PUBG आणि Call Of Duty खेळण्याची घेता येईल मजा, 15000 रुपयांपेक्षा कमी किंमत असणाऱ्या या दमदार स्मार्टफोन्स वर

एखादा नवीन स्मार्टफोन विकत घेण्याआधी त्याचे स्पेसिफिकेशन्स, कॅमेरा आणि बॅटरी वर खास लक्ष दिले जाते. या सर्व आस्पेक्ट्स सोबतच सध्याचा तरुण नवीन स्मार्टफोनच्या आधी जणू इच्छितो कि त्यात PUBG आणि Call Of Duty सारखे गेम्स कसे चालतील. सध्या हे दोन्ही गेम इंडियाचे टॉप मोबाईल गेम बनले आहेत. हाईएंड स्पेसिफिकेशन्स असलेल्या स्मार्टफोन्स मध्ये हे मोबाईल गेम्स खूप सहज खेळता येतात. पण आजकाल टेक ब्रँड्स त्या यूजर्सना पण लक्षात ठेऊन आपले स्मार्टफोन लॉन्च करत आहेत, जे गेमचे चाहते आहेत परंतु हाय बजेट फोन विकत घेत नाहीत. सध्या भारतीय बाजारात अनेक असे स्मार्टफोन आहेत ज्यांची किंमत 15,000 रुपयांच्या आसपास आहे आणि PUBG व Call Of Duty सारख्या गेमचा पण शानदार अनुभव देतात. जर तुम्ही पण एखाद्या अशा फोनचा शोध घेत असाल जो 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येईल आणि तुम्ही त्यावर PUBG आणि Call Of Duty आरामात खेळू शकाल, तर पुढे आम्ही अश्याच स्मार्टफोन्सची यादी तयार केली आहे.

Xiaomi Redmi Note 8 Pro

भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड पासून सुरवात करायची झाल्यास Redmi Note 8 Pro या बजेट मधील बेस्ट गेमिंग स्मार्टफोन्स पैकी एक आहे. हा स्मार्टफोन भारतात लॉन्च होणारा पहिला डिवाईस आहे ज्यात मीडियाटेकचा हेलीयो जी90टी चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्स साठी Redmi Note 8 Pro माली जी76 एमसी4 जीपीयूला सपोर्ट करतो. फोनची प्रोसेसिंग स्मूद करण्यासाठी यात ‘मी टर्बो’ आहे तर गेमिंगच्या वेळी परफॉर्मेंस फास्ट करण्यासाठी Redmi Note 8 Pro ‘गेम टर्बों 2.0’ टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला गेला आहे. टर्बो टेक्नोलॉजी Redmi Note 8 Pro मध्ये PUBG आणि Call Of Duty चा आनंद अनेक पटीने वाढवते.

Redmi Note 8 Pro चा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. इतर स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई 10 वर चालतो. यात 6.53 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो गेम एक्सपीरियंस अजून चांगला करतो. फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहेत. फोटोग्राफी साठी Redmi Note 8 Pro मध्ये 64MP + 8MP + 2MP + 2MP चा क्वॉड रियर कॅमेरा आणि 20MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. दीर्घकाळ गेम खेळता यावे म्हणून या फोन मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग असलेली 4500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Realme 5 Pro

शाओमीचे कट्टर प्रतिस्पर्धी बनलेली Realme पण आपल्या फॅन्सना Realme 5 Pro च्या रूपाने चांगला गेमिंग डिवाईस देत आहे. Realme 5 Pro एंडरॉयड पाई आधारित कलर ओएस 6 सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 712 एआई चिपसेट वर चालतो. फोन मधील HyperBoost 2.0 फीचर सह PUBG आणि Call Of Duty सारखे गेम्स प्रो प्लेयर प्रमाणे खेळता येतात. Realme चे म्हणणे आहे कि या फीचर मुळे गेमिंग परफॉर्मेंस मध्ये 16.2 टक्के टच बूस्ट आणि 38 टक्के फ्रेम बूस्ट मिळतो. तर Realme 5 Pro मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह एड्रेनो 616 जीपीयू देण्यात आला आहे.

