iPhone SE 2020 ला टक्कर देण्यासाठी गूगल घेऊन येत आहे ‘स्वस्त’ Pixel फोन, 13 जुलैला होऊ शकतो लॉन्च

Google च्या आगामी पिक्सल फोन Pixel 4a च्या लॉन्च बद्दल अनेक दिवसांपासून लीक बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी समोर आले होते कि कंपनी हा डिवाइस मे किंवा जून मध्ये लॉन्च करेल. पण आता एका नवीन लीक समोर आला आहे, ज्या नुसार फोन 13 मे ला सादर केला जाईल. बोलले जात आहे कि हा कंपनीचा दुसरा सर्वात अफोर्डेबल फोन असेल. याआधी कंपनीने गूगल पिक्सल 3a लॉन्च केला आहे. कंपनीने गेल्यावर्षी मे मध्ये पिक्सल 3a लॉन्च केला होता. विशेष म्हणजे कंपनी गूगल I/O कॉन्फ्रेंस मध्ये हा फोन लॉन्च करणार होती पण हा इवेंट कोविड-19 मुळे रद्द झाला. गेल्या महिन्यात गूगलच्या या बजेट फोनची किंमत पण समोर आली आहे. हा फोन 399 डॉलर म्हणजे जवळपास 30,500 रुपयांच्या किंमतीत सादर केला जाईल. जर या किंमतीत हा फोन भारतात आला तर नक्कीच आईफोन एसई 2020 ला टक्कर देईल.

Jon Prosser नावाच्या टिप्सटरने ट्विट करून याची माहिती दिली आहे कि कंपनी गूगल पिक्सल 4ए 13 जुलैला सादर करू शकते. तसेच ट्विट मध्ये माहिती देण्यात आली आहे कि फोन फक्त 4G वेरिएंट मध्ये सादर केला जाईल. हँडसेट Just Black आणि Barely Blue कलर ऑप्शन सह येईल.

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक नुसार हा फोन पिक्सल 3ए प्रमाणेच प्लास्टिक बॉडी वर सादर केला जाईल. रिपोर्टनुसार पिक्सल 4ए पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल आणि या फोन मध्ये 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 5.81 इंचाची ओएलईडी स्क्रीन मिळेल. लीकनुसार हा फोन आक्टाकोर प्रोसेसरला सपोर्ट करेल, सोबतच Google Pixel 4a मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 730 चिपसेट मिळेल. ग्राफिक्ससाठी या गूगल फोन मध्ये ऐड्रेनो 618 जीपीयू असल्याचे समोर आले आहे.

Google Pixel 4a च्या बॅक पॅनल वर चौकोनी आकाराचा कॅमेरा सेटअप दिला जाईल जो डावीकडे असेल. फोटोग्राफीसाठी 12.2 मेगापिक्सल सेंसर असलेला रियर कॅमेरा सेटअप असल्याचे सांगण्यात आले आहे जो ओआईएस व आटोफोकस सारख्या फीचर्स सह येईल. तसेच सेल्फीसाठी या फोन मध्ये 84 डिग्री फिल्ड व्यू असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. लीकनुसार पिक्सल 4ए 6 जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल तसेच हा फोन 64 जीबी स्टोरेज आणि 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करेल.

गूगल पिक्सल 4ए बद्दल या लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन गूगलच्या टाइटेन एम सिक्योरिटी चिप सह येईल तसेच या डिवाइस मध्ये हेडफोन जॅक पण दिला जाईल. लीक नुसार Google Pixel 4a ब्लॅक आणि ब्लू कलर मध्ये लॉन्च केला जाईल आणि या फोनची किंमत 399 यूएस डॉलरच्या आसपास म्हणजे जवळपास 40,000 रुपये असेल. या लीक वर विश्वास ठेवल्यास Google Pixel 4a इंडियन मार्केट मध्ये पण लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे हार्डवेयरमुळे Google Pixel 4 भारतात लॉन्च झाला नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here