Motorola ने लॉन्च केला 5,000एमएएच बॅटरी आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा असलेला पावरफुल स्मार्टफोन Moto G9 Plus

Motorola च्या ‘जी9 सीरीज’ च्या आगामी स्मार्टफोन Moto G9 Plus संबंधित अनेक लीक्स गेल्या काही दिवसांपासून समोर आले आहेत, ज्यात स्पेसिफिकेशन्स सहित इतर माहिती पण सांगण्यात आली होती. आता मोटोरोलाने स्वतः हा फोन समोर आणत मोटो जी9 प्लस टेक मंचावर सादर केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मोटोरोलाने भारतात या सीरीज अंतर्गत Moto G9 स्मार्टफोन लॉन्च केला होता जो 11,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. Moto G9 Plus सर्वात आधी ब्राजील मध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या काही दिवसांत इतर मार्केट्स मध्ये येईल.

Moto G9 Plus

मोटोरोला जी9 प्लस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता कंपनीने हा फोन पंच-होल डिस्प्ले डिजाईन वर लॉन्च केला गेला आहे. फोन मध्ये बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे तर स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यावर छोटासा होल आहे. Moto G9 Plus स्मार्टफोन 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: 5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह भारतात आला Moto G9, किंमत : 11,499 रुपये

Moto G9 Plus एंडरॉयड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालतो. ब्राजील मध्ये हा फोन एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे जो 4 जीबी रॅम मेमरीला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मोटोरोलाचा हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, तेवढाच अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. त्याचप्रमाणे सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: स्वस्त Moto E7 Plus मध्ये असेल 5000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा, जाणून घ्या किंमत

Moto G9 Plus एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सोबतच इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 30वॉट टर्बोपावर फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. ब्राजील मध्ये हा फोन Rose Gold आणि Indigo Blue कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्याची किंमत BRL 2.249,10 म्हणजे जवळपास 31,000 रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here