Xiaomi 13 Pro येताच कंपनीनं 10 हजारांनी कमी केली Xiaomi 12 Pro फोनची किंमत

Highlights

  • Xiaomi 12 Pro वर प्राइस कट 1 मार्चपासून लागू होईल.
  • या फोनची किंमत 10 हजार रुपयांनी कमी झाली आहे.
  • शाओमी आणि रेडमी युजर्सना 5,000 रुपयांचा एक्स्ट्रा बेनिफिट मिळेल.

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीचा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 13 Pro भारतात लाँच झाला आहे. या फोनमध्ये एक शानदार कॅमेरा सेटअप, फास्ट चार्जिंग आणि दमदार प्रोसेसर देण्यात आला आहे. Xiaomi 13 Pro ची विक्री 10 मार्चपासून सुरु होईल. विशेष म्हणजे हा हँडसेट भारतात येताच कंपनीनं गेल्यावर्षीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 12 Pro च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. शाओमी 12 प्रो ची प्राइस थेट 10,000 रुपयांनी कमी झाली आहे.

शाओमी 12 प्रोची भारतातील नवीन किंमत

शाओमी 12 प्रो च्या किंमतीत कंपनीनं 10 हजार रुपयांची मोठी कपात केली आहे. या स्मार्टफोनचा 8GB RAM + 256GB Storage व्हेरिएंट 62,999 रुपयांमध्ये तर 12GB RAM + 256GB Storage व्हेरिएंट 66,999 रुपयांमध्ये लाँच झाला होता परंतु आता हे दोन्ही मॉडेल 10,000 रुपयांनी कमी किंमतीत विकले जातील. हे देखील वाचा: डीएसएलआर सारखा कॅमेरा असलेल्या Xiaomi 13 Pro च्या भारतीय किंमतीचा खुलासा; आयफोनला टाकणार मागे?

Xiaomi 12 Pro प्राइस कटनंतर फोनच्या 8जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 52,999 रुपये तर 12जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 56,999 रुपये झाली आहे. ही नवीन किंमत उद्या म्हणजे 1 मार्चपासून संपूर्ण देशात लागू होईल. शाओमी आणि रेडमी मोबाइल युजर्सना एक्सचेंज ऑफरमध्ये 5,000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जाईल तसेच एचडीएफसी बँक कार्डवर 3,000 रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काउंट देखील मिळेल.

शाओमी 12 प्रो 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.78″ 120Hz Display
  • 32MP Selfie Sensor
  • 50MP + 50MP + 50MP Camera
  • Qualcomm Snapdragon 8 Gen1
  • 120W 4,600mAh Battery

शाओमी 12 प्रो मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 3200 x 1440 पिक्सल रेजोल्यूशन, 480Hz टच सॅम्पलिंग रेट, 1500nits पीक ब्राइटनेस, डॉल्बी व्हिजन, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस आणि HDR10+ सह 6.73-इंचाचा 2K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येते. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन1 चिपसेटवर चालतो.

Xiaomi 12 Pro 5G मध्ये मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेरा आहे, ज्यात f/1.9 अपर्चर असलेला 50MP Sony IMX707 प्रायमरी सेन्सर, OIS, LED फ्लॅश, 50MP Samsung JN1 अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा115-डिग्री FoV सह, 50MP ची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे जी 2x ऑप्टिकल झूमसह येते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी 32MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा मिळेल. हे देखील वाचा: Yulu Bajaj नं लाँच केल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर Miracle GR आणि DeX GR, पाहा किंमत

Xiaomi 12 Pro 5G MIUI 13 कस्टम स्किनसह Android 12 OS वर चालतो. त्याचबरोबर हा 120W फास्ट चार्जिंग, 50W वायरलेस चार्ज आणि 10W वायरलेस रिवर्स चार्जिंगला सपोर्टसह 4,600mAh ची बॅटरी मिळेल. कनेक्टिव्हिटी फीचर पाहता यात 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 6ई, एनएफसी, ब्लूटूथ 5.2, जीपीएस आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here