200 यूनिट मोफत वीज देत आहे कर्नाटक सरकार, अशी आहे ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत

कर्नाटक सरकारनं राज्यात सर्व नागरिकांना मोफत वीज सब्सिडी देण्याची घोषणा केली आहे. सरकार गृह ज्योती योजनाच्या माध्यमातून सब्सिडी देत आहे. जिचा लाभ घेण्यासाठी लोकांना सेवा सिंधु पोर्टलवर नोदंणी करावी लागेल. पुढे आम्ही कर्नाटकात मोफत वीज सब्सिडीसाठी अर्ज करण्याची पद्धत सांगितली आहे.

मोफत विजेसाठी पुढील स्टेप फॉलो करून करा अर्ज

न्यू युजर रजिस्ट्रेशन

  • सर्वप्रथम Seva Sindhu वेबसाइट (https://sevasindhuservices.karnataka.gov.in) वर जा.
  • त्यानंतर रजिस्टर करण्यासाठी तुमचा आधार नंबर एंटर करा आणि captcha code एंटर करा.
  • त्यानंतर नेक्स्टवर क्लिक केल्यावर तुम्ही Digilocker वर पोहोचाल.
  • त्यानंतर आधार ओटीपी टाकून कन्टिनियूवर क्लिक करा.
  • त्यानंतर सर्व परमिशनचा अ‍ॅक्सेस द्या.
  • पुढील पेजवर तुमचा ई-मेल आयडी, मोबाइल नंबर टाका. त्यानंतर गाइडलाइननुसार पासवर्ड बनवा आणि कॅप्चा टाकून सबमिट करा.
  • आता तुम्हाला तुमच्या मेल आयडी आणि मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.
  • ओटीपी टाकल्यानंतर तुमचं अकाऊंट Seva Sindhu वेबसाइटवर बनेल.

युजर लॉगइन

  • रजिस्ट्रेशन नंतर पुन्हा Seva Sindhu होमपेज (https://sevasindhuservices.karnataka.gov.in) वर या.
  • होमपेजवर ई-मेल आयडी किंवा मोबाइल नंबर टाका व ओटीपी किंवा पासर्वड टाकून लॉग इन करा.
  • लॉग इन केल्यानंतर “Apply for Service” सिलेक्ट करा.
  • त्यानंतर सर्व डिटेल्स भरून सबमिट करा.
  • त्यानंतर तुम्हाला अ‍ॅप्लीकेशन रेफरन्स नंबर मिळेल, जो तुम्ही भविष्यात वापरू शकता.

अ‍ॅप्लीकेशन ट्रॅकिंग

  • पोर्टलवर जाऊन “Check Your Application Status” टॅबमध्ये अ‍ॅप्लीकेशन रिफ्रेंस नंबर टाका.
  • त्यानंतर Gruha Jyoti application ची माहिती आणि स्टेटस तुमच्यासमोर येईल.

ऑफलाइन अ‍ॅप्लीकेशन

ग्राहक ऑफलाइन देखील अर्ज करू शकतात. ह्यासाठी, तुम्हाला कर्नाटक राज्यातील कर्नाटक वन, ग्राम वन आणि बँगलोर वन केंद्रात फॉर्म आणि कागदपत्र द्यावे लागतील.

रजिस्ट्रेशन डेट

Gruha Jyoti साठी ऑनलाइन अर्ज 18 जूनपासून सुरु झाला आहे.

Gruha Jyoti योजनेत कोण अर्ज करू शकतं?

  • कर्नाटकातील सर्व रहिवाशी ग्राहक ह्यात अर्ज करू शकतात.
  • व्यावसायिक सेटअप मोफत वीज योजनेसाठी पात्र नाही.
  • योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ग्राहकांना आपली ग्राहक आयडी/अकाऊंट आयडी आधार कार्डशी लिंक करावी लागेल आणि उर्वरित थकबाकी भरावी लागेल .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here