सुरू झाली 1जीबीपीएस स्पीड वाल्या जियो गीगाफाइबरची नोंदणी, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सविस्तर

साल 2016 मध्ये रिलायंस जियो ने आपल्या 4जी मोबाइल सर्विस ची सुरवात केली होती. लॉन्च सोबतच कंपनी ने अनेक रेकॉर्ड बनवले आहेत आणि भारतीय मोबाईल बाजार बदलून टाकला आहे. तर गेल्यावर्षी 2017 मध्ये कंपनी ने 4जी फीचर फोन जियोफोन लॉन्च केला होता आणि आता पर्यंत या फोनने अनेक उच्चांक प्रस्थापित केले आहेत. तसेच साल 2018 मध्ये कंपनी ने आपल्या अल्ट्रा फास्ट स्पीड वाल्या ब्रॉडबँड सर्विस ची सुरवात केली आहे आणि याबद्दलची चर्चा खुप आधी पासून सुरू झाली आहे. गेल्या महिन्यात मुकेश अंबानी ने जियोच्या गीगाफाइबर सर्विस बद्दल सांगितले होते आणि आज पासून या सर्विस साठी ​रजिस्ट्रेशन पण सुरु झाले आहे आणि तुम्ही यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता.

गीगा​फाइबरचा स्पीड
जियो च्या गीगा​फाइबर सर्विस मध्ये कंपनी 1जीबीपीएस पर्यंत स्पीड असलेली ब्रॉडबँड सर्विस देऊ शकते. कंपनी ने सर्विस बद्दलच्या माहिती सोबत काही कनेक्टेड डिवाइस बद्दल pan सांगितले आहे. या सुपर फास्ट इंटरनेट वर तुम्ही घरातील सर्व मोबाइल, टीवी आणि इलेक्ट्रॉनिक डिवाइस सह अनेक गोष्टी कनेक्ट करू शकता. जियो चा दावा आहे की या यूजर्सना यातून जवळपास दसपट स्पीड मिळेल.

कुठे मिळेल सर्विस
जियो च्या ​गीगाफाइबर सर्विस बद्दल सांगताना मुकेश अंबानी यांनी सांगितले होते की यासाठी सध्या देशातील 1100 शहरांमध्ये नोंदणी सुरू होईल. तसेच ज्या शहरातून जास्त रजिस्ट्रेशन येतील तिथे सर्वात आधी सेवा सुरू करण्यात येईल. पण जियो गीगाफाइबर चा ट्रायल कंपनी 10,000 पेक्षा जास्त शहरांमध्ये केला आहे त्यामुळे अशा आहे की लॉन्च काही दिवसांनी इतर शहरांमध्ये पण सेवा उपलब्ध होईल.

शुल्क किती असेल
सध्या रजीस्ट्रेशन ची कॉस्ट ​शून्य आहे. म्हणजे नि:शुल्क तुम्ही जियो गीगाफाबर सर्विस साठी रजिस्ट्रेशन करू शकता. कंपनी ने आता पर्यंत सर्विस कॉस्ट सांगितली नाही पण मिळालेल्या माहितीनुसार 500 रुपयांपासून सुरवात होऊ शकते.

लॉन्च कधी होईल
जियो गीगाफाइबर साठी आता फक्त रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे पण आशा आहे की कंपनी दिवाळी पर्यंत ही लॉन्च होऊ शकते. सध्या एक साथ 1,100 शहरांमध्ये लॉन्च होणार नाही. बोलले जात आहे की ही सेवा आधी 80 मेट्रो शहरांमध्ये सुरू होऊ शकते.

कसे करावे गीगाफाइबर साठी रजिस्ट्रेशन
रिलायंस जियो च्या ​गीगाफाइबर सर्विस ची रजिस्ट्रेशन प्रक्रिया खुप सोप्पी आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट jio.com किंवा माय जियो अॅप मधून करू शकता.

माय जियो अॅप मधून रजिस्ट्रेशन
अॅप मधून रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला माय जियो अॅप ओपन करवा लागेल. त्यानंतर तुम्हाला लोकेशन विचारण्यात येईल. तुम्ही चेंज वर क्लिक करून तुम्ही तुमच्या घरचे किंवा आॅफिस चे लोकेशन टाकू शकता.

लोकेशन आॅन करताच तुम्हाला तुमची माहिती विचारली जाईल. जसे की नाव आणि मोबाईल नंबर ​इत्यादी. ती दिल्यानंतर अग्री करून सबमिट करताच तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. त्यानंतर पत्ता टाकल्या नंतर तुमचे काम पूर्ण होईल. तुम्ही इथून लोकांना रजिस्ट्रेशन साठी इनवाइट पण करू शकता. रजिस्ट्रेशन प्रक्रिया मोफत आहे.

जियो वेबसाइट वरून रजिस्ट्रेशन
वेबसाइट वरून जियो गीगाफाइबर चे ​रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला Jio.com वेबसाइट वर जावे लागेल. तिथे इनवाइट जियो गीगाफाइबर नाउ चा पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा. एक नवीन विंडो उघडेल तिथे तुम्हाला लोकेशन टाकावे लागेल. तुम्ही घराचे किंवा आॅफिस चे लोकेशन टाकू शकता. लोकेशन टाकण्यासाठी चेंज वर क्लिक करा आणि संपूर्ण पत्ता सविस्तर द्यावा लागेल.

लोकेशन टाकताच तुमच्याकडे नाव आणि मोबाईल नंबर मागण्यात येईल. तो देताच मोबाईल वर ओटीपी येईल आणि तो टाकून पुढे जा. त्यानंतर पत्ता टाकून सबमिट करताच तुमचे काम पूर्ण होईल. तिथून पण तुम्ही इतरांना रजिस्ट्रेशन साठी इनवाइट करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here