Xiaomi Mi 10T - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 02 Mar 2021 12:05:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8GB रॅम आणि 64MP कॅमेरा असलेल्या Xiaomi Mi 10T ची किंमत 3000 रुपयांनी झाली कमी, लवकरच घ्या या संधीचा फायदा https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10t-8gb-ram-64mp-camera-phone-price-dropped-by-rs-3000-know-new-sale-prices/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10t-8gb-ram-64mp-camera-phone-price-dropped-by-rs-3000-know-new-sale-prices/#respond Tue, 02 Mar 2021 12:05:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10233 Xiaomi Mi 10T चे स्पेसिफिकेशन्स पाहता, यात 20:9 आस्पेक्ट रेशियो आणि 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाचा मोठा फुलएचडी+ डॉट डिस्प्ले देण्यात आला आहे.

The post 8GB रॅम आणि 64MP कॅमेरा असलेल्या Xiaomi Mi 10T ची किंमत 3000 रुपयांनी झाली कमी, लवकरच घ्या या संधीचा फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने गेल्यावर्षी ऑक्टोबर 2020 मध्ये आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Mi 10T भारतात लॉन्च केला होता. आता 91मोबाईल्सला ऑफलाइन सोर्सद्वारे माहिती मिळाली आहे कि कंपनीने या प्रीमियम स्मार्टफोनच्या किंमतीत 3,000 हजार रुपयांची कपात केली आहे. मार्केटमध्ये Xiaomi Mi 10 दोन वेगवेगळ्या वेरिएंट मध्ये येतो आणि दोन्ही वेरियंटची किंमतीत जवळपास 3 हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन कमी किंमतीत ऑनलाइन व ऑफलाइन विकत घेऊ शकतात. Mi 10T चा प्राईस कट मर्यादित कालावधीसाठी आहे. पुढे तुम्हाला फोनची नवीन किंमत आणि स्कीमसह डिवाइसच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देत आहोत. (xiaomi mi 10t 8gb ram 64mp camera phone price dropped by rs 3000 know new sale prices)

स्कीम काय आहे

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या स्कीममध्ये कंपनी मी10टी कमी किंमतीत 1 मार्च 2021 ते 15 मार्च 2021 पर्यंत 3,000 डिस्कॉउंटसह विकला जाईल. फोन तुम्ही ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्मवरून विकत घेता येईल.

हे देखील वाचा : 4 मार्चला एंट्री घेईल Xiaomi ची Redmi Note 10 सीरीज, लॉन्चच्याआधीच जाणून घ्या यातील वैशिष्ट्ये

नवीन किंमत

Xiaomi ने Mi 10T च्या लॉन्च किंमतीत 3,000 रुपयांची कपात केली आहे. मी 10टी चा 6 जीबी + 128 जीबी वेरिएंट 35,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण आता हा 32,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 8 जीबी + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 37,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण, कपातीनंतर फोन 34,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Mi 10T चे स्पेसिफिकेशन्स पाहता, यात 20:9 आस्पेक्ट रेशियो आणि 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाचा मोठा फुलएचडी+ डॉट डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले ट्रिपल कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 सह येतो. तसेच प्रोसेसिंगसाठी हँडसेटमध्ये 2.84गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर आहे.

हे देखील वाचा : मागवला होता Apple iPhone पण मिळाला Apple ज्यूस! जाणून घ्या काय आहे हे प्रकरण

फोटोग्राफीबद्दल बोलायचे तर फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये एफ/1.89 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX682 सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000एमएएचची दमदार बॅटरी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे. फोन अँड्रॉइड 10 वर चालतो आणि कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून फोन मध्ये 5 जी, 4 जी एलटीई, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.1, जीपीएस / ए-जीपीएस, एनएफसी, इंफ्रारेड (आईआर) आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे.

शाओमी मी 10टी व्हिडीओ

The post 8GB रॅम आणि 64MP कॅमेरा असलेल्या Xiaomi Mi 10T ची किंमत 3000 रुपयांनी झाली कमी, लवकरच घ्या या संधीचा फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10t-8gb-ram-64mp-camera-phone-price-dropped-by-rs-3000-know-new-sale-prices/feed/ 0
खुशखबर! 64MP कॅमेरा आणि 5,000एमएएच बॅटरी असलेला Mi 10T झाला खूप स्वस्त, जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/mi-10t-price-in-india-slashed-by-rs-3000-flipkart-sale/ https://www.91mobiles.com/marathi/mi-10t-price-in-india-slashed-by-rs-3000-flipkart-sale/#respond Thu, 28 Jan 2021 12:29:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9795 Xiaomi ने Mi 10T च्या लॉन्च किंमतीत 3,000 रुपयांची कपात केली आहे.

