टेक्नोचे Fold आणि Flip 2 लवकर होऊ शकतात लाँच, सर्टिफिकेशन साईटवर दिसले दोन्ही स्मार्टफोन

टेक्नोने आतापर्यंत भारतीय बाजारात दोन फोल्ड होणारे स्मार्टफोन सादर केले आहेत. ज्यात एक फोल्ड आणि एक फ्लिपचा समावेश आहे. तसेच, आता बातमी येत आहे की याचे अपग्रेड व्हर्जन Tecno Phantom V Fold 2 आणि Tecno Phantom V Flip 2 फोन लवकर बाजारात येऊ शकतात. तसेच हे EEC लिस्टिंग प्लॅटफॉर्मवर नावाने पाहिले गेले आहेत. ज्यावरून असे वाटत आहे की येत्या काही दिवसांमध्ये ब्रँड फोनची घोषणा करू शकतो. चला, पुढे माहिती सविस्तार जाणून घेऊया.

Tecno Phantom V Fold 2 आणि Tecno Phantom V Flip 2 लिस्टिंग

  • तुम्ही खाली दिलेल्या स्क्रीनशॉट लिस्टिंग फोटोमध्ये पाहू शकता की टेक्नो फँटम वी फोल्ड 2 5G AE10 मॉडेल नंबरसह दिसला आहे तर टेक्नो फँटम वी फ्लिप 2 5G AE11 मॉडेल नंबरसह दिसून आला आहे.
  • मॉडेल नंबर सोबत लिस्टिंग फोटोमध्ये फोनचे नाव पण दिसून येत आहे.
  • तसेच EEC प्लॅटफॉर्मवर मॉडेल नंबर आणि नावाव्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती समोर आलेली नाही, परंतु ही या गोष्टीचे संकेत आहेत की डिव्हाईस लवकर बाजारात येऊ शकतो.

Tecno Phantom V Fold चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: फोनचा प्रायमरी डिस्प्ले 2k 7.65 इंचाचा आहे. यावर 2296 x 2000 पिक्सल रिजॉल्यूशन आणि एलटीपीओ अ‍ॅमोलेड टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. तर फोल्ड झाल्यावर आऊटर स्क्रीन अ‍ॅमोलेड 6.42 इंचाची आहे यावर फुलएचडी+ 1080 x 2550 पिक्सल रिजॉल्यूशन मिळते. दोन्ही पॅनलवर 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट देण्यात आला आहे.
  • प्रोसेसर: टेक्नो फँटम वी फोल्डला पावर देण्यासाठी यात MediaTek Dimensity 9000+ 5G चिपसेट देण्यात आली आहे.
  • स्टोरेज: हा फोल्ड फोन 12GB रॅम + 256GB इंटरनल स्टोरेजसह ठेवण्यात आला आहे.
  • कॅमेरा: Tecno Phantom V Fold मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी सेन्सर, 13MP अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि 50MP पोर्ट्रेट लेन्स लावण्यात आली आहे. तसेच, सेल्फीसाठी आऊटर डिस्प्लेवर 32MP कॅमेरा आणि 16MP कॅमेरा डिव्हाईस प्रायमरी डिस्प्लेवर मिळतो.
  • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत फोनमध्ये 5,000 एमएएच बॅटरी आणि 45 वॉट फास्ट चार्जिग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
  • ओएस: सॉफ्टवेअरनुसार टेक्नो फँटम वी फोल्ड अँड्रॉईड 13 वर आधारित HiOS वर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here