Realme 5 Pro चा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. फोन मध्ये 6.3-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफी साठी Realme 5 Pro मध्ये पण मागे चार सेंसर आहेत ज्यात 48MP + 8MP + 2MP + 2MP च्या सेन्सरचा समावेश आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. जास्त बॅकअप साठी Realme 5 Pro मध्ये VOOC फ्लॅश चार्ज 3.0 सह एआई कूलिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,035एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy M30s

Samsung ने ‘गॅलेक्सी एम’ सीरीजच्या Galaxy M30s स्मार्टफोन द्वारे या लीग मध्ये आपली पकड मजबूत केली आहे. हा स्मार्टफोन 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनॉस 9611 चिपसेट वर चालतो. PUBG किंवा Call Of Duty खेळताना फोन मधील Game Booster टेम्परेचर आणि मेमरी मोनिटर करत असतो. गेम बूस्टर टेक्नोलॉजी गेम खेळताना स्मूद ग्राफिक्स देते. Samsung Galaxy M30s चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy M30s चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.4-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड पाईला सपोर्ट करतो. फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 48MP + 5MP + 8MP चे तीन सेंसर आहेत. तसेच सेल्फी साठी हा डिवाईस 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोन मधील 15वॉट फास्ट चार्जिंग असलेल्या 6,000एमएएच च्या बॅटरी सह मन भरेस्तोवर PUBG आणि Call Of Duty सारखे मोबाईल गेम्स खेळता येतील.

Vivo Z1 Pro

Z1 Pro Vivo ने खासकरून PUBG प्लेयर्स साठी लॉन्च केला होता. विशेष म्हणजे या फोनचा लॉन्च ईवेंट पण पूर्णपणे PUBG च्या थीम वर होता. PUBG आणि Call Of Duty सारख्या गेम्स साठी या फोन सह Vivo ने Multi-Turbo Engine टेक्नॉलॉजी सादर केली होती. मल्टी टर्बो सॉफ्टवेयर आणि हार्डवेयर दोन्ही सोबत समन्वयाने चांगला गेमिंग एक्सपीरियंस देते. या इंजन मध्ये Game Turbo, Centre Turbo, Cooling Turbo आणि AI Turbo समावेश आहे. हे सर्व फॅक्टर मिळून गेम खेळताना FPS म्हणजे फ्रेम पर सेकेंड रेट 78 टक्के कमी होतो तर गेम लोड स्पीड आणि ग्राफिक्स पण फास्ट होतात.

Vivo Z1 Pro एंडरॉयड आधारित फनटच ओएस 9.0 सह 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 720 एआई चिपसेट वर चालतो तर ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 616 जीपीयू आहे. Vivo Z1 Pro 6.53-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 16MP + 8MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन मधील 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी दीर्घकाळ गेमचा आनंद देते. फोनचा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 14,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

OPPO A5 2020

OPPO ‘ए सीरीज’ चा A5 2020 स्मार्टफोन पण गेम लवर्स साठी बेस्ट निवड ठरू शकतो. कंपनीने हा डिवाईस Game Boost 2.0 टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे जो PUBG किंवा Call Of Duty खेळताना फ्रेम आणि टच तर बूस्ट करतो सोबतच फोनची परफॉर्मेंस स्मूद करून पावर कन्जम्पशन पण 20 टक्क्यांपर्यंत कमी करतो. हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. तर ग्राफिक्स साठी OPPO A5 2020 मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे.

OPPO A5 2020 एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6 वर सादर केला गेला आहे. हा स्मार्टफोन 6.5-इंचाच्या नॅनो वॉटरड्रॉप नॉच एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वर 12MP + 8MP + 2MP + 2MP चा क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी हा स्मार्टफोन 8MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. दीर्घकाळ PUBG किंवा Call Of Duty खेळण्यासाठी फोन मध्ये 5,000एमएएच ची बॅटरी आहे. OPPO A5 2020 चा 4जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Moto G8 Plus

15,000 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या गेमिंग स्मार्टफोन्स मध्ये Motorola चे नाव पण आहे. ऑक्टोबर मध्ये लॉन्च झालेला Moto G8 Plus पण गेमिंगच्या बाबतीत शानदार आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. Motorola ने आपला फोन AI engine सह आणला आहे जो गेमिंगच्या वेळी फोनची परफॉर्मेंस सुधारतो. तर ग्राफिक्स साठी Moto G8 Plus एड्रेनो 610 जीपीयूला सपोर्ट करतो.

इतर स्पेसिफिकेशन्स पाहता Moto G8 Plus 6.3 इंचाच्या फुलएचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोटोग्राफी साठी या फोन मध्ये क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 48MP + 16MP + 5MP + मॅक्रो लेंस आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी हा फोन 25MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Moto G8 Plus मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. फोनचा 4जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here