्हर्जन असू शकतो.

विवोच्या टी2 सीरीज बद्दल गेले कित्येक दिवस लीक व माहिती समोर येत आहे. आता फ्लिपकार्टवर Vivo T2 सीरीजची मायक्रो-साइट लाइव्ह करण्यात आली आहे. लिस्टिंगवरून निश्चित झालं आहे की हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात लाँच केला जाईल. परंतु अजूनही अधिकृत लाँच डेट समोर आली नाही. लिस्टिंगवरून स्पष्ट झालं आहे की येत्या काही दिवसांत डिवाइसच्या फीचर्सचा खुलासा केला जाईल. पुढे आम्ही तुम्हाला या सीरीजची आतापर्यंत समोर आलेली माहिती सांगणार आहोत.

फ्लिपकार्टवर लिस्ट झाला फोन

फ्लिपकार्टवर मायक्रो-साइटवरून समजलं आहे की विवो टी2 5जी सीरीज लवकरच भारतात लाँच होईल. तसेच लिस्टिंगमधून समजलं आहे की आगामी स्मार्टफोनमध्ये टर्बो डिस्प्ले असेल, जो हाय रिफ्रेश रेटची हिंट देतो. तसेच लिस्टिंगमध्ये आगामी डिवाइसच्या टर्बो कॅमेरा आणि टर्बो प्रोसेसरचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामुळे या फोनमध्ये हाय रिजोल्यूशन कॅमेरा आणि शक्तीशाली चिपसेट मिळेल असा अंदाज लावला जात आहे. हे देखील वाचा: Realme GT Neo 5 SE लाँच! यात आहे 100W चार्जिंग, 5000mAh Battery आणि 1.5K डिस्प्ले

फ्लिपकार्टवरील माहितीनुसार कंपनी 5 एप्रिल, 7 एप्रिल आणि 9 एप्रिलला प्रोडक्टच्या फीचर्सच्या अधिक माहितीचा खुलासा करेल. तसेच टीजर इमेजवरून समजलं आहे की या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल. टर्बो डिस्प्लेच्या बॉक्समधून वॉटरड्रॉप नॉच डिजाइन आणि टर्बो प्रोसेसर बॉक्समधून क्वॉलकॉम 5G चिपसेटची माहिती मिळाली आहे. या नवीन विवो स्मार्टफोनची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा: Samsung Galaxy A24 झाला भारतीय वेबसाइटवर लिस्ट; सपोर्ट पेजवरून लाँच कंफर्म

विवो टी 2 सीरिजचे लीक स्पेसिफिकेशन्स

अलीकडेच माहिती समोर आली होती की Vivo T2 5G सीरीजमध्ये Vivo T2 आणि Vivo T2x स्मार्टफोन्स सादर केले जाऊ शकतात. यातील Vivo T2 स्मार्टफोनमध्ये FHD+ रेजोल्यूशनसह AMOLED डिस्प्ले आणि 1300 निट्स पीक ब्राइटनेस दिली जाऊ शकते. डिवाइस क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 5जी चिपसेटसह बाजारात येईल, असा खुलासा Google Play कंसोल लिस्टिंगवरून झाला होता. तसेच डिवाइसमध्ये 6जीबी/ 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते. विवो टी2 स्मार्टफोन OIS सपोर्टसह 64MP च्या प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. प्रायमरी सेन्सरसह एक सेकंडरी डेप्थ किंवा मॅक्रो सेन्सर मिळू शकतो.

The post Vivo T2 5G सीरीज येतेय भारतात; फ्लिपकार्टवर लिस्ट झाला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-t2-5g-india-launch-confirmed-in-india-sale-on-flipkart/feed/ 0
Vivo T2 सीरीजच्या इंडिया लाँचची टाइमलाइन लीक; जाणून घ्या माहिती https://www.91mobiles.com/marathi/vivo-t2-series-india-launch-timeline-price-and-key-spec-leak/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-t2-series-india-launch-timeline-price-and-key-spec-leak/#respond Wed, 29 Mar 2023 06:10:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19857 अनेक दिवसांपासून अफवा अफवा आहे की चीनी मोबाइल निर्माता कंपनी Vivo आपल्या Vivo T2 सीरीजमध्ये सादर केल्या जाणाऱ्या मोबाइल फोनवर काम करत आहे. आतापर्यंत याबाबत कोणतीही माहिती ऑफिशियल झाली नाही. दरम्यान टेक वेबसाइट Pricebaba नं या आगामी सीरीजच्या इंडिया लाँच टाइमलाइनचा खुलासा केला आहे. रिपोर्टनुसार, भारतात T2 series एप्रिल मध्ये सादर केली जाऊ शकते. कंपनी […]

