Exclusive: क्वाड कॅमेरा आणि ड्यूल टोन-डिजाइन सह येईल Samsung Galaxy M12, रियर पॅनल आला समोर

91मोबाईल्सने अलीकडेच एक्सक्लूसिवली सॅमसंगच्या अपकमिंग फोन गॅलेक्सी एम12 च्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली होती. तसेच आमच्या मागच्या रिपोर्ट मध्ये Galaxy M12 (SM-M127F) आणि Galaxy F12 (SM-F127G) च्या रियर पॅनलचे फोटो पण दाखवण्यात आल्या आहेत, ज्यात मागे मॉडेल नंबर पण दिसत होते. आता आम्हाला मॉडेल नंबर SM-M127F चे लाइव फोटोज मिळाले आहेत. तसेच हा फोन 7,000mAh क्षमता असलेल्या बॅटरी सह येऊ शकतो. सॅमसंग इतक्या मोठ्या बॅटरी सह फोन लॉन्च करण्याची हि काही पहिली वेळ नाही. Galaxy M51 कंपनीने 7,000 एमएएच क्षमता असलेल्या बॅटरी सह सादर केला होता.

समोर आलेल्या फोटो वरून स्पष्ट झाले आहे कि Samsung Galaxy M12 कंपनी ड्यूल-टोन फिनिश सह सादर करू शकते. तसेच मागे टॉप वर टेक्चर फिनिश आणि बॉटम मध्ये ग्लोसी डिजाइन असेल. तसेच फोनच्या मागे टॉप लेफ्ट वर चौकोनी कॅमेरा मॉड्यूल असेल.

हे देखील वाचा : दमदार 256GB स्टोरेज सह येत आहे Samsung Galaxy M62, लवकरच करेल एंट्री

मागे कोणताही फिंगरप्रिंट सेंसर दिसत नाही, ज्यामुळे वाटत आहे कि फोन मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल. याआधी समोर आलेल्या माहिती मध्ये दिसले होते कि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट, स्पीकर ग्रिल आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक खालच्या बाजूला आहे.

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार गॅलेक्सी एम12 / एफ12 मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले असेल ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी होल-पंच कटआउट असेल. हा 7,000mAh च्या मोठ्या बॅटरी सह येऊ शकतो. याआधी कंपनी Galaxy M51 7,000 एमएएच क्षमता असलेल्या बॅटरी सह सादर केला आहे.

हे देखील वाचा : Samsung Galaxy Note 10 ची किंमत झाली 27,000 रुपयांनी कमी, विकत घेण्याची आहे सुवर्णसंधी

वर सांगितल्याप्रमाणे दोन्ही मॉडेल नंबर्स मधील साम्य पाहता, असे म्हणता येईल कि सॅमसंग गॅलेक्सी एफ12 गॅलेक्सी एम12 चा रीब्रँडेड वेरिएंट असू शकतो. सॅमसंगची F-सीरीज कंपनीची सर्वात नवीन स्मार्टफोन सीरीज आहे, ज्यात आतापर्यंत किफायती Galaxy F41 लॉन्च केला गेला आहे. गॅलेक्सी एफ41 Galaxy M31 चा रीब्रँडेड वेरिएंट आहे, जो इशारा करतो कि गॅलेक्सी एफ12 रीब्रँडेड गॅलेक्सी एम12 असू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here