चोरी झालेला किंवा हरवलेला फोन ब्लॉक करण्यासाठी CEIR ची सर्व्हिस संपूर्ण भारतात सुरु; अशी करा तक्रार

Highlights

  • हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या फोनचा IMEI नंबर ब्लॉक करण्यासाठी सीईआयआरची सर्व्हिस संपूर्ण देशात सुरु.
  • CEIR ची सर्व्हिस गुगलच्या फाइंड माय डिवाइस (Find My Device) पेक्षा वेगळी आहे.
  • हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या फोनचा IMEI नंबर ब्लॉक करता येईल.

जर तुमचा मोबाइल फोन (Mobile Phone) चोरी झाला किंवा हरवला तर आता त्याची तक्रार करणं किंवा तो ब्लॉक करणं सोपं झालं आहे. दूरसंचार विभाग (DoT) नं चोरी झालेल्या किंवा हरवलेल्या फोनला प्रत्येक नेटवर्कवर ब्लॉक करण्यासाठी 2019 मध्ये सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्ट्री (CEIR) ची स्थापना केली होती. आधी ही सेवा दादरा आणि नगर हवेली, गोवा आणि महाराष्ट्रात करण्यात आली होती, आता ही संपूर्ण भारतात उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया कशाप्रकारे तुम्ही तुमचा चोरी झालेल्या फोनची तक्रार कशी करू शकता किंवा तो ब्लॉक कसा करू शकता.

CEIR च्या या सर्व्हिसचा उपयोग काय

दूरसंचार विभागाने सीईआयआर (http://www.ceir.gov.in/) प्रोजेक्ट सुरु केला आहे. मुख्य हेतू प्रत्येक मोबाइल नेटवर्कवर हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाइल फोन ब्लॉक करणं, हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाइल फोन ट्रेस करणं, नेटवर्कवर मोबाइल डिवाइसला नकली आयएमआय (IMEI) पासून वाचवणं असा आहे. सर्व मोबाइल फोनमध्ये ओळख पटवण्यासाठी आयएमआय (IMEI) नंबर असतो. IMEI नंबर रिप्रोग्रामेबल आहे, त्यामुळे मोबाइल चोरी झाल्यानंतर IMEI नंबर रिप्रोग्राम केला जातो, ज्यामुळे IMEI ची क्लोनिंग होते. विभागानुसार, नेटवर्कवर क्लोन/ नकली आयएमआय हँडसेटची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. CEIR सर्व नेटवर्क ऑपरेटर्ससाठी ब्लॅकलिस्टेड मोबाइल डिवाइसच्या डेटाची देवाणघेवाण करण्यासाठी एक कॉमन मॅकॅनिज्म म्हणून काम करेल. यामुळे एका नेटवर्कवर ब्लॅकलिस्ट केलेले डिवाइस दुसऱ्यावर चालणार नाहीत. जरी त्या डिवाइसमधील सिम कार्ड बदललं तरी.

गुगलच्या फाइंड माय डिवाइसपेक्षा वेगळी आहे सेवा

CEIR ची ही सर्व्हिस गुगल (Google) च्या फाइंड माय डिवाइस (Find My Device) पेक्षा वेगळी आहे. फाइंड माय फोन फंक्शनचा वापर करण्यासाठी फोन किंवा टॅबलेट पावर ऑन असणं आवश्यक आहे, गुगल अकाऊंटमध्ये साइन इन आवश्यक आहे, मोबाइल डेटा किंवा वाय-फायशी डिवाइस कनेक्टेड असणं आवश्यकत आहे, Google Play वर दिसला पाहिजे आणि लोकेशन व ‘फाइंड माय डिवाइस’ फीचर ऑन असणं आवश्यक आहे. तर CEIR चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाइल फोन शोधण्यासाठी फक्त IMEI नंबरचा वापर करतो. पोर्टल देशातील दूरसंचार ऑपरेटर्सचा डेटा एकत्र करेल, त्यामुळे अ‍ॅक्टिव्ह इंटरनेट कनेक्शन किंवा आयडी सह लॉगइन असणं आवश्यक नाही.

IMEI नंबरद्वारे कशाप्रकारे फोन ब्लॉक करायचा किंवा किंवा शोधायचा

मोबाइल फोन चोरीला गेल्यावर किंवा हरवल्यावर CEIR वर तक्रार करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनवर रिपोर्ट करावा लागेल.

त्यानंतर फोनचा IMEI नंबर डिसेबल करण्यासाठी CEIR च्या वेबसाइटवर म्हणजे https://ceir.gov.in/Home/index.jsp वर विजिट करा.

