Vivo V27e - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 14:27:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 64MP च्या कॅमेऱ्यासह Vivo V27e ची एंट्री; सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोनमध्ये 8GB RAM https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27e-launched-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27e-launched-price-specifications/#respond Thu, 02 Mar 2023 05:26:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18312 Vivo नं काल Vivo V27 आणि Vivo V27 Pro हे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केले आहेत. त्याचबरोबर कंपनीनं व्ही सीरिजचा Vivo V27e मलेशियन बाजारात उतरवला आहे. या व्ही सीरिजच्या नव्या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर, 4600mAh ची बॅटरी, 120Hz AMOLED डिस्प्ले आणि OIS सपोर्ट असलेला 64MP चा कॅमेरा आहे. पुढे आम्ही व्ही27 सीरिजमधील सर्वात […]

The post 64MP च्या कॅमेऱ्यासह Vivo V27e ची एंट्री; सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोनमध्ये 8GB RAM first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo V27e मध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा ओआयएस सपोर्टसह देण्यात आला आहे.
  • फोनमधील 4600mAh ची बॅटरी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
  • हा फोन लॅव्हेंडर पर्पल आणि ग्लॉरी ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध झाला आहे.

Vivo नं काल Vivo V27 आणि Vivo V27 Pro हे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केले आहेत. त्याचबरोबर कंपनीनं व्ही सीरिजचा Vivo V27e मलेशियन बाजारात उतरवला आहे. या व्ही सीरिजच्या नव्या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर, 4600mAh ची बॅटरी, 120Hz AMOLED डिस्प्ले आणि OIS सपोर्ट असलेला 64MP चा कॅमेरा आहे. पुढे आम्ही व्ही27 सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोनची सविस्तर माहिती दिली आहे.

Vivo V27e ची किंमत आणि उपलब्धता

Vivo V27e चा एकच व्हेरिएंट जागतिक बाजारात आला आहे, ज्यात 8 जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. कंपनीनं या मॉडेलची किंमत 1,299 मलेशियन रिंगेट (सुमारे 24,000 रुपये) ठेवली आहे. हा फोन लॅव्हेंडर पर्पल आणि ग्लॉरी ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध झाला आहे. सध्या मलेशियन बाजारातील हा मॉडेल लवकरच भारतात देखील दाखल होऊ शकतो. हे देखील वाचा: Redmi Note 12 4G देखील लाँचसाठी सज्ज; फोनचे फोटो आणि स्पेसिफिकेशन्स आले समोर

Vivo V27e चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.62″ Full HD+ AMOLED display
  • MediaTek Helio G99 processor
  • 8GB RAM 256GB Storage
  • 64MP Triple rear camera
  • 4600mAh battery, 66W fast charging

Vivo V27e मध्ये 6,62 इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2400 × 1080 पिक्सेल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी यात इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळतो. तसेच यातील पंच होल मध्ये सेल्फी कॅमेरा सेन्सर फिट करण्यात आला आहे.

व्ही सीरिजमधील या किफायतीशीर स्मार्टफोनमध्ये कंपनीनं ऑक्टाकोर MediaTek Helio G99 प्रोसेसरचा वापर केला आहे, जो Mali G57 जीपीयूसह येतो. जोडीला 8जीबी रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच एक्सटेंडेड रॅम फिचरच्या मदतीनं 8जीबी अतिरिक्त रॅम मिळून 16जीबी रॅम मिळवता येतो. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित फनटचओएस 13 वर चालतो.

Vivo V27e मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात OIS सपोर्ट असलेला 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चा मॅक्रो सेन्सर, आणि 2MP चा बोकेह सेन्सर ऑरा लाईट एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीनं विवो व्ही27ई मध्ये 32MP च्या कॅमेऱ्यासह वापर केला आहे. हे देखील वाचा: स्वदेशी 5G वापरण्यासाठी येतोय स्वदेशी स्मार्टफोन; लाँच पूर्वीच Lava Agni 2 5G चे स्पेसिफिकेशन्स लीक

हा फोन 4600mAh च्या बॅटरीसह बाजारात आला आहे जी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच यात कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम, 4जी, वायफाय, ब्लूटूथ 5.2, एनएफसी, जीपीएस, टाइप सी पोर्ट आणि 3.5एमएम ऑडिओ जॅक मिळतो. यात के हायब्रीड मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. हा एक IP54 रेटेड स्मार्टफोन असल्यामुळे काही प्रमाणात वॉटर आणि डस्ट रेजिस्टंट बनतो.

