Samsung Galaxy A24 झाला भारतीय वेबसाइटवर लिस्ट; सपोर्ट पेजवरून लाँच कंफर्म

Highlights

  • सॅमसंग गॅलेक्सी ए24 लवकरच भारतात येऊ शकतो.
  • गॅलेक्सी ए24 चं सपोर्ट पेज कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट झालं.
  • फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर आणि 5,000एमएएचची बॅटरी असेल.

Samsung आपल्या लोकप्रिय ‘ए सीरिज’ मध्ये नवीन फोन भारतात लाँच करण्याची योजना बनवत आहे, जो गेले कित्येक दिवस बातम्यांमधून समोर येत आहे. आता 91मोबाइल्सनं सॅमसंगच्या भारतीय वेबसाइटवर Samsung Galaxy A24 चं सपोर्ट पेज पाहिलं आहे, यामुळे लवकरच हा फोन भारतात लाँच होणार हे कंफर्म झालं आहे. या अधिकृत सपोर्ट पेजवरून डिवाइसच्या मॉडेल नंबरची माहिती मिळाली आहे. पुढे आम्ही सॅमसंग गॅलेक्सी A24 बाबत आतापर्यंत समोर आलेली माहिती सांगितली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी A24 चं सपोर्ट पेज लाइव्ह

स्क्रीनशॉटमध्ये दाखवल्याप्रमाणे आगामी Samsung Galaxy A24 चा मॉडेल नंबर Samsung SM-A245F/DS आहे आणि याच नंबरसह हा मॉडेल सॅमसंगच्या भारतीय वेबसाइटवर सपोर्ट पेज लाइव्ह करण्यात आलं आहे. सपोर्ट पेजवरून डिवाइसच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती मात्र मिळाली नाही. हे देखील वाचा: अधिकृतपणे समोर आले Redmi Note 12 Pro 4G चे स्पेसिफिकेशन्स; मिळेल 108MP चा कॅमेरा

सॅमसंग गॅलेक्सी A24 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A24 मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंच FHD+ AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. डिवाइसमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर मिळू शकतो. तसेच यात 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असण्याची शक्यता आहे. कंपनी Samsung Galaxy A24 स्मार्टफोन नवीन Android 13 आधारित OneUI 5.0 स्किनवर लाँच करू शकते. हे देखील वाचा: Realme GT Neo 5 SE लाँच! यात आहे 100W चार्जिंग, 5000mAh Battery आणि 1.5K डिस्प्ले

डिवाइसचा कॅमेरा सेगमेंट पाहता, सॅमसंग गॅलेक्सी ए24 मध्ये कथितरित्या OIS सह 50MP चा मुख्य कॅमेरा, 5MP चा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 13MP चा फ्रंट कॅमेरा असू शकतो. तसेच डिवाइसमध्ये यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्टसह 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000mAh ची बॅटरी असण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here