अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेल 2023 : बेस्ट स्मार्टफोन डील्स

अ‍ॅमेझॉनवर ग्रेट समर सेल सुरु झाला आहे. सेल दरम्यान ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरील अनेक कॅटेगरीच्या प्रोडक्टवर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. या सेल दरम्यान पॉपुलर स्मार्टफोन ब्रँड जसे की सॅमसंग, अ‍ॅप्पल, ओप्पो, आयकू, सोनी, आसुस आणि इतर कंपन्या आपापल्या डिवाइसेसवर जबरदस्त ऑफर देत आहेत. जर तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची योजना बनवत असाल तर ही बेस्ट संधी आहे. अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेल दरम्यान प्रत्येक कॅटेगरीच्या फोन्सवर बेस्ट डील्स मिळत आहेत. या सेल दरम्यान ICICI बँक आणि कोटक बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरून पेमेंट केल्यास 10 टक्के डिस्काउंट देखील मिळत आहे. इथे आम्ही तुम्हाला अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेल दरम्यान स्मार्टफोन्सवर मिळणाऱ्या बेस्ट डील्सची माहिती देत आहोत.

या स्मार्टफोनवर मिळत आहेत अमजेन ग्रेट समर सेलच्या बेस्ट डील्स

Apple iPhone 14 (128 GB)

Deal price

Apple च्या लेस्टेस्ट iPhone 14 वर अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेल दरम्यान धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. iPhone 14 चे फीचर्स पाहता यात 6.1-इंचाचा Super Retina XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. जोडीला यात प्रो-लेव्हल 12MP ड्युअल कॅमेरा सिस्टम आणि चांगल्या फोटोग्राफीसाठी फोटोनिक इंजिन देण्यात आलं आहे. तसेच यात अ‍ॅक्शन मोड देखील मिळतो, जो स्टेबल आणि स्मूद व्हिडीओ कॅप्चर करतो. iPhone 14 मध्ये पावरफुल A15 Bionic चिपसेट देण्यात आला आहे जो दमदार परफॉर्मन्स ऑफर करतो.

 • प्राइस : 71,999 रुपये
 • डील प्राइस : 66,359 रुपये (बँक डिस्काउंटसह)
 • Apple iPhone 14 Plus (256 GB)

  Deal price

  iPhone 14 Plus त्या लोकांसाठी बेस्ट ऑप्शन आहे, ज्यांना मोठी स्क्रीन असलेले फोन आवडतात. यात 6.7-इंचाचा Super Retina XDR डिस्प्ले मिळतो. त्याचबरोबर iPhone 14 Plus मध्ये देखील 12MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि फोटोनिक इंजिनचा पोर्ट मिळतो. iPhone 14 Plus बद्दल अ‍ॅप्पलचा दावा आहे की हा सिंगल चार्जमध्ये 26 तासांपर्यंतचा व्हिडीओ प्लेबॅक ऑफर करतो. यात A15 Bionic प्रोसेसर देण्यात आला जो 5G कनेक्टिव्हिटीसह येतो.

 • प्राइस : 94,999 रुपये
 • डील प्राइस : 74,999 रुपये (ऑफर आणि बँक डिस्काउंटसह)
 • Samsung Galaxy M33 5G

  Samsung Galaxy M33 5G मिड रेंजमध्ये बेस्ट स्मार्टफोन आहे, जो या सेल दरम्यान धमाकेदार ऑफरसह विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यात पावरफुल Exynos 1280 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे, जोडीला 5MP अल्ट्रावाइड सेन्सर, 2MP डेप्थ कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. बॅटरी पाहता फोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहेत.

 • प्राइस : 17,999 रुपये
 • डील प्राइस : 14,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)
 • iQOO Z6 Lite 5G

  iQOO Z6 Lite 5G स्मार्टफोन मिड रेंज मध्ये आणखी एक बेस्ट ऑप्शन आहे. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.58-इंचाचा FHD+ डिस्प्ले मिळतो. आयकूच्या या फोनमध्ये 50MP Eye ऑटो फोकस कॅमेरा देण्यात आला आहे, जो सुपर नाइट मोड सपोर्टसह येतो. आयकूच्या या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग मिळते. हा फोन Qualcomm Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसरवर चालतो.

 • प्राइस : 13,999 रुपये
 • डील प्राइस : 12,499 रुपये (बँक डिस्काउंटसह)
 • Samsung Galaxy M14 5G

  Samsung Galaxy M14 5G स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान स्वस्तात विकत घेता येईल. सॅमसंगच्या या फोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले (90Hz रिफ्रेश रेट) आणि 6,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंगचा हा फोन Android 13 वर आधारित Samsung One UI 5.1 वर चालतो. या फोनमध्ये व्हॉइस फोकस, सॅमसंग वॉलेट आणि सिक्योर फोल्डर सारखे फीचर मिळतात. सॅमसंगच्या या फोनमध्ये 50MP, 2MP डेप्थ आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन Exynos 1330 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर चालतो. फोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटीसाठी 13-बँड्सचा सपोर्ट देण्यात आला आहे.