The post खुशखबर! 64MP कॅमेरा आणि 5,000एमएएच बॅटरी असलेला Mi 10T झाला खूप स्वस्त, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये शक्ती प्रदर्शन करत भारतात आपला 64एमपीचा कॅमेरा असलेला Mi 10T लॉन्च केला होता. पण, आता त्या युजर्ससाठी आनंदची बातमी आहे जे हा फोन विकत घेण्याचा विचार करत आहेत कारण मी 10टीच्या किंमतीत 3,000 रुपयांची कपात झाली आहे. कंपनीने लॉन्चच्या वेळी फोनची किंमत 35,999 रुपयांपासून सुरु केली होती.

नवीन किंमत

वर सांगितल्याप्रमाणे Xiaomi ने Mi 10T च्या लॉन्च किंमतीत 3,000 रुपयांची कपात केली आहे. मी 10टीचा 6 जीबी + 128 जीबी वेरिएंट 35,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण, आता हा 32,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच, या फोनचा 8 जीबी + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 37,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण, कपातीनंतर फोन 34,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा : Redmi Note 10 चा लॉन्च आला जवळ, Xiaomi अधिकाऱ्यांनी सीरीज केली टीज

Mi 10T Pro

इथून विकत घ्या फोन

विशेष म्हणजे कपात केल्याची कंपनीने अजूनतरी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही, पण हा फोन कमी किंमतीत Flipkart आणि Mi.com वरून विकत घेता येईल. मी 10टी कॉस्मिक ब्लॅक आणि लुनर सिल्वर कलर ऑप्शन मध्ये विकला जात आहे.

स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Mi 10T मध्ये 20:9 आस्पेक्ट रेशियो आणि 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.67 इंचाचा मोठा फुलएचडी+ डॉट डिस्प्ले देण्यात आला आहे. तर, स्क्रीन 144Hz रिफ्रेश रेट वर काम करते जी ट्रिपल कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.84गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर आहे.

हे देखील वाचा : Exclusive : Mi 11 आणि Redmi Note 10 सीरीज येत आहे भारतात, बघा Xiaomi चा संपूर्ण प्लान

Mi 10T Pro

फोटोग्राफीसाठी फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट आहे. शाओमी मी 10टी स्मार्टफोन मध्ये एफ/1.89 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX682 सेंसर आहे. तसेच या फोन मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा अल्ट्राक्लियर पंच-होल कॅमेरा देण्यात आला आहे.

पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5,000एमएएचची दमदार बॅटरी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे. फोनच्या छोट्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज आणि दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

शाओमी मी 10टी व्हिडीओ

The post खुशखबर! 64MP कॅमेरा आणि 5,000एमएएच बॅटरी असलेला Mi 10T झाला खूप स्वस्त, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mi-10t-price-in-india-slashed-by-rs-3000-flipkart-sale/feed/ 0
Xiaomi ने आणला पावरफुल फोन Redmi K30s, स्पेसिफिकेशन्स वर टाका एक नजर https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30s-launched-know-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30s-launched-know-price-specifications/#respond Tue, 27 Oct 2020 14:21:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8691 Redmi K0S चा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरीएंट कंपनीने RMB 2,599 (जवळपास 28,700 रुपये) मध्ये सादर केला आहे. तर याच्या 8GB + 256GB वेरिएंटची किंमत RMB 2,799 (जवळपास 30,900 रुपये) आहे.

The post Xiaomi ने आणला पावरफुल फोन Redmi K30s, स्पेसिफिकेशन्स वर टाका एक नजर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने आपल्या घरच्या मार्केट मध्ये Redmi K30S ऑफिशियली सादर केला आहे. हा स्मार्टफोन Mi 10T चा रीब्रँडेड वर्जन असेल असे समजले आहे. रेडमी के30एस मध्ये कंपनीने 144 हर्ट्ज डिस्प्ले, स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर, 5000mAh बॅटरी आणि 33 वाट फास्ट-चार्जिंग सपॉर्ट सारखे फीचर्स दिले आहेत. चला जाणून या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स बाबत सर्वकाही.

