Realme आणतेय अजून एक स्वस्त स्मार्टफोन Narzo 50i Prime; पुढील आठवड्यात येणार भारतीयांच्या भेटीला

5000mah battery realme 50i prime low budget smartphone launch india price sale specification

या आठवड्यात रेडमीनं आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन सादर केला आहे. 6,500 रुपयांच्या बजेटमध्ये आलेल्या Redmi A1 ला टक्कर देण्यासाठी रेयालमीकडे कोणताही स्मार्टफोन नाही. परंतु पुढील आठवड्यात रियलमी दोन लो बजेट स्मार्टफोन सादर करणार आहे. आज रियलमीनं आपल्या नारजो सीरीज लो बजेट स्मार्टफोन realme Narzo 50i Prime च्या लाँच डेटचा खुलासा केला आहे. Narzo 50i Prime 13 सप्टेंबरला भारतात लाँच होईल. रियलमी याला entry-level all-rounder smartphone म्हणत आहे जो 7,000 रुपयांपर्यंतचा बजेटमध्ये लाँच होऊ शकतो.

Realme Narzo 50i Prime launch in India

रियलमी इंडियानं माहिती देत सांगितलं आहे की कंपनी नारजो सीरीजचा हा नवीन स्मार्टफोन realme Narzo 50i Prime 13 सप्टेंबरला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी भारतात लाँच केला जाईल. रियलमीनं या स्मार्टफोनच्या किंमतीची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार हा एक लो बजेट स्मार्टफोन असेल ज्याची किंमत 7,000 रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये असू शकते. फोनच्या अधिकृत प्राइससाठी 13 सप्टेंबरची वाट बघावी लागेल. हे देखील वाचा: इतक्या स्वस्तात 55 इंचाचा Smart TV; घराला थिएटर बनवण्यासाठी आले Thomson चे QLED 4K TV

13 September realme narzo 50i Prime india launch date

Realme Narzo 50i Prime ची संभाव्य किंमत

रियलमी नारजो 50आय प्राइम चीनमध्ये दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला होता. फोनचा बेस व्हेरिएंट 3 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत भारतीय करंसीनुसार 7,850 रुपयांच्या आसपास आहे. तर तरह Realme Narzo 50i Prime 4GB RAM + 64GB Storage व्हेरिएंट इंडियन करंसीनुसार जवळपास 8,600 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. आशा आहे की Realme Narzo 50i Prime ची भारतीय किंमत देखील याच रेंजमध्ये असेल. तसे झाल्यास हा या सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन ठरू शकतो.

Realme Narzo 50i Prime चिनी मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

हा मोबाइल फोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. वॉटरड्रॉप नॉच स्टाइल असलेली ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे. या फोनची जाडी फक्त 8.55एमएम आहे तर वजन 182 ग्राम आहे. या सेग्मेंटमधील सर्वात पातळ आणि हलक्या स्मार्टफोन्स पैकी हा एक असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. इस रियलमी फोनमध्ये ड्युअल सिम, 4जी आणि 3.5एमएम जॅकसह बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात.

Realme Narzo 50i Prime अँड्रॉइड 11 ओएसच्या ‘गो एडिशन’ वर लाँच करण्यात आला आहे जो ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc T612 चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये माली जी52 जीपीयू देण्यात आला आहे. चीनी मार्केटमध्ये हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसरा व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: महिनाभर नव्हे तर 45 दिवसांची वैधता असलेला Recharge Plan; रोज 2GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंग

फोटोग्राफीसाठी Realme Narzo 50i Prime मध्ये एफ/2.0 अर्पचर असलेला 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 4एक्स डिजिटल झूमला सपोर्ट करतो. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या रियलमी मोबाइलमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी यात 5,000एमएएच ची बॅटरी आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. रिपोर्टनुसार हा फोन सिंगल चार्जमध्ये 36 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here