5G ची पावर, 4400mAh बॅटरी आणि 8GB रॅम असलेला शक्तिशाली फोन iQOO Z3 झाला लॉन्च

Vivo पासून वेगळा झालेला सब-ब्रँड iQOO अनेक दिवसांपासून बजेट स्मार्टफोन्सपासून हायएन्ड फ्लॅगशिप फोन सादर करत आहे. याअंतर्गत पुढे जात कंपनीने पुन्हा एकदा आपला नवीन फोन सादर केला आहे. यावेळी कंपनीने आपल्या Z-सीरीजमध्ये iQOO Z3 लॉन्च केला आहे. कंपनीने लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये पंचहोल डिस्प्ले, स्टीरियो स्पीकर्स आणि दमदार प्रोसेसर सपोर्ट दिला आहे. फोनने सध्या चीन टेक मार्केटमध्ये एंट्री केली आहे. भारतासह दुसऱ्या देशांमध्ये फोनच्या उप्लब्धतेबाबत सध्या कोणतीही बातमी समोर आली नाही. (iqoo z3 5g launched prices specifications)

iQOO Z3

हा स्मार्टफोन कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेवर सादर केला आहे. तसेच, iQOO Z3 मध्ये 6.58-इंचाचा FHD+ LCD 1080 x 2408 रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले आहे. इतकेच नव्हे तर या डिस्प्लेमध्ये एक्सट्रा फीचर्स म्हणून 120Hz रिफ्रेश रेट, 96 टक्के NTSC colour gamut आणि HDR सपोर्ट आहे. तसेच फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 768G प्रोसेसरसह येतो, ज्याबाबत कंपनीचा दावा आहे कि हि सिस्टम चिपसेट तापमान 10 .C पर्यंत कमी करते. त्याचबरोबर यात 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1टीबी पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा : OPPO ने लॉन्च केला कमी किंमत असलेला 5G स्मार्टफोन Reno 5 Lite, बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात दोन मोठ्या सेसंरच्या खाली एक छोटा सेंसर आणि मध्यभागी एलईडी लाइट आहे. हा कॅमेरा सेंसर एक साथ एका कॅमेरा मॉड्यूल मध्ये आहेत. कॅमेरा स्पेसिफिकेशन पाहता फोनमध्ये अपर्चर f/1.8 सह 64MP सेंसर देण्यात आला आहे जो 4K व्हिडीओ रेकॉर्ड करतो. यात 8MP अल्ट्रावाइड-अँगल कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये अपर्चर f / 2.0 सह 16 एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे जो फेस अनलॉकसह चालतो. तुम्ही साइड-माउंटेड फिंगरप्रिंट रीडर चा वापर करून फोन अनलॉक करू शकता.

तसेच पावर बॅकअपसाठी iQOO Z3 मध्ये 4,400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 55W फ्लॅश चार्ज सपोर्टसह येते. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने फोन 15% पासून 60% पर्यंत फक्त 15 मिनिटांत चार्ज होतो. फोन अँड्रॉइड 11-आधारित ओरिजिन ओएसवर चालतो. कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून फोनमध्ये 5 जी, 4 जी वीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, 3.5 मिमी हेडफोन जॅक, यूएसबी टाइप-सी पोर्ट, इत्यादींचा समावेश आहे.

हे देखील वाचा : Motorola चा अजून एक स्वस्त 5G फोन Moto G50 झाला लॉन्च, यात आहे 5000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा

किंमत

कंपनीने iQOO Z3 तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर केला आहे. फोनच्या बेस वेरिएंटमध्ये 6GB + 128GB स्टोरेज मिळते ज्याची किंमत CNY 1,699 (जवळपास 18,800 रुपये) आहे. 8GB + 128GB मॉडेलची किंमत CNY 1,799 (जवळपास 20,000 रुपये) आणि 8GB रॅमसह 256GB स्टोरेज ऑप्शनची किंमत CNY 1,999 (जवळपास 22,100 रुपये) आहे. हा डीप स्पेस ब्लॅक, क्लाउड ऑक्सीजन ब्लू आणि नेबुला ग्रेडिएंट कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here