The post Vivo T2 सीरीजच्या इंडिया लाँचची टाइमलाइन लीक; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • रिपोर्टनुसार Vivo T2 सीरीज एप्रिलमध्ये भारतात येऊ शकते.
  • सुरुवातीला सीरीजमध्ये दोन मोबाइल फोन्स लाँच केले जाऊ शकतात.
  • Vivo T2 5G आणि T2x स्मार्टफोन अलीकडेच गूगल प्ले कंसोलवर दिसला होता.

अनेक दिवसांपासून अफवा अफवा आहे की चीनी मोबाइल निर्माता कंपनी Vivo आपल्या Vivo T2 सीरीजमध्ये सादर केल्या जाणाऱ्या मोबाइल फोनवर काम करत आहे. आतापर्यंत याबाबत कोणतीही माहिती ऑफिशियल झाली नाही. दरम्यान टेक वेबसाइट Pricebaba नं या आगामी सीरीजच्या इंडिया लाँच टाइमलाइनचा खुलासा केला आहे. रिपोर्टनुसार, भारतात T2 series एप्रिल मध्ये सादर केली जाऊ शकते. कंपनी सुरुवातीला दोन T2-ब्रँडेड स्मार्टफोनची घोषणा करू शकते.

विवो टी2 सीरीज एप्रिलमध्ये होऊ शकते लाँच

रिपोर्टनुसार, विवो टी2 सीरीज भारतात एप्रिलच्या मध्यात लाँच होईल. तसेच असं देखील समोर आलं आहे की क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन आणि मीडियाटेक डायमेंसिटी चिपसेट असलेले दोन डिवाइस सीरीजमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. सध्या फोनच्या अचूक नावांची माहिती तर मिळाली नाही. परंतु, हे विवो टी2 आणि विवो टी2एक्स नावाने सादर केले जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सची देशात किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. हे देखील वाचा: सामान्य नागरिकांना दिलासा! पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढली

गुगल प्ले कंसोलवर लिस्ट झालेले विवो टी2 सीरीजचे फोन

हे दोन्ही हँडसेट काही आठवड्यांपूर्वी Google Play कंसोल लिस्टिंगवर दिसले होते. लिस्टिंगमध्ये समोर आलं होतं की फोन FHD + डिस्प्ले, एक ड्यूड्रॉप नॉच आणि Android 13 सह बाजारात येऊ शकतो. तसेच विवो टी2 (वी2222) क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 एसओसीसह लाँच केला जाऊ शकतो, तर विवो टी2एक्स मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 700 चिप मिळू शकते. तसेच या दोन्ही स्मार्टफोन्सनंतर येणारे मॉडेल सर्वात किफायतशीर असण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा: Redmi नं लाॅन्च केला पावरफुल Note 12 Turbo 5G फोन, PUBG सारख्या गेम्ससाठी ठरू शकतो मस्त ऑप्शन

तुमच्या लक्षात असेल गेल्यावर्षी विवोनं भारतात विवो टी1 सीरीजची सुरुवात केली होती. या लाइनअपमध्ये तीन मॉडेल-विवो टी1, विवो टी1 44डब्ल्यू आणि विवो टी1एक्स चा समावेश करण्यात आला होता. हे सर्व फोन iQOO Z6 डिवाइसचे रीब्रँड व्हर्जन होते. परंतु, यावेळी काही रिपोर्ट्सनुसार, विवो टी2 लाइनअप मार्केटमध्ये आलेल्या iQOO Z7 सीरीज पेक्षा वेगळी असेल.