CEIR वेबसाइटच्या मुख्य पेजवरच तुम्हाला ‘Block Stolen/Lost Mobile’ चा पर्याय दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. त्यानंतर इथे तुम्ही Request for blocking lost/stolen mobile phone फॉर्म पेजवर पोहोचाल. या पेजवर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर, डिवाइसचं ब्रँड नेम, जिथे फोन हरवला ती जागा, हरवल्याची किंवा चोरीला गेल्याची तारीख, मालकाचे नाव, पत्ता, ओळखपत्र इत्यादी माहिती द्यावी लागेल. ही माहिती दिल्यानंतर ओटीपी टाका, डिक्लेरेशनवर क्लिक करा, त्यानंतर सबमिट करा. हे देखील वाचा: 13 एप्रिलला भारतात लाँच होईल पावरफुल गेमिंग फोन Asus ROG Phone 7

एका माहिती दिली की तुम्हाला एक रिक्वेस्ट आयडी दिली जाईल, ज्याचा वापर तुम्ही तुमच्या चोरी झालेल्या फोनचं स्टेटस पाहण्यासाठी करू शकता.

जर तुम्हाला तुमचा फोन परत मिळाला तर तुम्ही ब्लॉक केलेला IMEI नंबर अनब्लॉक करू शकता. यासाठी तुम्हाला सीईआयआर (CEIR) वेबसाइटच्या मुख्य पेजवर ‘Un-Block Found Mobile’ वर क्लिक करावं लागेल. पुन्हा रिक्वेस्ट आयडी आणि मोबाइल नंबर टाकावा लागेल आणि सबमिटवर क्लिक करा. तुम्ही Check IMEI Request Status वर क्लिक करून रिक्वेस्ट स्टेटस पाहू शकता.

CEIR ची ‘नो योर मोबाइल’ सर्व्हिस

सरकारनं सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (https://ceir.gov.in/Home/index.jsp) प्लॅटफॉर्मवर ‘नो योर मोबाइल’ नावाची सेवा सुरु केली आहे. जिच्या मदतीनं तुमच्या डिवाइसची व्हॅलिडिटी तपासात येईल. तुम्ही मोबाइलवर *#06# डायल करून IMEI नंबर मिळवू शकता. तो नंबर इथे दिल्यास स्क्रीनवर मोबाइलचं स्टेटस दिसेल, जसे की मोबाइलचा IMEI नंबर ब्लॅक लिस्टेड आहे का, डुप्लिकेट किंवा आधी वापरात असलेला आहे का, हे समजेल. इथे मोबाइलचं स्टेटस जाणून घेण्याच्या तीन पद्धती आहेत.

SMSच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन

तुम्ही KYM <15 digit IMEI number> टाइप करून 14422 वर तुमच्या मोबाइलवरून एसएमएस पाठवू शकता. त्यानंतर तुम्हाला समजेल की त्या फोनचा आयएमआय नंबर ब्लॅक लिस्टेड आहे की डुप्लिकेट आहे. जर एखादा फोन IMEI नंबरविना विकला जात असेल तर तो अवैध मानला जातो.

Web portal च्या माध्यमातून

वेब पोर्टलच्या माध्यमातून देखील फोनची माहिती मिळवता येईल. यासाठी सीईआयआर च्या वेबसाइटवर ‘नो योर मोबाइल’ सेक्शनमध्ये वेब पोर्टलचा ऑप्शन दिसेल. क्लिक केल्यानंतर https://ceir.gov.in/Device/CeirIMEIVerification.jsp पेजवर पोहोचाल. इथे तुम्हाला मोबाइल नंबर टाकावा लागेल आणि त्यानंतर ओटीपी मागितला जाईल. त्यानंतर जो डिवाइस विकत घेत असाल त्याचा IMEI नंबर टाकावा लागेल. आयएमआय नंबरवरून फोनची वैधता समजेल. जर IMEI नंबरचं स्टेटस ब्लॅक लिस्टेड, डुप्लिकेट किंवा ऑलरेडी इन युज असेल तर असा फोन विकत घेऊ नये. जर IMEI नंबरचं स्टेटस योग्य असेल तर ‘आयएमआय इज व्हॅलिड’ लिहून येईल. हे देखील वाचा: Redmi 12C 30 मार्चला होईल भारतात लाँच, किंमत असू शकते 8 हजारांपेक्षा कमी

KYM app

हे अँड्रॉइड अ‍ॅप सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स (C-DOT) नं तयार केलं आहे. याच्या मदतीनं फोनचा आयएमआय नंबर योग्य आहे की नाही ते समजतं. केवायएम अ‍ॅप (KYM app)च्या माध्यमातून मोबाइल ब्लॅक लिस्टेड, डुप्लिकेट आहे की नाही ते जाणून घेता येतं. इथे तुम्हाला डिवाइससंबंधित मॅन्युफॅक्चररचं नाव, ब्रँड नेम आणि आयएमआय नंबर असलेलया फोनच्या मॉडेल इत्यादींची माहिती मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here