Exclusive : Realme 5 Pro मध्ये नसेल 64-मेगापिक्सलचा कॅमेरा, जाणून घ्या या फोन संबंधित महत्वाची माहिती

Realme ने घोषणा केली आहे कि कंपनी उद्या म्हणजे 8 ऑगस्टला जगासमोर आपला 64-मेगापिक्सल कॅमेरा टेक्नॉलॉजी प्रदर्शित करेल. हा ईवेंट दिल्ली मध्ये आयोजित किया जाएगा आणि इंडियन मंचावरून जगात पहिल्यांदा Realme ची 64MP Quad Camera टेक्नॉलॉजी समोर येईल. Realme च्या घोषणेनंतर अंदाज लावला जात होता कि हि टेक्नॉलॉजी असलेल्या स्मार्टफोनचे नाव Realme 5 Pro असेल. पण 91मोबाईल्सला एक्सक्सूसिव माहिती मिळाली आहे कि कंपनी Realme 5 Pro लॉन्च करेल परंतु या फोन मध्ये 64-मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाणार नाही.

91मोबाईल्सला इंडस्ट्री संबंधित सूत्रांनी सांगितले आहे कि Realme लवकरच भारतात आपली स्मार्टफोन सीरीज वाढवणार आहे. कंपनीच्या लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्सची नावे Realme 5 आणि Realme 5 Pro असेल. हे दोन्ही स्मार्टफोन या महिन्याच्या शेवटपर्यंत या भारतीय बाजारात येतील. सूत्रांनुसार Realme 5 आणि Realme 5 Pro दोन्ही स्मार्टफोन 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च होतील.

फोन मध्ये असेल क्वॉड कॅमेरा

Realme 5 आणि Realme 5 Pro संबंधित अजून एक बाब स्पष्ट झाले आहे कि हे दोन्ही स्मार्टफोन 64-मेगापिक्सल कॅमेरा टेक्नॉलॉजी सह येणार नाहीत. आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार हे दोन्ही स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह येतील. म्हणजे दोन्ही फोन मॉडेल मध्ये 4 रियर कॅमेरा दिले जातील. Realme 5 मध्ये 16 मेगापिक्सलचा प्राइमरी क्वॉड कॅमेरा दिला जाईल तर Realme 5 Pro मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी क्वॉड कॅमेरा दिला जाईल.

Realme आपल्या आगामी स्मार्टफोन्स मध्ये खूप बदल करणार आहे. Realme 5 आणि Realme 5 Pro या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये क्वालकॉमचा चिपसेट दिला जाईल. त्याचप्रमाणे आतापर्यंत ‘वी’ शेप नॉच वर फोन सादर करत होते तर Realme 5 आणि Realme 5 Pro मध्ये नॉच आधीपेक्षा छोटी आणि ‘यू’ शेप मध्ये असेल. विशेष म्हणजे Realme 5 Pro कंपनी एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च करेल.

Madhav ‘5’ Quad

Realme इंडियाच्या हेड माधव सेठ यांनी पण आपल्या ट्वीटर हँडेलचे यूजरनेम बदलून Madhav ‘5’ Quad ठेवले. हे यूजरनेम पण कंपनीच्या आगामी स्मार्टफोन Realme 5 आणि Realme 5 Pro कडे ईशारा करतात तसेच फोन मध्ये दिल्या जाणाऱ्या क्वॉड रियर कॅमेऱ्याचा पण खुलासा करतो. पण आम्ही आमच्या रिपोर्ट मध्ये अशी माहिती दिली आहे कि रियलमीच्या Realme 5 आणि Realme 5 Pro दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये 64-मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाणार नाही.

इनपुट : केशव खेडा

रियलमी एक्स वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here