101 किमी रेंजसह लाँच झाली Ola ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

भारतातील प्रमुख इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी ओलानं भारतीय बाजारात आपला सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Air लाँच केला आहे. या स्कूटरची किंमत 79,999 रुपये (एक्स शोरूम प्राइस) ठेवण्यात आली आहे. ही फक्त लिमिटेड पीरियड ऑफर आहे आणि काही काळानंतर या स्कूटरची किंमत 84,999 रुपये होईल. नवीन ओला एस1 एयर मध्ये प्राइस कमी झाली आहे तसेच जुन्या एस1 मॉडेलच्या तुलनेत अनेक बदल करण्यात आले आहेत. सध्या कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरची प्री बुकिंग घेत आहे आणि डिलिव्हरी पुढील वर्षी 2023 च्या पहिल्या सहामहिन्यात होईल.

Ola S1 Air चे स्पेसिफिकेशन

ओला एस1 एयरचे स्पेसिफिकेशन पाहता, पहिल्या नजरेत जास्त बदल दिसत नाहीत. परंतु छोट्या-छोट्या गोष्टी बदलण्यात आल्या आहेत. कंपनीनं ही ड्युअल कलर बॉडीसह सादर केली आहे. वरचा भाग सफेद किंवा लाल रंगात देण्यात आला आहे तर खाली काळ्या रंगाचा अनपेंटेड प्लास्टिक आहे. तर बूट स्पेस यावेळी खूप फ्लॅट झाली आहे आणि इथे तुम्हाला 34 लिटरची जागा मिळते. हे देखील वाचा: Battery Swapping म्हणजे काय? या टेक्नॉलॉजीमुळे मोठ्या प्रमाणात कमी होणार Electric Vehicle ची किंमत

समोरच्या लाइट आणि हँडलिंग स्टाइल तीच आहे. परंतु सीट थोडी वेगळी आहे आणि कंपनीनुसार त्यांनी स्कल्पटेड सीटचा वापर केला आहे जी खूप आरामदायक आहे. तसेच सहज उभी करण्यासाठी, स्टॅन्डवर लावण्यासाठी किंवा पुढे मागे करण्यासाठी ग्रॅब हँडल देण्यात आलं आहे.

उभे तुम्हाला टेलिस्कोपिक फोर्क्स मिळतात तर कम्फर्ट ड्राईव्हिंगसाठी यात ड्युअल सस्पेंशन देण्यात आलं आहे. कंपनीनं डिजिटल स्पीडोमीटरसह अनेक स्मार्ट फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच स्क्रीन विजेट्स कस्टमाइज करता येतील. कंपनीनं यात 10 वॉटचे स्पिकर देण्यात आले आहेत जे गाडी चालवताना तुम्हाला नेव्हिगेशनमध्ये मदत करतील.

ओला एस1 एयरमध्ये 4.5 किलोवॉटची मोटर देण्यात अली आहे. कंपनीचा दावा आहे की ही अधिकतम 85 किलोमीटरचा स्पीड देऊ शकते तर फक्त 4.3 सेकंदात 40 किलोमीटर प्रति तास आणि 9.8 सेकंदात 60 किलोमीटर प्रति तास स्पीड गाठू शकते. एकदा चार्ज केल्यास स्कूटर 101 किलोमीटरची रेंज देऊ शकते. हे देखील वाचा: फक्त स्वस्त प्लॅन नव्हे तर स्पीडही मिळणार; BSNL 4G ची लाँच डेट कंफर्म, टेलीकॉम मंत्र्यांनी दिली खुशखबर

स्कूटरचे दूसरे फीचर्स पाहता यात तुम्हाला 17.78 सेंटीमीटरची स्क्रीन मिळते. तसेच कंपनीनं यात ऑक्टा कोर प्रोसेसर दिला आहे ज्याचा मॅक्सिमम क्लॉक स्पीड 2.2 गीगाहर्ट्ज आहे. कंपनीनं यात 3 जीबी रॅम दिला आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर एलटीई, वायफाय आणि जीपीएस फीचर्सनी सुस्सज आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here