दमदार कॅमेरा

कॅमेरा पाहता यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोन 64 मेगापिक्सल प्राइमरी, 13 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड आणि 5 मेगापिक्सल मॅक्रो सेंसर सह येईल. फोन मध्ये सेल्फी आणि विडियो चॅटसाठी 20 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला जाईल.

डिस्प्ले

रेडमी के30एस चे स्पेसिफिकेशन्स Mi 10T सारखेच आहेत. यात 6.67 इंचाचा फुल एचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144 हर्ट्ज आहे. तसेच स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आली आहे. यात पंच-होल कटआउट पण देण्यात आला आहे.

हार्डवेयर

हैंडसेट मध्ये स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी अड्रेनो 650 जीपीयू दिला जाईल. फोन मध्ये 8 जीबी पर्यंत रॅम व 256 जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज होगी. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. फोन अँड्रॉइड 10 बेस्ड MIUI 12 कस्टम स्किन सह लॉन्च केला गेला आहे.

कनेक्टिविटी आणि बॅटरी

या फोन मध्ये साइडला फिंगरप्रिंट सेंसर असेल. हँडसेट फेस अनलॉक फीचर सह आला आहे. कनेक्टिविटीसाठी फोन मध्ये 5जी सपॉर्ट, 4जी एलटीई, ड्यूल-बॅंड वाय-फाई, ब्लूटूथ 5.1, जीपीएस आणि चार्जिंग व डेटा सिंकसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. हँडसेटला पावर देण्यासाठी 5000mAh बॅटरी आहे जी 33 वॉट फास्ट-चार्जिंगला सपॉर्ट करेल.

हे देखील वाचा : 9,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे पावरफुल Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोन, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी

किंमत

Redmi K0S चा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरीएंट कंपनीने RMB 2,599 (जवळपास 28,700 रुपये) मध्ये सादर केला आहे. तर याच्या 8GB + 256GB वेरिएंटची किंमत RMB 2,799 (जवळपास 30,900 रुपये) आहे. इंट्रोडक्टरी ऑफर मध्ये दोन्ही रॅम व स्टोरेज वेरिएंटची किंमत RMB 2,299 (जवळपास 25,400 रुपये) आणि RMB 2,499 (जवळपास 27,600 रुपये) आहे. फोन 11 नोव्हेंबरला ब्लॅक आणि मून लाइट सिल्वर कलर मध्ये येईल.

The post Xiaomi ने आणला पावरफुल फोन Redmi K30s, स्पेसिफिकेशन्स वर टाका एक नजर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30s-launched-know-price-specifications/feed/ 0
Xiaomi ने केले शक्ती प्रदर्शन, भारतात लॉन्च झाले पावरफुल Xiaomi Mi 10T आणि Mi 10T Pro 5G स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10t-pro-officially-launched-in-india-features-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10t-pro-officially-launched-in-india-features-specs-price-sale-offer/#respond Thu, 15 Oct 2020 13:26:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8530 Xiaomi Mi 10T आणि Xiaomi Mi 10T Pro हे दोन्ही स्मार्टफोन भारतात मोठ्या बॅटरी सह लॉन्च झाले आहेत.

The post Xiaomi ने केले शक्ती प्रदर्शन, भारतात लॉन्च झाले पावरफुल Xiaomi Mi 10T आणि Mi 10T Pro 5G स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने गेल्या महिन्यात अंर्तराष्ट्रीय मंचावर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत ‘मी 10टी’ सीरीज सादर केली होती. 30 सप्टेंबरला हि सीरीज यूरोपियन मार्केट मध्ये आली होती, त्यानंतर भारतीय मी फॅन्स हि सीरीज भारतात येण्याची वाट बघत होते. आज आपल्या फॅन्सची मागणी पूर्ण करत आणि भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत Xiaomi ने Mi 10T सीरीज भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने या सीरीज अंतगर्त Xiaomi Mi 10T आणि Xiaomi Mi 10T Pro स्मार्टफोन जोडले आहेत जे 5G कनेक्टिविटीला सपोर्ट करतात.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Mi 10T आणि Mi 10T Pro कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केले आहेत जे 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डॉट डिस्प्लेला सपोर्ट करतात. या दोन्ही फोन्सची स्क्रीन 144Hz रिफ्रेश रेट वर चालते जो ट्रिपल कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. हा डिस्प्ले 1500:1 कान्ट्रॉस्ट रेशियो, 650 nits मॅक्सिमम ब्राइटनेस आणि HDR10 सारख्या फीचर्स सह येतो तसेच शाओमीने या दोन्ही स्मार्टफोन्स रिडिंग मोड 3.0 तसेच सनलाईट डिस्प्ले 3.0 सह येतात.

