जगातील कोट्यवधी युजर्स व्हॉट्सअॅप वापरतात. व्हॉट्सअॅपवर युजर्स एकमेकांना टेक्स्ट मेसेज, व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल करू शकतात. जर तुम्ही आतापर्यंत व्हॉट्सअॅपवरून व्हिडीओ कॉल केला नसेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ह्या प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्ही कशाप्रकारे तुमच्या मोबाइल किंवा कंप्यूटरवरून व्हिडीओ कॉल करू शकता. इथे आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे.
मोबाइलवरून व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल कसा करायचा?
व्हॉट्सअॅपवरून व्हिडीओ कॉल करणं खूप सोपं आहे. लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅपवरून व्हिडीओ कॉल करण्यासाठी.
स्टेप 1 : सर्वप्रथम ज्या कॉन्टॅक्टला व्हिडीओ कॉल करायचा आहे त्यावर टॅप करा.
स्टेप 2 : आता तुम्हाला स्क्रीनवर दिसलेल्या दिख व्हिडीओ कॅमेरा आयकॉनवर क्लिक करा. तुम्ही ज्यांना कॉल केला आहे त्यांनी जर तुमचा कॉल रिसिव्ह केला तर तुमचा व्हिडीओ कॉल सुरु होईल.
व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल सुरु झाल्यावर बाय डिफॉल्ट फ्रंट फेसिंग कॅमेरा ऑन असतो. तुम्ही रियर कॅमेऱ्यावर स्विच करू शकता. तसेच तुम्ही कॉल दरम्यान मायक्रोफोन म्यूट देखील करू शकता. त्याचबरोबर कॉल दरम्यान ऑडियो लेव्हल वॉल्यूम बटननं कमी जास्त करता येते.
कंप्यूटरवरून व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल कसा करायचा?
कंप्यूटरवरून व्हिडीओ कॉल करणं सोपं आहे. पुढे आम्ही तुम्हाला स्टेप-बाय-स्टेप माहिती दिली आहे.
स्टेप 1 : सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या विंडो किंवा मॅक कंप्यूटरवर व्हॉट्सअॅप अॅप इंस्टॉल करावं लागेल.
स्टेप 2 : ज्यांना कॉल करायचा आहे त्यांच्या कॉन्टॅक्टवर क्लिक करा. स्क्रीनवर दिसलेल्या व्हिडीओ कॅमेरा आयकॉनवर क्लिक करा. कॉल रिसिव्ह होताच तुमचा व्हिडीओ कॉल सुरु होईल. व्हिडीओ कॉलसह तुम्ही इतर कॉन्टॅक्ट्सशी चॅट देखील करू शकता.
व्हिडीओ कॉलच्या डिस्प्लेवर तुम्हाला कॅमेरा आणि मायक्रोफोन ऑफ किंवा ऑन करण्याचे टॉगल बटन मिळतील.
व्हॉट्सअॅपवर ग्रुप व्हिडीओ कॉल कसा करायचा?
व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल दरम्यान तुम्ही 32 सदस्यांसह एकत्र व्हिडीओ कॉल करू शकता. इथे आम्ही तुम्हाला ग्रुप व्हिडीओ कॉलची माहिती दिली आहे.
स्टेप 1 : सर्वप्रथम एका कॉन्टॅक्टला व्हिडीओ कॉल करा. कॉल रिसिव्ह झाल्यावर तुम्ही इतर लोकांना कॉलमध्ये जोडू शकता.
स्टेप 2 : ग्रुप कॉलसाठी इन-कॉल स्क्रीनमध्ये वरच्या बाजूला अॅरो आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर Add Participant वर क्लिक करा. इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट लिस्ट दिसेल ज्यातून तुम्ही त्या लोकांना कॉल करू शकाल, ज्यांना ग्रुप कॉल मध्ये जोडायचं आहे.