 • प्राइस : 16,490 रुपये
 • डील प्राइस : 12,490 रुपये (बँक डिस्काउंटसह)
 • Redmi 12C

  Redmi 12C स्मार्टफोन बजेट सेगमेंटचा बेस्ट ऑप्शन आहे. शाओमीच्या या फोनमध्ये 6.71-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याची मॅक्सिमम ब्राइटनेस 500 निट्स आहे. कॅमेरा पाहता फोनमध्ये 50MP (f/1.8) AI ड्युअल रियर कॅमेरा, 5MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये पोर्टेट मोड आणि नाइट मोड देण्यात आला आहे. हा फोन Mediatek Helio G85 प्रोसेसर वर चालतो.

 • प्राइस : 11,499 रुपये
 • डील प्राइस : 8,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)
 • Redmi 10A

  Redmi 10A स्मार्टफोन शानदार EVOL डिजाइनसह येतो, जी बजेट सेग्मेंटमधील ग्राहक खूप आवडते. रेडमीच्या या फोनमध्ये 6.53-इंचाचा मोठा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी Redmi 10A स्मार्टफोनमध्ये 13MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. रेडमीच्या या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळते. हा फोन MediaTek Helio G25 ऑक्टा कोर प्रोसेसरवर चालतो.

 • प्राइस : Rs 8,999
 • डील प्राइस : 7,849 रुपये (बँक डिस्काउंटसह)
 • realme narzo N55

  realme narzo N55 स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेल दरम्यान डिस्काउंटेड किंमतीत विकत घेता येईल. रियलमीच्या या फोनमध्ये 6.76-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात पंच होल डिजाइन देण्यात आला आहे. narzo N55 फोनमध्ये 64MP AI कॅमेरा मिळतो. या फोन MediaTek Helio G88 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये Dynamic RAM एक्सपांशन व्हर्च्युअल रॅम फीचर मिळतो. 5,000mAh बॅटरी कंपनीनं दिली आहे.

 • प्राइस : 12,999 रुपये
 • डील प्राइस : 10,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)
 • realme narzo 50i Prime

  realme narzo 50i Prime स्मार्टफोन स्लीक डिजाइनसह येतो. रियलमीच्या या फोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा मॅक्सिमम ब्राइटनेस 400 निट्स आहे. या फोनमध्ये 8MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 5,000mAh ची बॅटरी आणि 10W चार्जिंग स्पीड देण्यात आला आहे. रियलमीच्या Narzo 50i Prime स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट 5G कनेक्टिव्हिटी मिळते. यात Unisoc Tiger T612 प्रोसेसर देण्यात आला आहे.

 • प्राइस : 8,999 रुपये
 • डील प्राइस : 6,299 रुपये (बँक डिस्काउंटसह)
 • Samsung Galaxy M53 5G

  Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोनवर देखील सेल दरम्यान जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. सॅमसंगचा हा मिड रेंज स्मार्टफोन पावरफुल MediaTek Dimensity 900 प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जोडीला हा फोन 108MP क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्टसह येतो, ज्यात अ‍ॅडव्हान्स फीचर्स जसे की सिंगल टेक, ऑब्जेक्ट रिमूवर आणि फोटो रीमास्टर सारखे टूल्स देण्यात आले आहेत. यात 6.7-इंचाचा FHD+ Super AMOLED प्लस डिस्प्ले मिळतो.

 • प्राइस : 27,999 रुपये
 • डील प्राइस : 23,249 रुपये (बँक डिस्काउंटसह)
 • iQOO 11 5G

  फ्लॅगशिप iQOO 11 5G स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान डिस्काउंटेड किंमतीत विकत घेता येईल. iQOO 11 5G स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 2K E6 AMOLED 6.78-इंचाचा प्रीमियम डिस्प्ले देण्यात आला आहे. iQOO 11 5G मध्ये मोशन कंट्रोल फीचर मिळतं. तसेच गेमिंग आणि अ‍ॅडव्हान्स जेस्चर सारख्या फीचर्ससह येतो. या फोनमध्ये व्हेपर चेंबर लिक्विड कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. तसेच फोटोग्राफीसाठी फोनमध्ये V2 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 50MP GN5 Ultra-सेंसिंग कॅमेरा देण्यात आला आहे, जो 4K सुपर नाइट व्हिडीओ सपोर्टसह येतो. या फोनमध्ये 120W फ्लॅशचार्ज मिळतो.

 • प्राइस : 64,990 रुपये
 • डील प्राइस : 49,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)
 • LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here