शाओमी मी 10टी सीरीजची दुसरी सर्वात मोठी यूएसपी आहे याचा कॅमेरा सेग्मेंट आहे. Xiaomi Mi 10T आणि Mi 10T Pro स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. शाओमीने मी 10टी प्रो 108 मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेरा लेंस सह लॉन्च केला आहे. हा Samsung HMX सेंसर आहे जो एफ/1.69 अपर्चरला सपोर्ट करतो. दुसरीकडे शाओमी मी 10टी स्मार्टफोन एफ/1.89 अपर्चर असलेल्या 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी Sony IMX682 सेंसरला सपोर्ट करतो.

या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. शाओमी मी 10टी प्रो चा रियर कॅमेरा 30x पर्यंत तसेच मी 10टी स्मार्टफोन 10x पर्यंत डिजीटल जूमला सपोर्ट करतो. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा अल्ट्राक्लियर पंच-होल कॅमेरा देण्यात आला आहे. हा एक Samsung S5K3T2 सेंसर आहे.

Xiaomi Mi 10T आणि Mi 10T Pro स्मार्टफोन अँड्रॉइडच्या सर्वात नवीन ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 11 वर लॉन्च केले गेले आहेत जे मीयूआई 12 सह चालतात. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोन्स मध्ये 2.84गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसर सह 7नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर बनलेला क्वॉलकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 आहे. हा चिपसेट X55 मॉडम सह येतो जो 5G नेटवर्कला सपोर्ट करतो. तसेच ग्राफिक्ससाठी फोन मध्ये एड्रेनो 650 जीपीयू देण्यात आला आहे.

Xiaomi Mi 10T मार्केट मध्ये दोन वेरिएंट्स मध्ये आला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Xiaomi Mi 10T Pro ने पण भारतीय बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये एंट्री केली आहे. Xiaomi Mi 10T Pro ने पण भारतीय बाजारात एकाच वेरिएंट मध्ये एंट्री घेतली आहे. मी 10टी प्रो 8 जीबी रॅमला सपोर्ट करतो त्यासोबतच 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हे दोन्ही डिवाईस LPDDR5 RAM आणि UFS 3.1 फ्लॅश स्टोरेजला सपोर्ट करतात.

Xiaomi Mi 10T आणि Xiaomi Mi 10T Pro हे दोन्ही स्मार्टफोन भारतात मोठ्या बॅटरी सह लॉन्च झाले आहेत. शाओमीने आपले फोन्स 5,000एमएएच च्या दमदार बॅटरी सह सादर केले आहेत. मी 10टी आणि मी 10टी प्रो दोन्ही स्मार्टफोन्सची बॅटरी चार्जर आणि वायरलेस दोन्ही पद्धतीने चार्ज केला जाऊ शकतात. मोठी बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी फोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येतो. चांगली बाब अशी आहे कि 33W fast charger रिटेल बॉक्स मध्ये मिळतो.

किंमत

Xiaomi Mi 10T चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेला बेस वेरिएंट 35,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच फोनच्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटने 37,999 रुपयांमध्ये बाजारात एंट्री घेतली आहे.

Xiaomi Mi 10T Pro स्मार्टफोन कंपनीने 39,999 रुपयांमध्ये भारतात लॉन्च केला आहे, जो 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. हे दोन्ही फोन आज पासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाले आहेत जे शॉपिंग साइट फ्लिपकार्ट आणि शाओमी अधिकृत स्टोर्स वर Cosmic Black आणि Lunar Silver कलर मध्ये विकत घेता येतील.

The post Xiaomi ने केले शक्ती प्रदर्शन, भारतात लॉन्च झाले पावरफुल Xiaomi Mi 10T आणि Mi 10T Pro 5G स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10t-pro-officially-launched-in-india-features-specs-price-sale-offer/feed/ 0
Xiaomi चा पावरफुल फोन Mi 10T Lite पण येत आहे भारतात, वेबसाइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10t-lite-listed-on-bluetooth-sig-india-launch/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10t-lite-listed-on-bluetooth-sig-india-launch/#respond Mon, 05 Oct 2020 14:21:37 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8398 फोन M2007J17I मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे खास बाबा अशी कि वेबसाइट वर फक्त मॉडेल नंबरच नाही तर फोनचे नाव Mi 10T Lite पण लिहिण्यात आले आहे.

