एक्सक्लूसिव : पुढील आठवड्यात लॉन्च होईल लावाचा पहिला नॉच असलेला फोन, यात असेल 3जीबी रॅम आणि 13-एमपी कॅमेरा, किंमत असेल 9,999 रुपये

इंडियन स्मार्टफोन कंपनी लावा ने लो-बजेट सेग्मेंट मध्ये प्राविण्य मिळवले आहे. लावाचे फोन कमी किंमतीती चांगले स्पेसिफिकेशन्स देतात आणि हीच कंपनी आता कमी बजेट मध्ये नॉच डिस्प्ले असलेला फोन आणणार आहे. 91मोबाईल्सला एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि लावा यावंच महिन्यात आली झेड सीरीज वाढवत भारतात एक नवीन स्मार्टफोन आणेल. लावा आपला हा फोन झेड92 नावाने बाजारात आणेल आणि याची किंमत 9,999 रुपये असेल.

91मोबाईल्सला मिळालेल्या माहितीनुसार लावा येत्या 29 जानेवारीला झेड92 नावाने नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च करेल. हा फोन कंपनीचा पहिला नॉच डिस्प्ले असलेला स्मार्टफोन असेल जो 9,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या फोन मध्ये 19:9 आस्पेक्ट रेशियो असलेला 6.22-इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिला जाईल.

लावा झेड92 एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फोन असेल जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या हेलीयो पी22 चिपसेट वर चालेल. लावा आपला हा नवीन फोन 3जीबी रॅम सह लॉन्च करणार आहे जो 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. फोटोग्राफी साठी लावा झेड92 च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला जाईल तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल.

लावा झेड92 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दिला जिळ तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करेल. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,260एमएएच ची बॅटरी दिली जाईल. लावा झेड92 पुढील आठवड्यात इंडियन मार्केट मध्ये येई आणि कंपनी आपला नवीन फोन ऑफलाइन रिटेल स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here