BYD Atto 3 इलेक्ट्रिक एसयूव्हीचा नवा कलर व्हेरिएंट आला; जाणून घ्या किंमत

Highlights

  • BYD Atto 3 सह कंपनीनं BYD SEAL सादर केली आहे.
  • BYD Atto 3 34.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) वर उपलब्ध होईल.
  • BYD Atto ची साइज 132 मिमी आणि 275 मिमी लांब आहे..

BYD नं बऱ्याच दिवसांनी भारतीय बाजारात आपलं electric vehicles सादर करत आहे. आता कंपनीनं आपली नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करून Tata आणि MG ला टक्कर देण्याची तयारी केली आहे. कंपनीनं Auto Expo 2023 मध्ये BYD Atto 3 electric SUV चा नवा कलर व्हेरिएंट लाँच केला आहे. पुढे आम्ही BYD Atto 3 electric SUV Range, Price, Specs आणि Booking Detail ची सविस्तर माहिती दिली आहे. कंपनीनं BYD ATTO 3 सोबतच BYD SEAL देखील सादर केली आहे. परंतु हिच्या किंमतीचा खुलासा केला नाही.

BYD Atto 3 Electric SUV Price

BYD नं ऑटो एक्सपो 2023 मध्ये भारतात BYD Atto 3 इलेक्ट्रिक SUV चा एक नवीन लिमिटेड व्हर्जन लाँच केला आहे. नवीन BYD Atto 3 फॉरेस्ट ग्रीनचे 1200 यूनिट येतील आणि ही Atto 3 च्या तुलनेत महाग असेल. भारतात BYD Atto 3 ची किंमत 33.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरु होते आणि लिमिटेड व्हर्जन फॉरेस्ट ग्रीन BYD Atto 3 34.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) वर उपलब्ध होईल. नवीन कलर ऑप्शन व्यतिरिक्त BYD Atto 3 मध्ये सर्व काही सारखंच आहे. आता पर्यंत, BYD Atto 3 चार रंगात सादर करण्यात आली होती, SUV साठी फॉरेस्ट ग्रीन पाचवा ऑप्शन आहे.

BYD Atto 3 ची डिजाइन

BYD Atto 3 एक आकर्षक डिजाइनसह सादर करण्यात आली आहे. यात समोरच्या बाजूला एक जाडी क्रोम हॉरिजॉन्टल स्ट्रिप आहे जिच्या खाली एक एलईडी लाइट बार आहे, जी पुढे एलईडी डीआरएल पर्यंत पसरली आहे. एलईडी हेडलॅम्प पातळ आहेत, आणि टेल लॅम्प एक लाइटबारच्या माध्यमातून एकमेकाशी जोडले गेले आहेत. या कारमध्ये स्टाइलिश ड्युअल-टोन अलॉय व्हीलचा समावेश करण्यात आला आहे ज्यांचा आकार 18 इंच आहे. तसेच BYD नं व्हिज्युअल बल्क कमी करण्यासाठी बाहेर एयर वेंटचा वापर केला आहे. BYD Atto 3 ची साइज 4,445 मिमी लांब, 1,875 मिमी रुंद आणि 1,615 मिमी उंच आहे. हे देखील वाचा: स्वस्त आणि मस्त Moto G53 5G ची होणार बाजारात एंट्री; लाँच पूर्वीच वेबसाइटवर लिस्ट

BYD Atto 3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

BYD Atto 3 मध्ये वायरलेस फोन चार्जर, Android Auto, Apple CarPlay, 7 एयरबॅग, 360-डिग्री कॅमेरा, मल्टी-कलर एंबियंट लाइटिंग, अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल, इमरजेंसी ब्रेकिंग, रियर कोलिजन अलर्ट, ब्लाइंडस्पॉट मॉनिटरिंग सारखे फीचर्स मिळतात.

तसेच या इलेक्ट्रिक कारमध्ये 60.48 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 80 kW DC फास्ट चार्जिंगसह येते. कंपनीनं दावा केला आहे की कारची बॅटरी 0 ते 80 टक्क्यापर्यंत फक्त 50 मिनिटांत चार्ज होते. तसेच कारमध्ये Type 2 AC चार्जर आहे जो 10 तासांमध्ये कार फुल चार्ज करेल.

या electric SUV मध्ये 3.3 kW लोडचा पावर बॅकअप मिळतो. तसेच BYD Atto 3 मध्ये 7 kW AC चार्जर आणि 3kW पोर्टेबल चार्जिंग बॉक्स मिळतो. इतकेच नव्हे तर ही कार एकदा चार्ज केल्यावर 521KM ची रेंज मिळते हे देखील वाचा: फक्त 18 मिनिटांत 80 टक्के चार्ज होणार इलेक्ट्रिक कार; 631km रेंजसह Hyundai Ioniq 5 ची एंट्री

बॅटरीवर मिळेल वॉरंटी

BYD Atto 3 मध्ये 6 वर्ष/1.5 lakh km ची वॉरंटी मिळते. तसेच बॅटरी पॅकवर 8 वर्ष/1.60 lakh km ची वॉरंटी देण्यात आली आहे. प्रोमोशनल बेनिफिट्स पाहता यात 3 वर्षांचे 4G डेटा सब्सक्रिप्शन आणि 6 फ्री सर्व्हिस मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here