5 रियर कॅमेरा असलेला जगातील पहिला फोन Nokia 9 होईल भारतात लॉन्च, सर्टिफिकेशन साइट वर झाला लिस्ट

nokia 9 pureview

HMD Global ने यावर्षी फेब्रुवारीत बार्सिलोना मध्ये आयोजित मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 मध्ये Nokia 9 PureView स्मार्टफोन सादर केला होता. या फोनची खासियत आहे कि हा आता पर्यंतचा 5 रियर कॅमेरा असलेला जगातील पहिला फोन आहे. आता हा फोन भारतात लॉन्च होण्यासाठी तयार आहे.

आता फोनला BIS (ब्यूरो ऑफ इंडियर स्टॅन्डर्ड) सर्टिफिकेशन मिळाले आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि 5 रियर कॅमेरा असलेला हा लवकरच भारतात लॉन्च केला जाईल. नवीन नोकिया फोनचा मॉडेल नंबर TA-1182 आहे, ज्याने वाई-फाई, ब्लूटूथ सर्टिफिकेशन पास केले आहे. या सर्टिफिकेशनची माहिती सर्वात आधी माएस्मार्टप्राइज वेबसाइट वर समोर आली होती. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात नोकिया मोबाईलच्या फेसबुक पेज वर एक विडियो टीजर पण शेयर केला गेला होता. या फोनची चीन मध्ये किंमत 5499 युआन (जवळपास 56,000 रुपए) आहे. पण भारतातील याच्या किंमतीची सध्या कोणतीही ऑफिशियल माहिती मिळाली नाही.

Nokia 9 Pureview चे स्पेसिफिकेशन्स
फोनचे अन्य स्पेसिफिकेशन्स पाहता Nokia 9 Pureview 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिजाईन वर सादर केला गेला आहे. हा फोन 5.99-इंचाच्या क्यूएचडी+ 2के पीओएलईडी डिस्प्लेला करतो. कंपनी ने Nokia 9 Pureview ची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर ने सुसज्ज करण्यात आला आहे जो फोन अनलॉकिंग साठी उपयोगी पडतो. कंपनी ने हा आईपी67 रेटिड बनवला आहे ज्यामुळे हा पाणी आणि धुळीपासून वाचतो.

हे देखील वाचा: रेडमी 7 ला मागे टाकण्यासाठी भारतात आला Nokia 4.2, शानदार फीचर्सच्या जीवावर करेलचा नवीन रेकॉर्ड

Nokia 9 Pureview कंपनीने 6जीबी रॅम सादर केला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे जो क्वालकॉमच्या फास्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 845 वर चालतो. Nokia 9 Pureview मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 3,320एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी वायरलेस चार्जिंग सह पण वापरता येते. Nokia 9 Pureview एचएमडी ग्लोबल ने 699 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 49,600 रुपयांच्या आसपास आहे.

Nokia 9 Pureview ची सर्वात मोठी ताकद फोनचा कॅमेरा सेटअपच आहे जो इतरांपेक्षा वेगळा आहे. Nokia 9 Pureview मध्ये सेल्फी साठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा डुअल टोन एलईडी फ्लॅश आहे तसेच चांगल्या फोटोग्राफ साठी यात शानदार ब्यूटी मोड तसेच फिल्टर्स देण्यात आले आहेत. या फोनच्या बॅक पॅनल वर पेंटा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 5 कॅमेरा सेंसर आहेत. Nokia 9 Pureview चे हे पाचही कॅमेरा कार्ल जेसिस चे आहेत ज्यामुळे फोटोग्राफ्स शानदार येतात. या फोनची खास बाब अशी कि हे पाचही कॅमेरा सेंसर कोणताही फोटो क्लिक करण्यासाठी एक साथ काम करतात तसेच प्रत्येक फोटो एचडीआर मोड वर कॅप्चर होतो.

हे देखील वाचा: चुकून गिळला AirPod, शौचालयात आला बाहेर. आता पण चालू आहेत गाणी!

Nokia 9 Pureview च्या कॅमेरा अनोख्या पद्धतीने चालतो. फोन मधील पाचही रियर कॅमेरा 12-मेगापिक्सलचे आहेत. यात दोन कॅमेरा सेंसर आरजीबी आहे तर इतर तीन मोनोक्रोम सेंसर आहेत. या पाचही कॅमेरा सेंसर्सचा अपर्चर एफ/1.8 आहे. कोणताही फोटो घेताना हे पाचही कॅमेरा एक साथ चालतील. पाचही सेंसर 5 वेगवेगळे फोटो कॅप्चर करतील आणि प्रोसेसिंग करून त्याचक्षणी 5 फोटो एकत्र करून एक फोटोचा आउटपुट देतील. हे फोटो हाईरेज्ल्यूशन वाले असतील, जे फोन मधेच एडिट पण करता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here