The post Xiaomi चा पावरफुल फोन Mi 10T Lite पण येत आहे भारतात, वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने गेल्या 30 सप्टेंबरला टेक मंचावर आपली नवीन ‘मी 10टी’ सीरीज सादर केली होती. कंपनीने या सीरीज अंतर्गत Xiaomi Mi 10T, Xiaomi Mi 10T Pro आणि Xiaomi Mi 10T Lite स्मार्टफोन लॉन्च केले होते. यूरोपियन मार्केट मध्ये सीरीज लॉन्च झाल्यानंतर शाओमी इंडियाने ट्वीट केले होते कि शाओमी मी 10टी सीरीज भारतात पण लॉन्च होईल. तसेच आता या सीरीजचा शाओमी मी 10टी लाइट स्मार्टफोन इंडियन सर्टिफिकेशन्स साइट वर पण लिस्ट झाला आहे.

Xiaomi Mi 10T Lite स्मार्टफोन सध्या ब्लूटूथ एसआईजी अथॉरिटी वर स्पॉट केला गेला आहे. हि लिस्टिंग आज म्हणजे 5 ऑक्टोबरची आहे इथे मी 10टी लाइटच्या ग्लोबल वर्जन सोबतच इंडियन वर्जन पण लिस्ट केला गेला आहे. या सर्टिफिकेशन मध्ये फोन M2007J17I मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे खास बाबा अशी कि वेबसाइट वर फक्त मॉडेल नंबरच नाही तर फोनचे नाव Mi 10T Lite पण लिहिण्यात आले आहे. या लिस्टिंग वरून स्पष्ट झाले आहे कि Mi 10T आणि Mi 10T Pro सह शाओमी Mi 10T Lite पण भारतात लॉन्च करेल.

Xiaomi Mi 10T Lite

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च केला गेला आहे जो 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्टेड आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. अँड्रॉइड 10 आधारित मीयूआई 12 सह हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 750G चिपसेट वर रन करतो.

Xiaomi Mi 10T Lite क्वाड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 13 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा फोन 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेल्या 4,820एमएएच च्या बॅटरी सह लॉन्च केला गेला आहेत.

शाओमी मी 10टी लाइट यूरोप मध्ये दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे त्याची किंमत EUR 279 म्हणजे जवळपास 24,000 रुपये आहे. तर दुसरा वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत EUR 329 म्हणजे जवळपास 28,300 रुपये आहे. आशा आहे कि भारतात पण हा फोन याच स्पेसिफिकेशन्स सह लॉन्च होईल.

The post Xiaomi चा पावरफुल फोन Mi 10T Lite पण येत आहे भारतात, वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10t-lite-listed-on-bluetooth-sig-india-launch/feed/ 0
30 सप्टेंबरला Xiaomi करेल मी 10टी सीरीज सादर, लॉन्च होऊ शकतात Mi 10T, Mi 10T Lite आणि Mi 10T Pro https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10t-pro-and-lite-to-be-launched-on-30-september-know-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10t-pro-and-lite-to-be-launched-on-30-september-know-specs-price/#respond Thu, 24 Sep 2020 16:43:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8304 सीरीज अंतर्गत Mi 10T, Mi 10T Lite आणि Mi 10T Pro स्मार्टफोन लॉन्च केले जातील.

The post 30 सप्टेंबरला Xiaomi करेल मी 10टी सीरीज सादर, लॉन्च होऊ शकतात Mi 10T, Mi 10T Lite आणि Mi 10T Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi बद्दल गेल्या महिन्यात बातमी आली होती कि कंपनी टेक मार्केट मध्ये आपली ‘मी 10टी सीरीज’ आणण्याची योजना बनवत आहे आणि या सीरीजचे स्मार्टफोन भारतीय बाजारात पण येऊ शकतात. आता शाओमीने अधिकृतपणे मी 10टी सीरीजची घोषणा करत सांगितले आहे कि कंपनी येत्या 30 सप्टेंबरला आपली नवीन सीरीज जगासमोर सादर करेल. चर्चा आहे कि या सीरीज अंतर्गत Mi 10T, Mi 10T Lite आणि Mi 10T Pro स्मार्टफोन लॉन्च केले जातील.

