लॉन्च झाला भारतातील सर्वात स्वस्त 5000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम असलेला फोन Infinix Hot 8, Xiaomi-Realme ला मिळेल टक्कर

Infinix ने काही दिवसांपूर्वी सांगितले होते कि कंपनी भारतात आपला स्मार्टफोन प्रोर्टफोलियो वाढवणार आहे आणि नवीन डिवाईस Hot 8 लॉन्च करेल. त्यानुसार आज कंपनीने Infinix Hot 8 सादर केला आहे. शानदार लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन लो बजेट सेग्मेंट मध्ये आला आहे जो ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरच सेल साठी उपलब्ध होईल.

Infinix Hot 8 लुक

Infinix ने हा स्मार्टफोन बेजल लेस ड्यूड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे. डिस्प्ले दोन्ही बाजूने बेजल लेस आहे आणि वरच्या बाजूला ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. फोन डिस्प्लेच्या खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. Infinix Hot 8 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये फ्लॅश लाईट पण आहे. दोन सेंसर फ्लॅश लाईट वर आहेत तर एक सेंसर फ्लॅशच्या खाली आहे.

Infinix Hot 8 च्या बॅक पॅनल वर मधोमध रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. रियर पॅनल वर खालच्या बाजूला Infinix ची ब्रॅण्डिंग आहे. फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. या पोर्टच्या एका बाजूला साईड स्पीकर आहे तर दुसऱ्या बाजूला 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे. Infinix Hot 8 च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे तसेच डाव्या बाजूला सिम स्लॉट आहे.

Infinix Hot 8 स्पेसिफिकेशन्स

Infinix Hot 8 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वरील मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो. कंपनीने Infinix Hot 8 4जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला गेला आहे जो 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Infinix Hot 8 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर इनफिनिक्स हॉट 8 मध्ये 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी हा स्मार्टफोन 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सपोर्ट करतो.

Infinix Hot 8 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटी साठी हा फोन रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअप साठी Infinix Hot 8 मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. किंमतीबद्दल बोलायचे तर Infinix Hot 8 6,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच हा फोन 12 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विकत घेता येईल. विशेष म्हणजे Infinix Hot 8 31 ऑक्टोबर पर्यंत या किंमतीत विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here