जाणून घ्या कसं बनवायचं इंस्टाग्राम अकाऊंट, अशी आहे सोपी पद्धत

इंस्टाग्राम सध्या तरुणाईत खूप लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जर तुम्हाला देखील इंस्टाग्रामवर अकाऊंट बनवायचं असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. इंस्टाग्रामवर दोन प्रकारे अकाऊंट बनवता येईल. ह्या प्लॅटफॉर्मवर नवीन अकाऊंट इंस्टाग्रामच्या अ‍ॅप आणि वेबसाइट Instagram.com वरून बनवता येतं. इथे आम्ही तुम्हाला इंस्टाग्रामचं नवीन अकाऊंट बनवण्याची स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे. इंस्टाग्रामवर अकाऊंट बनवण्यासाठी तुमचं वय 13 वर्षांपेक्षा जास्त असलं पाहिजे.

असं बनवा इंस्टाग्रामवर नवीन अकाऊंट

स्टेप 1 : सर्वप्रथम तुमच्या कंप्यूटरवर इंस्टाग्रामची वेबसाइट instagram.com ओपन करा.

स्टेप 2 : वेबसाइट ओपन केल्यानंतर ‘Sign Up’ वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या ईमेल किंवा मोबाइल नंबरसह संपूर्ण नाव, युजरनेम आणि पासवर्ड बनवून Sing Up वर क्लिक करा.

नोट : जर तुम्ही ईमेलद्वारे साइन इन केलं तर अचूक ईमेल अ‍ॅड्रेस द्या आणि तो लक्षात ठेवा. जर तुम्ही लॉगआउट केलं आणि पासवर्ड विसरलात तर इंस्टाग्राम अकाऊंट अ‍ॅक्सेससाठी तुम्हाला ईमेल आयडी आवश्यक आहे.

स्टेप 3 : पुढील पेजवर तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकावी लागेल आणि Next वर क्लिक करा. जर तुम्ही बिजनेस अकाऊंट क्रिएट करत असाल तरी तुमची जन्मतारीख टाका.

स्टेप 4 : पुढील पेजवर कंफर्मेशन कोड द्यावा लागेल. हा कोड तुम्हाला ईमेल आणि मोबाइल नंबरवर मिळेल.

स्टेप 5 : पुढील पेजवर तुमच्या समोर इंस्टाग्रामची टर्म्स अँड पॉलिसी दिसतील. अकाऊंट बनवण्यासाठी Agree बटनवर क्लिक करून पुढे जा.

स्टेप 6 : पुढे तुम्हाला तुमचा इंस्टाग्राम प्रोफाईल फोटो अपलोड करावा लागेल. जर तुम्ही प्रोफाईल फोटो नंतर अपलोड करायचा असेल तर स्किप बटनवर टॅप करा. तुमचं इंस्टाग्राम अकाऊंट तयार आहे.

फेसबुक अकाऊंट असेल तर असा बनवा इंस्टाग्राम अकाऊंट

तुमच्याकडे फेसबुक अकाऊंट असेल तर तुम्ही त्या अकाऊंटच्या मदतीनं इंस्टाग्राम अकाऊंट बनवू शकता. दोन्ही अकाऊंट एकाच लॉगइन पासवर्डनं अ‍ॅक्सेस करता येतील. तसेच तुम्ही दोन्ही अकाऊंटची प्रोफाईल इंफॉर्मेशन जसे की नाव, प्रोफाईल फोटो, युजरनेम आणि अवतार सिंक करू शकता. त्याचबरोबर अकाऊंट सेंटरवरून तुम्ही दोन्ही अकाऊंट एकत्र मॅनेज करू शकता.

स्टेप 1 : सर्वप्रथम कंप्यूटरमध्ये इंस्टाग्रामची वेबसाइट ओपन करा.

स्टेप 2 : वेबसाइट ओपन केल्यावर लॉगइन विथ फेसबुक लिंकवर क्लिक करा. पुढील पेजवर फेसबुकच्या आयडी पासवर्डनं लॉगइन करा. त्यानंतर नाव, प्रोफाईल फोटो आणि अवतार सिंक करा.

स्टेप 3 : पुढील पेजवर इंस्टाग्रामची टर्म अँड पॉलिसी दिसतील, त्या अ‍ॅक्सेप्ट केल्यावर तुमचा अकाऊंट तयार होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here