शाओमीच्या घोषणेनुसार येत्या 30 सप्टेंबरला कंपनी एका ऑनलाईन ईवेंटचे आयोजन करेल ज्याच्या मंचावरून मी 10टी सीरीज सादर केली जाईल. हा ईवेंट भारतात संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल जो लाईव बघता येईल. कंपनीने आतापर्यंत सीरीज मधील फोन्सची नावे सांगितली नाहीत पण बोलले जात आहे कि 30 सप्टेंबरला Xiaomi Mi 10T, Mi 10T Lite आणि Mi 10T Pro लॉन्च केले जातील. चर्चा अशी आहे कि शाओमी हे फोन्स नंतर भारतात पण लॉन्च करेल.

144Hz डिस्प्ले

Xiaomi Mi 10T Pro चे फोटो आणि स्पेसिफिकेशन्स आधीच इंटरनेट वर लीक झाले आहेत. यात सांगण्यात आले आहे कि हा फोन 144हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल जो एलसीडी पॅनल वर बनलेला असेल. विशेष म्हणजे अलीकडेच लॉन्च झालेल्या Mi 10 Ultra मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालणारा 6.67 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला होता. या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला होता तर मी 10टी प्रो मध्ये साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर असेल.

प्रोसेसर

लीकनुसार Xiaomi Mi 10T आणि Mi 10T Pro स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल स्नॅपड्रॅगॉन 865+ चिपसेट वर लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे या चिपसेट सोबतच या स्मार्टफोन्स मध्ये 5G कनेक्टिविटी सपोर्ट पण मिळेल. लीक मध्ये शाओमी मी 10टी प्रो मध्ये 8 जीबी रॅम असल्याचे समोर आले आहे.

पावरफुल कॅमेरा

समोर आलेल्या फोटो मध्ये फोनचा रियर कॅमेरा सेटअप बऱ्याच अंशी गिंबल सारख्या स्टेबलाइजेशन टेक्नॉलॉजी वर लॉन्च झालेल्या Vivo X50 Pro सारखा वाटत आहे. कदाचित मी 10टी प्रो पण अश्याच फीचर सह मार्केट मध्ये येईल. लीकनुसार या फोन मध्ये प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर 108 मेगापिक्सलचा असेल. Xiaomi Mi 10T मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा असल्याचे सांगण्यात आले आहे.

5,000एमएएच बॅटरी

शाओमी मी 10टी प्रो 5,000एमएएच बॅटरी वर लॉन्च केला जाऊ शकतो ज्या सोबत फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी पण असेल. विशेष म्हणजे मी10 अल्ट्रा शाओमीने 120वॉट फास्ट चार्जिंग सह लॉन्च केला होता जो 50वॉट फास्ट वायरलेस चार्जिंगला पण सपोर्ट करतो. या फोन मध्ये रिवर्स वायरलेस चार्जिंग फीचर पण देण्यात आला आहे जो 10वॉट स्पीड वर चालतो. हे पाहता असे म्हणता येईल कि Xiaomi Mi 10T Pro मध्ये पण वायरलेस चार्जिंग मिळेल. ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी फोन लॉन्चची वाट बघावी लागेल.

The post 30 सप्टेंबरला Xiaomi करेल मी 10टी सीरीज सादर, लॉन्च होऊ शकतात Mi 10T, Mi 10T Lite आणि Mi 10T Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10t-pro-and-lite-to-be-launched-on-30-september-know-specs-price/feed/ 0
Xiaomi Mi 10T Pro येत आहे भारतात, स्पेसिफिकेशन्स आले समोर, किंमत असेल 35,000 रुपयांच्या आसपास https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10t-pro-price-could-be-rs-35000-in-india-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10t-pro-price-could-be-rs-35000-in-india-specs-leaked/#respond Mon, 31 Aug 2020 14:09:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7928 Xiaomi भारतीय बाजारात आपल्या ‘मी 10 सीरीज’ चा विस्तार करणार आहे ज्या अंतर्गत Mi 10T आणि Mi 10T Pro स्मार्टफोन्स लॉन्च केले जातील.

