कोणीही वाचू शकणार नाही तुमचं खाजगी चॅटिंग; WhatsApp मध्ये आलं नवीन सिक्योरिटी फीचर

Highlights

  • WhatsApp नं नवीन चॅट लॉक फीचर रोलआउट केलं आहे.
  • या फीचरच्या माध्यमातून युजर प्रायव्हेट चॅट लॉक करू शकतील.
  • युजर्सना नवीन फीचरमध्ये खाजगी चॅट वेगळ्या फोल्डरमध्ये सेव्ह करता येतील.

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp नं आपल्या युजर्सच्या प्रायव्हसीसाठी नवीन चॅट लॉक फीचर रोलआउट केलं आहे. या नवीन फीचरच्या माध्यमातून युजर प्रायव्हेट चॅट पासवर्डनं लॉक करू शकतील. तसेच युजर्सना खाजगी चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी वेगळ्या फोल्डरमध्ये करता येतील. चॅट लॉक फीचरमुळे युजरचं चॅटिंग सुरक्षित राहील आणि इतर कोणीही लॉक चॅट्स वाचू शकणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक फिचर

मेटा सीईओ मार्क जुकरबर्ग यांनी म्हटलं आहे की चॅट लॉक फीचरच्या माध्यमातून युजर्स खाजगी चॅट लॉक करण्यासाठी पासवर्ड वापरू शकतील. चॅट लपवण्यासाठी ती वेगळ्या फोल्डरमध्ये सेव्ह करता येईल. हे फीचर लॉक करण्यात आलेल्या चॅटमध्ये मेसेज आल्यावर युजर नेम देखील हाइड करतो. व्हॉट्सअ‍ॅपनुसार ही सुविधा प्रायव्हसी फीचरचा भाग आहे. याआधी युजर्सची प्रायव्हसी राखण्यासाठी डिसअपीयरिंग मेसेज आणि एन्ड-टू-एन्ड एन्सक्रिप्शन सारखे फीचर्स सादर करण्यात आले होते.

कधी मिळेल हे फीचर

कंपनीनं हे फीचर को रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांत चॅट लॉक फीचर सर्व स्टेबल अँड्रॉइड आणि आयफोन युजर्सना मिळण्यास सुरुवात होईल. हे देखील वाचा: Tata बनवणार आगामी iPhone 15 आणि iPhone 15 Plus, रिपोर्टमधून झाला खुलासा

चॅट लॉक फीचरचा वापर

  • नवीन फीचरचा वापर करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा लेटेस्ट अपडेट डाउनलोड करा.
  • मेसेजिंग अ‍ॅप ओपन करा.
  • आता त्या चॅटवर जा, जी तुम्हाला लॉक करायची आहे.
  • त्या चॅटच्या प्रोफाईल पिक्चरवर टॅप करा.
  • तुम्हाला डिसअपीयरिंग मेसेजच्या खाली नवीन चॅट लॉक फीचर दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • इथे तुम्ही खाजगी चॅट लॉक करू शकाल.

हे देखील वाचा: YouTube Shorts अँड्रॉइड, आयफोन आणि कंप्यूटरवर कसे करायचे डाउनलोड, जाणून घ्या पद्धत

चॅट अनलॉक करण्यासाठी फॉलो करा पुढील स्टेप्स

  • व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा.
  • होम पेजवर जा.
  • लॉक चॅट ओपन करण्यासाठी खाली स्क्रॉल करा.
  • त्या चॅटवर क्लिक करा, जी तुम्हाला ओपन करायची आहे.
  • त्यानंतर तुमचा फोन पासवर्ड टाका.
  • आता चॅट अनलॉक होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here