The post 64MP च्या कॅमेऱ्यासह Vivo V27e ची एंट्री; सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोनमध्ये 8GB RAM first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27e-launched-price-specifications/feed/ 0
1 मार्चला येऊ शकतो येणार Vivo V27e; कंपनीचं दिली माहिती https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27e-launch-date-design-specifications-confirmed/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27e-launch-date-design-specifications-confirmed/#respond Wed, 22 Feb 2023 06:49:22 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18044 चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo येत्या 1 मार्चला जागतिक बाजारात Vivo V27 series सादर करणार आहे, जी भारतात देखील येईल. या सीरिजमध्ये Vivo V27e स्मार्टफोनचा देखील समावेश असेल. कंपनीनं आपल्या आगामी स्मार्टफोनसाठी एक मायक्रोसाइट बनवली आहे, जिथून आगामी Vivo V27e स्मार्टफोनच्या डिजाईन आणि काही स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. हा स्मार्टफोन Vivo V27 आणि Vivo V27 […]

The post 1 मार्चला येऊ शकतो येणार Vivo V27e; कंपनीचं दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo V27e’s ची डिजाईन समोर आली आहे.
  • या फोनमध्ये MediaTek Helio G99 चिपसेट मिळेल.
  • Vivo V27 series मध्ये तीन स्मार्टफोन सादर केले जातील.

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo येत्या 1 मार्चला जागतिक बाजारात Vivo V27 series सादर करणार आहे, जी भारतात देखील येईल. या सीरिजमध्ये Vivo V27e स्मार्टफोनचा देखील समावेश असेल. कंपनीनं आपल्या आगामी स्मार्टफोनसाठी एक मायक्रोसाइट बनवली आहे, जिथून आगामी Vivo V27e स्मार्टफोनच्या डिजाईन आणि काही स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. हा स्मार्टफोन Vivo V27 आणि Vivo V27 Pro सोबत लाँच केला जाईल. चला या स्मार्टफोनची इतर माहिती जाणून घेऊया.

Vivo V27e चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

अपकमिंग Vivo V27e ची संपूर्ण डिजाईन या मायक्रोसाईटवरून समोर आली आहे. V27 Pro मध्ये कर्व 3डी स्क्रीन मिळू शकते परंतु यात एक फ्लॅट स्क्रीन असू शकते, जिच्या वरच्या बाजूला मध्यभागी सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंचहोल दिला जाऊ शकतो. प्रो व्हर्जन सारखा कॅमेरा सेटअप यात देखील मिळू शकतो, ज्यात रिंग शेप एलईडी फ्लॅश मिळू शकतो. हा फोन फक्त 7.8 एमएम जाड आहे आणि याचे वजन 186 ग्राम असू शकतं. हे देखील वाचा: कमी किंमतीत लाँच झाली ही किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये 80km धावणार

बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 64MP चा अल्ट्रा सेन्सिंग कॅमेरा आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन मिळू शकतं, ज्यामुळे कमी प्रकाशात देखील चांगले फोटोज येऊ शकतात. प्रो मॉडेलप्रमाणे Vivo V27e मध्ये देखील एक ऑरा लाइट फिचर देण्यात आलं आहे, जे रात्रीच्या वेळी पोट्रेट काढल्यास चांगल्या रिजल्ट्ससाठी स्टुडिओसारखी लायटिंग मिळू शकते.

लिक्सनुसार Vivo V27e मध्ये 6.5-इंचाचा ई4 अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळेल जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. तर गुगल प्ले कन्सोलच्या डेटाबेसनुसार या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G99 चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच यात पवार बॅकअपसाठी 5,000mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकतो. हे देखील वाचा: रेडमी-पोकोला टक्कर देण्यासाठी रियलमी सज्ज; लो बजेटमध्ये येणार Realme C55 आणि Realme C33 2023

Vivo V27 Price

लीकमध्ये Vivo V27 आणि Vivo V27 Pro ची किंमत शेयर करण्यात आली आहे. वी27 ची प्राइस 35,000 रुपयांच्या आसपास असू शकते. तसेच प्रो मॉडेलबद्दल सांगण्यात आलं आहे की हा 8 जीबी रॅमसह लाँच होऊ शकतो, जोडीला 128जीबी स्टोरेज आणि 256जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते. या फोनची प्रारंभिक किंमत 40 हजार रुपयांच्या आसपास असल्याच असू शकते. V27e ची किंमत समोर आली नसली तरी हा या सीरिजमधील सर्वात स्वस्त फोन असू शकतो आणि याची किंमत 30 हजारांच्या आसपास असू शकते, असा अंदाज लावला जात आहे.

