Stella Buzz इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

ईव्ही स्टार्टअप Stella Moto नं भारतीय ऑटो मार्केटमध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे, जिचे नाव Stella Buzz असं ठेवण्यात आलं आहे. या E-Scooter ची खासियत म्हणजे ही सिंगल चार्जमध्ये 90km ची देते तसेच हीच टॉप स्पीड 55kmph इतका आहे. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागल्याच्या घटना जास्त घडत आहेत त्यावर उपाय म्हणून कंपनीनं Stella Buzz electric scooter मध्ये Li-ion battery ऐवजी LPF battery pack दिला आहे, ज्यामुळे ही एक फायर रेसिस्टेंट बॅटरी पॅक असलेली इलेक्ट्रिक स्कूटर बनते.

Stella Buzz electric scooter price in India

कंपनीनं Stella Buzz electric scooter 95,000 रुपये (ex-showroom) मध्ये सादर केली आहे. या बजेटमध्ये भारतात दिग्गज ओलासह, हिरो, एथर, बाउंस असे अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत. ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर चार कलर ऑप्शन Grey, Matte Blue, Red आणि Brown मध्ये उपलब्ध होईल. विशेष म्हणजे Stella Buzz electric scooter सोबत कंपनी तीन वर्षांची वॉरंटी देखील देत आहे. उपलब्धतेच्या बाबतीत कंपनीनं दावा केला आहे, ही स्कूटर पुढील महिन्यात म्हणजे जानेवारी 2023 पासून लोकांसाठी उपलब्ध होईल. हे देखील वाचा: 8 हजारांच्या रेंजमध्ये 8GB रॅम असलेले फोन; 5000mAh च्या बॅटरीसह Samsung Galaxy M04 भारतात लाँच

Stella Buzz specifications

Stella Buzz e-scooter मध्ये 2kW BLDC मोटर 2.16kWh lithium iron phosphate (LFP) battery सह देण्यात आला आहे. LPF battery pack बद्दल कंपनीचा दावा आहे की हा Li-ion battery पॅक्स पेक्षा जास्त सुरक्षित आणि फायर रेजिस्टन्स आहे. यात अनेक सारे सेन्सर आणि एक मायक्रो-प्रोसेसर-आधारित बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम देण्यात आली आहे जी भारतीय परिथितीच्या आधारावर बॅटरीच्या आरोग्याची तपासणी आणि मेंटेनन्स करते. तसेच या स्कूटरची बॅटरी ओव्हरहिट झाल्यास पावर कटऑफ होते. त्यामुळे या स्कूटरमध्ये बॅटरीमुळे आग लागण्याची शक्यता कमी असेल.

कंपनी का दावा आहे की सिंगल चार्जमध्ये ही ई-स्कूटर 90km पर्यंत चालवता येईल. तसेच हीचा याची टॉप स्पीड 55kmph आहे. याव्यतिरिक्त Buzz ची लोड कॅरिंग कपॅसिटी 150kg आणि हीचा ग्राउंड क्लीयरेंस 180mm आहे. इतर फीचर्स पाहता, या ई-स्कूटरमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक, ट्यूबलेस टायर, एक डिजिटल स्पीडोमीटर, सेंट्रल लॉकिंग, एक यूएसबी चार्जर, क्रूज कंट्रोल आणि एक अँटी-थेफ्ट सिस्टम देण्यात आली आहे. हे देखील वाचा: विवोचा स्वस्त आणि मस्त 5जी मोबाइल लाँच; 8GB RAM सह Vivo Y35 5G Phone ची एंट्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here