YouTube Shorts अँड्रॉइड, आयफोन आणि कंप्यूटरवर कसे करायचे डाउनलोड, जाणून घ्या पद्धत

सध्या लोक YouTube Shorts ला जास्त पसंती देत आहेत. हे शॉर्ट्स व्हिडीओ मजेदार आणि छोटे असतात. हे व्हिडीओ 60 सेकंद किंवा त्यापेक्षा छोटे असतात. हे देखील इन्स्टाग्राम रील्स प्रमाणेच बनवले जातात. तर तुम्हाला एखादा शॉर्ट्स व्हिडीओ आवडला असेल तर तो सहज डाउनलोड देखील करता येतो. चला जाणून घेऊया अँड्रॉइड, आयफोन आणि कंप्यूटरवर युट्युब शॉर्ट्स डाउनलोड करण्याची पद्धत.

युट्युब शॉर्ट्स अँड्रॉइड फोनवर कसे डाउनलोड करायचे?

जर तुमच्याकडे Android डिवाइस असेल तर तुम्ही खालील स्टेप फॉलो करून सहज युट्युब शॉर्ट्स डाउनलोड करू शकता :

  • युट्युब शॉर्ट्स डाउनलोड करण्यासाठी तुमच्या Android डिवाइसवर YouTube अ‍ॅप ओपन करा.
  • त्यानंतर तो युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ सर्च करा, जो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे.
  • त्या व्हिडीओच्या खाली दिलेल्या शेयर बटनवर टॅप करा. नंतर कॉपी लिंक ऑप्शनची निवड करा.
  • नंतर तुमच्या वेब ब्राउजर मध्ये https://ssyoutube.com/en79/youtube-video-downloader वेबसाइट उघडा.
  • आता तुम्ही ज्या युट्युब शॉर्ट्स व्हिडीओची लिंक कॉपी केली आहे, ती लिंक सर्च बॉक्समध्ये पेस्ट करा. त्यानंतर Download बटनवर टॅप करा.
  • इथे तुम्हाला व्हिडीओ रिजॉल्यूशन निवडण्याचा पर्याय मिळतो. त्यानंतर Download बटनवर टॅप करा. शॉर्ट्स व्हिडीओ तुमच्या अँड्रॉइड मोबाइलमध्ये डाउनलोड होईल, जो तुम्ही कधीही ऑफलाइन देखील पाहू शकता.

आयफोन वर युट्युब शॉर्ट्स कसे डाउनलोड करायचे?

जर तुम्ही आयफोनचा वापर करत असाल तर पुढील स्टेप्स वापरून सहज युट्युब शॉर्ट्स डाउनलोड करू शकता :

  • सर्वप्रथम तुमच्या आयफोनवर YouTube अ‍ॅप ओपन करा.
  • आता तो युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ सर्च करा, जो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे.
  • व्हिडीओच्या खाली दिलेल्या शेयर बटनवर टॅप करा.
  • शेयर मेन्यूमधून कॉपी लिंक ऑप्शनवर टॅप करा.
  • आता तुमच्या आयफोनवर सफारी अ‍ॅप ओपन करा.
  • इथे देखील तुम्हाला https://ssyoutube.com/en79/youtube-video-downloader वेबसाइट ओपन करावी लागेल.
  • त्यानंतर कॉपी केलेला URL डाउनलोड फील्डमध्ये पेस्ट करा आणि डाउनलोड बटनवर टॅप करा.
  • व्हिडीओ क्वॉलिटी करून सिलेक्ट करा आणि डाउनलोड बटन वर टॅप करा. अशाप्रकारे तुम्ही आयफोनवर युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ डाउनलोड करू शकाल.

कंप्यूटरवर युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ कसे डाउनलोड करायचे?

जर तुम्हाला तुमच्या कंप्यूटरवर YouTube Shorts डाउनलोड करायचे असतील तर पुढील स्टेप फॉलो करा:

  • सर्वप्रथम तुमच्या कंप्यूटरवर YouTube वेबसाइट ओपन करा.
  • आता तुम्हाला आवडलेला YouTube शॉर्ट्स व्हिडीओ सर्च करा
  • त्यानंतर तो शॉर्ट्स व्हिडीओ ओपन करून व्हिडीओ लिंक कॉपी करा.
  • तुमच्या ब्राउजरमध्ये YouTube डाउनलोडर वेबसाइट ओपन करा.
  • URL च्या सर्च बॉक्समध्ये कॉपी केलेली लिंक पेस्ट करा आणि डाउनलोड बटनवर टॅप करा.
  • व्हिडीओची क्वॉलिटी सिलेक्ट करा आणि डाउनलोड बटनवर क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here