The post Vivo T2 सीरीजच्या इंडिया लाँचची टाइमलाइन लीक; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-t2-series-india-launch-timeline-price-and-key-spec-leak/feed/ 0
Vivo T2 5G स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि अँड्रॉइड 13 गुगल प्ले कन्सोलवर लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/vivo-t2-5g-specifications-google-play-console-launch/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-t2-5g-specifications-google-play-console-launch/#respond Mon, 13 Feb 2023 06:32:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17738 गेल्यावर्षी विवोनं आपल्या बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी नवीन ‘टी’ सीरिज सादर केली होती. यात कंपनीनं Vivo T1 Pro, Vivo T1 5G आणि Vivo T1 4G असे स्मार्टफोन सादर केले आहेत. आता या सीरिजमध्ये आणखी एका मॉडेलचा समावेश होऊ शकतो. Vivo T2 स्मार्टफोन गुगल प्ले कन्सोल लिस्टिंगवर दिसला आहे. या लिस्टिंगमधून स्मार्टफोन महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती लाँचपूर्वीच मिळाली […]

The post Vivo T2 5G स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि अँड्रॉइड 13 गुगल प्ले कन्सोलवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo T2 5G स्मार्टफोन गुगल प्ले कन्सोलवर मॉडेल नंबर V2222 सह लिस्ट झाला आहे.
  • या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 SoC, 8GB RAM आणि Android 13 मिळू शकतो .
  • Vivo T2 लवकरच भारतात येऊ शकतो.

गेल्यावर्षी विवोनं आपल्या बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी नवीन ‘टी’ सीरिज सादर केली होती. यात कंपनीनं Vivo T1 Pro, Vivo T1 5G आणि Vivo T1 4G असे स्मार्टफोन सादर केले आहेत. आता या सीरिजमध्ये आणखी एका मॉडेलचा समावेश होऊ शकतो. Vivo T2 स्मार्टफोन गुगल प्ले कन्सोल लिस्टिंगवर दिसला आहे. या लिस्टिंगमधून स्मार्टफोन महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती लाँचपूर्वीच मिळाली आहे. कंपनीनं कोणतीही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नसली तरी हा फोन लवकरच बाजारात येईल, ही शक्यता नाकारता येत नाही.

Google Play Console लिस्टिंगमधून समजलं आहे की Vivo T2 चा मॉडेल नंबर V2222 असू शकतो. या लिस्टिंगमध्ये रेंडर देखील आहे परंतु तो फोनचा आहे की फक्त प्लेस होल्डर आहे हे स्पष्ट झालं नाही. या रेंडरमध्ये वॉटर ड्रॉप नॉच आणि नॅरो बेझल दिसत आहेत. सीरिज मधील जुन्या फोन प्रमाणे Vivo T2 चे देखील अनेक व्हर्जन ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतात. हे देखील वाचा: भारतीय बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येतोय Nokia X30 5G; रेडमी-रियलमीची लागणार का वाट?

Vivo T2 5G चे स्पेसिफिकेशन

गुगल प्ले लिस्टिंगनुसार आगामी Vivo T2 5G स्मार्टफोनमधील प्रोसेसरचा मॉडेल नंबर Qualcomm SM6375 असा आहे. याचा अर्थ असा की या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 695 चिपसेट दिला जाऊ शकतो. विशेष म्हणजे कंपनीनं गेल्यावर्षीच्या Vivo T1 5G मध्ये देखील याच प्रोसेसरचा वापर केला होता. या चिपसेटमध्ये 2.2GHz चा क्लॉक स्पीड दिला जाऊ शकतो, जोडीला एड्रिनो 619 जीपीयू मिळू शकतो. फोनमध्ये 8GB RAM आणि 128GB ची इंटरनल स्टोरेज कंपनी देऊ शकते. आगामी विवो फोन लेटेस्ट अँड्रॉइड 13 सह बाजारात येऊ शकतो. हे देखील वाचा: 16 फेब्रुवारीच्या लाँचपूर्वीच iQOO Neo 7 5G च्या किंमतीचा खुलासा; परवडणाऱ्या दरात दणकट फोन

गुगल प्ले लिस्टिंगनुसार विवो टी2 5जीमध्ये FHD+ डिस्प्ले देण्यात येईल ज्याचे रिजोल्यूशन 1080×2400 पिक्सल असू शकतं. सध्यातरी अपकमिंग Vivo T2 5G ची एवढीच माहिती उपलब्ध झाली आहे. आगामी काळात अजून माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे. तसेच गुगल प्ले कन्सोलवर लिस्ट झाल्यामुळे कंपनी लवकरच हा फोन टीज करू शकते आणि बाजारात लाँच करू शकते.

The post Vivo T2 5G स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि अँड्रॉइड 13 गुगल प्ले कन्सोलवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-t2-5g-specifications-google-play-console-launch/feed/ 0