12जीबी रॅम असलेला Xiaomi चा Black Shark 2 येत आहे भारतात, वेबसाइट वर झाला लिस्ट

टेक कंपनी शाओमी इंडिया मध्ये नंबर वन स्मार्टफोन कंपनी बनली आहे. कमी किंमतीत चांगले स्पेसिफिकेशन्स दिल्यामुळे थोड्याच कालावधीत शाओमी इंडियन यूजर्सना आवडू लागली आणि आज भारतात शाओमीची फॅन फॉलोइंग इतर स्मार्टफोन ब्रँडस पेक्षा जास्त आहे. आपली हि लोकप्रियता वापरत आता शाओमी फक्त लो बजेट नाही तर हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन इंडियन बाजारात आणण्याची मोठी योजना बनवत आहे. शाओमी लवकरच भारतात आपला गेमिंग ब्रँड ब्लॅक शार्क अंतर्गत Black Shark 2 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

Black Shark 2 इंडिया लॉन्च
विशेष म्हणजे Black Shark 2 च्या लॉन्चची माहिती Xiaomi कंपनीने दिली नाही. तर शाओमीचा हा दमदार स्मार्टफोन भारतातील सर्टिफिकेशन्स साइट Bureau of Indian Standards म्हणजे बीआईएस वर दिसला आहे. BIS ची हि लिस्टिंग काल म्हणजे 6 मे ची आहे तिथे Black Shark 2 SKW-HO मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. या लिस्टिंगमुळे स्पष्ट झाले आहे कि शाओमी लवकरच Black Shark 2 इंडियन बाजारात आणणार आहे.

BIS ची हि लिस्टिंग एमएसपी वेबसाइट ने स्पॉट केली आहे. या लिस्टिंग मध्ये Black Shark 2 च्या मॉडेल नंबर व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती मिळाली नाही पण मीडिया रिर्पोट्स नुसार शाओमी या फोनचा टॉपएंड वेरिएंटच भारतात लॉन्च करेल ज्यात 12जीबी चा पावरफुल रॅम असेल. आशा आहे कि पुढल्या महिन्यात शाओमी Black Shark 2 अधिकृतपणे इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करेल.

हे देखील वाचा: 5 रियर कॅमेरा असलेला जगातील पहिला फोन Nokia 9 होईल भारतात लॉन्च, सर्टिफिकेशन साइट वर झाला लिस्ट

बनला आहे खास गेमिंग साठी
विशेष म्हणजे शाओमी ने मार्च मध्ये हा स्मार्टफोन टेक मंचावर सादर केला होता जो सध्या चीनी बाजारात सेल साठी उपलब्ध आहे. कंपनीने Black Shark 2 गेमिंग स्मार्टफोन म्हणून सादर केला होता जो खासकरून फोन मध्ये गेम खेळणाऱ्या यूजर साठी बनला आहे. हेवी रॅम आणि क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट सह या फोन मध्ये हीट मॅनेजमेंट साठी लिक्विड कूल 3.0 टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. जी यूजर्सना फास्ट आणि लॅग फ्री गेमिंग एक्सपीरियंस देते.

असे आहेत पावरफुल स्पेसिफिकेशन्स
Black Shark 2 मेटेलिक बॉडी वर बनला आहे. स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.39-इंचाच्या ट्रू व्यू ऐमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई सोबत या फोन मध्ये क्वालकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 आहे. तसेच गेमिंग एक्सपीरिएंस चांगला करण्यासाठी या फोन मध्ये एड्रेनो 640 जीपीयू चिप देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: रेडमी 7 ला मागे टाकण्यासाठी भारतात आला Nokia 4.2, शानदार फीचर्सच्या जीवावर करेल का नवीन रेकॉर्ड

Xiaomi ने हा फोन चीन मध्ये तीन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला होता. यात 6जीबी/128जीबी, 8जीबी/128जीबी स्टोरेज, 8जीबी/256जीबी मेमरी आणि 12जीबी/256जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंट होते. इंडिया मध्ये Black Shark 2 चा कोणता वेरिएंट येईल हे सांगता येणार नाही.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Black Shark 2 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 13-मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 20-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 27वॉट चार्जला सपॉर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here