HTC चे 3 दमदार फोन झाले वेबसाइट वर लिस्ट, चीनी स्मार्टफोन्सना टक्कर देण्यासाठी होतील लवकरच लॉन्च

HTC Wildfire E Lite, Wildfire E Ultra आणि Wildfire E Star लवकरच लॉन्च होतील. या तिन्ही फोन्सना EEC सर्टिफिकेशन्स मिळाले आहे. लिस्टिंग मध्ये HTC U20 5G आणि Desire 20 Pro हँडसेट पण दिसत आहेत जे यावर्षी जून मध्ये लॉन्च झाले आहेत. EEC सर्टिफिकेशन्स वरून माहिती मिळाली आहे कि फोन्स यूरोप मध्ये सादर होतील. पण लॉन्च डेट बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. HTC’s Wildfire सीरीज बजेट कॅटेगरी आणि मिड-रेंज सेगमेंट मध्ये येतील आशा आहे कि आगामी Wildfire E Lite, Wildfire E Ultra आणि Wildfire E Star पण याच कॅटेगरी मध्ये सादर केले जातील. लवकरच HTC Wildfire फोन बाबत जास्त ज्यादा माहिती समोर येऊ शकते.

HTC U20 5G आणि Desire 20 Pro चे स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता एचटीसी यू20 5जी मध्ये 6.8 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) होल-पंच डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 765जी प्रोसेसर आणि 8 जीबी रॅम देण्यात आला आहे. इंटरनल स्टोरेजसाठी फोन मध्ये 256 जीबी स्पेस आहे. फोटोग्राफीसाठी फोन मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात f/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, f/2.2 अपर्चर सह याचा सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आणि 118 वाइड-अँगल फील्ड ऑफ व्यू देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त इत्तर दोन कॅमेरे 2 मेगापिक्सलचे आहेत. फ्रंटला यूजर्सना f/2.0 अपर्चर सह 32 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.

पावर बॅकअपसाठी एचटीसी यू20 5जी फोन मध्ये 5,000 एमएएच बॅटरी सह क्विक चार्ज 4.0 (18W पर्यंत) सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिविटीसाठी फोन मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, AGPS, Beidou, GLONASS, एनएफसी, ब्लूटूथ वी5, वाई-फाई 802.11ac (2.4GHz आणि 5GHz) 5जी सारखे अनेक ऑप्शन आहे. सोबतच डिवाइस एंडरॉयड 10 वर चालतो. Desire 20 Pro फोन मध्ये तुम्हाला 6.5 इंच फुल-एचडी+ (1,080×2,340 पिक्सल) होल-पंच डिस्प्ले मिळतो. फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन मध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे.

फोटोग्राफीसाठी एचटीसी डिजायर 20 प्रो मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो HTC U20 5G प्रमाणे आहे. यात फक्त सेल्फी कॅमेऱ्याचा फरक आहे. फोनच्या फ्रंटला f/2.0 अपर्चर असलेला 25 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी एचटीसी डिजायर 20 प्रो फोन मध्ये पण 5,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिविटीसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट, 3.5 एमएम ऑडियो जॅक, जीपीएस, एनएफसी, ब्लूटूथ वी5, वाई-फाई 802.11ac (2.4GHz आणि 5GHz) 5जी सारखे ऑप्शन आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here