5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह भारतात आला Moto G9, किंमत : 11,499 रुपये

Moto G9 स्मार्टफोन भारतात लॉन्च केला गेला आहे. काही दिवसांपूर्वी Flipkart आणि Motorola दोन्ही कंपन्यांनी हा फोन टीज करत माहिती दिली होती कि 24 ऑगस्टला कंपनी मोठे काहीतरी लॉन्च करणार आहे. तेव्हा अधिकृतपणे कोणताही खुलासा करण्यात आला नव्हता कि आज कंपनी कोणता स्मार्टफोन लॉन्च करेल. आता सर्व लीक्सना पूर्णविराम देत कंपनीने अधिकृतपणे आपला नवीन मोटो जी9 भारतात सादर केला आहे. कंपनीने हा फोन मिड-रेंज कॅटेगरी मध्ये सादर केला आहे. चला जाणून घेऊया या फोनच्या सर्व स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइन बाबत सर्वकाही.

Moto G9 ची डिजाइन

कॉम्पेक्ट डिजाइन सह सादर करण्यात आलेल्या मोटो जी9 मध्ये फ्रंटला वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. नॉचमुळे फोनच्या वरच्या बाजूला बेज्लस खूप कमी आहेत. डिवाइसच्या उजव्या आणि डाव्या बाजूला पण बेजल्स कमी दिसतात. पण स्मार्टफोनच्या बॉटमला जाड बेजल आहे. फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर बटन आणि पावर ऑन-ऑफ बटन मिळेल.

तसेच डावीकडे सिम ट्रे आहे. मागची डिजाइन पाहता मागे चौकोनी आकाराचा कॅमेरा मॉड्यूल वरच्या बाजूला मधोमध आहे. या कॅमेरा मॉड्यूल मध्ये ट्रिपल कॅमेरा सह एक एलईडी फ्लॅश लाइट पण देण्यात आली आहे. कॅमेरा मॉड्यूलच्या खाली मोटोरोलाचा लोगो आहे जो फिंगरप्रिंट सेंसरचे काम करेल. डिवाइसच्या बॉटमला स्पीकर ग्रिल आणि टाइप-सी चार्जिंग पोर्ट पण देण्यात आला आहे. कंपनीने फोन डिजाइनला वाटर-रिपेलेंट डिजाइनचे नाव दिले आहे.

स्पेसिफिकेशन्स

मोटो जी9 चे स्पेसिफिकेशन्स पाहता या फोन मध्ये अल्ट्रा वाइड 6.5-इंचाचा मॅक्स विजन डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे पिक्सल रेजोल्यूशन (1600×720) आहे. तसेच मॅक्स विजन डिस्प्ले 20:9 आसपेक्ट रेश्यो सह येतो. इतकेच नव्हे तर फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 मोबाइल प्लॅटफॉर्म आहे जो 4 जीबी रॅम व इनबिल्ट 64 जीबी स्टोरेज सह येतो. फोनची इनबिल्ट स्टोरेज 512 जीबी पर्यंत माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी फोन मध्ये देण्यात आलेल्या कॅमेरा पाहता हँडसेट मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये अपर्चर एफ/1.7 सह 48 मेगापिक्सल प्राइमरी सेंसर, अपर्चर f/2.4 सह 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर स्मार्टफोनचा कॅमेरा नाइट विजन मोडला सपॉर्ट पण करतो.

बॅटरी

स्मार्टफोन मध्ये पावर देण्यासाठी कंपनीने 20वाट टर्बोपावर चार्जिंग सह 5000mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटी फीचर्सच्या नावाखाली फोन मध्ये ड्यूल 4जी वीओएलटीई, वाई-फाई 802.11 बी/जी/एन/एसी, एनएफसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि ग्लोनास सारखे फीचर्स आहेत. फोन एंडरॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो.

किंमत

मोटोरोला मोटो जी9 चा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरीएंट कंपनीने 11,499 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. डिवाइसची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून 31 ऑगस्ट दुपारी 12 वाजता सुरु होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here