एलजी ने सादर केली नवीन स्मार्टफोन सीरीज, एक साथ लॉन्च झाले तिन शानदार स्मार्टफोन

कालच आम्ही टेक कंपनी एलजी बद्दल बातमी दिली होती ज्यात एलजी क्यू7 स्टाइ​लस प्लस स्मार्टफोन ग्लोबल सर्टिफिकेशन्स वर लिस्ट झालेले दाखवले होते. तर आज कंपनी ने आपली नवीन स्मार्टफोन सीरीज ‘क्यू स्टाइलस’ अधिकृतपणे लॉन्च केली आहे. एलजी ने आपल्या या नव्या स्मार्टफोन सीरीज अंतर्गत एक साथ 3 डिवाईस लॉन्च केले आहेत. कंपनी ने क्यू स्टाइलस, क्यू स्टाइलस+ आणि क्यू स्टाइलस ‘ए’ अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केले आहेत जे आगामी काळात वेगवेगळ्या बाजारांत सेल साठी उपलब्ध होतील.

एलजी क्यू स्टाइलस सीरीज च्या तिन्ही स्मार्टफोंस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता तिन्ही स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 6.2-इंचाच्या फुलएचडी+ ​फुलविजन बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आले आहेत जे 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतात. एलजी चे सर्व नवीन डिवाईस एंडरॉयड 8.1.1 ओरियो आधारित आहेत जे वेगवेगळ्या गीगाहट्र्ज स्पीड वाल्या आॅक्टा-कोर प्रोसेसर वर चालतात.

एलजी क्यू स्टाइलस आणि क्यू स्टाइलस ‘ए’ कंपनी ने 3जीबी रॅम सह सादर करण्यात आला आहे तर क्यू स्टाइलस+ मध्ये 4जीबी रॅम मेमरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे क्यू स्टाइलस आणि क्यू स्टाइलस ‘ए’ कंपनी ने 32जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे तर क्यू स्टाइलस+ 64जीबी इंटरनल मेमरी सह येतो. या तिन्ही स्मार्टफोन ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 2टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता क्यू स्टाइलस ‘ए’ च्या बॅक पॅनल वर 13-मेगा​पिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर क्यू स्टाइलस आणि क्यू स्टाइलस+ मध्ये 16-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा आहे. त्याचप्रमाणे क्यू स्टाइलस ‘ए’ मध्ये सेल्फी साठी 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. तर क्यू स्टाइलस आणि क्यू स्टाइलस+ वेगवेगळ्या बाजारांत 8-मेगापिक्सल किंवा 5-मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा सह लॉन्च केला जाईल.

एलजी ने क्यू स्टाइलस आणि क्यू स्टाइलस+ आईपी68 रेटिंग सह सादर केले आहेत ज्यामुळे हे पाणी व धूळ रोधक बनतात. कंपनी ने हे तिन्ही स्मार्टफोन स्टाइलस पेन सह सादर केले आहेत. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअप साठी यात 3,300एमएएच ची बॅटरी आहे. एलजी चे हे तिन्ही स्मार्टफोन वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या बाजारांत सेल साठी उपलब्ध होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here