The post Xiaomi Mi 10T Pro येत आहे भारतात, स्पेसिफिकेशन्स आले समोर, किंमत असेल 35,000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi भारतीय बाजारात आपल्या ‘मी 10 सीरीज’ चा विस्तार करणार आहे ज्या अंतर्गत Mi 10T आणि Mi 10T Pro स्मार्टफोन्स लॉन्च केले जातील. गेल्या आठवड्यात मी 10टी प्रो स्मार्टफोनचे अनेक महत्वाचे स्पेसिफिकशन्स लीकच्या माध्यमातून समोर आले होते, ज्यात समजले होते कि हा एक फ्लॅगशिप फोन असेल जो हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह लॉन्च केला जाईल. आता या स्मार्टफोन संबंधित अजून एक मोठा लीक समोर आला आहे ज्यात फोनच्या किंमतीचा खुलासा केला गेला आहे.

Xiaomi Mi 10T Pro संबंधित हा लीक टिपस्टर ईशान अग्रवालने शेयर केला आहे. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि शाअेामी मी 10टी सीरीजची किंमत 35,000 रुपयांच्या आसपास असेल. पण लीक मध्ये स्पष्ट करण्यात आले नाही कि हि किंमत Mi 10T स्मार्टफोनची असेल कि Mi 10T Pro ची. रिपोर्ट मध्ये बोलले जात आहे कि 35 हजार हि किंमत शाओमी मी 10टी प्रो ची असू शकते. हि सीरीजची मॅक्सिमम किंमत असू शकते तसेच इतर मॉडेल्सची किंमत यापेक्षा कमी असू शकते. मी 10टी प्रो चे फोटो आणि स्पेसिफिकेशन्स आधीच इंटरनेट वर लीक झाले आहेत.

पावरफुल कॅमेरा

Xiaomi Mi 10T Pro च्या फोटो मध्ये फोनचा रियर कॅमेरा सेटअप मोठ्या प्रमाणावर गिंबल सारख्या स्टेबलाइजेशन टेक्नॉलॉजीवर लॉन्च झालेल्या Vivo X50 Pro सारखा दिसत आहे. कदाचित मी 10टी प्रो पण अश्याच फीचर सह मार्केट मध्ये येईल. लीक पाहता या फोन मध्ये प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर 108 मेगापिक्सलचा दिला जाऊ शकतो. Xiaomi Mi 10T मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा असल्याचे बोलले जात आहे.

प्रोसेसर

लीकनुसार Xiaomi Mi 10T आणि Mi 10T Pro स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल स्नॅपड्रॅगॉन 865+ चिपसेट वर लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे या चिपसेट सोबत या स्मार्टफोन्स मध्ये 5G कनेक्टिविटी सपोर्ट पण मिळेल. तसेच लीक मध्ये शाओमी मी 10टी प्रो मध्ये 8 जीबी रॅम असल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही मॉडेल एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये लॉन्च होतील ज्यात अजून जास्त रॅम असेल याची शक्यता नाकारता येत नाही.

144Hz असलेला डिस्प्ले

Xiaomi Mi 10T Pro बाबत सांगण्यात आले आहे कि हा फोन 144हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल जो एलसीडी पॅनल वर बनला असेल. विशेष म्हणजे अलीकडेच लॉन्च झालेल्या Mi 10 Ultra मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालणारा 6.67 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला होता. या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला होता तर मी 10टी प्रो मध्ये साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर असण्याची शक्यता आहे.

5,000एमएएच बॅटरी

शाओमी मी 10टी प्रो 5,000एमएएच च्या बॅटरी वर लॉन्च केला जाऊ शकतो ज्या सोबत फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असेल. मी10 अल्ट्रा शाओमीने 120वॉट फास्ट चार्जिंग सह लॉन्च केला होता जो 50वॉट फास्ट वायरलेस चार्जिंगला पण सपोर्ट करतो. या फोन मध्ये रिवर्स वायरलेस चार्जिंग फीचर पण देण्यात आला आहे जो 10वॉट स्पीडने चालतो. त्यामुळे आशा आहे कि Xiaomi Mi 10T Pro मध्ये पण वायरलेस चार्जिंग असेल. असे असले तर Xiaomi Mi 10T आणि Mi 10T Pro च्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी फोन लॉन्चची वाट बघावी लागेल.

The post Xiaomi Mi 10T Pro येत आहे भारतात, स्पेसिफिकेशन्स आले समोर, किंमत असेल 35,000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10t-pro-price-could-be-rs-35000-in-india-specs-leaked/feed/ 0