Xiaomi चा पावरफुल फोन Mi 10T Lite पण येत आहे भारतात, वेबसाइट वर झाला लिस्ट

Xiaomi ने गेल्या 30 सप्टेंबरला टेक मंचावर आपली नवीन ‘मी 10टी’ सीरीज सादर केली होती. कंपनीने या सीरीज अंतर्गत Xiaomi Mi 10T, Xiaomi Mi 10T Pro आणि Xiaomi Mi 10T Lite स्मार्टफोन लॉन्च केले होते. यूरोपियन मार्केट मध्ये सीरीज लॉन्च झाल्यानंतर शाओमी इंडियाने ट्वीट केले होते कि शाओमी मी 10टी सीरीज भारतात पण लॉन्च होईल. तसेच आता या सीरीजचा शाओमी मी 10टी लाइट स्मार्टफोन इंडियन सर्टिफिकेशन्स साइट वर पण लिस्ट झाला आहे.

Xiaomi Mi 10T Lite स्मार्टफोन सध्या ब्लूटूथ एसआईजी अथॉरिटी वर स्पॉट केला गेला आहे. हि लिस्टिंग आज म्हणजे 5 ऑक्टोबरची आहे इथे मी 10टी लाइटच्या ग्लोबल वर्जन सोबतच इंडियन वर्जन पण लिस्ट केला गेला आहे. या सर्टिफिकेशन मध्ये फोन M2007J17I मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे खास बाबा अशी कि वेबसाइट वर फक्त मॉडेल नंबरच नाही तर फोनचे नाव Mi 10T Lite पण लिहिण्यात आले आहे. या लिस्टिंग वरून स्पष्ट झाले आहे कि Mi 10T आणि Mi 10T Pro सह शाओमी Mi 10T Lite पण भारतात लॉन्च करेल.

Xiaomi Mi 10T Lite

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च केला गेला आहे जो 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्टेड आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. अँड्रॉइड 10 आधारित मीयूआई 12 सह हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 750G चिपसेट वर रन करतो.

Xiaomi Mi 10T Lite क्वाड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 13 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा फोन 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेल्या 4,820एमएएच च्या बॅटरी सह लॉन्च केला गेला आहेत.

शाओमी मी 10टी लाइट यूरोप मध्ये दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे त्याची किंमत EUR 279 म्हणजे जवळपास 24,000 रुपये आहे. तर दुसरा वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत EUR 329 म्हणजे जवळपास 28,300 रुपये आहे. आशा आहे कि भारतात पण हा फोन याच स्पेसिफिकेशन्स सह लॉन्च होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here