Xiaomi 13 Pro च्या भारतीय लाँचची तारीख ठरली; 26 फेब्रुवारीला येणार देशात

Highlights

  • Xiaomi 13 Pro 26 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल.
  • या फोन सोबतच Xiaomi 13 ची एंट्री देखील होऊ शकते.
  • हे दोन्ही फ्लॅगशिप शाओमी फोन हायएन्ड स्पेसिफिकेशन्ससह येतील.

शाओमी आपल्या रेडमी ब्रँड अंतर्गत बरेच स्मार्टफोन सादर करत असते, परंतु शाओमी ब्रँडचे फोन खूप कमी येतात. कंपनीनं ही ब्रॅंडिंग प्रीमियम स्मार्टफोन्ससाठी राखून ठेवली आहे. असेच दोन प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन कंपनीनं गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro नावानं चीनमध्ये सादर केले होते. आता कंपनीनं घोषणा केली आहे की येत्या 26 फेब्रुवारीला शाओमी 13 प्रो भारतात लाँच केला जाईल. त्याचबरोबर शाओमी 13 देखील भारतीय बाजारात येण्याची शक्यता आहे.

Xiaomi 13 Pro लाँच डेट

शाओमी इंडियानं घोषणा केली आहे की कंपनी येत्या 26 फेब्रुवारीला भारतात आपला नवीन फ्लॅगशिप फोन Xiaomi 13 Pro लाँच करेल. या फोनसह Xiaomi 13 देखील भारतीय बाजारात सादर केला जाऊ शकतो. हा लाँच इव्हेंट 26 फेब्रुवारीला रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल जो कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व युट्युब चॅनेलवर लाइव्ह बघता येईल. हे देखील वाचा: अबब! तब्बल दीड महिने टिकणार बॅटरी; 6 हजारांच्या बजेटमध्ये MOTO E13 भारतात लाँच

Xiaomi 13 Pro च्या चिनी मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.73″ QHD+ AMOLED
  • 12GB RAM + 512GB Storage
  • 50MP+50MP+50MP Rear Camera
  • Qualcomm Snapdragon 8 Gen 2
  • 120W Fast Charging
  • 50W Wireless Charging

Xiaomi 13 Pro स्मार्टफोनमध्ये 6.73-इंचाचा 2K ओएलईडी डिस्प्ले आहे, जो 3200×1440 पिक्सल रिजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+ आणि 1900 नीट्स पीक ब्राइटनेससह आला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली Snapdragon 8 Gen 2 चिपसेटची ताकद दिली आहे आणि जोडीला Adreno GPU आहे. शाओमीच्या नव्या फ्लॅगशिपमध्ये 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची स्टोरेज मिळते. हा Android 13 आधारित MIUI 14 वर चालतो.

Xiaomi 13 Pro मध्ये थोडीसी मोठी 4,820mAh ची बॅटरी मिळते, जी 120W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.3, GPS, NFC आणि USB Type-C चा समावेश आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा, हाय-रेज ऑडिओ, X-axis linear motor आणि फोन गरम होऊ नये म्हणून व्हेपर चेंबर मिळतो. हे देखील वाचा: 30 दिवस वैधता असलेले Airtel चे बेस्ट रिचार्ज; कॉलिंग आणि डेटा अनलिमिटेड

फोटोग्राफीसाठी Xiaomi 13 Pro मध्ये Leica ब्रॅंडिंगसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा मुख्य कॅमेरा आहे जो मोबाइल कॅमेरा सेन्सरमधील सर्वात मोठा एक इंचाचा Sony IMX989 सेन्सर आहे. जोडीला 50MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP ची टेलीफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here