The post 1 मार्चला येऊ शकतो येणार Vivo V27e; कंपनीचं दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27e-launch-date-design-specifications-confirmed/feed/ 0
Vivo V27 आणि Vivo V27 Pro फेब्रुवारीमध्ये येऊ शकतात भारतात; लीक झाली माहिती https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-and-vivo-v27-pro-will-be-launched-soon-features-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-and-vivo-v27-pro-will-be-launched-soon-features-leaked/#respond Thu, 02 Feb 2023 07:32:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17438 Vivo भारतीय बाजारात अनेक स्मार्टफोन सादर करणार आहे. यात बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी Vivo Y100 आणि Vivo Y78 चा समावेश असेल. तसेच प्रीमियम स्मार्टफोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी Vivo X90 आणि Vivo X90 Pro येतील. तर मिड रेंज मधील ग्राहकांना खुश करण्यासाठी कंपनी लोकप्रिय Vivo V27 लाइनअप सादर करू शकते. आता Vivo V27 सीरीजच्या लाँच पूर्वी सीरिजची एक्सक्लूसिव्ह […]

The post Vivo V27 आणि Vivo V27 Pro फेब्रुवारीमध्ये येऊ शकतात भारतात; लीक झाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • विवो भारतात सध्या Vivo V27 आणि Vivo V27 Pro स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे.
  • Vivo V27 Pro स्मार्टफोन भारतात कर्व डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो.
  • Vivo V27 सीरीजच्या प्रीमियम फोनमध्ये फ्लॅगशिप MediaTek 8200 SOC मिळू शकते.

Vivo भारतीय बाजारात अनेक स्मार्टफोन सादर करणार आहे. यात बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी Vivo Y100 आणि Vivo Y78 चा समावेश असेल. तसेच प्रीमियम स्मार्टफोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी Vivo X90 आणि Vivo X90 Pro येतील. तर मिड रेंज मधील ग्राहकांना खुश करण्यासाठी कंपनी लोकप्रिय Vivo V27 लाइनअप सादर करू शकते. आता Vivo V27 सीरीजच्या लाँच पूर्वी सीरिजची एक्सक्लूसिव्ह माहिती आमच्या हाती लागली आहे. Vivo हे स्मार्टफोन भारतात फेब्रुवारीमध्ये लाँच करू शकते.

Vivo V27 सीरिजची लीक माहिती

    Vivo V27 आणि Vivo V27 Pro येऊ शकतात बाजारात

  • Vivo V27 Pro मध्ये कर्व डिस्प्ले

  • MediaTek 8200 SOC

  • कलर चेंजिंग बॅक पॅनल

विवो भारतात आपल्या Vivo V27 सीरीजमध्ये Vivo V27 आणि Vivo V27 Pro असे दोन स्मार्टफोन सादर करू शकते. Vivo V27 सीरीजचे हे दोन्ही स्मार्टफोन गेल्यावर्षी आलेल्या Vivo V25 आणि Vivo V25 Pro पेक्षा परफॉर्मेंस आणि कॅमेऱ्यात मोठ्या अपग्रेडसह लाँच केले जाऊ शकतात. त्यानंतर कंपनी या सीरीजचा विस्तार करत Vivo V27e भारतात सादर करू शकते. हे देखील वाचा: कोल्ड्रिंक विकणारी कंपनी करणार स्मार्टफोन लाँच; Coca-Cola Phone बाबत मोठा खुलासा, तारीखही ठरली

Vivo V27 Pro स्मार्टफोनबद्दल मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन प्रीमियम लुक ऑफर करू शकतो. कंपनी हा स्मार्टफोन कर्व डिस्प्लेसह लाँच करू शकते. विवोच्या आगामी स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकच्या दमदार प्रोसेसर मिळू शकतो. Vivo V27 Pro स्मार्टफोनमध्ये फ्लॅगशिप MediaTek 8200 SOC मिळू शकते, अशी माहिती मिळाली आहे. हे देखील वाचा: Samsung Galaxy S23, Galaxy S23 Plus, Galaxy S23 Ultra ची भारतीय किंमत आली; आता प्रीबुक केल्यास भरपूर फायदे

विवो की V-सीरीज आपल्या दमदार लुक आणि शानदार कॅमेरा क्वॉलिटीसाठी ओळखली जाते. आगामी Vivo V27 सीरीज बाबत इंडस्ट्री सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळाली आहे, त्यानुसार या सीरीजच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये प्रायमरी कॅमेरा Sony चा हाय-एन्ड सेन्सर असू शकतो. हा फोन शानदार नाइट फोटोग्राफी एक्सपीरियंस देऊ शकते, अशी चर्चा आहे. Vivo V27 सीरीजचा लुक पाहता कंपनी या सीरीजचे दोन्ही स्मार्टफोन कलर चेंजिंग बॅक पॅनलसह लाँच करू शकते. सध्या Vivo V27 बद्दल इतकीच माहिती उपलब्ध आहे.

The post Vivo V27 आणि Vivo V27 Pro फेब्रुवारीमध्ये येऊ शकतात भारतात; लीक झाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-and-vivo-v27-pro-will-be-launched-soon-features-leaked/feed/ 0