Gmail, Outlook आणि Yahoo वर बिना झंझट बनवा ईमेल आयडी, अशी आहे सर्वात सोपी पद्धत

इंटरनेट घरोघरी आल्यामुळे Email ID आवश्यक झाला आहे. स्मार्टफोनमध्ये लॉगइन करायचं असेल किंवा ऑनलाइन एखादं काम करायचं असेल तर ईमेल-आयडी असणं आवश्यक आहे. ऑफिशियल काम असो किंवा ऑनलाइन सर्व्हिस वापरायची असो ईमेल आयडी लागतोच. ऑनलाइन सेवा जसे की सरकारी काम, बँक अपडेट, वीज बिल पेमेंट, तिकीट बुकिंग आणि ऑनलाइन शॉपिंग सारख्या सेवा वापरण्यासाठी ईमेल आयडी असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे आतापर्यंत ईमेल अकाऊंट नसेल तर आज आम्ही तुम्हाला लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर ईमेल आयडी कसा बनवायचा हे सांगणार आहोत.

ईमेल आयडी कसा बनवायचा

सध्या ईमेल आयडीसाठी अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत, ज्यात गुगलचा जीमेल, मायक्रोसॉफ्टचं आउटलुक आणि याहू हे लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. इथे आम्ही तुम्हाला ह्या तिन्ही प्लॅटफॉर्मवर ईमेल आयडी बनवण्याची संपूर्ण माहिती देणार आहोत.

  • Gmail आयडी कसा बनवायचा
  • Outlook आयडी कसा बनवायचा
  • Yahoo आयडी कसा बनवायचा

Gmail आयडी

Gmail सर्वाधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे जी गुगलची ई-मेल सर्व्हिस आहे. हे सर्व अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्ससाठी आवश्यक आहे कारण जीमेल आयडीनं गुगलचे अ‍ॅप्स जसे की Google Play आणि सर्व्हिसेसवर लॉगइन करता येतं. विशेष म्हणजे तुम्ही साइन इन करताच तुम्हाला गुगल ड्राईव्हमध्ये 15GB स्टोरेज मिळते. ज्याचा वापर इमेज, व्हिडीओ, इमेल सेव्ह करण्यासाठी करता येईल.

Gmail ID कसा बनवायचा?

  • सर्वप्रथम गुगल अकाऊंट Google Account क्रिएशन पेजवर जा. गुगल अकाऊंट क्रिएशन पेजसाठी इथे क्लिक करा.
  • इथे तुमचं संपूर्ण नाव, युजरनेम आणि पासवर्ड सारखी आवश्यक माहिती भरा आणि नेक्स्टवर क्लिक करा.
  • फोन नंबर आणि रिकव्हरी ईमेल आयडी भरा. (ऑप्शनल आहे.)
  • तुमची जन्मतारीख आणि लिंग इत्यादी माहिती भरा आणि नेक्स्टवर क्लिक करा.
  • सर्व माहिती भरल्यावर तुमचा जीमेल आयडी (Gmail ID) तयार होईल.

Outlook ID <

Outlook मायक्रोसॉफ्टची ईमेल सर्व्हिस आहे. भारतात अनेक कंपन्यांमध्ये आउटलुकचा वापर केला जातो. मायक्रोसॉफ्ट देखील गुगल प्रमाणे 15GB स्टोरेजचा ऑप्शन देतो. त्याचबरोबर Microsoft 365 युजर्सना 50GB स्पेस मिळते.

Outlook ID कसा बनवायचा?

  • Microsoft Outlook साइन-अप पेजवर जा. साइन-अप पेजसाठी इथे क्लिक करा.
  • इथे ‘क्रिएट फ्री अकाऊंट’ (Create free account) वर क्लिक करा.
  • आउटलुक अकाऊंटसाठी तुमचं युजर नेम टाइप करा आणि ड्रॉप डाउनवर जाऊन डोमने चेक करा की तुम्हाला Outlook.com की Outlook.in की hotmail.com हवं त्यावर क्लिक करा आणि नेक्स्टवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचं नाव टाका आणि नेक्स्टवर क्लिक करा आणि पुढील पेजवर डेट ऑफ बर्थ सारखी माहिती टाका आणि नेक्स्टवर क्लिक करा.
  • पुढील पेजवर तुम्हाला एक सोप्या कोड्याचं उत्तर द्यावं लागेल. जेणेकरून तुम्ही रोबोट नाही हे सिद्ध होईल.
  • कोडं सोडवल्यावर तुमचा आउटलुक आयडी तयार होईल.

Yahoo Email Id

Yahoo गुगल आणि मायक्रोसॉफ्टच्या तुलनेत खूप जुना इमेल प्रोव्हायडर आहे. Yahoo च्या इमेल आयडीची सर्वात खास बाब म्हणजे तुम्हाला सुमारे 1TB (1000 GB) फ्री क्लाउड स्टोरेज मिळते. जिचा वापर तुम्ही डेटा सेव्ह करण्यासाठी करू शकता. तसेच याहू व्हायरस प्रोटेक्शन आणि स्पॅम शॉर्टिंग सारखे फीचर्सही आहेत.

Yahoo Email Id कसा तयार करायचा

  • Yahoo च्या अकाऊंट क्रिएशन पेजसाठी इथे क्लिक करा.
  • इथे नाव, इमेलसाठी युजर नेम, पासवर्ड आणि जन्मतारीख सारखी माहिती देऊन नेक्स्टवर क्लिक करा.
  • पुढील पेजवर फोन नंबर टाकून ओटीपीच्या माध्यमातून मोबाइल व्हेरिफाय करा.
  • ह्या सर्व स्टेप फॉलो करून तुमचं अकाऊंट सेटअप करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here