6जीबी रॅम सह लॉन्च होईल असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1, 6-इंचाची ​स्क्रीन आणि 16-एमपी कॅमेरा वाल्या फोन ची किंमत असेल फक्त 14,999 रुपये

असूस ने एप्रिल मध्ये भारतीय बाजारात आपला स्वस्त आणि दमदार स्मार्टफोन झेनफोन मॅक्स प्रो एम1 लॉन्च केला होता. असूस ने हा फोन 3जीबी रॅम आणि 4जीबी रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला होता जे आज क्रमश: 10,999 रुपये तसेच 12,999 रुपयांमध्ये रुपये सेल साठी उपलब्ध आहेत. कंपनी ने लॉन्च च्या वेळच घोषणा केली होती की असूस या फोनचा 6जीबी रॅम मॉडेल पण आणेल आणि आता हा पावरफुल वेरिएंट नवीन स्पेसिफिकेशन्स सह शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर दिसला आहे.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 च्या 6जीबी रॅम वेरिएंट चा एक वेबपेज फ्लिपकार्ट वर बनवण्यात आला आहे. या पेज वर अनअवेलेबल लिहिले असले तरी पेज इंस्पेक्ट मध्ये फोन च्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती आहे. विशेष म्हणजे असूस आपल्या या फोन वेरिएंटला फक्त जास्त रॅम नाही तर अपडेटेड कॅमेरा सह पण लॉन्च करेल. झेनफोन मॅक्स प्रो एम1 च्या 6जीबी रॅम वेरिएंट मध्ये 16-मेगापिक्सल चा प्राइमरी रियर कॅमेरा आणि 16-मेगापिक्सलचाच सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर हा फोन आॅल मेटल यूनिबॉडी डिजाईन वर सादर करण्यात आला आहे जी ट्रेंड मध्ये असलेल्या 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिसप्ले ला सपोर्ट करते. फोन मध्ये 6-इंचाचा मोठा फुलव्यू फुलएचडी+ डिसप्ले देण्यात आला आहे तसेच स्क्रीन डॅमेज पासून वाचवण्यासाठी हा 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे.

असूस चा हा नवीन फोन स्टॉक एंडरॉयड वर सादर करण्यात आला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. बाजार मध्ये आधी पासून 3जीबी रॅम/32जीबी मेमरी तसेच 4जीबी रॅम/64जीबी स्टोरेज वेरिएंट आहे त्याचबरोबर 6जीबी रॅम वेरिएंट मध्ये पण 64जीबी मेमरी मिळू शकते.

फोटोग्राफी सेग्मेंट मध्ये असूस ने झेनफोन मॅक्स प्रो एम1 स्मार्टफोन मध्ये डुअल रियर कॅमेरा दिला आहे. या फोन च्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप चे 13-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर आहेत जे एलईडी फ्लॅश ला सपोर्ट करतात. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये फ्लॅश लाईट असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच नवीन वेरिएंट मध्ये सेल्फी कॅमेरा 16-मेगापिक्सल चा सांगण्यात येत आहे त्याचबरोबर दोन रियर कॅमेरा मधील पहिला कॅमेरा पण 16-मेगापिक्सल चा असू शकतो.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 डुअल सिम आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक पण आहे. बेसिक कनेक्टिविटी सह पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 5,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहता झेनफोन मॅक्स प्रो एम1 के 6जीबी रॅम वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here