Instagram आणि WhatsApp वर तिरंगा प्रोफाईल पिक्चर म्हणून कसा ठेवायचा?

75th Independence Day येत आहे. संपूर्ण देश तिरंग्याच्या रंगात बुडला आहे. भारत सरकारकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवच्या साजरा करण्यासाठी Har Ghar Tiranga अभियान सुरु करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला आपल्या घरावर तिरंगा फडकावण्याचं आव्हान केलं आहे. तसेच 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय आपला DP म्हणजे प्रोफाईल पिक्चरवर राष्ट्रध्वजाचा फोटो लावत आहेत. जर तुम्ही देखील Whatsapp किंवा Instagram वर Tiranga Dp म्हणून ठेवू इच्छित असाल तर पुढे आम्ही खूप सोपी पद्धत सांगितली आहे.

इन्स्टाग्रामवर प्रोफाईल पिक्चर कसं बदलायचं/ How to Change Instagram Profile Photo

1. Instagram वर खाली डावीकडे असलेल्या प्रोफाईल आयकॉन वर क्लिक करा.

2. प्रोफाईल ओपन झाल्यानंतर त्यात Edit Profile ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा.

3. इथे Change Profile Photo चा ऑप्शन येईल, त्यावर टच करा.

4. New Profile Phone ऑप्शनची निवड करा आणि गॅलरीमध्ये सेव्ह असलेला तिरंग्याचा फोटो सिलेक्ट करा

5. फोटोची साईज अडजेक्ट करा ओके बटनवर क्लिक करा. Tiranga Instagram Dp वर सेट होईल.

व्हॉट्सअ‍ॅपवर प्रोफाईल पिक्चर कसं बदलायचं/ How to Change WhatsApp Profile Photo

1. WhatsApp मध्ये सर्वातवर डावीकडे तीन डॉट दिसतील, त्यावर टॅप करा.

2. इथे ऑप्शन्सच्या यादी ओपन होईल, जिथे Settings चा पर्याय निवडा.

3. आता WhatsApp Profile Picture दिसेल, त्यावर टच करताच DP वर कॅमेरा आयकॉन येईल.

4. या कॅमेरा आयकॉनवर क्लिक केल्यावर Camera आणि Gallery चा पर्याय येईल, गॅलरीच्या ऑप्शनची निवड करा.

5. इथे गॅलरीमध्ये सेव्ह तिरंग्याचा फोटो सिलेक्ट करून Done करा. Tiranga WhatsApp Dp वर सेट होईल.

नोट: इन्स्टाग्राम किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्या प्रोफाईल पिक्चरवर तिरंगा ठेवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये राष्ट्रध्वज तिरंग्याचा फोटो डाउनलोड व सेव्ह करावा लागेल. यासाठी तुम्ही गुगलवर डायरेक्ट सर्च करू शकता आणि तुमच्या आवडीचा फोटो आधी मोबाइल फोनमध्ये सेव्ह करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here